first♥️night ♥️🤭😜

मिहीर आणि मनवा…
दाखवायचा कार्यक्रम झाल्यापासून फक्त 4 वेळाच एकटे भेटले… ते ही वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी… जिथे मोकळे पणाने काहीच बोलता आलं नाही..
दोघं ही अनंत स्वप्न मनातल्या मनात विणत होते…
कसा असेल तो?
कशी असेल ती?
याच विचारानं गांजले होते…
मला आवडतो रोमॅंटिक पुरुष.. त्याला जमेल का फिल्मी वागणं? तिला या विचारानं घाम फुटायचा..
मला बोल्ड बायको हवीये.. ती असेल का? सुरवात पुरुषांनं करावी अशा टिपिकल विचाराची असेल… कधी उलगडेल आमचं नातं..? अशा अनेक प्रश्नांचे शर त्याला घायाळ करीत असतं… तसा तो आतून जाम फिल्मी होता पण मित्र नातेवाईक यांच्या समोर मुद्दाम रुक्ष वागावं लागे…
कारण घरातलं वातावरण तसं होतं ना…
गव्हाळ रंगाचा, काळ्याभोर डोळ्यांचा तरतरीत नाकाचा पण सुखवस्तू बांध्याचा मिहीर आणि
गौर कांतीची, कथ्थाई आँखोवाली, अपऱ्या नाकाची आणि नाजूक बांध्याची मनवा…

अगदी छान पारंपरिक पद्धतीने लग्न लागलं.. सगळ्या नातेवाईकांनी मनसोक्त आनंद लुटला आणि आज फायनली ह्या दोघांची ‘पहिली रात ‘ आली ..
आता स्वप्न खंडिभर असतात पण किती जणांची पूर्ण होतात?? तर अशाच धाकधूकीत दोघं ही सज्ज झाले..
मनवा ला सुरेख सजवलेल्या रूम मधे बसवून तिच्या यां नव्या सख्या बाहेर पडल्या आणि इकडे मिहीर च्या भावंडांनी आणि मित्रांनी त्याला पिडायला सुरवात केली…
खरंतर ह्या सगळ्या गोष्टी आधी गोडं वाटल्या तरी नंतर बोअर होतात आणि म्हणूनच कधी एकदा इथून सुटका होतीये याची तो वाट पाहत होता…

मिऱ्या all the best 😜😜 मिऱ्या रॉक मॅन!” असे अनेक संमिश्र आवाज येत होते..

गपा रे… म्हणत मिहीर वैतागला..
कालच लग्न झालं होतं.. गेले आठ दिवस इतके धावपळीत गेले होते की बिचारा पार दमून गेला होता… त्यातच arrange marriage… म्हणजे एकमेकांना यां पूर्वी तसा दिलेला वेळ हा त्या मानाने फारच कमी..
त्यात दडपण “बायकोच्या ” अपेक्षांचं..
एकंदरीत मनात विचारांचा दंगा चालू होता..
मनवा… नवी नवरी..
सासरी पोचल्या क्षणापासून इतक्या लोकांच्या कचाट्यातून आताच सुटलेली..
इतकं अगत्य, प्रेम आणि नव्या नवऱ्याच्या अपेक्षांचं ओझं..
खरंतर ही  प्रचंड मोकळ्या वातावरणात वाढलेली.. बोलायला ही मोकळी पण का कुणास ठाऊक हे लग्न ठरल्यापासून बिचारीला मोकळ स्वच्छंदी जगताच आलं नाही.. इतके सल्लागार आजूबाजूला… हे कर ते नको
ही पण वैतागवाडीला पोचलेली..
फायनली तिला तिच्या रूम मधे एकट सोडून सगळी जत्रा बाहेर आली आणि पिंजऱ्यात प्राण्याला ढकलाव तसं आपल्या मिहीर ला आत ढकलला…
का कुणास ठाऊक… हिला खुद्कन हसूच फुटलं..
पण त्याच्यासमोर तिने हात तोंडावर ठेवत हसू दाबलं…
शेरवानी मधल्या मिहीर थोडा कचरत पुढे आला..
रुबाबदार दिसत होता पण attitude पार कोकरा सारखा झाला होता…
तिनेच खूण करत बेडवर बसायला सांगितलं…
तो हुश्श्य करत बसला…
आणि मग तिच्याकडे वळून पाहिलं..
ती त्या किरमिजी नऊवारीत अफलातून दिसत होती..
पण तरीही अवघडलेली वाटली…
तुला चेंज करायचय का? त्यानं विचारलं..
तुला चालेल? तिने प्रतिप्रश्न केला..
Pls मला चालायचा काय संबंध… ज्यात तू कमफर्टेबल असशील तशीच रहा… आता तुम्हीच मालकीण बाई आहात ना 😜
म्हणत त्यानं डोळा मारला..
अहाहा…. काय sexy moment वाटली तिला…
ह्याला म्हणतात रोमान्स..
मनातल्या मनात तिने कृष्णाला एक flying kiss दिला…
चलों आगाज तो अच्छा हुआ…
अर्थात हे सगळे मनातले भाव तिच्या बोलक्या डोळ्यातून त्याला चटकन कळले…
ऐक ना…तो उठत म्हणाला..
बोल.. ती ही पलंगावरून उतरत म्हणाली..
तू इथे चेंज कर… मी वॉशरूम मधे जातो..
चालेल ना?
नाही… ती ठामपणे म्हणाली..
आँ?? अगं तुझी नऊवारी आहें आणि तिथे चेंज करणं तुला अवघड जाईल नं.. तो बुचकळ्यात पडला ..
हो पण आताच म्हणालास ना… मी मालकीण बाई आहें मी ठरवायचं..
बर.. मग जा तू आत मी इथे चेंज करतो… त्यानं खांदे उडवत म्हटलं..
नाही… ती पुन्हा त्या ना वर जोर देत म्हणाली..
मग 😱?? त्याला काहीच कळेना…
ती जवळ आली.. त्याची धडधड वाढली…
उगाच आपली “धकधक माधुरी “होतीये की काय अशी भीती ही वाटून गेली…
तिने अलगद त्याच्या छातीवर हात ठेवला..
आणि अजून जवळ येत त्याच्या कानाशी कुजबुजली…
हा रोमान्स आवडेल तुला अनुभवायला?
आईशप्पथ… हे तो मनात किंचाळला… कसली मनकवडी बायको मिळाली या sssर्रर्रर्र!!
आयुष्यात हा क्षण यायला नाहीतर किती वेळ गेला असता कुणास ठाऊक?🤭🤭
त्याने ही तो हात तसाच छातीवर धरून ठेवला आणि तिच्या टपोऱ्या गाभूळलेल्या डोळयांत पाहत म्हणाला…
एका अटीवर…
आता आँ करायची पाळी तिची होती… या प्रसंगात अट 🙄???
असं रोज रोज करशील ना 😜..
छे…मुळ्ळीच नाही .. ती हात सोडवत म्हणाली… आणि पाठमोरी वळली…
तिची पाठमोरी छबी… काळजात रुतली…
केसांचा खोपा.. त्यावर सोनफूल, मोत्यांचे हेलकावे घेणारे वेल, गालाशी हितगुज करणाऱ्या खट्याळ बटा…
गौर कांती.. नितळ पाठ त्यावर रुळणारे लाल सोनेरी गोंडे,
आणि त्यावर कळस म्हणजे खणाच्या चोळीची गाठ..नऊवारीचा दुहेरी काठ, आणि त्यातून डसणारं… हो दिसणार नव्हे काळजाला डसणारं तिचं सौष्ठव…
पायघोळ नऊवारी, आणि नाजूक गुलाबी पावलं..

बाईच खरं सौन्दर्य यां अशा पाठमोऱ्या छबीतच आहें असं ही वाटून गेलं..
त्यानं जवळ येत तिच्या पदराच्या खांद्याची पिन काढली..
त्याचा तो पहिला वहिला स्पर्श तिला उमलवू लागला..

लाजून ती वळली आणि तिच्या खांद्यावरच्या पदरानं मुजोरी केली.. अलगद खाली सरकला आणि त्यानं तिला मिठीत कैद केली.. अलवार पणे एकेक शृंगार लेणं गळून पडलं अन उरली मुक्त काया…
प्रणायाच्या एकमेकांच्या स्वप्नील कल्पना आता मूर्त रुप घेऊ लागल्या…
रोमांच, प्रणयधुंदी अन द्रुत लयीतल्या उष्ण श्वासांनी मैफिलीत रंग भरला.. काही क्षण असेच आवर्तनात गेले आणि ती दोघं पुन्हा हात हातात गुंफुन एकमेकांना न्याहाळू लागली…
मीलनानंतरची ती जवळीक, नात्यानं ओलांडलेलं माप, आणि स्पर्शानं पटलेली नवी ओळख लेऊन आजत्या दापंत्य जीवनाची सुरुवात झाली..

सकाळी कुणी ही डिस्टर्ब करायला नं आल्यामुळे कालच्या गोडं क्षणांनीच आजच्या ही दिवसाची सुरुवात झाली..
अन दोन अवघडलेले जीव आता नात्यातल्या मोकळ्या आकाशात विहरत होते…
©मनस्वी

Image by Swadhin Das from Pixabay 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!