40TH BDAY…2
आधीच्या भागाची लिंक- 40th BDAY..1 समोरची व्यक्ती आणि ती यांच्यातलं अंतर हळू हळू कमी होऊ लागलं.. आणि एका क्षणी त्यानं हात पुढे करत तिला विचारलं .. May i? कपल डान्स चं आमंत्रण आणि तें हीं त्याच माणसाकडून जों लिफ्ट मधे पाहिला होता.. तिनं नकळत हात हातात दिला.. Dj नी गाणं चेंज केलं... आणि बॉल डान्स सुरु झाला... तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढत तो तिच्या कानाशी कुजबुजला... अजूनही तशीच दिसतियेस... मला पहिल्यांदा भेटायला आली होतीस.. आठवतंय. हाच club... आणि अशीच ती धुंद रात्र... तिला सगळं क्षणांत स्मरलं... विहान... हॊ तोच... विहान... तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि आज हीं तें प्रेम पाहून ती सुखावली... राही... ओळखलंस? ह्म्म्म... विहान... विहान रॉय.. पण तू? आज अचानक? आणि तें हीं इथे? चल... मला हीं बोलायचंय तुझ्याशी... खूप काही सांगायचंय.. खूप काही ऐकायचयं.. तिने हीं बार कॉउंटर पाशी उभ्या असलेल्या मिता ला बोलवून घेतलं.. आणि ओळख करून देतं म्हणाली... मिता हा विहान.. माझा... जुना...... हाय मी विहान.. राहीचा मित्र.. बरीच वर्ष इथे नव्हतो... आज अचानक भेट झाली... तुमची हरकत नसेल तर तिला घेऊन रूफ टॉप च्या टेरेस रेस्तो ला बसतो... आम्ही.. ओह्ह जरूर... पण त्या पेक्षा long ड्राईव्ह ला जा.. राही ला त्याच्या बरोबर इतकं खुष बघून मिता ही रिलॅक्स झाली... ***काय झालं?? लॉजिक पटलं नाही... ***- (लॉजिक..... : जरा पुन्हा मागे जाऊ.. आणि राही च्या नकळत तिनं विहानशी हात मिळवला आणि थम्स अप करत all the best wish केलं.. मिता आणि विहान गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते... आणि मिता जाणून होती विहान चा भूतकाळ..) राही त्या कोलाहलातून बाहेर आली... विहान ची स्पोर्ट्स कार valet parking मधून बाहेर आली आणि त्यानं दारं उघडून तिला आत बसवलं... गाडीचा ग्राउंड clearance लो असल्यानं ती बसताना तिच्या डोक्याला लागू नये म्हणून त्यानं तिच्या डोक्यावर अधांतरी हात धरला आणि तिचा gaun उचलून देतं सावकाश दारं लावलं .. तो येऊन बसला आणि लगेचच ac on केला... त्यानं तिचा सीट बेल्ट हीं लावून दिला नी गाणं लावलं... आज इबादत रुबरु हॊ गयी... तिनं गाणं ऐकताच त्याच्याकडे पाहिलं.. तो रस्त्याकडे पाहत गाडी चालवत होता... त्याचा तो आकर्षक चेहरा, डस्की रंग, 'फवाद ' सारखी दाढी, हसल्यावर दिसणाऱ्या त्या पांढऱ्याशुभ्र दंतपंक्ती .. गुलाबी ओठ आणि मोहक निळसर डोळे... जसा पूर्वी होता तसाच आहे.. फक्त दाढी फारच सुंदर राखलीये.. ती कॉम्प्लिमेंट द्यायला त्याच्या कडें सरकली आणि सिग्नल ला गाडी थांबवली आणि तिच्याकडे पाहिलं.. आणि नेमका याच क्षणांत नकळत तें अगदीच जवळ आले... त्यानं कपाळावर kis केलं.. बोल.. काय सांगत होतीस. अं... हेच की तू अजुनही तितकाच हॉट दिसतोयस. शुक्रिया मोहोतरमा... त्यानी गाडी सी फेस ला घेतली... तिथेच एका बाजूला थांबवली आणि तें उतरून बाहेर आले... बोल... मला ऐकायचयं.. ती म्हणाली काय सांगू? विहान खिशातून सिगरेटचं पाकीट काढत म्हणाला.. तुझ्याबद्दल सांग.. ... कुठे होतास इतकी वर्ष? आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं... म्हणून तू आला नाहीस... तिनं मुद्दाम त्याच्या नजरेत थेट पाहत विचारलं... त्यानं तिला सिगरेट ऑफर केली तिनं हातात घेऊन एक पफ मारला आणि त्याला परत दिली.. बोल... मी ऐकतिये... ****बरोबर 10 वर्षांपूर्वी भेटला होता विहान तिला... तिला फ्लॅशबॅक आठवला... ती आणि मिता अशीच हुक्की आली आणि पार्टीसाठी इथे आल्या . पण कपल एन्ट्री होती... हा हीं आला होता... पलाश बरोबर. त्यांची हीं पार्टनर नसल्याने अडचण झाली होती... तेव्हा हाच आला होता विचारायला... आणि आपण चौघे आत आलो... त्यानंतर... ड्रिंक्स जास्त झाले आणि कॅब साठी बाहेर पडणार इतक्यात हा गाडी घेऊन आला.. सोडतो म्हणाला.. मी गाडीत बसले. त्यानं सुखरूप घरी सोडलं आणि त्यानंतर तें उत्तम मित्र झाले... आता राही ला तो आवडू लागला आणि एक दिवस तिनं त्याच्याच वाढदिवसाच्या दिवशी त्याला प्रोपोज करायचा प्लॅन केला.. सगळी तयारी केली पण तो आलाच नाही... फोन बंद आणि कुठलाच निरोप नाही.. ती जाम रडली.. तो काळ खूपच वाईट गेला.. . पण मग पलाश आपल्याला भेटत राहिला आणि आपण त्याच्यात गुंतत गेलो.. तो करिअर मागे धावला आणि आपण मात्र सर्वस्व वाहून अस्मिता विसरून फरफटत जगत राहिलो... पलाश बरोबर .. ती विचारात हरवलेली असतानाच तो पुन्हा जवळ आला .. आणि म्हणाला... त्या दिवशी मी येणार होतो प्रोपोज करायला पण पलाश कडे मनातलं बोललो आणि त्यानं मला खोटं सांगितलं .. की तूच त्याला प्रोपोज केलंयस.. मग मी त्याचं दुःखात हे शहर सोडलं.. पुन्हा कधीच समोर आलो नाही .. पलाश आणि तू सुखात राहावंसं इतकंच डोक्यात होतं.. मग गेल्या 3 महिन्यांपूर्वी मिता कामानिमित्त मला भेटली पण सत्य कळूनही तिला तुझ्या नाजूक मनस्थिती मुळे काहीच सांगता आलं नाही.. तिच्याकडून तुझी ख्याली खुशाली कळत राहिली आणि तुझ्या आणि पलाशच्या नात्यातला दुरावा ही पण नुकताच तू घेतलेला निर्णय तिनं सांगितला आणि मगं मी तुला भेटायला आलो.... खरंच खूप वाईट वाटलं...की त्यानी तुलाही फ़सवलं.. हे सगळं तो इतका मनापासून बोलत होता की त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू तो थोपवू शकला नाही... का रे आलास मग आजचं... तें ही सगळं माहित असून... तिचा राग, संताप उफाळून आला.. अर्थात त्यामागे अव्यक्त प्रेम होतं त्यानं खूप मनापासून तिची माफी मागितली आणि तिला घट्ट मिठी मारली... एका अलवार क्षणी त्यांचं अधर मीलन झालं.. राही नी विलग होत त्याला सांगितलं.. की त्या दिवशी मी तुला प्रोपोज करणार होते आणि त्यात मी पलाश कडें मदत मागितली.. तुला घेऊन यायला सांगितलं... पण त्यानं मलाच फसवलं... तू लग्न करायला तुझ्या गावी परत गेला आहेस असं सांगितलं.. मग तो भेटत राहिला आणि तो कदाचित माझ्यावर खरंच प्रेम करतोय असं समजून मी लग्न केलं.. आणि आता राही ला बऱ्याच वर्षांनी ही जाणीव झाली की पलाश तिला स्वार्थापोटी जवळ करत राहिला आज खऱ्या अर्थी दोन प्रेमी जीव एकत्र आले... त्यानं पुन्हा एकदा तिला मिठीत घेतल आणि त्या भेटीची सांगता गुडनाईट kis नी झाली.. बरोबर 12 वाजता मिता अन विहान नी राही ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि शांत मनानी ती निजली... खरं सरप्राईज तर आता उद्या मिळणार होतं तिला.. ... ##काय करेल विहान..? क्रमश : Image by 3D Animation Production Company from Pixabay
Latest posts by gangal_manasi (see all)
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Pingback: 40th BDAY..1 – LekhakOnline – Excellent Marathi Articles