गुंतता हृदय हे…जब्त ए इश्क…11- शेवटचा भाग
आधीच्या भागाची लिंक- गुंतता हृदय हे…जब्त_ए_इश्क..10
सारांश….
शनाया ला लवकरात लवकर समर ला तिच्या जाळ्यात ओढायचंय.. निशांत ला डिच केल्यामुळे तिचे शौक पुरवणारा नवा श्रीमंत बकरा तिला हवाय.. निशांत मात्र आता शनाया चा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीये .. समर ला अद्याप शनायाचा हेतू माहित नाहीये , तर सखीला तिची तोट्यात गेलेली कंपनी, समर आणि विहान च्या साथीनं पुन्हा मार्केट मधे उभी करायची आहे . आणि तिच्या दादाला विहान ला परत आणायचंय घरी .. तेही मानानं……
##
समर…. आज डिनर ला नक्की भेटतोयस ना? मी लोकेशन पाठवलंय… शनाया चा msg आला, समर नी रिप्लाय दिला… Yes.. येतोय..
शनाया नी स्वतः डिझाईन केलेला लेटेस्ट fusion saree लुक आजच्या डेट साठी फायनल केला..
ब्लॅक साडी आणि मॅट गोल्ड स्लीवलेस बॅकलेस ब्लाउज.. तिची गौर कमनीय काया आणि शार्प लुक्स पुरुषालाच काय पण स्त्री लाही भुरळ घालणारे होते.. आज समर ला डिनर टेबल to बेड असा खुनशी प्लॅन शिजला होता.. एकदा का याचा बेडवर फोटो किंवा विडिओ मिळाला की बस्स.. काम फत्ते!!!
*******
निशांतनी, शनायाला कुठलीही कल्पना नं देता तिच्या घरी जायचं ठरवलं… त्याप्रमाणे तो तिच्या पार्किंगमध्ये पोहोचलाही..
आणि अचानक त्याला समर गाडी पार्क करून उतरताना दिसला..
एक क्षण त्याला शंका आली पण शनाया ज्या सोसायटीत राहायची ती उच्चभ्रू लोकांची सोसायटी होती.. त्यामुळे नक्की समर कुणाकडे जातोय हे चेक करावं लागणारं होतं त्यानं गेस्ट बुक मधे चेक केलं… आणि शनायाचा फ्लॅट नंबर पाहून तो अजूनच चवताळला..
त्यानं समर तिच्या फ्लॅट मधे पोचलेलं पाहून तिच्या दाराबाहेर थांबण्याचा निर्णय घेतला… तिच्याच बाजूच्या फ्लॅट ला एक टेरेस होता ज्याच्या पाईप वरून तिच्या किचन ड्राय बाल्कनीत उतरता येऊ शकत होतं…. अर्थात ड्राय बाल्कनी बंद असायची… तरीही तो पाईप च्या आधाराने त्या टेरेस मधून तिच्या किचन च्या ड्राय बाल्कनीत शिरला… नशिबानं त्या बाल्कनीच दारं उघडं होतं .. तो बाहेरचा अंदाज घेत किचन मधून बेड रूम मधे गेला.. इकडे हॉल मधे शनाया आणि समर सोफ्यावर बसले होते.. काही फॉर्मल गप्पांनंतर शनाया नी तिच्या कलेक्शन मधली रेड पोर्ट वाईन काढली…
समर आता स्टार्टरस आणि वाईन चा आस्वाद घेत होता एवढ्यात शनाया मधेच किचनमधे जाऊन आली…
तिने अजून एक चीज केक त्याच्यासाठी आणला..
अद्याप समर ला दारू चढली नव्हती पण त्याला चीज केक
अजिबात आवडतं नसे… तरीही त्याने आग्रहखातर तो केक हातात घेतला आणि खाल्लाय असं दाखवून तो पुन्हा प्लेट मधे ठेवला…
इकडे बेडरूम मधल्या वॉर्डरोब मधे निशांत लपून बसला होता…
शनाया नी ती यां क्षेत्रात कशी आली आणि निशांत तिचा कसा मित्र झाला इथवर च्या सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या… हळूहळू तिला दारू चढत होती आणि नशेत ती समरला जवळ करायचा प्रयत्न करत होती..
समर नी तिला हाताला धरून उठवलं आणि तिला बेडरूम कडे नेऊ लागला…
आत लपून बसलेल्या निशांत ला भन्नाट प्लॅन सुचला.. त्यानं हे सगळं विडिओ शूट करायला सुरवात केली… आता ही गोष्ट समर ला ब्लॅक मेल करायला वापरता येईल आणि शनाया लाही… जिने त्याला इतकं लुबाडलं होतं..
शनाया नी देखील तिच्या बेडरूम मधे आधीच एक कॅमेरा बसवलेला होता…
इकडे शनाया ला आत नेताना समरच्या वरच्या खिशातला फोनचा विडिओ मोड ऑन झाला .. आणि योगायोगाने त्याचा फ्रंट कॅमेरा सुरु झाला आणि हे सगळं शूट झालं..
बडबडणारी.. त्याला जवळ ओढणारी शनाया आता अधिकच लगट करू लागली..पण समर नी तिला झिडकारलं आणि तो निघून गेला..
निशांत बाहेर आला आणि तो ही निघून गेला..
समर नी वैतागून सखीला कॉल केला.. ती त्यालाच सरप्राईज द्यायला त्याच्या घरी आली होती.. पण त्याचा चिडलेला आवाज ऐकून तिने ती त्याच्या घरी पोचल्याच सांगितलं…
समर आता आनंदानं घराकडे निघाला.. आणि एका वळणावर अचानक त्याच्या गाडीचा ताबा सुटला आणि त्याचा अपघात झाला… नशिबानं त्याला वेळेवर हॉस्पिटल मधे ऍडमिट केलं गेलं… आणि सखी विहान सगळे त्याच्या जवळ पोचले…
तब्बल चौदा तास तो बेशुद्ध होता आणि उजवा हात मोडला होता.. डोक्याला ही जबर मार बसला होता…
काही वेळाने तो शुद्धीवर आला आणि पहिली हाक त्यानं सखी ला मारली…
सखी, विहान त्याची आई सगळेच होते आजूबाजूला .
सखीने त्याचा हात हातात घेत त्याला थोपटल , आहे मी इथेच म्हणताना तिचे डोळे पाणावले, सगळ्यांनी त्याची विचारपूस केली आणि मग एकेक जण पांगले, समर आणि सखी एकमेकांकडे पाहत होते जणू आज शब्दांच्या ऐवजी
डोळ्यांची भाषा जास्त बोलकी ठरत होती.. इतक्यात विहान चा फोन वाजला.. तो बोलत बोलत थोडा लांब गेला रूम पासून पण जेव्हा परतला तेव्हा अधिकच काळजीत पडला..
त्यानं सखीला बाहेर बोलावलं तिच्या कानात काहीतरी सांगितलं, ती ही हे ऐकून दचकली.
पण आता कुठलीही गोष्ट समरशिवाय करायची नव्हती..
तिने आणि विहान नी एक प्लॅन आखला..
जे काही समोर येईल ते समर समोर आणायचं आणि मग त्याचा जों काही निर्णय असेल तो फायनल..
गोष्ट नाजूक होती.. शनाया नी समरला एक विडिओ क्लिप पाठवली होती जी तिने मुद्दाम शूट केली होती आणि त्या बदल्यात तिने खंडणी मागितली होती..
नेमकं त्याचं वेळी निशांत नी ही एक मेसेज केला.. एक महत्वाची गोष्ट त्याच्याकडे आहें ज्यामुळे समर ला तो एका मोठ्या संकटातून वाचवू शकतो.. अर्थात त्याला याच्या बदल्यात समर कडून मदत हवी होती ज्यामुळे सखी च्या कंपनी च नुकसान करता येईल.
आणि कहर म्हणजे एका निनावी नंबर वरून ऑडिओ मेसेज आला समर च्या भूतकाळाविषयी माहिती असलेला आणि त्या ही व्यक्तीला समरशी डील करायच होतं..
समर आता बराच सावरला होता.. सखीने मुद्दाम तो तिसरा मेसेज आधी दाखवला.. समर नी आईला बोलवून घेतलं.. आईने एक विचित्र गौप्यस्फ़ोट केला.. समर ला अजून एक भाऊ असल्याचा आणि तो त्याचा सावत्र भाऊ आहें.. त्याच्या वडिलांनी त्या मुलाला आणी त्याच्या आईला नाकारलं पण समर ची आई मात्र त्यांना नंतर काही वर्ष नियमित पैसे पाठवत होती.
काही वर्षांपूर्वी त्याची आई गेली आणि त्या मुलाचा पुढचा सांभाळ समर च्या आईनी केला…
समर ला आणि सखीला हे ऐकून धक्का बसला पण काही वेळात तो सावरलाही…
एवढ्यात पुन्हा एक कॉल आला…
आता खंडणी ची रक्कम आणि जागा सांगण्यात आली..
सखी ने मुद्दाम समर ला तिला पाठवायची विंनंती केली.. समर ला ही या अवस्थेत जाणं अशक्य होतं म्हणून त्याने खंडणी मागणाऱ्या व्यक्तीला तशी विनंती केली..
सकाळपासून चालू असलेल्या नाट्यावर आता संध्याकाळी पडदा पाडायचा असं ठरवून सखी आणि विहान सज्ज झाले.
ठरल्याप्रमाणे एका कॅफे मधे सखीला बोलावण्यात आलं..
एका वेटर करवी पैशाची बॅग pass on झाली आणि त्या बदल्यात एक पेन ड्राइव्ह आणि एक मोबाईल मिळाला..
सखी ने सगळं फुटेज तिथेच बसून पाहिलं.. तिने स्वतः बरोबर एक पेन कॅमेरा आणि तिचा मोबाईल कॅमेरा नेला असल्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी टिपल्या जातं होत्या..
बॅग वेटर नी पॅन्ट्री मधे नेली मग एका डस्टबिन मधे टाकली ती साफ करायला आलेल्या माणसाने ती डस्टबिन वॅन च्या कर्मचाऱ्याकडे दिली तिथून एका बाईक वरून आलेल्या तरुणाने ती उचलली आणि सगळ्यात शेवटी एका मॉल मधल्या रांगेत ती बॅग एका तरुणी कडें गेली.
आता बॅग त्या मूळ मालकाकडें पोचली आणि त्याचा चेहरा पाहून समर विहान आणि समर च्या आईला धक्काचं बसला..
निशांत…??? होय निशांतच समर चा सावत्र भाऊ होता..
समर च्या आईने हा खुलासा करताच विहान नेही तो सखीचा बिझनेस पार्टनर असल्याच सांगितलं..
आता दुसरा धक्का होता तो म्हणजे शनाया ने पाठवलेला msg… तिने ही त्या बदल्यात समरच्या आयुष्यात जागा मागितली होती.
पण समर ला सखी हवी होती आयुष्यात आणि इतक्यात विहान नी खुलासा केला.. शनाया आधी त्याच्या आयुष्यात होती पण ती प्रत्यक्षात निशांत ची प्रेयसी आहें..
आता निशांत आणि शनाया यांचं बिंग उघडं पडतंय तोच सखीचे वडील हॉस्पिटल मधे आले आणि समोर असलेल्या विहान ला बघून भांबवले… विहान बेटा?? तू आणि इथे??
आणि ते ही समर आणि समर च्या आईसोबत??.
अरे ज्याच्या वडिलांनी आपला बिझनेस बुडवला त्यांना साथ देतो आहेस?.
वडिलांचे हे शब्द ऐकून विहान एकदम गप्प झाला.. समर च्या डोळयांत आता सखी आणि विहान बद्दल संशय दाटला.. इतक्यात समरच्या वडिलांना आणि निशांत शनाया ला घेऊन सखी पोचली.. सोबत पोलीस ही होते..
सगळा खुलासा झाला.. निशांत नी शनाया आणि समर यांना एकत्र खंडणी साठी टार्गेट केलं होतं.. यातून तो सखीच्या कंपनी ने दिलेल्या लीगल नोटीस ची रक्कम भरणार होता..
शनायाला फक्त समर च्या पैशात रस होता आणि म्हणूनच आधी निशांत मग विहान यांचा वापर करून ती समर पर्यंत पोचली होती.
सखी आणि विहान एकमेकांची भावंड असल्याचे कळले आणि सखीच्या वडिलांनी समर च्या वडिलांना त्यांच्या जुन्या दुष्मनी च्या विषयाला वाचा फोडली.. निशांत समरचा सावत्र भाऊ आहें हे कळल्यावर ते ही भांबावले कारण निशांत ची आई त्यांची बहीण होती.
निशांत आणि शनाया ला योग्य ती शिक्षा झाली..
काहीच महिने असेच विरहात गेले आणि एक दिवस
पुढाकार घेऊन समरच्या आईने सगळ्यांना समजावले आणि समर आणि सखी च्या प्रेमाला नात्याच्या बेडीत अडकवलं..
आशिक़ हैं हम तो ‘मीर’ के भी ज़ब्त-ए-इश्क़ के
दिल जल गया था और नफ़स लब पे सर्द था|
© मनस्वी
समाप्त
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
Pingback: गुंतता हृदय हे…जब्त_ए_इश्क..10 – LekhakOnline – Excellent Marathi Articles