श्रीरंग… 5

आधीच्या भागाची लिंक-  श्रीरंग… 4

मी तर आत्तूला समोर बघून हबकले... जागीच थिजले.. 

हा तर निघून गेला आणि आता मी एकटीच... कशी सामोरी जाऊ.. 
मी कपड्यांची रिकामी बादली घेऊन खाली पळाले.. 

पुस्तक काढून वाचतं बसले... निदान भासवायला की मी अभ्यास करतीये... पण बराच वेळ झाला तरी अत्तु येईना .. 
मग दारापाशी जाऊन बघून आले...शेजारच्या काकूंना हीं विचारलं... तर म्हणाल्या... 
आत्याबाई दिसल्या नाहीत... 
नाहीं नाहीं तें विचार पिंगा घालत होते मनात... 
इतक्यात त्याचा मेसेज आला... 
कशी आहेस? 
अजिबात बरी नाहीये . 
का? 🤔
आत्यानी पाहिलंय आपल्याला एकत्र... 
पलीकडून काहीच रिप्लाय नाहीं .. 
फोन करावा का... असं ही वाटून गेलं... पण तेवढ्यात बाबा आले... 
ढमे...चहा टाक... 
आणि आई कुठाय तुझी..? 
अं? मी ब्लँक .. 
अगं अशी पुतळ्यासारखी काय उभी...??
काय झालंय? 
अं.. काही नै.. आले मी.. मी गुमान चहा बनवला आणि बाबांना दिला...  आता आई आली... तिला हीं चहा दिला आणि संध्याकाळच्या स्वैपाकाची तयारी करायला घेतली .. 
तसा नियमच होता...  कुठल्याही एका वेळेचा स्वैपाक माझ्याकडे..  इतर वेळी आई, आत्या होत्या... 
आता आत्या आली.. पण माझ्याकडे पाहून न  पाहिल्यासारखं केलं... 
बापरे...  रागवलीये का हीं...?  
काहीच अंदाज येतं नाहीये? 
कणिक मळताना ती मागे आली... 
नी मग म्हणाली...  मला का बोलली नाहीसं? 
अगं काय सांगू... सगळं इतकं अचानक घडलं की वेळच नाहीं मिळाला... 
ठीक आहे आज माझ्या खोलीत ये झोपायला... 
तिच्या आवाजावरून काहीच कळत नव्हतं... 
कशीबशी जेवले आणि मागचं आवरून तिच्या खोलीत गेले .. 
आई बाबांना कळु नये म्हणून आत्तूला हात जोडले... 
तिनही शब्द पाळला... 
तिच्या खोलीत....  खाली गादी घातली.... आणि आम्ही बसलो... 
आई बाबा निजलेत अशी खात्री करूनच बोलायला सुरुवात केली.. आत्तू गं... sorry... मला लपवायचं नव्हतं.. 
ह्म्म्म...  बोला.. काय विचार आहे मग? 
बापरे.. क क कसला? 
नुसतीच फिरवणार आहे का तुला? तिच्या आवाजात जरब होती .. 
फोन लाव त्याला....  मला बोलायचंय... आत्तू गरजली..
अरे देवा...  आत्ता?  आत्ता नको ना... माझी धड धड मलाच ऐकू येऊ लागली 
गुमान फोन लाव... पुन्हा आदेश..
बरं लावते...  मी कॉल केला...भाता फुलवा तशी धाकधूक  वाढली.. मनोमन धावा केला.. नको उचलूस फोन.. 

पण छे!🙄 देव हीं परीक्षा बघतो म्हणतात तसंच झालं.. 
ह्यानी फोन उचलला ... 
आता उगाचच लाडात बोलला नाहीं म्हणजे मिळवलं... 🙄😜🙈🙈
व्यवस्थित हॅलो म्हणाला...हुश्श्य... 
काय झालं?  काही अडचण आलीये का?  
आई गं... असला भारी आवाज ऐकून मला कसकसचं झालं.. 
पण समोर वाघीण बघून माझी शेळी झाली 🙄
हॅलो...  माझ्या आत्याला तुमच्याशी बोलायचंय... मी एकादमात माझं टेन्शन त्याला दिलं. 🤭🤭
दे फोन... हा निवांतच होता.. 
हॅलो...मी राधाची आत्या बोलतीये... 

नमस्कार मी श्रीरंग साने... बोला.. 
स्पष्टच विचारते.... 
किती दिवस फिरवताय हिला? आणि विचार काय आहे नक्की पुढचा?
फिरवत नाहीये.. भेटलोय एकत्र.. 
पण तें हीं ठरवून नाहीं... 
आणि पुढचा विचार अजून पक्का व्हायचाय... कारण तुमच्या भाचीच अजून ठरत नाहीये... 
आता हीं माझ्याकडे संशयाने बघू लागली 🙄 
काय बोलला हा 🙄🙄🙄🙈🙈
बरं उद्या सकाळी देवळात भेटू मग ठरवू... म्हणत अत्तु नि फोन कट केला..
आताच मरण उद्यावर गेलं.... 

आत्या घोरायला लागली आणि इकडे मेसेज वाजला .. 
Gn शोना... 😜
मी मात्र..........  ब्लँक 😳😳😳😱😱😡😡

दुसऱ्या दिवशी सकाळी आत्या निघाली देवळात आणि मला मात्र ठेवलं घरात...

रेडिओ वर गाणं लागलं होतं. 

ओss. . साजण साजण में करु .. 
तो साजणी जीव जडी ss
साजणी फूल गुलाबरो सुंघू घडी घडी 
हॊ..  केसरीया बालम आवोणि पधारो म्हारे देस... 

त्या भेटीच काय झालं कुणास ठाऊक 🙄🙄🙄🤭🙄🙄🙄
जाऊदे... . वाट बघूया... 🤭🤭🤭😜😜
क्रमश:
©मनस्वी




Image by Free-Photos from Pixabay 

3 thoughts on “श्रीरंग… 5

Leave a Reply to Manasi@1 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!