पाऊस- 1
“या अल्लाह आज अचानक कैसे बारिश़़ आई” असे म्हणत पळतच जोया एका दुकानाच्या समोर भिजू नये म्हणून जाऊन उभारली.
तोच एक बाइकस्वार तरुण हेल्मेट काढून तेथे येऊन उभारला.
जोया बुरखा घालून नकाब पोश होती तिचे फक्त डोळे दिसत होते.ती अचानक आलेल्या पावसामुळे हैराण झाली होती.तोच तिथे काही टपोरी मुले आली आणि जोयाला बुरख्यात बघून शीळ घालत काही बाही गलिच्छ बोलू लागली.
तो तरुण तिथे कोणाला तरी फोनवर बोलत होता.अचानक त्याचे लक्ष त्या मुलांच्या कडे गेले.ते जोयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते.तोच याने जोरात त्यांना ओरडले पोलीसांना फोन करतो थांबा म्हणतांच ती मुले पळून गेली.
” थॅक्यू सर ” जोयाने अगदी हळू पण आतून घाबरलेल्या आवाजात म्हटले.
” अरे मी..
…मला सर काय म्हणता ओ तुम्ही .” हसतच त्याने उत्तर दिले.
… भेदरलेल्या नजरेने जोयाने त्याला बघितले.
…” अहो माझे नाव संतोष आहे.
मी सर वगैरे काही नाही हो.मला संतोष म्हणा”
…” मी जोया…
…इथे दवाखान्यात रिसेप्शनीश्टचे काम करते.आज जरा वेळच झाला मला.आणि त्यात हा पाऊस अचानक आला.”
” हो न.माझी पण जवळच आॅफिस आहे.आज या अचानक आलेल्या पावसामुळे माझी पण धांदल उडाली.आज आईचा वाढदिवस आहे आणि मी तिला सरप्राइज गिफ्ट घेऊन जाणार होतो तोच पाऊस आला”.
इतक्यात पाऊस थांबला.
” मी सोडू का तुम्हाला घरी”
….” नको..नको..
जाईन मी.पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे”.
…. दोघेही आपापल्या वेगवेगळ्या वाटांनी घरी गेले.
….जोया .
….समीर आणि शहनाज़ यांची एकूलती एक मुलगी.समीर उर्दू शाळेत शिक्षक होते आणि शहनाज़ घरात लहान मुलांना अरबी़ कुराण शरीफ शिकवित होती.
….जोया समीरच्या मित्राच्या दवाखान्यात रिसेप्शनिश्टचे काम करत होती.
बुरखा पाबंद असे परिवारातील होती.
……
… संतोष..
…. रमेश आणि शीला यांचा मुलगा.
संतोषला दोन मोठ्या बहीणी होत्या.संतोषचे वडील कपड्यांचे दुकानदार होते.आई प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या.घरामध्ये पुजा पाठ उपास अगदी काटेकोरपणे पालन असायचे.
आई वडील दोघेही शुद्ध शाकाहारी.पण संतोषने मात्र जीम मध्ये जाऊन मटण,चिकण ,अंडी खायचे सुरू केले होते.
…..
त्या दिवशी सकाळी दवाखान्यासमोर एक कार आली आणि त्यामधुन एक तरूण पळत पळतच आत आला.आणि जोरात पण घाबरलेल्या आवाजात स्ट्रेचर आणा लवकर आई…
….आई…
आई…
पुढे त्याला काही बोलायला येतच नव्हते.
…. दवाखान्यात एकच गडबड सुरू झाली. डॉ.नर्स लगेच बाहेर आले.
…” ओह,डोन्ट वरी मि.” डॉ.नीं त्या तरुणाच्या पाठीवर थाप मारत सांगितले.
आय सी यु मध्ये त्या महीलेला नेण्यात आले.
तो तरुण आणि त्याचा बरोबर एक वयस्कर व्यक्ती दोघे चिंताग्रस्त होऊन बाहेर बसले होते.जो कोणी आय सी यु मधुन बाहेर आले कि तो तरुण पळतच विचारत होता” कशी आहे आई?
काय झाले आहे तिला?”
पण त्याला फक्त मानेने आणि डोळ्यांनीच उत्तर दिले जायचे.आणि त्याला बसण्यास सांगितले जायचे.
तो तरुण खुपचं हवालदिल झाला.त्याला काही सुचत नव्हते.तो शुन्य नजरेने त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला बघत होता.तोच त्याचा फोन वाजला.एकदम घाबरून त्याने फोन उचलला आणि” हैलो……
…….
…..पुढे त्याला काही बोलायला येतच नव्हते तो फक्त आई…
…आई. म्हणतं रडत होता.
इतक्यात तिथे आय सी यु समोर बसलेला सिकिरुटी गार्ड उठून आला आणि त्या तरुणाला म्हणाला ” बाळा रडू नकोस.होईल बरी तुझी आई काळजी करू नकोस.तो वर आहे न तो सर्व चांगले करतो”
तोच आय सी यु मधुन नर्स बाहेर आली ” कोणी तरी एकजण आत या डॉ.बोलणार आहेत” हे ऐकताच ते वयस्कर उठायला लागले.त्यांना उठायला होईना पण तसेच ते उठायचा प्रयत्न करु लागले तोच ” अहो नको नको बाबा तुम्ही येथेच बसा मी जातो” म्हणत तो आत पळाला.
” डॉ.
….काय..
…कशी आहे आई..
त्याला बोलायला होईना.
” डोन्ट वरी मि.यांना हार्ट अॅटॅक आला आहे.तुम्ही लवकर आणलं बरे केले.आता उपचार सुरू केले आहेत. दोन दिवसांनी एन्जोग्राफ करुया म्हणजे किती ब्लाॅल्कस आहेत हे समजेल त्यावर ओपन हार्ट सर्जरी किंवा अॅन्जोप्लास्टी करावे हे ठरवू.शुगर वाढली आहे यांची ती जरा कंट्रोल मध्ये आणन्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही.काही काळजी करू नका”
हे ऐकताच तो तरुण आईकडे पाहत रडू लागला.
इतक्यात नर्सने औषधांची प्रिसकिप्शन दिली हे औषधे आणा लवकर .
बरं म्हणत तो डोळे पुसत बाहेर आला पण त्याला त्याच्या वडिलांना पाहून पुन्हा भरुन आले .तो त्यांच्या गळ्यात पडून एकसारखे रडू लागला.
…” अरे वेड्या लहान बाळासारखे काय रडतोस.मला नर्सने सांगितले.काही होणार नाही तुझ्या आईला.सायन्स किती पुढे गेले आहे.बघ चार दिवसांत तुझी आई चालत बाहेर येईल” अगदी जड अंतःकरणाने बाबांनीं आपल्या मुलाला म्हटले.
….तो गडबडीने बाहेर आला.मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेतली आणि आत जाऊन नर्सकडे दिली.आणि आपल्या वडिलांच्या जवळ जाऊन बसला.
….” संतोष…
…. संतोष”
आपले नाव इथे कोण घेतो आहे ते ही लेडीज एकदम दचकून त्याने मागे वळून पाहिले.तर समोर बुरखाधारी मुलगी उभी होती.
संतोष जरा गोंधळलाच.
” अहो संतोष मी जोया.
इथे कसे काय ? कोण आहे अॅडमीट?” जोया म्हटली.
” ओह साॅरी मी ..
…आई आहे आय सी यु मध्ये आहे.”
” ओह..काय झाले आईंना”
” सकाळी उठल्यावर एकदम घाम सुटला.रात्रीपण जेवण गेले नाही तिला.फक्त जळजळत आहे छातीत म्हटली आम्हाला वाटले पित्त झाले असेल कारण आज तुरीच्या डाळीचे वरण खाल्ले होते न.मग दुध पिऊन झोपली.आणि सकाळी उठल्यावर बाथरूममध्ये पडली.”
बोलता बोलता त्याचे अनगिणत अश्रु ओघळू लागले.
” डोन्ट वरी संतोष.होतील बऱ्या आई.बर हे सांगा तुम्ही काही खाल्लं कि नाही.”
” नाही..
ओह पुन्हा एकदा माफ करा तुमची ओळख करून देतो.हे माझे बाबा.बाबा या जोया.आईच्या वाढदिवसाच्या दिवशी मी सांगितले न त्या याच”
बाबांनी तिला बघून मंद हास्य केले.
” नमस्कार बाबा” जोया म्हटली.
बाबांनी हातांनी इशारा करून तिला उत्तर दिले.
” मी बाहेर आहे.काही लागले तर सांगा.” म्हणतं जोया बाहेर आपल्या कामाला गेली.
…..हे दोघे बाप लेक शुन्य नजरेने पाहत बसले होते.आय सी यु मधुन कोण येते.कशी असेल आई.या चिंतेत होते.
….” संतोष.चला मी अम्मी कडून उपमा मागविला आहे.तुम्ही दोघे नास्ता करा चला.इथे समोर जेवायला बसायची व्यवस्था आहे” जोया हातात मोठी जेवणाची बास्केट घेऊन उभी होती.
हे दोघांनाही अनपेक्षित होते.
” अरे कशाला तुम्ही त्रास करून घेतात.आम्हाला तसेही काही भुक नाही.आणि लागेल तर आणु बाहेरुन” संतोष म्हणाला.
” अहो त्यात त्रास कसला.आणि अम्मी माझी खूप छान उपमा करते.चला थंड होईल. मी प्लेट लावते तुम्ही बाबांना घेऊन या” म्हणत जोया गेली.
बाबांना हे सगळे अनपेक्षित होते.मनामध्ये कोठे तरी ही मुलगी मुस्लिम आहे.यांच्या घरचे जेवण कसे खायचे आम्ही शाकाहारी आहोत.हे कसे करावे.
संतोष बाबांच्या चेहऱ्यावरील भाव ओळखले.
” बाबा चला तुम्हाला जे वाटत आहे ते समजतो मी.पण आपण हॉटेल मध्ये जेवतो तेथे ही मुस्लिम स्वंयपाकी असतातच.आणि तुमच्या औषधांची वेळ झाली आहे.तुम्ही खाऊन घ्या मी इथून मेडिकल मधुन तुमचे आताच्या गोळ्या आणतो.चला” म्हणत त्याने बाबांचे हात हातात घेऊन हळूहळू घेऊन गेला.
उपमा ,चहा गरमागरम खाल्ल्यानंतर संतोषने त्यांना गोळ्या दिल्या.
बाबांनी पण जोयाला छान झाला आहे उपमा.म्हणत बाहेर जाऊन बसले.
” बरं बसा तुम्ही बाबा मी जाते माझे काम आहे.हा माझा फोन नंबर घ्या संतोष.काही हवे असेल तर फोन करा.मी येईन”
म्हणतं जोया बाहेर गेली.
संतोषने आपल्या दोन्ही बहीणींना फोन केला . दोन्ही बहीणी रडू लागल्या.दोन्ही मुली परदेशी असल्यामुळे खुपचं खंत व्यक्त करत होत्या.
जितक्या लवकर होईल तितक्या लवकर निघण्याचा प्रयत्न करणार आम्ही असे सांगितले.
… दिवस भर औषधे आणने, डॉ.ना भेटणे.नर्सला आईची प्रकृतीची विचारपूस करने या धावपळीत गेला पण या मध्ये जोयाने एका घरच्या सदस्या सारखे जेवण,चहाची व्यवस्था आपल्या घरातून केली.
…..” बरं मी जाते घरी माझी ड्युटी संपली.उद्या येईन.पण जरी काही जरुरत असेल तर फोन करा.सकाळी येतेवेळी नास्ता घेऊन येईन.बाबा तुम्ही घरी जाऊन झोपा.इथे कोणी एकानेच राहावे.तुम्ही नको इथे ” जोयाने म्हटले.
” नको बाळा घरात झोप लागणार नाही.एकटा असलो कि मन आणखीन उदास होते.इथेच झोपेन मी कोठेतरी .आणि हो तु आमच्या जेवणाची काळजी करू नकोस.संतोष आणेल काही तरी.आजच खुप उपकार झाले ग तुमचे”
” नको बाबा उपकाराची भाषा बोलू.त्यादिवशी संतोष मुळे मी वाचले.नाही तर त्या मुलांनी न जाणे माझ्या बरोबर काय केले असते.त्या उपकाराची परतफेड करत आहे असे नाही.तर माणुसकी म्हणून आम्ही करतो”
…..
…..आज आईची शुगर नॉर्मल आली.आता अॅन्जोग्राफी केली.दोन ब्लॉक होते.एक ९० %आणि दुसरा ५७% होता.
डॉ.नीं अॅन्जोप्लास्टी करायचा निर्णय घेतला.
…हे दोघे बाप लेक देवाजवळ प्रार्थना करत बसले.
….. डॉ.नीं सांगितले ” संतोष.गुड न्युज प्लास्टी सक्सेस झाली.आता तुमच्या आई लवकरच बऱ्या होतील.काळजी करु नका”
दोघे बाप लेक खुश झाले.जोया पण खुश झाली.
आज आईंनां आय सी यु मधुन रुम मध्ये शिफ्ट केले.
संतोष आणि त्यांचे वडील दोघेही आई समोर बसले.आईला बघुन संतोषने आपल्या अश्रुंना तिथेच अडविले.बाबा पण आपल्या पत्नीला बघत जरा आतून आवंढा गिळून गप्प बसले.तोच तिथे जोया आली.
” नमस्कार आई कशा आहात.आता घाबरायचे कारण नाही.आता आराम करायचे.
अरे मी बावळटच आहे माझी ओळख करून दिली नाही.मी जोया या दवाखान्यात रिसेप्शनिस्टचे काम करते.”
हे बोलत असताना संतोषने मध्येच म्हटले” आई तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी सांगितले न ती हिच मुलगी.इथे तिने मला ओळखले मी नाही ओळखू शकलो.ही अशी बुरखा पाबंद असते कसे ओळखणार मी”
” हो रे बाळा” आईंने एकदम बारीक आवाजात म्हटले.
” हो आता जास्त ताण पडेल असे बोलू नका आई.झोपा तुम्ही मी आहे बाहेर काही लागले तर हे बटण दाबा मी येईन” जोया म्हटली.
आईंना जेवण दवाखान्यात दिले जायचे.
” अरे संतोष तुम्ही काय आणि कोठे जेवता रे दोघे जण” आईने काळजीने विचारले.
” तु काळजी करू नकोस आई.तो वर आहे न तो व्यवस्था करतो आमची रोज” संतोषने आईला सांगितले.
…..
…आज आईचा डिस्चार्ज होता.संतोष सकाळपासून बिलचे पैसे,औषधे या गडबडीत होता.बिल पे केले.
” आई चल आता आपण आपल्या घरी जायचे.” आनंदाने संतोषने आईला म्हटले.
” अरे संतोष जोयाला आपल्या घरचा पत्ता दे बाळ.तिला फोन नंबर दे रे म्हण तिला घरी.पोरीने खुप मदत केली आपली कोण करते रे . खरंच खुप चांगले संस्कार केले आहे तिच्या आई वडिलांनी तिच्या वर” बाबा म्हटले.
” हो बाबा देतो तिला पत्ता आपल्या घरचा.चला तुम्ही हळूहळू बाहेर.कॅब बुक केली आहे.येईल इतक्यात.”
” अरे झाली तयारी निघायची.आई काळजी घ्या.आणि हो आराम करा हो.काही हवे तर मला फोन करा.आहे माझा नंबर संतोष जवळ.चला मी हात धरते तुमचा.संतोष तुम्ही चला मी आणते आईंना बाहेर” जोयाने म्हटले.
हळूहळू जोया आईंना घेऊन बाहेर आली.कॅब उभी होती.कॅबचा दरवाजा उघडला आणि एकदम जोरात हवा सुरू झाली तोच जोयाच्या तोंडावर असलेला नकाब उडाला आणि संतोषने एकदम तिच्या कडे पाहीले आणि तो पाहतच राहिला.इतके सुंदर कोणी असु शकतो हे त्याला पटतच नव्हते.इतके दिवस तिचा फक्त आवाज ऐकत होता आज तिला पाहीले.आणि पाहतच राहीला.
” सर प्लिज जल्दी बैठीए.” कॅब ड्रायव्हरच्या आवाजाने संतोष दचकलाच.
… क्रमशः
Image by Jiří Rotrekl from Pixabay
- घटस्थापना.. - July 29, 2021
- सुहासिनी - June 15, 2021
- कन्या दान - May 8, 2021