40thbday…4
आधीच्या भागाची लिंक- 40thBDAY… 3
राही ला तसंच अलगद मांडीवरून बाजूला उशीवर ठेवून मिता आवरायला निघून गेली…
तितक्यात बेल वाजली…
मिता नीं दारं उघडलं आणि विहान आत आला..
त्याच्या हातात काही सामानाच्या पिशव्या होत्या.. त्या ठेवून तो फ्रेश होऊन आला आणि एप्रन चढवून किचनमध्ये आला…
राही ची सगळ्यात आवडती डिश कुठली??
मिता नीं मेन्यू कार्ड ऐकवाव तसं ऐकवलं..
एक मशरूम स्टफ ग्रेव्ही, एक दम चिकन बिर्याणी आणि हनी पेस्ट्री विथ बटर स्कॉच आइसक्रीम…
वॉव… भारी चॉईस आहे…
ह्म्म्म करतीये लंच साठी ऑर्डर मी.. मिता नीं फोन वर swiggy सर्च करायला घेतलं ..
Chill मिता.. ठेव फोन बाजूला.. हे सगळं मी बनवू शकतो…
काssssssय???
🙄🙄
एवढं सगळं आणि तू बनवणार?? 🙄🙄मिता शॉक..
ह्म्म्म… मधल्या काळात लखनौ ला गेलो होतो… तिथे माझा रूममेट chef होता..
आणि त्यानी मला बराच स्वैपाक शिकवला.
आता बिर्याणी साठी तुझी मदत लागेल..
पण मशरूम online बघून जमेल..
पेस्ट्री आणि आईसक्रीम आयत आणलय.
तें फक्त गार्निश करूयात मस्त…
अरे पण..
चल सुरुवात करूया… म्हणजे ती जागी होईपर्यंत एखादा तरी पदार्थ तयार होईल…
ओक्के बॉस… म्हणत मिता नीं तयारी सुरु केली…
मशरूम, चिकन मॅरिनेशन अशी एकेक स्टेप करत सगळं तयार झालं आणि त्यांची हि सगळी धावपळ राही लांबून शूट करत होती..
हुश्श्य…. आता एक कॉफ़ी दे यार मिता…
दमलो..
म्हणत एप्रन उतरवत तो बाहेर आला आणि सोफ्यावर बसला डोळे मिटून.
कॉफी घेऊन राही आली.
मिता मुद्दाम टेरेस मधल्या झोपाळ्यावर बसून कॉफी घेत होती.
आणि राही नीं अलगद त्याचे खांदे चेपले.
आणि त्यानी डोळे उघडले… राही तू?
कधी उठलीस?
जेव्हा कुणीतरी you ट्यूब वर बघून मशरूम स्टफ बनवत होतं तेव्हा 😜😜🤭
ओह्ह म्हणजे आमच सरप्राईज फुसका बार..
तो हिरमुसला..
मुळीच नाही… तू बनवलं आणि तें हि माझ्यासाठी… हेचं खूप भारी आहे… हे बघ ती मोमेन्ट माझ्या कॅमेऱ्यात कैद आहे 🤭..
म्हणत तिने video दाखवला..
ओह्ह जासूसी करत होतीस..
ह्म्म्म सुगंध दरवळत होता मग उठले.
बरं कॉफ़ी कशी झालीये तें तरी सांग…
त्यानं कॉफ़ी घेतली आणि म्हणाला… साखरेचा अंदाज चुकला..
नाही रे.
एकचं चमचा घातलीये…
बघ.. खूप गोड़ झालीये..
तिने सिप घेतला आणि पुन्हा म्हणाली..
नाही कुठं गोड़ आहे…
🤭ह्म्म्म u kissed it and it turned into sugar…
Sweetipie 😍
गप रे काहीही.. मला वाटलं खरंच बिघडली की काय कॉफ़ी.. 🙄
वेडाबाई.. तू केलेली कुठलीच गोष्ट बिघडणार नाही… कधीच..
असं म्हणत तिच्या कपाळावर ओठ टेकले आणि तिला जवळ घेतलं..
चला आता लंच डेट ला…
चल…मी वाढते…
आणि हे काय तू चेंज नाही करणार.. टी शर्ट ट्रॅकपँट यात डेट ला येणार??
घरातच आहोत.. काय फरक पडतो..
इतक्यात मिता आली. मॅडम bday गर्ल आहेस नं..
जा आत तुझं गिफ्ट ठेवलंय…
परत?? अगं काय चालवलय तुम्ही?? 🙄🙄
आज ऐश कर 😜
मिता आणि विहान नीं एकमेकांना टाळ्या दिल्या ..
आणि राही आत आली..
खूप सुंदर निळ्या रंगाची peacock ब्लू साडी.. मॅचिंग तो सकाळचा नेकलेस, टॉप्स, बांगड्या आणि हॉल्टर नेक चा ब्लाउज..
ती पाहतच राहिली, मग हलकासा मेकअप करून साडी नेसून बाहेर आली.. आणि विहान ती समोर येताच पानात बांधलेले जाइ चे गजरे दिले…
मी माळू?.
मग कुणाला सांगू 😜?
ओहो.. थांब.. लगेच देतो माळून..
म्हणत तिच्या केसांत गजरे माळले..
मग तिचं औक्षण केलं.. आणि पुन्हा एक गिफ्ट दिलं..
पण जे संध्याकाळी च बघायची परवानगी होती…
##काय असेल तें गिफ्ट?
##असं छान मनाजोगता पदार्थ करून bday सेलेब्रेशन कसं वाटतंय??
##अजून काही फँटॅसीज असतील तर नक्की सांगा 😜
क्रमश:
©®मनस्वी
Image by 3D Animation Production Company from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
👌👌