गुंतता हृदय हे…जब्त_ए_इश्क- 9
स्थळ: विहान ची हॉटेल रूम…
शनाया शी बोलतानाच त्याला शर्मा चा कॉल आला होता.. शर्मा हा विहान चा मित्र पण सध्या निशांत ला assist करत होता त्याचा फायनान्स कन्सलटन्ट म्हणून… त्यानं सांगितलेली माहिती आणि पाठवलेला एक फोटो शॉकिंग होता… क्षणभर विहान ला वाटून गेलं… किती बर झालं.. मगाशी शनायाचा कॉल कट केला…
पण शनाया… का फसवतीये आपल्याला.. किती मनापासून प्रेम करतोय…उद्या खरंतर प्रोपोज करणार होतो..
खरंच नशीब म्हणूनच वाचलो… पण शनाया कडें आपल्या डीलची कागदपत्र आली कशी.?
शर्मा ला मिळालेल्या माहितीनुसार शनायाकडें महत्वाची माहिती होती पण अद्याप शर्मा ला निशांत आणि शनाया असा एकत्र संशय ही आला नाही आणि तसा काही पुरावा मिळाला नाही..
पहाटे5 ची फ्लाईट होती… बंगलोर ला जावं लागणार होतं… त्यानं सखी ला msg केला.. तिच्या कानावर आता गोष्टी घालाव्या लागणार होत्या…
ती online दिसली… तसं त्यानं कॉल लावला…
हा बोल दादू…
जागी कशी?
असचं… रे
ओह्ह luv बर्डस 😜
गप रे…
बर बोलता येईल का? विहान जरा अस्वस्थ झाला
दादा… बोल.. आवाज का असा येतोय? सखी ला ही जाणवलं ..
ऐक… म्हणत त्यानं सखी ला मगाचचा कॉल सांगितला, एक फोटो पाठवला आणि तो अपलोड झाला आणि सखी ने पाहिला…
ती विचारात पडली… हा चेहरा पाहिलंय कुठे?? आठवत का नाहीये??
विहान नि तिला शर्मा ला चं भेटायला सांगितलं होतं.. काही महत्वाची कागदपत्र तिला घ्यायला सांगितली आणि तो गजर लावून निजला..
*******
सखीला विहानचा कॉल चांगलाच अस्वस्थ करून गेला…
एवढ्यात समर चे 20 msg येऊन पडले होते…
तिला हसूच आलं… काय हा मुलगा? शेजारच्या खोलीत आहें तरी इतका वेडेपणा..
ह्म्म्म सखी बाई… हे येडू आता आयुष्यभर सांभाळायचं 😜🤣🤣
असा विचार मनात आला आणि सखी ही निजली हसत हसत…
******
एकीकडे सखीचा विचार करत असतानाच समर फेसबुक चेक करत होता… एक नवी फ्रेंड request….
शनाया…
एकदा तिची प्रोफाइल पाहिली आणि नंतर बघू म्हणत तो ही निजला..
*****
निशांत मात्र अस्वस्थपणे त्याच्या टेरेसवर बसून ice burst ओढत होता… आणि सखीचा बापाला फसवून कम्पनी चा मालक व्हायची स्वप्न बघत होता…
कधीतरी सखी चा चेहरा यायचा डोळ्यासमोर… पण शनाया वर प्रेम असल्याने त्याला सखीत कधीच रस वाटला नाही…
तूर्तास त्याला सखी बिझनेस मधे बापा बरोवर उतरलीये याची कल्पना ही नव्हती…
****
दुसऱ्या दिवशी समर ला एअरपोर्ट ला सोडून सकाळी सखी शर्माला भेटायला गेली.
जुजबी बोलणं झालं आणि सखीन तिच्या जवळची एक फाईल त्याला दाखवली… खूप वर्षांपासून निशांत तिच्या कम्पनीतुन एक ठराविक रक्कम बाहेर काढत होता… सगळं तपासल्या वर शर्मा नि डोक्याला हात लावला… नुकसान काही कोटींच्या घरात होतं..
सखीनं त्याला तिच्या आणि विहानच्या प्लॅन मधे घेतलं…
आणि कंपनी तर्फे निशांत ला परफॉर्मन्स आणि बिझनेस वाढवण्यासाठी काही अधिकार दिले.. अर्थात मूळ कागदपत्रात मधे मधे काही मुद्दे असे काही घुसवले जेणे करून तो जुना तोटा भरून निघेल…
शर्मा नि कागदपत्रे तयार केले असल्यामुळे निशांत नेही फार नं तपासता सह्या केल्या…
आज अजून एक डील होतं… जिथे निशांत आणि विहान बंगलोर ला भेटणार होते… अर्थात शनाया नि आज ही खूप प्रयत्न केला आणि शेवटी तिला यश मिळालं… निशांत ची फाईल मिळवाण्यात…
(अर्थात त्यातली माहिती ही खोटीच होती जेणेकरून ती माहिती निशांत ला पोचवली जाईल आणि त्याचं नुकसान होईल )
विहान दिवसभर शनाया बरोबर फिरत होता… तिला एकटीला तेव्हाच सोडलं जेव्हा डील मीटिंग सूरु व्हायला अगदी थोडाच वेळ उरला होता आणि नेमका निशांत जाळयात अडकला… आज ही अपयश… त्यात आपलीच माशुका त्या विहान च्या मिठीत…. सगळंच असह्य होऊन त्यानी राडा घातला…
आणि शनायानि तिथून पळ काढला…
****
सखीच्या बाबांनी सखी ला समोर बसवून समर च्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगितला..
एकीकडे विहान तिला इथे काय घडलं ह्याचे अपडेट द्यायला सतत फोन करत होता… दुसरीकडे निशांत साठी जाळं लावायला सखी धडपडत होती… आणि तिथून सटकलेल्या शनाया नि समर ला कॉन्टॅक्ट करून तिच्या ब्रँड च्या कॉलॅबरेशनसाठी त्याची वेळ मागून घेतली…
आता नवा बकरा समर…. विहान चा बॉस… आणि तिला खुणावत होता… त्याचा पैसा!
#शनाया ला यश मिळेल?
#विहान आणि निशांत आमनेसामने… आता?
#सखी वडिलांपासून सत्य लपवू शकेल समरचं?
क्रमश :
©मनस्वी
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Baap re….
🤭🤭🤭 thank you
Pingback: गुंतता हृदय हे…जब्त_ए_इश्क..10 – LekhakOnline – Excellent Marathi Articles