कन्या दान
” सोनू बेटा झाली का तयार. चल वेळ होतेय शाळेचा.चल चल लवकर.डब्बा, वाॅटर बॅग घे.चल बाळ”
” हो हो आऊ..
आलेच…”
दोघीं घरा बाहेर पडल्या.सोनुने मागे वळून उभारलेल्या तिच्या आईला ” बाय मम्मा” म्हटले.आणि त्या दोघी शाळेच्या दिशेने गेल्या.
” गुड मॉर्निंग सर ” सोनुने शाळेबाहेर तिला भेटलेल्या सरांना अभिवादन केले.
” बाय आऊ..
आणि हो लवकर ये न्यायला मला” म्हणत आऊच्या हाताचा गोड पापा घेऊन सोनू शाळेत पळाली.
…..
…सोनु …
….आणि आऊ…
या दोघींचें तसे नाते म्हणजे आऊ ही सोनुची मोठी काकी माधवी. पण सोनु तिला आऊ म्हणायची.काकी लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत विधवा झाली होती.तिचे पती बॅंकेत नोकरी करत होते.एके दिवशी घरी परतताना ट्रकने धडक दिल्याने त्यांची स्कुटर रस्त्याच्या कडेला जाऊन पडली आणि ते उडून जाऊन तिथे पडले.डोक्याला मार लागला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.
आणि आजच तिला आपल्याला बाळ होणार आहे याची चाहूल लागली होती.ती आपल्या नवऱ्याला संध्याकाळी ही गोड बातमी देणार होती. तोच तिच्या वर हा नियतीचा घाला झाला.ती हा धक्का सहन करू शकली नाही.यामध्येच तिचे मिसकेरेज झाले.
माधवीवर जणू काही दुःखाचे आकाशच कोसळले.
यानंतर तिला दुसरे लग्न करून देण्याचा निर्णय तिच्या सासु सासऱ्यांनीं केला पण तिने नकार दिला.
धाकटे दिर सुहास .
एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होते.माधवी त्यांना अगदी आपल्या लहान भावाप्रमाणे वागवायची.आता त्याला मुलगी पहाणेची जवाबदारी सासुबाईंनीं माधवीवर सोपवली.तसेच तिनेही चांगली शिकलेली गुणी तिच्या नात्यातील मुलगी पसंत करून आपल्या दिराचे लग्न केले.
त्यांना एक गोंडस मुलगी झाली.तिचे नाव नयनतारा ठेवले पण प्रेमाने तिला सोनू म्हणायचे.माधवी सोनूला आपल्या मुलीसारखेच प्रेम करायची.सोनू देखील तिच्या शिवाय कोणाकडे राहायची नाही.ज्यांना माहीत आहे त्यांनाच माहीत कि सोनू माधवीची मुलगी नाही.न माहीत ते लोक या दोघी मायलेकी आहे असे म्हणायचे.
तर आता सोनू शाळेत जाऊ लागली होती.तिला शाळेत नेणे,तिचा अभ्यास करून घेणे हे सगळे माधवीच करत असे.
आज शाळेमध्ये शिक्षकांचीं मिटिंग होती म्हणून शाळेची लवकर सुट्टी होणार होती.माधवी लवकरच शाळेत गेली.सगळ्या मुली पळत पळत शाळे बाहेर आल्या.ज्या त्या आपापल्या पालकांकडे,रिक्षा,वॅन कडे धावू लागल्या.सोनू पण आऊ..आऊ..करत आली.आऊने मंद हास्य करत तिला जवळ घेतले.तिची स्कूल बॅग आपल्या जवळ घेऊन तिचा हात धरुन त्या दोघी घराकडे निघाल्या.तोच तिथे सोनूची वर्ग मैत्रीण रडत उभी होती.सोनूने माधवीला तिच्या कडे जाऊ या म्हटले.
” काय झाले बाळा,का रडतेस” माधवीने विचारले.
” पप्पा….
…..पप्पा….
….पप्पा…”
” अरे बोल न बेटा.का रडतेस”
” पप्पा आला नाही”
” अरे ..मग आई येत असेल.”
हे ऐकून ती मुलगी आणखी जोरात रडू लागली.
माधवीला काही कळेना.
मग शेवटी माधवीने तिला जवळ घेतले तिचे डोळे पुसले.” तुझी स्कूल डायरी दे बेटा.मी तुझ्या पप्पांना फोन करते”
माधवीने तिच्या वडिलांना फोन केला.तर त्यांनी लगेच कट केला आणि मेसेज केला मी मिटींग मध्ये आहे नंतर फोन करेन.
माधवीने मग सविस्तर मेसेज केला कि मी माधवी.आज शाळा लवकर सुट्टी झाली तुम्ही कोणी नेण्यास न आले ने तुमची मुलगी रडत आहे.तिच्या डायरीत तुमचा नंबर मिळाला म्हणून फोन केला.
हा मेसेज मिळताच लगेचच माधवीला फोन आला” ओ आय एम व्हेरी सॉरी.आज लवकर शाळा सुट्टी होणार याची मला कल्पना नव्हती.येतोच मी लगेच जरा मिटींगमध्ये आहे”
” ओके.
नाही तर हिच्या आईला कळवा त्या येतील ना”
” नको नको मीच येतो.धन्यवाद तुमचे”
” हे बघं सोनू हिचे पप्पा येईपर्यंत आपण इथे समोरच्या ग्राउंड मध्ये जाऊन बसू.तुम्ही दोघी खेळा .मग आपण हि गेली कि जाऊ हो का”
हे ऐकून या दोघी चिमुरड्या खुश झाल्या.जवळ जवळ अर्धा तास झाला तरी तिला नेण्यासाठी आलेच नाही.आणि इतक्यात गाडीचा हॉर्न ऐकू आला तोच ” पप्पा…
पप्पा..म्हणतं ती पोर पळू लागली.
” अरे हो रे हळूहळू जा.पडशील बाळा” माधवी तिची स्कुल बॅग घेऊन आली.
तिचे वडील कारमधून बाहेर आले ” ओह माय डॉल
साॅरी बेटा ” हे म्हणतं असतानाच त्यांचे लक्ष माधवी कडे गेले.
” नमस्ते मी माधवी.मीच फोन केला होता तुम्हाला”
” नमस्ते .ओह माफ करा माझ्या मुळे तुम्हाला त्रास झाला.जरा मिटींग संपवून येण्यास वेळच झाला.चला मी तुम्हाला सोडतो तुमच्या घरी.मग आम्ही जातो”
” अहो नको नको जातो आम्ही चालत.
चल बेटा बाय” म्हणत माधवी सोनुला घेऊन चालत गेली.
आता रोज हे दोघे शाळा सुटायच्या वेळी भेटत.मग रोज यांचे वेगवेगळ्या विषयांवर बोलणे होत असे.
दोघांची मते एकमेकांना पटत होती.दोघांच्या आवडी निवडी पण एकच.आता दोघांची मैत्री चांगली झाली होती.
त्यादिवशी त्यांनी माधवीला सांगितले कि उद्या मला जरा काम आहे तर मला यायला उशीर होईल तोपर्यंत तुम्ही हिच्या कडे लक्ष द्याल का.खुप नाही अगदी जराच वेळ होईल”
आणि माधवीने सांगितले प्रमाणे दोघी मुलींना घेऊन समोरच्या ग्राउंड मध्ये जाऊन बसली.
जरा वेळाने त्याच्या गाडीचा आवाज आला.तशी मुली दोघी पळत पळत गेल्या.
” हे घ्या मिठाई.आज माझे प्रोजेक्ट पुर्ण झाले.मला आता प्रमोशन मिळाले”
” अरे व्वा.अभिनंदन”
” अहो याच्या खऱ्या अर्थाने हकदार तुम्ही आहात”
माधवीला आश्र्चर्यच वाटले
” हो..
खरंच .. जेव्हा पासून आपली ओळख झाली तेव्हा पासून मी माझ्या छकुली बाबत बिनधास्त झालो कारण जरा मला येणेस उशीर झाला तरी तुम्ही आहातच.आणि तुमच्या बरोबर बोलताना तुमचे विचार ऐकून एक वेगळीच प्रेरणा मिळाली.
सो ..
या माझ्या यशाची पायरी म्हणजे तुम्ही आहात.आणि हो उद्या शनिवारी मला सुट्टी असते.मुलींनाही सुट्टी मग तुम्ही दुपारी लंच साठी सहकुटुंब सहपरिवार यायचे.अरे हो आपण इतके दिवस भेटतो पण तुमचे मिस्टर काय करतात हेच विचारले नाही मी” म्हणत तो हसु लागला.
पण…
पण माधवीच्या डोळ्यात पाणी आले.
याला काही कळेना की का माधवीच्या डोळ्यात पाणी आले.
मग माधवीने सगळे सांगितले.
” ओह आय एम व्हेरी सॉरी.”
माधवीने मौन बाळगले.
” चला मी आज तुम्हाला तुमच्या घरी सोडतो.या निमित्ताने तरी तुमच्या सासु सासऱ्यांची भेट होईल.’
दोन्ही मुली कारमधून उतरुन आत घरात पळाल्या.सोनुने आपली सारी खेळणी दाखवण्यास छकुलीला आपल्या खोलीत नेले.
” या..या…” माधवीने म्हटले.
आत जाऊन आपल्या सासु सासऱ्यांना बोलावून त्यांची ओळख करून दिली.
” बसा मी चहा करते” म्हणत माधवी आत गेली.
ती आत गेली आणि याने तिच्या सासऱ्यांना म्हटले” मी संदीप.मी सिल्क साडीच्या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहे.मी साड्यांचे डिझाईन तयार करतो.एका स्त्रीला काय आवडेल हे लक्षात घेऊन.माझ्या डिझाईन केलेले साडी नेसून मॉडेल त्याची जाहीरात करतात.हे देखील काम मीच करतो.असेच एका नवशिक्या मॉडेल म्हणून आलेल्या मुलीवर मी प्रेम करु लागलो.ती देखील नकळत माझ्या प्रेमाची साथीदार बनली.आमच्या प्रेमाला आमच्या दोघांच्या आई वडिलांनीं संमती दिली आणि आमचे लग्न झाले.
तिला मोठी मॉडेल व्हायचे स्वप्न होते.तिला मोठं मोठ्या कंपनीत बोलवायचे.आता ती यशाची शिखरे चढु लागली.तोच तिला छकुली होणार याची चाहूल लागली.
मग तिने मला इतक्यात मुल नको.माझी फिगर बर्बाद होईल.मला अजून पाच वर्षे तरी बाळ नकोय.माझे करियर मला इंम्पाॅरटंट आहे.मी काही सर्व सामान्य स्त्री सारखे रांधा वाडा उष्टी काढा करणार नाही.मी आजच जाऊन मुल अबाॅर्ट करते.पण माझ्या आई बाबांनी तिला असे करु नकोस म्हणून खुप विनवले पण ती ऐकेना.शेवटी ती दवाखान्यात गेली.पण तिथेही हे गैरप्रकार आहे.माझे डॉ.चे लायसन्स रद्द होईल म्हणून डॉ.नी नकार दिला.
मग तिने मी मुलाला जन्म देणार पण त्याला अंगावर दुध पाजणार नाही.अशा एक न अनेक अटी घातल्या.
शेवटी छकुली जन्मली.छकुली अगदीच एका महीनाभराची असेल हिला बाहेर देशात मॉडेलींगची आॅफर आली.तिने आमचे कोणाचेही न ऐकता तिकडे जाणेचा निर्णय घेतला.आणि ती निघून गेली.आणि काही महिन्यांतच मला घटस्फोट हवाय म्हणून पेपर पाठविले.आणि आमचा घटस्फोट झाला.
हे सगळे सांगायचे तात्पर्य काय तर मी जर तुम्ही परवानगी दिली तर माधवीला माझी पत्नी बनवू इच्छितो.तिच्यामध्ये वाहणारा ममतेचा निस्वार्थ झरा पाहिला आहे मी.ओळख नसली ,काहीही नाते नाही तरी देखील तिची माझ्या छकुली साठी होणारी तळमळ पाहील मी.मला खात्री आहे माझ्या छकुलीला आईचे प्रेम,माया देणारी माधवीच आहे.आणि मी देखील तिला आयुष्य भर सुखी ठेवीन.वचन देतो मी तुम्हाला”
हे ऐकून माधवीचे सासु सासरे म्हणाले” अहो आम्ही पण माधवीचे लग्न करून देणार आहोत पण ती नाही म्हणते’
” हो म्हणाली तशी ती.”
इतक्यात माधवी चहा घेऊन आली.तिने हे सगळे ऐकले होते.
सासुबाई म्हटल्या” पोरी बघ विचार कर “
माधवी काही न बोलता आत निघून गेली.
आत जाऊ ” ताई खरंच संदीप भाऊ चांगले आहेत.बघा तुम्ही विचार करा.अहो आता सोनू लहान आहे.ती मोठी झाली कि लग्न करून जाईल.मग पुन्हा तुम्ही एकट्याच.
आयुष्याच्या संध्याकाळी कोणीतरी आपल असावं.नाही म्हणजे आम्ही आहोतच पण हक्काचं माणूस असावं”
माधवी म्हणाली” असा लगेच कसा निर्णय घेऊ.जरा विचार करून सांगेन”
……
……आज सकाळपासून घरात एक उत्साहीत वातावरण निर्माण झाले होते.सगळेजण खुप आनंदात होते.घरामध्ये गोड पक्वान्न बनत होते.सासुबाईंनी आपल्या लेकीसमान सुनेसाठी हिरवी पैठणी साडी आणली होती.माधवीने हिरवी साडी नेसून गळ्यामध्ये लक्ष्मी हार, कोल्हापुरी साज, हिरव्या बांगड्या,नाकामध्ये नथ घालून जणू काही आई अंबाबाईचे रुप.
तिला पहाताच छकुली आणि सोनु दोघीही आऊ…आऊ..
करत पळत पळत आल्या.
संदीपलाही आपली निवड चुकली नाही.मला हवीय अशीच सालस, सुंदर अर्धांगिनी म्हणून मिळाली याचा आनंद झाला.तो एकसारखा तिला पाहताच राहीला.
तोच त्याचे आई-वडील म्हणाले” अरे बाळा इथेच उभारुन आमचे पाय आणखीन दुखावणार काय.चल आत मुहूर्ताची वेळ झाली.सुनबाईंना पण वेळ पाहण्यास लावू नको” एकच हास्याचा फुलोरा फुलला.
माधवीला आशिर्वाद देण्यासाठी तिने जोडलेली शेजारच्या काकू, आजी आजोबा आले होते.सगळ्यांना खुप आनंद झाला होता.
माधवीचे कन्यादान करायला माधवीच्या आई वडीलांनी तिच्या सासु सासऱ्यांनाच सांगितले.ही आमची मुलगी होती पण आता ती तुमची मुलगी आहे.तिचा कन्या दान करण्याचा अधिकार तुमचा आहे.
हे ऐकून माधवीचे सासु सासरे भावनिक झाले.जमलेले लोक आपापल्या डोळ्यात वाहत असलेल्या अश्रुंना वाट मोकळी करून देत होते.
हा आगळा वेगळा कन्यादान सगळे भरभरून टाळ्या वाजवून हर्ष उल्ल्हासित होऊन कौतुक करत होते.
माधवीच्या सासु सासऱ्यांनी तिचे कन्या दान केले.माधवी जाताना सासुच्या गळ्यात पडून रडू लागली.
सासु सासरे देखील रडू लागले.तिचा हात संदीपच्या हातात देऊन म्हणाले ” आज पासून आमची मुलगी तुमची झाली.”
” तुम्ही काही काळजी करू नका.जसे तुम्ही हिचा सांभाळ केला तसेच मी देखील करेन.वचन देतो तुम्हाला.”
माधवीच्या शेजारी राहणाऱ्या शांताकाकुंनीं हा सोहळा पाहुन डोळ्याला पदर लावून अश्रु टिपले.आणि म्हणाल्या ” आयुष्यात असे कन्यादान मी पहिल्यांदाच पाहिलं.खरंच पोरी तु खुप भाग्यवान आहेस.असे सासु सासरे लाभले आणि तुला शोभणारा जोडीदार मिळाला”
माधवी आणि संदीप यांचा जोडा अगदी लक्ष्मी नारायण सारखा दिसत होता.
©® परवीन कौसर….
Image by rajesh koiri from Pixabay
Latest posts by Parveen Kauser (see all)
- घटस्थापना.. - July 29, 2021
- सुहासिनी - June 15, 2021
- कन्या दान - May 8, 2021
खूप छान कथा