श्रीरंग… 7

आधीच्या भागाची लिंक- श्रीरंग..6

आत्तू ज्या रागानं बघत होती तें पाहून तर माझा मगाचचा आनंद पार मावळून गेला… बाबा आई नीं आत्तू चार पाच पत्रिका आणि फोटो घेऊन बसले होते…
बापरे ! एवढयात इतकी स्थळं आली मला 🙄🙄
आत्तू नीं काय दवंडी पिटवली 🙈😳🤪
मला तर काहीही दिसू लागलं… तें स्वयंवर and all 😉
छे… पण असं स्वप्न रंजन बरं नाही .. ♥️मेरा उसके पास 🤭 हैं… हे आठवलं आणि पुन्हा एकदा हमरी नैय्या गोते खाने लगी..

मी आत जाण्याच्या बहाणा केला आणि त्याला msg केला..
मेलो…  आता कै खरं नाही आपलं .
लगेच रिप्लाय…
का गं.. काय झालं?
बाबा आत्तू आई सगळे पत्रिका फोटो घेऊन माझ्या साठी दुल्हा शोधत आहेत…
हसू नका …  मला भीती वाटली की  ती हिंदीत वाटते 🙈..
असो…
इकडून टाकलेल्या बॉम्ब नीं एव्हाना त्याच्या दिलात “हिरो -साकी* ” इफेक्ट दिला होता…  पलीकडचा शामियाना शांत… नव्हे
खर्जात म्हणाला…
आज भेटूया दोन तासांनी .. प्लीज बाहेर ये ..
इकडे आमच्या शामियानात अचानक सनई चौघडे वाजू लागले…
खरंच काय भार्री फीलिंग असतं ना 😜
मग मैत्रिणी शी गॉसिप…
पुन्हा गहन चर्चा..
.कसं होईल??  काय होईल?? लांबचा पल्ला ss🤭🤭
हॊ मग आमचं वऱ्हाड योग्य जागी पोचायला नको?
चला आता पुन्हा मैत्रीण … अभ्यास जुगाड लावत बाहेर पडणार
इतक्यात आई म्हणाली ..
राधे .. आज मला संध्याकाळी दाते बाईंना भेटायला जायचंय…  तासात तुझं आवरून घे…
अगं आई मला कसं जमेल?
का??  तुला का नाही जमणार .  तें काही नाही..
त्यांच्याच भाच्यांच स्थळं आहे…  आत्याबईंनी पसंती दिलीये ..
(आई गं.. आत्तू अशी वागली… फुल्ल टू व्हिलन… देवा आता मी काय करू… )
हे सगळं स्वगत…
बरं मग आधी मी निशा कडें जाऊन येते आणि मग थेट तिथेच येते चालेल??
आईचा बरं ऐकला आणि माझ्या जीवात जीव आला.
लगेच मेसेज केला… लवकर भेटूयात… आई बरोबर जावं लागतंय..
तो बिचारा… लगेच जागा वेळ ठरवून वाट पहात बसला ..
मला आई बाहेर नेणार म्हणजे साडी नेसावी लागणार..
मी लगेच आईच्या कपाटातून 2 साड्या काढल्या… आणि मग डोळे मिटून एक निवडली..  जी त्याला आवडू शकेल…
आणि गेले नेसून.. रिस्क तर होती पण माझी साडी नेसायची आवड जगजाहीर होती त्यामुळे घरातल्यांना संशय नाही आला…
पुन्हा एकदा जागा ठरली ती मुरलीधराच्या मंदिरात… पण त्याच्या मागे एक बाग होती आणि दिवसा फारसं कुणी नसायचं तिथं…
मी फोन केला तर आमची स्वारी आधीच पोचलेली मी हि पोचले…
गाभाऱ्यातल्या श्रीरंगाचं दर्शन घेतलं आणि गेले माझ्या श्री दर्शनाला…
मागे गेले तर तिथं स्वारी पाठमोरी उभी…
कुठल्याही अँगल नीं चिकणा दिसतो हा 😜🤭
मला तर काहीही सुचतं होतं..
मी मागे जाऊन उभी राहिले… तो फोन लावणार इतक्यात खांद्यावर हात ठेवला.. आणि तो मागे वळला आणि अचानक खालीच बसला..
तेच मुळी गुडघ्यावर..
माझ्यापुढे चाफ्याची फुलं एका पानात आणली होती ती दिली.. आणि म्हणाला…
मला या जन्मात माझ्या राधेपासून दूर नाही जायचंय…
माझी बायको होशील??
काय सांगू काय वाटलं हे ऐकून..
अय्या इश्श्य सगळं एकत्रच उमटलं…
नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता..
मी हि लाजत हॊ म्हणाले ..
आणि खुष झालेल्या स्वारीनं मला घट्ट मिठीत घेतलं…
अहो सोडा.. म्हणतं मी हि  पळाले …पण तरी हि सापडलेच
मी… मग अलगद हात त्याच्या भक्कम हातात घेत मला जवळ ओढलं आणि काही कळायच्या आत त्यानी प्रेमाची मोहोर उमटवली…
मग तिथेच काही  क्षण विसावलो.. आणि मग त्यानं घरच्यांचा विषय काढला…
मला टेन्शन नको घेऊस… आजच घरी सांगतो… आणि आई बाबांना बोलणी करायला पाठवतो म्हणाला…
क्रमश :

#काय होईल पुढे?
##आत्तू नीं पसंत केलेल्या मुलाला आता भेटायचंय.. कैसा होगा वों 🙄?

*हिरोशिमा नागासाकी…🤭🤭 ब्लास्ट उध्वस्त… आठवलं…
©®मनस्वी

पुढील भागाची लिंक- श्रीरंग… 8

Image by Free-Photos from Pixabay 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!