आणि valantine गोड झाला- ५
आधीच्या भागाची लिंक- आणि valantine गोड झाला- ४
क्षितीला सुद्धा हळूहळू अभिजित आवडू लागला होता . आणि इतका handsome मुलगा आपल्याला त्याच्या गाडीवरून घेऊन जात आहे बाहेर , तर नकार द्यायचा प्रश्नच नव्हता , पण लगेच कसं हो म्हणणार , म्हणून हे नाटक.
“नाही रे तसं नाही …. बरं मी करते मेसेज घरातून निघाले की”
संध्याकाळी बरोबर पाच वाजता क्षितीचा मेसेज आला
‘कुलूप लावून बाहेरच पडत आहोत , तू निघालास तरी चालेल’
तो तयारच होता. ब्लू जीन्स आणि त्यावर व्हाईट कलरचा टी शर्ट . खूपच handsome दिसत होता तो.
जिना उतरत दोघीही येत होत्या. पिहू गुलाबी रंगाच्या फ्रॉक मध्ये परीच दिसत होती. आणि क्षितीने black and white कलर कॉम्बिनेषन असेलला वन पीस घातलेला होता. तिचे केस सरळ आणि चमकदार होते . ते तिने सोडलेले होते. कानात मोठाले रिंग आणि हलकीशी लिपस्टिक. अहाहा काय दिसत होती ती . असं वाटलं एक शिट्टी मारावी . पण मनाशीच असं म्हणून त्याने स्वतःला रोकलं.
तेवढ्यात त्या दोघी त्याच्या समोर येऊन उभ्या राहिल्या
“काका” असं म्हणून पिहुने त्याच्याकडे दोन्ही हात केले
त्यानेही तिला पटकन कडेवर घेतलं आणि एक गोड पापा घेतला
“काय रे, स्वतःशीच काय हसत होतास? आणि बाय द वे एकदम चिकणा दिसत आहेस आत्ता तू , म्हणजे मला शिट्टी येत असती तर नक्की मारली असती”
आणि तो परत मोठ्याने हसायला लागला
“सेम … सेम माझ्याही मनात हेच आले अगं, तुला बघून …. म्हणजे तुम्हा दोघींना बघून”
“बरं… बरं…. ऐकलंसं का पिहू , काकाने आपल्याला आपण सुंदर दिसतो म्हणून कॉम्प्लिमेंट दिली आहे”
आणि ते दोघेही हसायला लागले. पिहू मात्र गाडीवरून फिरायला जायचं म्हणून भलतीच खुश दिसत होती.
“पिहुला पुढे घेऊ मी , की तू घेऊन बसतेस मागे , म्हणजे तुला काय comfortable वाटतंय तसं सांग, कारण अर्धा तास तरी लागेल mall पर्यंत जायला”
“चालेल तू पुढे घेऊन बसलास तरी , ती तुझं ऐकते आणि मुळात तू आवडता आहेस तिचा , म्हणून तू पुढेच घे तिला”
त्याने पिहुला गाडीवर पुढे बसवलं , गाडी चालू केली आणि क्षिती त्याच्या खांद्याचा आधार घेऊन मागे बसली.
पाच मिनिटं ते सगळेच शांत होते. इतकी सुंदर मुलगी आपल्या गाडीवर इतक्या जवळ बसली आहे ह्याचा तो आनंद घेत होता , आणि ती हि एका handsome मुलाच्या मागे बसून पिहू सोबत फिरायला जात आहे ह्याचे सुख अनुभवत होती.
मग दोघांच्या गप्पा चालू झाल्या, त्याने हेलमेट घातलेलं असल्यामुळे तिला नीट ऐकू जावे म्हणून तो मागे वळून तिच्याशी बोलत होता. आणि तिच्या केसांचा आणि मधूनच तिचाही त्याच्या हेलमेटला स्पर्श जाणवत होता.
शाळा , कॉलेज , नंतर नोकरी ह्या सगळ्या विषयावर गप्पा झाल्या.
अभिने mall पाशी आल्यावर गाडी स्लो केली . आणि बेसमेंटला गाडी नेऊन तिथे पार्क करून ते तिघेही mall मध्ये आले
“पिहुला आधी खेळ दाखवूया सगळे इथे”
असं म्हणून ते top फ्लोअर वर आले. आज mall मध्ये बरीच गर्दी दिसत होती.
“रविवार वगैरे ठीके पण आज जरा सगळीकडे गुलाबी गुलाबी का दिसतंय”
क्षितीच्या ह्या प्रश्नावर अभी गालातल्या गालात हसला
“का रे हसलास … बघ की किती जोडपी दिसत आहेत , अगदी लग्न झालेली , न झालेली अगदी आजी आजोबा पण , सगळे कसे गोड दिसत आहेत”
“तुला खरच माहिती नाही का आज काये ते क्षिती?”
“खरंच नाही रे” असं म्हणून ती काहीतरी आठवल्या सारखे करू लागली
“अगं आज तारीख किती हे तरी आठवतंय का?”
“१४ फेब न आज ?……. अय्या हो की रे आज velantine day नाही का ?
ती त्याच्याकडे बघून इतकी गोड हसली की त्याला वाटले तिला आत्ता ह्या क्षणी propose करावे.
“चल.. मी त्या लाईनीत उभं राहून तिकीट काढते ह्या गेमचं” असं म्हणून ती गेली आणि तो विचार करू लागला.
हि मुलगी आपल्या आयुष्यात आली तर कायमची ? तिच्याशी मगाशी मारलेल्या गप्पांमधून त्याला एवढं कळलेलं होतं की तिचं कुठेही जमलेलं किंवा प्रेम वगैरे नव्हतं. आणि त्यालाही अजूनही कुणी मुलगी क्षिती इतकी आवडलेली नव्हती. पिहुच्या बाबतीत तर तो निश्चिंत होता कारण तो तिला आपली मुलगी म्हणून नक्कीच वाढवू शकला असता , इतकी पिहू गोड आणि लळा लावणारी होती.
“चल तिला आत घेऊन जाऊ , म्हणून ते मोठ्याने जंप मारायच्या त्या गेम मध्ये पिहुला घेऊन गेले. चार पाच मुलं आणि चार पाच मुली तिथे आधीपासून तो गेम एन्जॉय करत होत्या. पिहू गेली आणि हसत हसत उड्या मारू लागली. दोघेही तिला चीअर अप करत होते . आणि अचानक चार पाच उड्या मारून झाल्यावर पिहू त्या जम्पिंग ball ऐवजी जमिनीवर पडली. ते दोघेनी धावत तिच्याजवळ गेले. पिहू जोरात रडायला लागली . तिच्या गुडघ्याला बरंच खरचटलेलं दिसलं. अभिने तिला पटकन उचलून कडेवर घेतलं आणि पाठीवर थोपटत शांत करू लागला
“पिहू बाळा काही नाही झालं , तू एकदम brave मुलगी आहेस ना? अजिबात रडायचं नाही , आपण औषध लावू आणि एकदम बरं वाटेल आमच्या पिहू राणीला , उगी उगी नको रडू”
क्षिती पण घाबरलेलीच होती , पण अभिचे ते पिहुला सांभाळणे पाहून तिला खूप ग्रेट वाटलं त्याच्याबद्दल.
mall मध्ये एक first aid सेक्शन होता तिथे ते पिहुला घेऊन गेले आणि तिला banded वगैरे लावलं. पिहू बऱ्यापैकी शांत झाली होती , पण अभिला ती अजिबात सोडत नव्हती आणि क्षितीला आश्चर्य ह्या गोष्टीचे वाटले की ती क्षितीकडे बघत पण नव्हती , अर्थात तिला ह्या गोष्टीचे वाईट अजिबात वाटले नाही.
“पिहू बाळा , कसं वाटतंय आता ? येते बाळा माझ्याकडे काकांचा हात दुखायला लागेल ना राजा , ये गं माझी सोना ती” असं म्हणून क्षिती तिच्याकडे दोन्ही हात पसरून कडेवर येण्यासाठी सांगत होती.
“आणि माउं असं म्हणून पिहू तिच्या कडेवर थोडं थोडं मुसमुसत आली”
“पिहू आपण icecream खायचं का गार गार , मस्त chocklet चे मोठे icecream खाऊ”
“ice cream म्हंटल्यावर तिची कळी खुलली आणि ते ice cream counter वर आले
पिहू शांतपणे बसून icecream खात होती , अभी तिच्याकडे कौतुकाने आणि प्रेमाने बघत होता , आणि क्षिती त्या दोघांकडे आळीपाळीने प्रेमाने बघत होती
“क्षिती … एक विचारायचं होतं….. विचारू ?”
क्षितीला साधारण अंदाज आलेला होता की तो काय विचारणार
“हो विचार की”
“आजचा दिवस खूप मस्त आहे आणि मी आढेवेढे वगैरे घेणार नाहीये …. मला पिहुचे बाबा व्हायचं आहे …. तू आई होशील तिची”
हे ऐकून क्षितीच्या डोळ्यातून घळाघळा पाणीच यायला लागले
“sorry …. sorry ए रडू नको बाई …. लोकं बघत आहेत आपल्याकडे , म्हणजे इतके गोड आई बाबा आणि गोड मुलगी ह्या अर्थाने म्हणत आहे मी” असं म्हणून तो हसायला लागला
“अभी मी काय बोलू ? तुझा कुठला गुण जास्त चांगला आहे , तू मला का आवडतोस नाही सांगता येणार , पण ह्या प्रश्नात मला तू पिहुचा बाबा , माझा जोडीदार ह्याहूनही एक माणुसकी जपणारा , भावना सांभाळणारा एक गुणी मुलगा म्हणून जास्त भावला आहेस”
“म्हणजे तुझा होकार समजू ना ?”
“तू जा तिकडे” असं म्हणून क्षिती चक्क लाजली
“अरे वा आत्ताच्या मुलीही इतकं गोड लाजत असतील तर माझ्या आईला तर तू एका फटक्यात पसंत पडशील”
“अभी , पण तुझ्या कडचे पिहुला…. ?
“क्षिती माझे आई बाबा आहेत ते , मी जितका इतरांचा विचार करतो , किंवा माणसांना जपतो त्याहूनही कितीतरी जास्त ते इतरांचा विचार करतात , आणि माझ्या कुठल्याही निर्णयाला त्यांची कधीही ना नसते”
“हो कारण तू हि हल्लीच्या मुलांसारखा उथळ विचार , सैरभैर वागणं असलेला नाहीयेस”
“ बरं बरं स्तुती खूप झाली , आता उत्तर दे की लवकर”
“सगळ्या गोष्टी अश्या शब्दात नसतात मावत अभी”
आणि अभिने एका बाजूला पिहुच्या डोक्यावर हात ठेवला आणि क्षितीचा एक हात हातात घेऊन वचन दिलं …. आज मी तुला एक वचन देतो क्षिती … मी कधीही पिहुला अंतर देणार नाही , पुढे आपली मुलं झाली तरीही ती माझी लाडाची लेकच असणार लक्षात ठेव”
“ अभी ….. “
“आणि तुला काय हवं … म्हणजे एक मुलगी आहेच , तर मुलगा ठीके ना एक आपल्यला , किंवा दुसरी मुलगी पण चालेल बरं का”
हे ऐकल्यावर “गप रे अभी” असं म्हणून क्षिती अभिच्या एक्दम जवळ आली आणि त्याचा हात हातात घेऊन पिहुकडे आनंदाने बघत तिला जवळ घेऊन “आपली मुलगी म्हणून कवटाळू लागली.
आणि असा हा valantine गोड झाला.
समाप्त…
मानसी चापेकर
Image by StockSnap from Pixabay
- शर्वरी…(कथा संग्रह) - September 12, 2022
- निसरडी वाट- 1 - September 17, 2021
- फिरुनी नवी जन्मेन मी ….२ - July 27, 2021
ggodach ekdam