श्रीरंग.. 2

आधीच्या भागाची लिंक- श्रीरंग..1
तो तर मित्रांमागे निघून गेला आणि मी त्या सावळ्या मूर्तीमागे धावत बाहेर आले… पण छे.. योग नव्हता भेटीचा… हिरमुसली होऊन पुन्हा चपला स्टॅन्ड पाशी परतले..
आणि घराच्या दिशेने निघाले..
काही अंतर चालून गेले आणि चप्पल तुटली.. आधीच मनात तो रुतलेला आणि इथे चपलेत खिळा..
आता दुडक्या  चालीनं तर कधी पाय घासत अशी चालू लागले..
इतक्यात मागून एक हॉर्न ऐकू आला..
काय झालं?  पायाला लागलंय का?
आता कोण? म्हणून वैतागून मागे पाहिलं..
परत तोच..
अहा.. त्याला बघून तर असलं बरं वाटलं की विचारूच नका 😜..
मग मी ही तुटकी चप्पल काढून त्याकडे बोटं दाखवलं..
पठ्ठा गाडी side ला लावून उतरला..
मला वाटलं चला… भारी चान्स आहे… आता नक्की सोडेल हा घराजवळ..
पण त्यानं bike च्या पुढे अडकवलेल्या फडक्यानं उचलली आणि म्हणाला…
तुम्ही बसा.. मी आलोच.. पुढे एक मोची आहे..
असा म्हणून निघून गेला..
आणि मी आ sss  वाss सून बघत राहिले…
अरे.. काय माणूस आहे यार…
पण जाताना त्याच्या बुलेट च्या मागे ‘लैला ‘ अशी पाटी लिहिलेली पाहिली.. नंबर ही झकास होता.. 9 2 11
खरंय… या नंबर सारखाच माझं नुकतंच तुटलेलं ♥️ आणि चप्पल दोन्ही घेऊन फरार झाला 🙄..
आता काय करता राधाबाई… चला .. म्हणून दुसरी चप्पल हातात घेऊन पुन्हा चालू लागले..
आता तर वातावरण ही आपला ‘रंग ‘ बदलू लागलं..
आधीचा उकाडा जाऊन गार गार हवेचे झोत येऊ लागले आणि बघता बघता आभाळ काळवंडून गेलं..
इतका अंधार दाटून आला की जणु हिवाळ्यातली गर्द रात…
आजूबाजूला जमेल तितके दिवे उजळले पण तें ही फार काळ तग धरू शकले नाहीत..
आणि तितक्यात ढगांचा गडगडाट सुरु झाला.. आणि टप्पोरे थेंब कोसळू लागले..
आता कशाला थांबायचं जाऊयात भिजत म्हणत मी ही निघाले..
आणि पुन्हा एक बुलेट माझ्या दिशेनी धग धग आवाज करत आली..
खरंतर अज्जिबात बोलायचं नाहीं असं ठरवलं होतं..
पण आता तो पुन्हा जवळ येऊन थांबला आणि एक बॉक्स माझ्या हातात दिला 🙄…आता तुटकी चप्पल टाचून काय बॉक्स मधे देतात का 🙄🙄
मी ही बॉक्स उघडला तर त्यात नवी कोरी चप्पल होती..
मी खुष होऊन पाहिलं आणि इतक्यात जोरात वीज कडाडली…
अश्शी घाबरले आणि डोळे गच्च मिटून त्याचा भरदार खांदाचं धरला…
तो मात्र शांतपणे त्या पर्जन्यधारा आणि त्यात भिजणाऱ्या मला न्याहाळत होता..
मी पुन्हा सावरले आणि त्याला पाहत सॉरी म्हणत दूर झाले..
जाते मी.. म्हणत निघाले सुद्धा (तसही हा काही सोडणार नाहीं 🙄 उगा भाबडी आशा कशाला लावा मनाला )
इतक्यात तो म्हणाला..
थांबा… पाऊस वाढलाय… मी सोडतो तुम्हाला…
मग काय पडत्या फळाची आज्ञा… मी ही नखरे नं करता बसले मागे…
आता पुन्हा एकदा वीज कडकावी असं काहीबाही 🤭🤭 मनात येतं होत पण काही अंतर गेलो आणि ही लैला बंद पडली…
बघतोय तर चाक बसलंय 🙄🙄.
छे… नशिबातच नाहीं… म्हणून चरफडत उतरले..

त्यानं bike बाजूला घेतली..
आणि आम्ही एका आडोशाला थांबलो… चार दुकानं सोडून चहा वाला होता…
तो सुवास आता मला छळू लागला…
पण मी मात्र मोबाईल काढून रेंज मिळतिये का तें तपासत होते.. बॅटरी ही लो झाली ..
तेव्हा तोच म्हणाला…घरी फोन लावून सांगा… तुम्ही इथे आहात..  मी ही कळवतो मग…
मी ताईला फोन केला आणि मग हळूच त्याच्या नंबर वरून माझ्या नम्बरला मेसेज पाठवून दिला…
Hii.. 🤭🤭
आणि मगच फोन परत केला ..

आता हे उद्योग करताना तो चहा आणायला गेला होता… 🤭
मग कोसळणाऱ्या पावसात त्याला निसटते स्पर्श करत तो चहा enjoy केला…

इतक्यात बाबांची हाक आली…
राधे… इथे काय करतियेस…?
बाबा लोकं पण ना नेमके क्लायमॅक्स ला येतात 🙄🙄
मी त्याच्या कडें पाहत डोळ्यांनी निरोप घेतला तेव्हाची त्याची ‘नजर ‘…
कातिल ! किलर !! जानलेवा !!!
पुढे????
क्रमश :
©®मनस्वी

पुढील भागाची लिंक- श्रीरंग…. 3

Image by Free-Photos from Pixabay 

One thought on “श्रीरंग.. 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!