पाऊस.. ..भाग..३..

” अरे..

… संतोष. .

तुला वेड गिड लागले आहे का रे.अरे आम्ही कोण.आणि संतोष म्हणजे.

माझेच चुकले, माझ्या आई बाबांचें मी ऐकले नाही आणि जोयाला शिक्षण दिले तिला नोकरी करायची परवानगी दिली.तेही तुझ्या वर विश्वास ठेऊन. पण तु..

…तु तरी तिला समजावयास होते न.ती चुक करत आहे.हे आपल्या समाजात होणे शक्य नाही.अरे मी एक शिक्षक आहे मग माझी मुलगी असे केल्याने माझ्या वर कोणी पालक विश्वास करणार नाही”

” अरे काही तरी मुर्खासारखे बडबडू नको.जोया आणि संतोष यांचें प्रेम पवित्र प्रेम आहे.जर यांना लग्न करायचे तर ते आताही करू शकतात पण ते तुमचा विश्वासघात करणार नाही.तुम्ही संमती दिली तरच करणार आहेत.

अरे खरंच मुलगा खूप चांगला आहे.त्याचे आई वडील ही चांगले आहेत.मी भेटलो होतो त्यांना.बघं विचार कर .मुलांचीं मने जुळली आहेत.’

” नाही नाही हे शक्यच नाही.मी आताच गावी जाऊन माझ्या चुलत बहिणीच्या मुलाबरोबर  जोयाचे लग्न ठरवून येतो.

आणि हो आज पासून तुझी माझी मैत्री तुटली.मेहरबानी होईल जर तु पुन्हा इथे न आला तर”

……

…जोयाची अम्मी आतुन सगळे ऐकत होती.तिला आपल्या नवऱ्याच्या रागाने घाबरून घाम सुटला होता.

….” जोया..

…जोया…

………..जोया…

बाहेर ये…..

जोरजोरात जोयाचे अब्बु ओरडू लागले.

…..” न…

…. नाही…जोया

अजून आली नाही.” घाबरत घाबरत अम्मीनें म्हटले.

हे ऐकून अब्बुंना राग अनावर झाला.ते गडबडीत तिला आणण्यासाठी बाहेर पडले तोच जोया आली.

तिला पाहून आज पहिल्यांदाच त्यांनीं तिच्या वर हात मारण्यासाठी उगारला पण अम्मीने पळत पळत जोयाला आपल्या जवळ खेचले.

….” तुझ्या मुळे ही बिघडली.घराबाहेर नको म्हटले तर तुझ्या मुळे नोकरी साठी पाठविले.पाहीलेस काय दिवे लावले.सकाळीच जाऊन लग्नाची तारीख फिक्स करून येतो.तु तयारीला लाग.आणि हो आजपासून हिचे घराबाहेर पडणे बंद.बाहेर पडली तर पायच तोडतो.”

दोघीं मायलेकी घाबरून आत गेल्या.जोया रात्र भर रडत होती.तिने संतोषला मेसेज करून सगळे सांगितले.संतोषला फार वाईट वाटले.त्याने त्याच्या ताईला बोलावून सांगितले.” ताई तु सकाळी जोयाच्या घरी जाऊन तिला भेटून ये प्लिज.”

” नाही नाही मी जाणार नाही”

कधी एकदा रात्र संपते असे संतोषला झाले.

… सकाळी तो लवकरच उठला.

….” आई..बाबा..

…. तुम्हाला मला काही तरी सांगायचे आहे.”

” हो बोल बाळा” आई आता जरा तिची प्रकृती चांगली झाली होती.ती म्हणाली ” काय हवंय का तुला बाळा”

” नाही ..

…मला नको काही.पण…

…..मी ….

…..मला…

” अरे काय हे.स्पष्ट बोल.” बाबा म्हणाले.

…” हां…

हो…संतोषने बोलता बोलता एक ग्लास पाणी प्याला.तोंड रुमालाने पुसुन बोलायला सुरुवात केली” आई.मी एका मुलीवर प्रेम करतोय आणि तुमची दोघांचीं परवानगी असेल तरच आम्ही लग्न करणार आहोत नाही तर आजन्म अविवाहित राहीन मी”

… आई-बाबांना एकदमच हे अगदी अनपेक्षित होते.दोघेही अवाक होऊन पाहू लागले.

ताई पण गप्प उभी राहिली.

….” बरं

कोण आहे रे मुलगी.कोणाची आहे.सगळे सविस्तर सांगितले तर बरे होईल.असे एकदम सांगितले तर आम्हाला काय आणि कसे कळेल बाळा” बाबा म्हणाले.

..मग संतोषने जोया विषायी  सगळे सांगितले.हे ऐकून आई बाबा दोघेही गप्प बसले.त्यांना काय बोलावे हेच सुचेना.

इतक्यात बाबा म्हणाले” अरे संतोष हे बघ जोया खरंच खुप गोड आणि गुणी मुलगी आहे.ती ज्या घरात जाईल ते घर स्वर्ग बनवेल.

पण…

….पण..अरे आपण आणि ती दोघेही वेगवेगळ्या समाजाचे.आपले राहणीमान, खानपान सगळेच वेगळे.आणि आपणास मान्य असले तरी तिच्या घरच्यांनी मान्य केले पाहिजे.त्यात तुझ्या दोन्ही बहीणींना याचा त्रास होईल त्यांच्या सासरी.बघ विचार करून.तुझ्या चुकीचे निर्णय किती घरे उद्ध्वस्त करेल’.”

बाबांचें बोलणे ऐकून संतोषला काय बोलावे समजेना.

पण तरीही त्याने मन घट्ट केले आणि म्हणाला ” नाही बाबा तुम्ही म्हणता तसे काही होणार नाही.फक्त तुम्ही हो म्हणा पुढचे मी सांभाळून घेतो”

हे ऐकून आईला खूप राग आला.” एवढ्यासाठीच यायची का ही इथे.बघा म्हणे बुरखा पाबंद.कोणाला तोंड दाखवित नाही.आणि हि खेळ .मी हे अजिबात होऊ देणार नाही”

इतक्यात ताईने आईला आवरते घेतले.” आई

…आई तु शांत हो आधी.

……

… दोन्ही घरात स्मशान शांतता.

.. दोन्ही जीव एकमेकांसाठी भेटण्यास तळमळू लागले होते.दोघांनींहीं अन्न जल त्यागले.

जोयाचे लग्न अवघ्या दोन आठवड्यात करायचे ठरवले.जोयाने अम्मीला खुप विनवणी केली पण अम्मी अब्बुंना घाबरून काही बोलू शकत नव्हती.

…..जोया अब्बु बाहेर गेले तर हळूच संतोषला मेसेज करून सगळे सांगायची.

…आता तयारी लग्नाची जवळ जवळ होत आली होती.

….सोनाराकडे सकाळी लवकर जायचे होते.पैसे बॅंकेतून काढून मग सोनाराकडे जाऊन दागिने आणायचे.

जोयाला घेऊन तु सोनाराकडे जा मी तोपर्यंत पैसे घेऊन येतो म्हणून अब्बु बॅंकेत गेले.

तिथे त्यांनी पैसे काढले आणि आपली बॅग हातात घेऊन रिक्षाला थांबवू लागले.तोच बाईक वरून दोन बाईकस्वार जोरात येऊन त्यांच्या हातातील बॅग हिसकावुन घेऊन पळाले.

…चोर…चोर…

पकडा पकडा…

…माझे पैसे…

….माझी बॅग ” अब्बुंनीं जोरजोराचा आरडा ओरड केला.

…हे ऐकून लोक जमा झाले.तिथुनच संतोष आॅफिसला जात होता काय हा दंगा सुरु आहे म्हणून तो ही तिथे जमावात गेला त्याला समजले की चोरांनी बॅग पळवली तसा तो त्या दिशेने जोरात गाडी पळवली.त्या मुलांचा पाठलाग करत त्यांना पकडले आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आणि ती पैशाची बॅग अब्बुंनां दिली.

” धन्यवाद बेटा.तुझे खुप खुप उपकार झाले.जीवनभरची कमाई माझी.

अल्लाह तुझे सलामत रखें.तेरे सब अरमान पुरे हो बेटा”

” चला मी तुम्हाला सोडतो कोठे जाणार आहात तुम्ही काका?

” सोनाराकडे.मुलगीचे लग्न आहे तिला दागिने आणायचे आहेत.”

…. दोघे सोनाराकडे गेले.तिथे या दोघी मायलेकी होत्या.

…” आज मी या मुला मुळे वाचलो.माझे पैसे चोरीला गेले.या पोराने आणुन दिले.” अगदी आनंदाने अब्बु म्हणाले.

आणि तिथे जोया संतोष दोघे अचानक आमोरासमोर आले.

जोयाने फक्त हाताचा नकळत इशारा करून संतोषला काही न बोलणे समजावले.

….आज तर दोघांच्या मनाची घालमेल सुरू झाली.

काय करावे.संतोष लग्न करणार तर जोया बरोबर नाही तर नाही.पण..

…पण जोयाचे काय.

तिचे तर लग्न काही दिवसांतच.

…” देवा काहीतरी चमत्कार कर.आमच्या खऱ्या प्रेमाची परीक्षा अजून किती दिवस घेणार.मी जोया शिवाय जगूच शकत नाही.आणि ती सुद्धा.जातपात काय आहे.सगळे मनुष्य जात एकच नाही का.मग हा भेदभाव का.

…आईला का समजत नाही.जोयाचे अब्बु का असा हट्ट करतात.यांना समाजाची चिंता.आमची नाही.

देवा तु आहेस ना.आम्ही प्रेम केले हा गुन्हाच आहे का? नाही जगू शकत मी .

….जोया …

…जोया….” संतोष अक्षरशः रडू लागला.

आजतर तो आॅफिसला गेलाच नाही.न आंघोळ न जेवण न ही कोणाशी बोलणे.

….इकडे जोया एक निर्जिव वस्तू जणू काही.घरात पाहूणे येऊ लागले.जो तो का ही अशी निस्तेज झाली आहे.नवरी मुलगी कशी आनंदी असते ही का अशी.

आज जोयाला हळद लागणार होती.जेव्हा पासून लग्न ठरले तेव्हा पासून जोया न नीट जेवली न नीट झोपली होती.

तिला हळदीची पिवळी साडी.पिवळ्या फुलांचें दागिने घातले.मांडव सजवला होता.मांडवात स्त्रिया लग्नाचे गाणे म्हणत होत्या.जोयाला तिच्या मावशीने हात धरून मांडवात आणले आणि हळदीसाठी ठेवलेल्या चौकीवर बसविणार तोच जोया चक्कर येऊन पडली.

…….

….

डॉ. काय झाले माझ्या पोरीला.ये बेटा देख डोळे उघड हे बघ अब्बु बघ मला.

ये बेटा…

…तुला काही होणार नाही.

..ये बेटा…

जोयाचे वडील खुप रडू लागले.अम्मीतर एक पुतळाच जणु.

” प्लिज तु शांत हो.

काही नाही होणार तिला मी आहे ना.” डॉ.नीं म्हटले.

….आय सी यु मध्ये जोयाला नेले.सलाईन लावले.काही वेळात ती जरा शुद्धीवर आली.

…” मला का वाचविले डॉ.अंकल.मला जगायचे नाही.मी मरणार आहे.आत्महत्या करावी इतके प्रेम माझे कमकुवत नाही.पण प्रेम माझे सफल ही झाले नाही.मी संतोष शिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही.

पण अब्बुंच्या जिद्द पुढे मला काही करता येत नाही.म्हणून मला मरण जवळ करावे वाटले.”

…..जोया.

जोया…

डॉ.कशी आहे माझी सुनबाई.माझ्या घरची लक्ष्मी” संतोषची आई पळतच आय सी यु मध्ये आली.

” हो

आहे बरी आता .

आता तर तुम्ही आलात म्हणजे एकदमच ठणठणीत होते कि नाही बघा तुमची सुनबाई.” डॉ.नीं हसतच सांगितले.

….

बाहेर जोयाचे अब्बु अम्मी, संतोषच्या ताई,बाबा उभे होते.आतुन आई हसतच बाहेर आल्या.

” वेडी रे पोरे ही.आमच्या संमती विरोधात न जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वत: वर सगळा त्रास करून घेतला.

अहो चला लवकर हळदीचा मुहूर्त संपेल.मी माझ्या सुनेला इथेच लावणार आहे हळद.

संतोषला पण इथेच लावू.

लग्न दोन्ही पद्धतीने करायचे.आधी जोयाच्या अब्बुंच्या पद्धतीने मग आपल्या पद्धतीने.

चला चला ”

अचानक असे कसे बदललेत आपली माणसे हे जोया आणि संतोषला कळतच नव्हते.

तोच ताई हातात हळदी आणि मिठाई घेऊन आली.आणि म्हणाली” अरे वेड्या आई शेवटी आईचं असते रे.तु रात्री रडत होता तेव्हा आईने तुला पाहिले.आणि तु देवाजवळ प्रार्थना करत होता ते ही तिने ऐकले.आणि तीने बाबांना आणि मला जोयाच्या घरी सकाळी लवकर उठून जा म्हणून सांगितले.आणि आम्ही दोघे सकाळीच तिच्या घरी गेलो.पण तिच्या अब्बुंना हे काही केल्या मान्य होतच नव्हते.जोयाची अम्मीने पण सांगितले कि तुमची पैशाची बॅग चोरांपासून आणुन देणारे दुसरे तिसरे कोणी नसून संतोषच होते.तरी देखील ते ऐकले नाही.जोयाचा निस्तेज चेहरा बघून तरी त्यांना पाझर फुटेल पण हे देखील नाही.ते आपल्या म्हणन्यावर ठामच होते.

आम्ही निराश होऊन घरी आलो.मग शेवटी आईने स्वत: जाणेचे ठरविले.ती जाण्याच्या तयारीत होती तोच दवाखान्यातून नर्सचा फोन आईला आला.जोयाची तब्येत बरी नाही लवकर या.मग आम्ही पळतच इथे आलो.

जोयाची अशी अवस्था बघून आईने अक्षरशः जोयाच्या अब्बुंच्या समोर रडून तिच्या साठी पदर पसरून तिला मागणी घातली.शेवटी ते देखील तुमच्या खऱ्या प्रेमाला समजले आणि त्यांनी होकार दिला”

आईंनीं जोयाला हळद लावली.जोया लाजेने चूर चूर होऊन गेली.

संतोषला पण हळद लावली.

बाहेर ताईने कार बुक केली.दवाखान्यात एक वेगळाच आनंददायी वातावरण निर्माण झाला.

सगळे जण खुप खुश झाले.आज आईंनीं जोयाचा हात धरून बाहेर हळूहळू चालत आणले.कारमध्ये संतोष बसला होता.जोयाला कारमध्ये आई बसवित होत्या तोच अचानक हवा सुरू झाली आणि पाऊस सुरू झाला.हवेमुळे जोयाच्या डोक्यावरील पिवळ्या साडीचा पदर उडू लागला तशी ती गडबडीने डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करु लागली तोच संतोषने हळूच बाहेर येऊन तिच्या डोक्यावर अलगद पदर दिला आणि तिच्या हातात हात घेऊन हळूवार अलगत आत कार मध्ये बसविले.तिच्या हातावर लावलेले सलाईनच्या पट्ट्यांना धक्का न बसेल ही  खबरदारी घेतली.

ज्या अचानक आलेल्या पावसामुळे दोघांचीं भेट घडवून आणली तोच अचानक आलेला पावसाने  यांचीं साता जन्माची गाठ बांधली.

…. समाप्त..

Image by Jiří Rotrekl from Pixabay 

Parveen Kauser
Latest posts by Parveen Kauser (see all)

Parveen Kauser

लेखन:: हिंदी आणि मराठी भाषेत कविता,शायरी, चारोळी, लघुकथा,दिर्घ कथा , बोधकथा ,अलक म्हणजे अती लघु कथा यांचे लेखन करतात. यांच्या कथांना सर्वोत्कृष्ट कथा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.कथालेखन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पटकावला आहे. चारोळ्या स्पर्धेमध्ये देखील यांना विशेष योग्यता पुरस्कार मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!