गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ४
आधीच्या भागाची लिंक- गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ३
सखी एअरपोर्ट पोचली आणि तो पर्यंत समर चा एक msg आला…
Bon voyage… तुझं तिकीट काढू नकोस..ते फक्त कलेक्ट कर… काळजी घे..
तिने रिप्लाय केला… Pls तुझे account details कळव, मी करते trf तुला..
त्याचा पुन्हा मेसेज… Btw(by the way ) ते पैसे विहान नीं दिलेत मी नाई..😜
सखी ह्यावर काहीच रिप्लाय करु शकली नाही..
दादाला पैसे देण्याइतकी ती मोठी नव्हती ना..
पण त्यामुळे इकडे मजनू दुखावला गेला, त्याच्या डोक्यात भलतेच विचार 🤣 …. विहानला सखी आवडली असेल तर 🙄…
आणि तो ह्या विचारात असतानाच विहान चा msg…
थँक्स सखी साठी एवढं केल्याबद्दल…
आता तर विहान अचानक व्हिलन च वाटू लागला स्टोरी चा बर त्यात भरीस भर सखीचा कॉल..
थँक्स… तुला आणि विहान ला… माझी फ्लाइटची वेळ झालीये… बाय..
सखी… यार ही पण… हिला एवढंही कळू नये…
मग समर स्वतःशीच बडबडत त्याच्या रूम मधे बसून खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाकडे पाहत राहिला…
उगाचच एक विमान जाताना पाहून त्यात सखी असेल… असं वाटून गेलं…
इकडे टेक ऑफ घेतलेल्या विमानाच्या खिडकीतून सखी बंगळूर शहर न्याहाळत होतं…
काल रात्रीचं शहर आणि आज ची सकाळ यात किती काय काय घडून गेलं होतं…
तिने खिडकीतल्या काचेवर हात ठेवला आणि काही क्षणांत तिचं विमान ढगांच्या दुलईवरून पुढे सरकू लागलं..
***
निशांत चिटणीस, सखी पोचण्याआधीच मुंबईला परतला होता… रातोरात..
आणि सखीच्या वडिलांबरोबर नाश्ता करत होता…
त्यानं अशी काही कहाणी रंगवली की सखी ला आल्यानंतर तिच्याच वडिलांनी फैलावर घेतलं…
कुठे निघून गेलीस? आणि निशांत ला भेटायला गेली होतीस ना? मग त्याला न कळवता परस्पर कुठे गायब झालीस? किती काळजीत आहें तो… सगळ्या मिटींग्स कॅन्सल करून तुला भेटायला आलाय तो परत…
सखी ने एक जळजळीत कटाक्ष टाकला निशांत कडें आणि ती बॅग घेऊन बेडरूम कडें गेली…
निशांत उठून तिच्या मागे जाणार इतक्यात त्याला एक कॉल आला आणि नाईलाजाने त्याला तो घ्यावा लागला…
दारं जोरात आपटल्याचा आवाज घुमला.. आणि सखी चे वडील ही त्यांच्या रूममध्ये निघून गेले… बोलत बोलत निशांत खाली पार्किंग मधे आला आणि एकवार सखीच्या बेडरूम कडें पाहत त्याने सुस्कारा सोडला…
त्याने गाडी काढली आणि तो निघून गेला…
सखी मात्र आल्यापासून उशीत डोकं खुपसून बसली होती… रडायला ही येतं नव्हतं पण संतापानं डोळे भरून आले होते…
निशांत ची निवड साफ चुकली हे मनोमन पटलं आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला .. बॅग आल्या आल्या रूम च्या कोपऱ्यात भिरकावली होती त्यामुळे उठून फोन घेई पर्यंत कट झाला…
समर चे 3 मिस्ड कॉल्स…
सखी ने डोळे पुसत कॉल लावला..
Hii… सॉरी घरी आले आताच… फ्रेश होतं होते…
बोल…
काही नाही ग पोचलीस ना वेळेवर.. प्रवास ok ना? समर तिचा अंदाज घेत बोलत होता..
हो हो all ok… बरं पुन्हा एकदा तुला आणि विहानला खूप खूप थँक्स…
बाय..
बर बाय… समर नी नाईलाजाने फोन कट केला..
सखी ने चेंज केलं आणि ती बेडवर आडवी झाली .. कालपासून चे सगळे क्षण एखाद्या पिक्चर सारखे डोळ्यासमोरून सरकू लागले… आणि गाडी अडली त्या स्पेशल व्यक्ती वर…
##सखी ला ही समर बद्दल वाटणारी ओढ जाणवेलं?
##बिझनेस मधले छक्के पंजे सखीला हाताळता येतील?
##निशांत ला आलेला कॉल कुणाचा होता?
क्रमश :
©मनस्वी
पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ५
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Pingback: गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ५ – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ५ – LekhakOnline – Excellent Marathi Articles