गुंतता हृदय हे…ये इश्क़ नहीं आसाँ (भाग 3)

 आधीच्या भागाची लिंक- गुंतता हृदय हे…ये इश्क़ नहीं आसाँ (भाग 2)

“समीरा तू” निनाद जोरात ओरडला.

“हो मी” समीरा त्याचा हात हातात घेऊन म्हणाली. काय झालं तू इतका शॉक का झालास मला बघून? कोणीतरी दुसऱ्या मुलीला expect करत होतास का तू?

निनाद – “पण तू इथे कशी? I am damn sure तो आवाज तुझा नव्हता. ती अनोळखी व्यक्ती म्हणजे मुलगी तू नाहीस. खरं सांग यार…माझ्या डोक्याचा भुगा होईल आता. हे काय चालू आहे सगळं. कोण आहे ती मुलगी?”

समीरा – सगळं सांगते पण त्याआधी तुला एक गोष्ट आठवते का बघ. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना 14 फेब्रुवारीला माझ्या नावाने कॉलेजमध्ये अचानक बुके, चॉकलेट्स,ग्रीटिंग आणि त्यावर मस्त चारोळ्या वगैरे लिहिलंय असं गिफ्ट मिळालं होतं. आणि मी कोण आहे जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येक ठिकाणावर नव्या जागेसह नवीन चिठी असायची. मी फारशी ते शोधण्यात इंटरेस्टड नव्हतेच खरंतर पण हा छुपा आशिक कोण याची उत्सुकता मात्र होती. त्यात तुम्ही सगळ्यांनी मला प्रत्येक वेळी ती चिठी शोधून त्या लिहिलेल्या नवीन जागेवर जाण्यास भाग पाडलं आणि पूर्ण दिवसभर मी त्या आशिकला शोधण्यात घालवला आणि शेवटपर्यँत तो चेहरा समोर आलाच नाही कारण हे तुम्ही सगळ्यांनी मिळून prank केलं होतं…मला फसवलं होत. आणि नंतर माझा तो उतरलेला चेहरा बघून खि खि खि दात काढत बसलेला. बऱ्याच दिवसांनी या प्लॅनच्या मागचा मास्टर माइंड तू आहेत हे कळलं.

निनाद (जोरजोरात हसत) – हा यार कसली भारी फसली होतीस यार तू…भारी दिवस होते कॉलेजचे…फुल ऑन मस्ती. तू तर अगदी लग्नापर्यंत स्वप्न पाहिली असशील तेव्हा त्या तुझ्या आशिक जो कधी भेटलाच नाही ( पुन्हा जोरात हसला). अरे हा पण त्याचा इथे काय संबंध??? एक मिनिटं dont tell की हा सर्व  तुझा प्लॅन होता….हा prank होता????.

समीरा – yes u right mr. Ninad. (समीरा हसत त्याच्या खांद्यावर एक फटका मारत बोलते. कॉलेजपासून प्रत्येक valentine day ला मला तो फसलेला valentine day आठवतो आणि तेव्हाच मी ठरवलं होतं एक स्पेशल valentine day तुझा नक्की बनवेन😂😂. सिक्रेट valentine शोधताना आपल्या नकळत आपण त्यात गुंतत जातो…हळूहळू  आभासतला तो किंवा ती आपली होऊन आपण गुलाबी स्वप्नांच्या जगात गुलाबी होऊन नाचतो. भावना खऱ्या खोट्याच्या पलीकडे जाऊन वेगळ्या जगात धुंद होतात आणि नजर,मन फक्त कोण तो वा कोण ती याचाच शोध घेत फिरत…हे जरा जाणवून द्यायचं होत रे फक्त तुला बाकी काही नाही. म्हणून म्हंटल जरा तुझीही फिरकी घेऊ आज आणि केला प्लॅन माझ्या मैत्रीणी सोबत तुझा दिवस स्पेशल बनवायचा (हसत).

तुला मी इतक्या वर्षांपासून ओळखते…तू फार emotional वगैरे नाहीस माहितीये…एक दिवस माझी नजर जशी भिरभिरत त्याला शोधत होती तस तू शोधशील आणि सोडून देशील. I know very well. बोल की आता कायतरी …आजपर्यंत तू खूप prank खेळलेस…. तुझ्यासोबत खेळलेला prank कसा होता.

निनाद पूर्णपणे शॉक मध्ये गेला होता. काय बोलावं काय करावं काही कळत नव्हतं. आपण कोणाच्याच बोलण्याला  सहज भुलत नाही पण आज या मुलीच्या आवाजाने अशी काय जादू केली की आपण जाळ्यात अडकले जातोय हेही लक्षात आलं नाही आपल्या..समिराने हाताने हलवल्यावर तो भानावर आला आणि म्हणाला,

निनाद – काय यार समीरा…. हे असं तू इतक्या वर्षांनी त्या गोष्टीचा बदला घेशील मला वाटलं ही नव्हतं. बेकार अडकलो मी यात. खर बोललीस आपल्या नकळत स्वप्नं अन बघत जातो. सकाळपासून आतापर्यंत मी त्या आवाजा वरून त्या मुलीचा चेहरा रंगवण्याचा प्रयत्न केला. ती कशी दिसत असेल, कशी बोलेल,कसा स्वभाव असेल सगळं सगळं  मनात imagine करत होतो. आज कल्पनाशक्ती खूप भन्नाट पळत होती. फारच बेकार झालं यार माझ्यासोबत (हसत) . जाऊदे आज तुलाही शांत झोप लागेल नाही का. खूप वर्षांचा तुझा बदला पूर्ण झाला हो ना.

दोघेही एकमेकांना टाळी देऊन भरपूर हसतात. निनादची नजर सगळीकडे फिरायला लागते. त्याला बघून समीरा विचारते, ” काय रे काय झालं? कोणी अजून येणार आहे का तुला भेटायला? Someone special?”

निनाद – हम्म हमारा तो बकरा ही बन सकता है..special one अपना तो कोई नहीं! मी त्या गोड आवाजातील मुलीला शोधतोय जिने मला तिच्या गोड बोलण्यात अडकवल. तिच्या आवाजाने मला खेचून इथपर्यंत आणलं. तुझी मैत्रीण म्हणजे ती इथे आलीच असेल ना. देना यार ओळख करून..फक्त ओळखच..बाकी मी genuine आहे तुला माहीतच आहे.

समीरा(हसत) – I know u r very genuine.  ती माझी मैत्रीणही खूपच साधी सरळ आहे रे…बिचारीला मीच मैत्रीची शपथ देऊन तुला फसवण्याचं पाप करवून घेतलं. माझ्या आधीच्या ऑफिसमध्ये ती माझ्यासोबत होती. आता तर तुला माहितीये मी बाहेर असते आणि परवाच घरी आले, ती भेटली आणि माझ्या डोक्यात प्लॅन सुरू झाला. तिला खूप गयावया करून प्लॅन शेवटी यशस्वी झालाच. हा पण जिला शोधतोयस ती इथे आलेली नाही. ती फार अबोल आहे रे आणि कोणासोबत पटकन मैत्री वगैरे तर अजिबातच नाही जमत तिला. तिच्या जगात ती खुश असते.

निनाद – intresting… एकदा तरी भेटायला आवडेल ग मला तिला. चुकीचा अर्थ काढू नको पण तिचा आवाज…काय आवाज आहे..सुंदरही असेल नाही का ग. बरं तू राहूदे मी तिलाच फोन करून बोलून घेतो तिच्याशी. मग तर तिला मला भेटावंच लागेल ना.

समीरा – ती नाही बोलू शकणार तुझ्याशी आणि तू असली स्वप्न देखील बघणं सोडून दे.

क्रमशः

 Image by efes from Pixabay

Sarita Sawant

Sarita Sawant

मी By Profession सॉफ्टवेअर इंजिनिअर असले तरीही मनापासून लिखाणातच रमते. कथा,कविता,चारोळी,लेख हे मराठी साहित्य लिहायला मला आवडते. स्त्री विषयक व सामाजिक विषयांवर लेखन करणे मनाला जास्त भावते. आजपर्यंत बऱ्याच प्लॅटफॉर्मवर लेखन केले असून पुण्यनगरी वृत्तपत्रातही माझे स्त्रीविषयक लेख वुमनिया सत्रातुन छापून आले आहेत. मन:पटलावर जे कोरलं जात ते व स्त्रीमनाच्या भावना माझ्या लेखणीतुन उमटतात बस्स इतकंच. माझ्या लिखाणातून मी मलाच गवसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!