गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ३

आधीच्या भागाची लिंक- गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग २

सखी आणि ती व्यक्ती काही क्षण एकमेकांना पाहत राहिल्या..
आणि सखीच्या तोंडून अस्फुट किंकाळी फुटली…आणि ती म्हणाली
तू? तू कसा इथे?
ती व्यक्ती ही एक पाऊल पुढे आली आणि म्हणाली
चल…आपण बाहेर जाऊन बोलूयात…
समर ही विचारात पडला.. सखी कशी काय ओळखते  ह्याला??
सखी… प्लीज शांत हो… मी सगळं सांगतो… पण मला वचन हवयं तू घरी काहीही बोलणार नाहीयेस..आणि इथे ही..
सखी नीं फक्त एक स्माईल दिली ..
ती व्यक्ती होती विहान… सखीचा मोठा भाऊ…
समर चे वडील आणि विहान आता एकत्र बिझनेस करत होते… विहान नीं मुंबईच घर कायमच सोडलं होतं.. …

झालं असं की सखीची आई कॅन्सर नीं ग्रस्त होती आणि म्हणूनच तिचं आजारपण मुलांना कळू देऊ नये या तिच्या इच्छेखातर, सखी आणि विहान दोघांनाही शिकायला पाचगणी हॉस्टेल ला ठेवलं होतं.. विहानच्या मॅचेस नेमक्या मुंबई ला होत्या… त्याने वडिलांना कळवलं देखील होतं… पण कामाचा बहाणा करून ते येऊ शकत नाहीत असा निरोप आला..
मॅच संपल्यावर त्याचं हॉटेल च्या रूफ टॉप club मधे या टीन एज ग्रुप ला party होती आणि नेमकं त्याचं हॉटेल च्या लॉबीत  आडनेड्या वयातल्या विहान नीं आपल्या वडिलांना एका बाई बरोबर पाहिलं..
मनावरचा आघात आणि मित्रांसमोर झालेली नाचक्की त्या कोवळ्या वयाला झेपली नाही… त्यानी वडिलांशी संबंध तोडले आणि त्याचं महिन्यात त्यांची आई  गेली आणि शालेय शिक्षण संपल्यावर तो त्याच्या आजोळी बंगळूर ला आला… पैशाचा प्रश्न नव्हता पण बाप लेकाच नातं तुटलं ते कायमचंच…
सखी लहान होती आणि तिचं आणि तिच्या वडिलांचे नातं खूपच घट्ट होत… म्हणूनचं सखीच्या वडिलांनी सखीची आजारी आई गेल्यावरही त्याचं बाई बरोबर  live inn मधे राहण्याचा पर्याय निवडला होता..
सखी ही आता तिच्या वडिलांना कामात मदत करु लागली… एक दिवस एका कॅम्पस इंटरव्यू मधे निशांत चिटणीस ची निवड झाली आणि त्याने सखीचा फॅमिली बिझनेस जॉईन केला…
या दरम्यान तिचा मोठा भाऊ आणि ती बंगळूरला चं भेटत असत…
पण तो आणि हा भेटलेला समर ओळखीचे निघतील असं तिला स्वप्नात ही वाटलं नाही…
आजही विहान नीं तिला त्यांचं नातं कुणालाही सांगू नकोस अशीच विनंती  केली कारण ऑटोमोबाईल च्या या बिझनेस मधे विहान आणि सखी एकमेकांचे rival होते…
आता ते दोघे परत समर च्या रूम मधे आले..
आणि विहान नीं ती एका कॉलेज फ्रेंड ची बहीण असल्याच सांगितलं…
ओह्ह… एवढंच ना… मग ते तर इथे ही बोलू शकला असता.?
अरे आता तो मित्र आणि माझं पटत नाही soo.. विहान नीं सारवा सारवं केली…
समर ची डोक्याची जखम ही अजून ठणकत होती त्यामुळे त्यानं  ही फारसा ताण नं घेता विषय तिथेच सोडला..
बाहेर आल्यावर सखी ला विहान नीं खाली कॅन्टीन मधे नेलं… कॉफ़ी घेत तिची चौकशी केली…
निशांतचं वागणं आणि तिची झालेली फसवणूक तिने विहान ला सांगितली…नुकत्याचं हार्ट ब्रेक झालेल्या सखी ला पाहून विहान नीं तिला डोक्यावर थोपटलं आणि बिल देत उठून जाताना सांगितलं…
आता तरी डोळे उघडे ठेवून वाग… आजूबाजूची माणसं विश्वास ठेवण्याइतकी जवळ करू नकोस.. जीव लावू नकोस ..
आणि आज इथेच रहा.. उद्या जा.. समरशी बोलतो मी..
विहान नीं समर ला सखीची सोय घरी करायला सांगितली आणि तो निघून गेला… पहाटे त्याला चेन्नई ची फ्लाइट पकडायची होती आणि ती ही समर च्या वडिलांबरोबर जे आज त्याच्याच घरी काही क्लायंट बरोबर पार्टीत व्यस्त होते.. हार्ट पेशन्ट असल्याने शशीनीं विहान ला कळवले..

ती ही फ्रेश होऊन पुन्हा समर च्या रूम मधे आली …

सॉरी… माझ्यामुळे आज तुमचा अपघात झाला … खरचं सॉरी..
Its ok मॅडम.. By the way मी समर….hii
Hello मी सखी… दोघांनी हात मिळविले आणि तिने निरोप घेतला..
मला निघायला हवं..
मला मुंबईला पोचायचंय…
बाय…
थांबा ना… समर पटकन म्हणाला…
आता तसाही उशीर झालाय.. तुम्ही प्लीज उद्या सकाळी जा हवंतर.. विहान नीं ही सांगितलं मला.. प्लीज थांबा..
हो पण मी इथे हॉस्पीटल मधे कशी राहू? मी बघते हॉटेल मधे सोय.. सखी ला अजूनही अवघडल्या सारखं होत होतं..
एक मिनिटं… त्या पेक्षा माझ्या घरी आराम करा.. माझी आई ही आहें घरी… शशी तू यांना माझ्या बंगल्यावर ड्रॉप करून ये…
सखी नं घड्याळ पाहिलं.. रात्रीचे 11 वाजून गेले होते…
आता हॉटेल शोधणं ही अवघड होतं तिने झटकन त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला..
Ok थँक्स… जाते मी तुमच्या घरी… (विहानच्या बोलण्यातून समर आणि त्याच्या घरचे लोक म्हणजे सज्जन लोकं होती..त्यामुळे तिने त्याच्या घरी जायचा निर्णय सहज घेतला )
समर नीं घरी फोन करून आईला सखी येतं असल्याची कल्पना दिली…

सखी घरी पोचली तेव्हा तिच्यासाठी ताट वाढून तयार होतं.. मोजकंच जेवून ती निजायला गेस्ट रूम मधे गेली…
आलिशान रूम होती ती..
सखी ही सुखवस्तू कुटुंबातील होती पण इथे तर साक्षात लक्ष्मी पाणी भरत होती..
या घरात इतकी श्रीमंती असूनही मायेचा ओलावा जाणवत होता… अगदी निजायला जाण्यापूर्वी समरच्या आईनं जातीने चौकशी केली तिची… एकीकडे निशांत चं वागणं आणि दुसरीकडे  नुकत्याच भेटलेल्या समरचं आणि त्याच्या घरच्यांच वागणं… आणि त्यात दादाची भेट… सगळचं स्ट्रेस फुल्ल झालं होतं.. मिक्स फीलिंग्स.
या त्राग्यामुळे तिचा पहाटे डोळा लागला…

********
सखी आणि शशी गेल्यावर समर नीं त्याचा फोन उघडला… आजचं संध्याकाळी तिचा काढलेला फोटो त्यानं झूम केला..
ती वेळ ते आत्ता पर्यंत सखी समोर असलेली वेळ… ह्या सगळ्या घटनांची मालिका एखाद्या चित्रपटासारखी त्याच्या  डोळ्यासमोर तरळली..
पण मगाशी पाहिलेली सखी.. आणि आता जाताना पाहिलेल्या सखीच्या डोळ्यात दुःख दिसलं…. अगदी स्पष्ट.. आणि त्याला मात्र दाटून आलं..तो तिच्याच विचारत निजला..
*******

दुसऱ्या दिवशी गजर लावुनही सखीला लवकर जाग आली नाही…जेव्हा उठली तेव्हा 8 वाजून गेले होते…. तिने उठून स्वतः चं आवरलं आणि बॅग घेऊनच ती बाहेर आली..
डायनींग टेबल वर समर ची आई बसलेली दिसली..
ये… सखी बेटा .. बस.
नको मॅडम….निघते मी…
मॅडम नाही काकू म्हण..
Thanks…. बरं येऊ मी आता … निघते… आणि काल राहायची सोय केल्याबद्दल खूप थँक्स…
थँक्स काय… तू आमच्या समर चा जीव वाचवलास… तुझे आभार कसे मानू?
खरंतर i am सॉरी काकू…प्लीज माझे आभार नका मानू.. हा अपघात माझ्यामुळेचं झाला त्यामुळे मी जे काही केलं  ते माझं कर्तव्य चं होतं…
खरचं सॉरी.. सखी नं प्रामाणिकपणे कबूल केलं .
मला खूप आवडलीस तू… समरच्या आईनं हसून सांगितलं..
आँ?? म्हणजे?? बावचळून सखी नं विचारलं…
जितकी दिसायला सुंदर आहेस तितकीच मनानं ही सुंदर आहेंस.. प्रामाणिक आहेस… मला कालच शशी कडून सगळं कळलं होतं..
सखी तशीच शांत उभी होती..
इतक्यात समर आला…
हाय मातोश्री… गुड  मॉर्निंग ग…
अरे… तू आलास पण…ये… ये… आता बरं वाटतंय ना? आईनं जवळ आलेल्या समरच्या तोंडावरून हात फिरवून म्हणाला..
हो  आई…. बघ ok आहें मी…
पायाला थोडं लागलयं पण आठवड्या भरात होईल नॉर्मल… आता सकाळी काही टेस्ट करून डॉक्टरांनी लगेच डिस्चार्ज दिला.. समर सखी कडें च पाहत राहिला.. बेज रंगाच्या कॉटन पॅन्ट वर कॉफ़ी रंगाचा टॉप आणि कानात रिंग्ज इतक्या elegant लुक मधली सखी खूपच क्युट दिसत होती… Missing होती ती फक्त स्माईल… कालची वाली  ….
बरं..ये बस.. नाश्ता करा दोघे ही…
बस सखी…
सखी हा आग्रह टाळण अशक्य होतं..
समोर पितळी थाळे.. त्यावर केळ्याचं पानं आणि त्यावर खास दक्षिण्यात बेत… वाफाळती इडली,आप्पे पितळी वाटीत सांबर आणि शुभ्र चटणी…
सखी शी गप्पा मारत तिघांचा नाश्ता झाला आणि जाताना सखी नं काकूंना नमस्कार केला.. तिच्याही तोंडावरून हात फिरवत… लवकर परत ये.. भेटायला.. म्हणाल्या ..
सखी ला ती आत्मीयता खूपच भावली  ..
पाय दुखत असूनही आणि ती नको म्हणत असूनही  समरं गाडी पर्यंत सोडायला आला.. त्यानं गाडीचं दारं उघडलं…तीच कालची आलिशान  गाडी…porsche…
क्षणभर तिला कळेचना… तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं… अनोळखी असूनही खूप आपलासा वाटला.. तिचं तिलाच कळलं नाही पण त्याच्या गहिऱ्या डोळ्यात हरवली ती ..
मग भानावर येतं ती गाडीत बसली… इतक्या वेळानी तिला जाणवलं की त्याचा नंबरच नाही घेतलाय… तिने आपणहून फोन नंबर मागितला आणि त्यानंही झटकन दिला …
Take care… पोचलीस की कळव म्हणत त्यानं निरोप दिला…
आता मात्र त्याला उगाचच तिच्या डोळ्यात तो कालचा आनंद गवसल्याचा भास झाला…
##सखी पुन्हा समर ला भेटेल?
##सखी आता निशांतच्या बाबतीत काय निर्णय घेईल?
##विहान आणि सखी चं सत्य समोर आलं तर?
क्रमश:
©®मनस्वी

पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ४

Image by efes from Pixabay 

3 thoughts on “गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!