गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ५
आधीच्या भागाची लिंक- गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ४
निशांत नी गाडी ऑफिस कडें वळवली.. वकील आणि कंपनीच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यानं एक प्लॅन आखला .. बंगळूर ची महत्वाची बिझनेस मिटिंग मुंबईत ठरवली.. एक महत्वाचं टेंडर ओपन होणारं होतं आणि विहान ऐवजी आज समर त्या मीटिंग ला येणार होता …
निशांत आणि समर वेगवेगळ्या वेळेला मुंबई च्या ‘ताज’ ला पोचले..
हे टेंडर ज्या कम्पनीला मिळेल तिचा टर्नोव्हर कोटींची उलाढाल करणार होता..अर्थात हे डील समर आज एकटा हाताळणार होता.. पण सकाळपासून त्याला सतत, सखी ची आठवण येत होती.. मग न राहवून त्याने तिला कॉल केला पण कामात बुडालेल्या तिला कॉल ऐकूच नाही आला.
ती घरातल्या वडिलांच्या ऑफिस मधे बसून काही कागदपत्र चाळीत बसली होती. अचानक एक पेपर समोर आला आणि तो घेऊन तिने वकिलाला फोन लावला..
बराच वेळ तिची आणि तिच्या कंपनी वकिलाची चर्चा झाली. आता तिला हळूहळू निशांत च्या प्लॅन ची कल्पना येऊ लागली.. पण तरीही वकिलाला मात्र तिने तिचा संशय बोलून दाखवला नाही..
***
विहान ला आजच्या डील चे सगळे अपडेट्स त्याच्या मुंबईच्या ऑफिस कडून मिळाले होते.. आणि वेळोवेळी तो समर ला सुद्धा कळवत होता पण तरीही आजचं डील समर च्या हातून निसटण्याची शंका ही येत होती.. कुणीतरी निशांतला मदत करतंय हा संशय बळावत होता..
शेवटी न राहवून त्यानं वर्क एथिक्स मोडायचे ठरवले आणि सखीला कॉल लावला..
विहान चा कॉल??
सखी ने क्षणभर विचार केला आणि तो कॉल घेतला.. विहान नी तिला सगळं समजावून सांगितलं आणि ह्या डील मुळे समर आणि त्याच्या करिअर ला होणारा फायदा ही सांगितला.. सगळं शांतपणे ऐकून घेतल्यावर सखीने विचार करायला वेळ मागितला आणि ती वडिलांकडे गेली
बाबा..
आज जे डील होणारं आहें ते जर फिसकटलं तर किती नुकसान होईल?
बाबा 2 मिनिटं तिच्याकडे बघतच राहिले आणि तिच्या चेहेऱ्यावरचे उमटलेले वेगळे भाव टिपले आणि म्हणाले
साधारण 5 वर्षांचा टर्नोव्हर..
बर… मग मी काही ठरवलं तर तुम्ही मला साथ द्यालं??
नक्कीच देईन बेटा.. बोल काय ठरवलं आहेस?
बाबा.. कंपनीच्या भल्या साठी हे डील आपल्याला सोडावं लागेल.. सध्या इतकंच..
पण विश्वास ठेवा आज जरी हे नुकसान कागदोपत्री असलं तरी उद्या आपल्यालाच फायदा होईल..
… तिचे बाबा तिच्याकडे नुसतेच पाहत राहिले.. नकळत रक्तातून उतरलेल्या ह्या बिझनेस mindset ला तर जोखत होते.. आणि हेच त्यांना त्यांच्या लेका कडून विहानकडून अपेक्षित होतं.. जे स्वप्न आज सखी पूर्ण करत होती..
****
सखी नी विहान ला कॉल केला..
त्याला काही माहिती दिली आणि विहानचं काम झालं..
समर चा फोन वाजला.. सायलेंट करत त्यानं नाव पाहिलं.. सखी…
त्यानं झटकनं कॉल घेतला … हा बोल ग..
अरे कामात आहेस का??
हो अगं एका महत्वाच्या मिटींग साठी आलोय .. आता जरा ब्रेक घेतलाय..
बर मग अभिनंदन.. सखी हसत म्हणाली
काय?? अभिनंदन कशाला?? अजून रिझल्ट लागायचाय ह्या मीटिंग चा . त्यानं ही खुष होतं उत्तर दिलं..
लागेल उत्तम निकाल… तुझ्या बाजूनी. सखी नी त्याचा उत्साह वाढवायला म्हटलं आणि तेवढ्यात मीटिंग पुन्हा सुरु झाली..
****
सखीच्या घरी निशांत आणि त्याचा सहकारी मान खली बसले होते तिच्या बाबांसमोर आणि तिचे बाबा त्यांचा यथेच्छ समाचार घेतला.
***
ताज च्या एका रूफ टॉप रेस्तो मधे आज एक स्पेशल टेबल सजत होतं… कँडल light डिनर साठी..
A table for two..🌹🌹
आणि सखी आणि समर एका कॉफीशॉप मधे निवांत गप्पा मारत बसले होते ..
क्रमश :
©मनस्वी
पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ६
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Pingback: गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ६ – LekhakOnline – Excellent Marathi Articles