श्रीरंग… 4

आधीच्या भागाची लिंक- श्रीरंग…. 3

तो निघून गेला असं वाटून मी मैत्रिणीकडें पाहिलं आणि जरा रागावूनच म्हणाले… अर्थात रागं मनातून लटका चं होता.. 😜की…

आता जर हा पुन्हा समोर आला ना.. तर?  🙄🙄
तर काय करायचा प्लॅन आहे मॅडमजी??? 😜😜🤣
ती हीं चेष्टेत म्हणाली..
काहीं नाहीं… तू पण सामील हॊ त्याला..
नाहीं गं   . पण खरचं कसलं गोड़ प्रेम आहे त्याचं… तुझ्यावर 🤭🤭..
गप गं… काहीही.. आणि माझ्या घरी कळलं तर? 🙄
मी घाबरूनच गेले… चला.. नको ती स्वप्न बघू नकोस ..
खरंतर मला हीं आवडतं होतं सगळं… पण आता मनं पुन्हा आलं ताळ्यावर…
घरी येऊन पोचले तोच आत्तूचा आवाज…
ढमे जरा… गच्चीवर हे कपडे नेऊन वाळत घाल…
चांगलं ऊन पडलय..
जुनी सोसायटी होती.. जोडून इमारती आणि गच्च्या पण
मी हीं तें सगळे कपडे घेऊन वर आले… मी गाणी लावली होती मोबाईल वर…
एक लडकी को देखा तो ऐसा लगा….
आणि उगाचच तिच्या सारखं (मनीषा कोईराला हॊ 🤭) त्या लांब दोऱ्यांवर माझ्या ओढण्या वाळत घालताना style मधे घावत होते..
कपडे तर झाले वाळत घालून… म्हणत खाली जायला वळले तर हा समोर…
छे…  भास व्हायला लागलेत 🙄   काहीही काय होतंय म्हणत माझा मलाच चिमटा काढणार.. इतक्यात त्यानं माझा हात धरला आणि टाकीच्या बाजूला ओढलं…
नेमकं तिसरं कुणीतरी आता जिन्यात असल्याची चाहूल लागली..
आता आली का पंचाईत…
टाकीच्या मागे त्या एवढ्याशा जागेत भिंतीला टेकलेली मी अन 4इंचअंतरावर तो…
आता या परिस्थितीतं माझा मोबाईल ‘थरथरला ‘
त्यानं झटकन हातातून घेतला आणि बंद करून टाकला..
त्याचा हीं ऑफ…  शांतता, पाण्याची टाकी मागे असल्यामुळे पाठीला गार गार लागत होतं…
आणि इतक्यात त्यानं मला थोडं जवळ ओढलं.. आता ह्या परिस्थितीतं ह्याला रोमान्स कसा सुचतोय.. ह्याचाच मला राग आला.. मी डोळे मोट्ठे केले… नजरेनंच काय?  विचारलं..
तर त्यानं त्याचा हात  माझ्यापाठी मागे पालथा भिंतीला लावला..
आणि कानाशी येऊन विचारलं…
आता नाहीं ना गार लागतं आहे?   😜😜
कसलं गं गोड तें 😍😍
म्हणजे तसला विचार नव्हता त्याच्या डोक्यात.. 😜😜
आता गच्ची तला आवाज थांबला.. कुणी तरी जिना उतरून जातंय असं कळल..  आणि तो त्या एवढ्याशा जागेतून बाहेर पडला .. अंदाज घेत मला बाहेर काढल आणि कान पकडून sorry म्हणाला..
Sorry.. तुला असं अडचणीत आणायचा विचार नव्हता…
आणि जायला वळला..
जेमतेम दोन पावलं पुढे गेला आणि मीच त्याचा हात धरला..
त्यानं चमकून मागे पाहिलं…
अन त्या भर माध्यान्ही मी ‘माझा चाँद’ मागितला..
माझा चेहरा ओंजळीत धरत तो जवळ आला ..
आणि…
आणि….
कपाळावर kiss 😜करून निघून गेला…
वेडू… कुठला… 😍😍

आणि ह्या घटनेची साक्षीदार होती….  माझी  अत्तु… 🙄 कारण ती पलीकडच्या गच्चीतून आम्हालाच बघत होती 🙈🙈
मेले मी…
##थोडं थांबा… आमची ♥️story अशीच आहे… साजूक तुपातली 😜😜😜🤣🤣
©®मनस्वी

पुढील भागाची लिंक- श्रीरंग… 5

Image by Free-Photos from Pixabay 

One thought on “श्रीरंग… 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!