श्रीरंग..1

त्या अवचित कातरवेळी भेटलास तु असा अचानक..मंदिऱ्यातल्या पायऱ्या उतरताना तोल गेला अन नकळत तुझा हात हाती आला.. मी हात सोडवून घेताना आधी तुझ्या भरदार छाती कडें लक्ष गेलं.. अन मग मान हनुवटी ओठ सरळ नाक आणि तें दो नैना… आणि तो सावळा रंग… ती मला नजर वर करायला लावणारी उंची.. तें रुंद कपाळ.. त्यावर गोपीचंदनाचा नाम.. तें भरघोस केस..
अडकला जीव माझा.. भान विसरून पाहत राहिले.. अन तु.. तु मात्र एक कटाक्ष टाकलास आणि त्या गर्दीत मिसळून गेलास..
शोधू की नको या विवंचनेत मी बाहेर आले.. प्रसादाच्या रांगेत उभी होते..
सतत मागे वळून तुला शोधत होते..
आणि प्रसाद घ्यायला नकळत हात पुढे गेला.. नजर अजूनही मागेच.. तु अलगद त्या हातावर हात ठेवलास..
तोच झटकन वळून समोर पाहिलं.. तु गालातल्या गालात हसत होतास..
गरम आहे.. सावकाश.. म्हणत प्रसादाचा द्रोण माझ्या हातावर ठेवणार इतक्यात दुसऱ्या हातानी रिकामा द्रोण आधी ठेवलास.. मग त्यावर प्रसाद द्रोण ठेवलास..
मी तिथेच  आडोसा पाहून उभी राहिले…
तुला कुणी तरी हाक मारली.. रंगा…
तु ही हात उंचावून… आलो म्हणालास..
तो आवाज तें देखणं रूपं पाहून मी नादावून गेले…
इतक्यात देवळात कुणाची तरी रिंगटोन वाजली… त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे गं..
अन वाटलं  जणु गाभाऱ्यातल्या श्रीरंग  मला भेटायला बाहेर आला..
क्रमश:
©®मनस्वी

Image by Free-Photos from Pixabay 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!