गुंतता हृदय हे…जब्त_ए_इश्क..7

जब्त_ए_इश्क..7

सखी समर ला घेऊन घरी आली.. अर्थात तिला समर बद्दल सगळं माहित असलं तरी वडिलांना तिने तिचा बंगलोरचा मित्र एवढीच ओळख करून दिली आणि रात्रीच्या स्वैपाकाच्या सूचना द्यायला ती आत गेली..
समर तिचे घर पाहत होता काही ट्रॉफीज काही मेडल्स.. तिचे बाबा त्याला काही विचारणार इतक्यात त्याला एक कॉल आला म्हणून तो उठला आणि टेरेसमधे बसून बोलू लागला…
मागून सखी आली…खुणेनचं विचारलं मी जाऊ?

त्यानं तिचा हात धरत नाही म्हणलं आणि फोन तिच्याकडे दिला.. बोल… आई बोलतिये   ..
हॅल्लो काकू.. नमस्कार
नमस्कार बेटा… कशी आहेस?
तिकडे गेलीस आणि विसरलीस का आम्हाला?
नाही काकू.. जरा.. कामात अडकले.. पण यापुढे नक्की कॉल करीन.. तुम्ही कशा आहात?
मी उत्तम.. तू कशी आहेस? समर म्हणाला मला आज डिनर ला तुझ्या घरी आलाय… Enjoy करा आणि तू ही ये नक्की मला भेटायला..
हो काकू नक्की… समर ला देते… बाय
हो दे… बाय..
तिने समर ला फोन दिला आणि तो फोन हातात घेऊन दुसऱ्या हातानी तिचा हात धरून ठेवला…
बाकी जुजबी बोलत त्यानी कॉल कट केला आणि तिचा हात अलगद सोडला..
तशी ती लाजून आत पळाली आणि तो ही तिच्या मागे किचन मधे गेला…

तिला त्याच्याशी गप्पा मारताना, हसताना पाहून तिचे बाबा मात्र खूप खुष होते…
पण प्रत्यक्षात हा कोण आहें हे कळल्यावर ते काय करतील कुणास ठाऊक!

*******

निशांत सतत त्याचा फोन चेक करत होता पण अजूनही अपेक्षित कॉल आला नाही… आणि तेवढ्यात एक कॉल आला..
बोल… निशांत नी सुरुवात केली
सर.. I am sorry.. मी दिलेली सगळी माहिती अगदी बरोबर होती पण ऐनवेळी त्या बंगलोर च्या पार्टीला आपली price कशी कळली मला नाही कळत आहें…
सर… ती फाईल तुमच्याशिवाय कुणाकडेचं नव्हती..
ठीक आहे.. निशांत अजूनही शांतपणे बोलत होता..
तू काही दिवस मुंबई च्या बाहेर रहा …
मी बोलावून घेईन तेव्हाच ये… ठेव फोन ..
Ok sir म्हणत त्या माणसानी फोन ठेवला..

आता एक msg फ्लॅश झाला… निशू…. आज रात्रीं बॉनेट बार रात्री 10 ला शार्प.. मी लोकेशन पाठवलंय..
Ok असा रिप्लाय दिला आणि त्यानी गाडी सुरु केली…
****

#मेसेज करणारी यक्ती कोण असेल?
#सखी आणि समर ला एकत्र आलेलं पाहून निशांत कसा रिऍक्ट करेल??
क्रमश:
©मनस्वी

पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय हे…जब्त_ए_इश्क..८

Image by efes from Pixabay

2 thoughts on “गुंतता हृदय हे…जब्त_ए_इश्क..7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!