श्रीरंग… 10

आधीच्या भागाची लिंक- श्रीरंग … 9
मला गॅस वर बसवून हा नक्की कुठं आहे याचा शोध घ्यायचाच या विचारानं सगळं आवरून बाहेर पडणार तोच हा दारात !!🙄🙄 साधारण दातखीळ वगैरे बसली असती मला… आता सकाळी सकाळी थेट घरी???
बापरे ! मेले मी … पूज्य पिताश्री मातोश्री आणि आत्याश्री 🙄🤭
मिळून मला कुटतायत असा भास झाला क्षणभर !.
मला तर सुचेचना…
हा आला आणि माझ्याकडे न पाहता घरात गेला…
कानात आणि डोक्यात वारा शिरल्यासारखा… 🙄
मी कसली अपेक्षेने बघत होते. 🙄🤭
आत गेला आणि बाबा समोरच पेपर वाचतं बसले होते…
त्यांना काही कळायच्या आत त्यांना वाकून नमस्कार केला  ..
ते ही दचकून बघायला लागले..
मग म्हणाला…
नमस्कार… मी श्रीरंग..
मी एक वकील आहे,  स्वतःचं घर नसलं तरी वडिलोपार्जित वाडा, एकत्र कुटुंब आणि एक पेढी आहे आमची.. मोठा भाऊ आणि वडील पेढी सांभाळतात मी ही मदत करतो…
एकूण काय… खाऊन पिऊन सुखी आहोत…
बरं मग 🙄… बाबांच्या तोंडून निघालं..
तर माझं हे काम आहे तुमच्याकडे
की मला तुमच्या या मुलीशी लग्न करायचंय..
मी तिला मागणी घालायला आलोय.. 🙄🙄🙄
आता हिरो साकी आमचं घर झालं…
आई कुणीतरी आलय हे पहायला स्वैपाकघरातून बाहेर आली होती.. हातात पिठाचा वाडगा होता… हो होता..
कारण हे ऐकून तो सटकला आणि पिठाची रांगोळी घातली गेली… भावी जावयासाठी 🤭🤭😜..
बाबा डोळे विस्फारून बघत होते… की हे आत्ता नक्की काय झालं??
आत्तू नुकतीच देवपूजा आटपून बाहेर येतं होती…
आणि हे ऐकून ती ही ब्रेक मारल्यासारखी थांबली…
आणि मी 🙄🙄..
मला नक्की हे ऐकून काय वाटलं असेल…
विचारूच नका…
एकीकडे होऊ घातलेल्या नवऱ्याचा शाहरुख  दिसला आणि दुसरीकडे बाबांचा ‘पोतराज ‘ झालाय असा सीन दिसला 🤭🤭😜😜🤣🤣🤣🤣..
एकूण काय… तर हे प्रकरण… डेंजर वाटेवर आलं…
आधी त्याला आणि मग मला आपादमस्तक न्याहाळलं…
ढमे… आत ये…
🙄 काय हे… माझ्या अहो समोर ढमे काय म्हणताय बाबा?? असं चिडून विचारावं असं वाटलं.. पण सध्या जीव वाचवा मोहिम महत्वाची होती ..
मी गुमान आत आले…
त्याच्या बाजूला उभी राहू की समोर हे न कळून गोंधळले..
काय म्हणतायत हे??
तु ओळखतेस ह्यांना??
मी त्याच्याकडे पाहिलं..
तो मात्र शांत… आणि नेमकं याच वेळी त्यानं माझ्या डोळ्यात पाहिलं..
आई गं… काळजात कळ उठते तो असा पहायला लागला की.
🤭
पण ही वेळ रोमान्स साठी नाही…
मी मान खाली घालून उभी राहिले…
ढमे..
मी काय विचारतोय?? बाबांचा अमरीश पूरी झालाय.. असा फील आला..
मी गप्प..
अगं बोल काहीतरी… आई डायरेक्ट फरीदा ऐवजी ललिता पवार बेअरिंग मधे… 🙄🙄
मग मी मान वर करून दोघांकडे पाहत म्हणाले…
हो ओळखते…  आणि आवडतात मला हे… आणि हे मी आत्तूला सांगितलंय..
🤭
आत्तू आता चिडेल असं वाटलं पण ती शांत होती…
तिने पुढे येत सांगितलं… हो.. म्हणाली ही मला,  पण मुलाची माहिती काढल्याशिवाय मी तुम्हाला काहीही सांगायचं नाही असं ठरवलं होत… आता हे थेट इथे असे येतील हे मला काय माहित…?
आत्यानी बॉल पुन्हा माझ्याच कोर्टात टाकला…
एवढ्यात बाबांचा फोन वाजला…
पलीकडून पुन्हा एक आवाज…
आज आमच्या लेकाचा वाढदिवस आहे तेव्हा संध्याकाळी तुम्ही सगळे आमच्या घरी या…
बाबा….  हो हो म्हणत फोन बंद करून आमच्या कडें पाहू लागले..
हिला कालच मागणी घातलीये एकांनी… त्यांचाच फोन होता..
आज मुलाला सांगणार आहेत त्यांनी हिला पसंत केलीये ते…  रीतसर कार्यक्रम आज होईल..
आणि मग पुढची बोलणी…
आता हे असं अचानक तुम्ही आलात….
खरंच भलताच पेच होता…
सगळेच गप्प…
मग  पुन्हा शांतता…
आम्ही एकमेकांना चोरून पाहत होतो…
मी ही तो आवडतो हे ऐकल्यापासून स्वारी जास्तच खुष होती… 😜🤭🤭

मग बाबा म्हणाले…. तुमच्या घरच्यांना माहीतीये?
त्यांचं काय म्हणणं आहे?
मी आज बोलणार त्यांच्याशी ..
ठीक आहे…
तुम्ही तुमच्या घरी बोला मग पाहूया पुढे काय होतंय…
पण मला एक वचन हवयं…
तोपर्यंत तुम्ही हिचं परस्पर कुठेही लग्न जुळवू नका..
🙄🙄🙄बापरे केवढं डेरिंग केलं ह्यानी… असं आपलं मी मनातच म्हणाले…
बाबा ही त्याच्याकडे रोखून बघत म्हणाले… ठीक आहे देतो शब्द…
पण जर तुमच्या घरच्यांचा नकार असेल  तर?
तर….  2 मिनिटं पॉझ…  मग माझ्याकडे बघत म्हणाला…
तर मी तुमचे आशीर्वाद घेऊन आमचा संसार थाटीन…. पण हिच्याशिवाय दुसरी कुणीच माझी बायको होणारं नाही…
आणि आमचा नकार असेल तर?? 🙄🙄
बापरे….  आता उत्तर मी द्यायच की काय??  या विचारानं मी घाबरले…
तर….
मग पुन्हा माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला…
तुमचा होकार मिळेपर्यंत वाट पाहीन…  पण मग हिचं दुसरीकडे लग्न होणारं नाही याची ही काळजी घेईन..
बाई गं.. डायरेक्ट नडला हा माझ्या बापूसला 🙄😜
आता काय होणारं…
मुरलीधरा ये रे बाबा धावून..

मी मनातल्या मनात जप सुरु केला 🙄🙄..
वातावरण फारच तंग झालं होतं…
मग आई मधे पडली…
बरं… बोलू आपण…बसा तुम्ही…
ढमे….  आत चल…  चहा घेऊन जा….
आणि मी चोरून त्याला बघत आत आले.
बाबा त्याला बाकीचं विचारू लागले…
आणि मी चहा करताना आई आणि अत्तु माझ्याकडेच पाहत होत्या…
चहा बनवला आणि बाहेर नेऊन दिला.. फराळाची बशी ही ठेवली  .
बाबांनी चहा त्याच्या हातात दिला…. त्यानं एक सिप घेतला आणि माझ्याकडे बघत गालातल्या गालात हसत राहिला…
मग बाबांनी चहा घेतला… आणि चहा चा सिप घेऊन त्याच्याकडे पाहिलं…
त्यानं नजरेनं खुणावलं काहीतरी..
आणि मग म्हणाला..
उत्तम झालाय…  धन्यवाद…
मी चटकन आत पळाले लाजून…
तसा आत्तूनी पाठीत धपाटा घातला …
अगं लक्ष कुठाय?  चहात साखर कुठाय?? किती कडू लागतोय…
🙄🙄🤭🤭 बापरे…. म्हणजे त्यानं तसाच चहा प्यायला??
आई गं. बिच्चारा….
काय हा धांदरटपणा…काय म्हणत असेल तो…?
तो निघाला… मुद्दाम मोठ्या आवाजात म्हणाला…लवकरचं येतो…
आणि निघून गेला…

बाबा आत आले..माझ्या डोक्यावर हात ठेवला काहीच बोलले नाहीत…
पुन्हा फोन वाजला…..  आज संध्याकाळी नक्की या… मुलगी दाखवायला..
#आता काय होईल?
#मला तर अज्जून माहित नाही कुणाला दाखवणार?
#आत्तू बाबा आई आता काय म्हणतील???

क्रमश :
©®मनस्वी

Image by Free-Photos from Pixabay 

5 thoughts on “श्रीरंग… 10

  • April 6, 2021 at 9:11 am
    Permalink

    सुरेख भाग

    Reply
  • April 6, 2021 at 3:21 pm
    Permalink

    मस्त कथा,पण रोजच्या रोज पुढचे भाग पाठवत जा

    Reply
  • April 8, 2021 at 5:31 pm
    Permalink

    Mast aahe story… waiting for Next part

    Reply

Leave a Reply to keti Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!