सरहदे

“आमीर…….. बेटेजान,जरा यहां आयीये तो!!”

“जी दद्दु ??? बोले .”
“कुछ हुआ है क्या ? सुबह से न्युज देखे जा रहे है सब ???” 

“जी …..वो हिंदुस्ता के कुछ लडाखु जहाज घुस गए थे….हमबारी हुई है ऐसे बोल रहे है न्युज पे !”

“अच्छा !!” दद्दुच्या कापर्या आवाजात ,त्या खोलवर डोळ्यात खुशी होती.

“दद्दुजान …..आप खुश हो रहे है ???” आमीरला दद्दुचं हे वागणं अजिबातच पटलं नव्हतं .

“हा बेटेजान….हमे सुकुन लग रहा है ये सुनकर ….हमे मालुम है तुम्हे पसंद नही हमारा युं अंदर ही अंदर जश्न मनाना!!”

“क्यों पसंद हो दद्दु?? ये तो वतनपरस्ती हुई ना ..ये नापाक खयालात…ये हमले ….जिनमे हमारे मजहब के लोग मारे जाते है …इनपे क्युं मुस्कुरा रहे है आप ??? या अल्ला ….ये वतनपरस्ती हमसे बरदाश्त नही होती .” आमीर आता बराच उखडला होता.

“आमीर…..हम वतनपरस्त नही है ….बेटेजान …देखो वतन, ये सरहदे अब बनी है …ये सियासती मसले …तुम्हारा देश हमारा मुल्क कुछ मायने नही रखता है….जानते हो इन सियासतों ने क्या क्या छिना है ??? “हे बोलताना दद्दुंना धाप लागली , खोल डोळ्यात थेंब जमा झाले.

तसा आमीर त्यांना उठवत म्हणाला , “छोडिये ना दद्दु….हमे क्या हैं ? हम सलामत है ….जिंदा है ….बस अल्लाताला की मेहरबानी है ….क्युं फिर इन चीजों पे बहेस करनी है …आप पानी पिजिए….!!”

“आमीर ..बहेस तो हमे भी नही करनी,बस लगता है जिस दिन उपरवाले का पैगाम आए……तो हिंदुस्तां की मिट्टी नसीब हो….मेरी सरजमीन पर मौत आए…..कम से कम हिंदुस्तां के गिराये बारूद से मौत आए…..रूह को सुकुन मिलेगा की मेरी मिट्टी से बने बारूद से मैं मिट्टी हो गया ….जहां का हुं उसी मिट्टी संग मिल गया.”

“दद्दु बस किजिए……वो हमारे मुल्क को बरबाद करने पर तुले है …सारी दुनियां मे हमे आंतकवादी मुल्क करार देने की फिराक मे है वो ….और आप ….!” आमीर संतापाने लालबुंद झाला होता.

“बेटेजान गुस्सा ना होना….वैसे गुस्सा आपका लाजमी है….पर एक बात बताए??? आप जितने पाकिस्तानी है ,उतने ही हिंदुस्तानी भी है ….सरहद ने हमे बाट जरूर दियां…मगर हमारी रगों का लहु ना बाटं पाए…..सब कुछ बदल दिया इन सियासतो ने पर हमारे अंदर के हिंदुस्तां को ना बदल पाए!”

“मतलब????” आश्चर्याने आमीर विचारत होता…संतापाची जागा कुतुहलाने घेतली होती.

“दद्दुंनी कापर्या हाताने पलंगाच्या बाजुच एक ड्रावर उघडलं …त्यात ठेवलेली किल्ली उचलुन काठीच्या आधाराने ते तिजोरीजवळ गेले…तिजोरी उघडुन त्यातली एक सागवानी …आयताकृती पेटी घेऊन ते पुन्हा पलंगावर येऊन बसले. एवढ्याश्या चालण्यानेही त्यांना दम लागला होता. त्यांनी त्या पेटीवरची कळ विशिष्टप्रकारे फिरवुन ती पेटी उघडली…..तसे आमीरचे डोळेच फिरले.

त्या पेटीच्या आत जानवं ….कुंकु …गीतेची प्रत अन रामाची तसबीर होती…..लाल वस्रात लपेटलेलं चंदन होतं ….श्वास पुरत नसतानाही दद्दु गीतेचा अध्याय म्हणत होते 
“श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते । श्रद्ध्या परयोपेतास्ते मे युक्ततमा मता:।।”

आमीर हे पाहुन ऐकुन मटकन खालीच बसला….इतकी वर्ष नमाज कुराण पढणारे दद्दु….गीता म्हणत होते…रामलल्लाच्या तसबीरीवरून सुरकुतलेले हात फिरवत तो जाप करत होते. 
त्याला आठवतं होतं ….ईद …शाहीखाना असलं तरी दद्दु कधीच गोश्त खात नसतं ….त्याला उमगायला लागलं गोश्त,बिर्याणी असलेल्या कोणत्यात खान्याला दद्दु शिवतही नव्हते…..दुध पिऊन ,शिरखुर्मा खाऊन किंवा फल घेऊन दद्दुंचा तो दिवस संपे. त्याला आठवलं एकदा त्याने हट्ट केला म्हणुन दद्दुंनी त्याला बिर्याणी भरवली…..मग फार गरमी होतीये अस म्कहणुन रून त्यांनी अंघोळ केली…म्हणजे गरमी बहाणा होता फक्त….त्यानंतर ते अंगभर काहीतरी शिंपडत होते……आमीरनं विचारल्यावर “कुछ नही इत्तर है” म्हणुन त्यांनी त्याला टाळलं …पण त्याच्या बालमनाला तेव्हाही प्रश्न पडला होता …इत्तर कुठ बदबुदार असतं ?? पण आता समजलं ते इत्तर नाही गोमुत्र होतं. ….

“आमीर ….कहां खो गए बेटे ?? हमे माफ करना बेटेजान हम नही मिटा पाए हमारे अंदर के हिंदुस्ता को,…..अंग्रेजोसे आजाझ तो हुए पर मजबही मसलों ने सबको बाटां ….हमे याद नही हमे कैसै झेलम के इसपार पहुंचे ….उसदिन बाबुजीका हात छुटा और भीड रूकी तो इस नये मुल्क मे थे हम ….कुछ सात -आठ साल के थे हम …. हात मे ये खानदानी चीजें और कुछ कपडे थे …मां बाबुजी का तो पता भी नही था ,मगर एक बेगम हमे उनके घर ले गयी …. बेऔलाद थे वो …शौहर को मनाया ….हमे गोद लियां हमसे नमाज पढवायी, कुराणं सिखाया …पंडित शर्माजी का बेटा केसरी शर्मा यहां केसर मोहम्मद शेख बन गया….फिर भी नही मिटा पाए हम हमारे अंदर के केसरी को……ऐसे नही के हम नफरत करते है इस मुल्क से,हमे तो बस हमारे वतन हिंदुस्तां से …कश्मीरसे बेहद मोहब्बत है!!

हमे धुंदला धुंदला याद आता है मुल्क …….सारा दिन घरमे पुजा चलती थी …वो चंदन की खुशबु ,रामलल्ला की आरती ….हनुमान चालीसा जहन मे वैसे ही है जैसे बाबुजीने सिखायां था . प्रशाद ,चरणामृत ,पंचामृत के लिए रोज पुजा मे जाते थे हम ….जीजी….भैय्या शायद होंगे आज भी वही कही ….मां ..बाबुजी…उन्होंने तो उम्मीद रखी होगी हमारे लौट ने की…. पर हालात ऐसे थे के लौट नही सके हम …और हालात सुधरे तो वक्त इतना बीता था की लौटने से कुछ हासील ना होता.
बेटेजान आप वतनपरस्ती की बाते करते हो…..मगर कभी सोचा है ….जब ये सरहदे नही थे …..इन मुल्कों की आवाम इकदुसरे की दुश्मन नही थी ,कोई पाकिस्तान था ही नही , उस वक्त की पैदाईश है हमारी…कैसे सोच ले फिर हम..के हम जुदां है ….पर फिर भी झेलम के उसपार देखुं तो अपनासा लगता है ….हम कभी किसी मुल्क ,किसी मजहब के तो नही थे…हम बस मां बाबुजीके केसरी….बेगमसाब के केसर थे …..इन सरहदों ने बाटा हमे….पर ये बाटं नही पाए हमारे अंदर के केसरी को…उस हिंदुस्तानी लहु को….. ऐसे नही के ये मुल्क परायां लगता है ….बस ज्यादा मोहब्बत उस मुल्क से है …..बेगमसाब ने तो हमे इतने नाजों से पाला की शायदही हमारे मां बाबुजी पाल सकते ….लेकिन फिर मे ताउम्र हमे ये इल्म था …आजभी है के वो साथ नही है….
जानते हो आमीर हम अक्सर सोचते थे क्या झेलम के उसपार कोई हमारे लिए आज भी इंतजार कर रहां है …अजान सुनते तो लगता कानोंमे कोई गणेशजी का मंत्र पढ रहा हो..किसी का सेहरा देखते तो उसपार की वो दुल्हे की पगडी याद आती ……और कितनीही बाते खयालात याद करके बस जी रहे थे …..पर किसी को मालुम न पडने दियां की हम कौन है ….तुम्हारी दादीजान को भी नही. निकाह के वक्त हम मन मे वो सारे मंत्र पढ रहे थे जो हमारी जिजी की शादी के वक्त पंडितजीने पढे ..मगर जुबान से जो निकले वो लफ्ज कुबुल  है यही थे …..

दद्दुचा उर भात्यासारखा वर खाली होत होता,आसवं थांबत नव्हती …दद्दुनां बहुदा समजलं होत पैगाम आलाय ….पैंगबराचा अन रामलल्लाचाही …..म्हणुनच मनाचा हळवा कोपरा ,कुणीही शिवायची नाही अशी तिजोरी त्यांनी लाडक्या आमीरसमोर उघडली कित्येक वर्ष उरात दाबुन ठेवलेलं सत्य अस उघड केलं.

दद्दु आमीरच्या मांडीवर डोक ठेऊन आडवे झाले,उभं आयुष्य दद्दुंच्या डोळ्यासमोर फिरू लागलं ,दद्दु नमाज पढताना कित्येकदा गीतेचा अध्यायही म्हणायचे,कुणाच्या शेवटच्या मातीला जाताना त्यांना धडधडती चिता हवीहवीशी वाटायची…मोठ्या मंत्रोच्चारात अस्थि गंगेत जाव्यात अस वाटायचं!
निकाह लावताना ते सप्तपदी आठवायचे…..त्यांना जिजीची शादी आठवायची …..कातरवेळी घाटावरचं संध्यास्नान आठवायच.

आजही त्यांना मुंजीचा प्रसंग आठवत होता ,ते मंत्रोच्चार कानात घुमत होते !! सोवळ्यात प्रशाद बनवणारी मां आठवुन ते हळवे झाले …..मी मेलो तर ह्या मुलखात मातीत मिसळणार …मला मुखाग्नी मिळणार नाही …..माझं कधीच श्राद्ध होणार नाही ह्या विचाराने ते अजुनही सारभैर झाले …..आयुष्याची केवळ सात -आठ वर्ष ते हिंदुस्तानात होते पण मां च्या गर्भापासुन झालेले संस्कार विसरण त्यांना अजुनही शक्य नव्हतं …..आजही त्यांना बाबुजीच शेवटच वाक्य आठवलं  जे घर सोडताना बाबुजींनी त्यांना आणि भैय्याला सांगितलं होतं ….”लल्ला ..अब कश्मीर कब आना होगा ये तो जानते नही हम बस इतनी गाठ बांधलो की ये जमीन ये वतन ये लोग हमारे है ….कोई दुश्मन नही है किसी का बस हालात खराब है …..सब्र रखना हमे सिखना होगा …चाहे कितनी भी मुश्किल आए रामलल्ला के सामने हात जोडो वो सब ठीक कर देंगें ……अब से बल्की अभीसे तुम दोनो को भी संभालनी है हमारी पहचान ….हमारी ये पुश्तैनी चीजें “ आणि बाबुजींनी भैयाला …दद्दुंना एक एक पेटी दिली ….हीच ती पेटी जी दद्दुंनी जीवापाड जपली ,बेगमसाब आणि दद्दुंचे अब्बा सोडुन आज फक्त आमीरला समजलं होतं पेटीच अन् दद्दुचं रहस्य!

दद्दुंना पुसटसं दिसत होतं ….कश्मीरमधलं मोठसं घर…..सोडताना डोळेभरून पाहिलं होतं …..गर्दीबरोबर चालताना माहीत नाही कुठल्या क्षणी हात सुटला …..रडुन शुद्ध हरपली ….भान आलं तेच बेगमसाबच्या कुशीत …..तेव्हापासुन आजपर्यंत दद्दुंना मां बाबुजी भैय्या जिजी फक्त स्वप्नातच दिसले ……!!! दद्दुंच्या धुंदल्याश्या आठवणी फार गडद होत होत्या .
आमीर त्यांच मस्तक थोपटत ती पेटी …गीता …चंदन न्याहाळत होता.
त्याला उमगतच नव्हतं तो कोण होता ? दद्दु कोण होते ?? अब्बाजान काय आहेत ??? आपला मजहब कोणता ? आपला मुळ देश कोणता ? 
दद्दुंच्या डोळ्यातली आसवं वाचण्याचा तो प्रयत्न करत होता ,दद्दु म्हणाले “आमीर ….झेलम के उसपार मां बाबुजी खडे है ….हमे बुला रहे है ,भैय्या भी है साथ आवाज दे रहे है ..हरद्वार जाना है…गंगामैय्या बुला रही है !!!”….
आमीरला जाणवलं  दद्दुंचा श्वास खोलखोल जातोय ,घराबाहेर विमानांचा आवाज मोठा झाला होता ….दुरवर अजुनही धमाके चालु असल्याच्या बातम्या तेज होत्या ….घराच्या आसपाससुद्धा धमाक्यांचे आवाज आता ऐकु येत होते.
त्यांन सहाण घेतली,दद्दुंच डोक अलगद उशीवर ठेवलं ,सहानेवर मक्केचं पवित्र पाणी घालुन तो चंदन उगाळु लागला….चंदन कुंकवाचा टिळा दद्दुच्या माथ्यावर लावुन तो त्यांना जानवं घालु लागला…सरळ उलट माहित नसतानाही अल्लाचं स्मरण करत त्यान ते जानवं दद्दुंना घातलं .
दद्दु समाधानान हसले, दुरवर मोठा धमाका झाला…..अन् त्या आवाजाबरोबर दद्दुंनी डोळे मिटले ….मजहब..वतन ह्याच्या कितीतरी पारच्या प्रवासाला दद्दु निघुन गेले…झेलम ,रावी के पार अगदी गंगेच्याही पार पलीकडे !!!!

दद्दुंना सरहदपारची मिट्टी नसीब होणार नव्हती …पण किमान अखेरच्या क्षणी पंडित केसरी शर्मा म्हणुन ते जगु शकले …केसर मोहम्मदच्या अंगरख्या आतला केसरी शर्मा आमीरला  समजावुन सांगु शकले ह्याच समाधान त्या सुरकुतलेल्या निप्राण चेहर्यावर होत !!!!

आमीर सुन्नपणे ती पेटी आवरत होता …सीमेपल्याडचं दद्दुंच विश्व तो समेटुन आहे त्या जागी ठेवत होता ,त्यांन ठरवलं दद्दुंना गंगेत वाहणं शक्य नसलं तरी एक दिवस तो गंगा त्यांच्या कब्रपर्यंत आणेल ….रोज रामलल्लाचीही इबादत करेल …आणि सगळ्यात महत्वाच कुणाविषयी नफरत न ठेवता तो मजहब …वतन ह्यांच्यापार जाऊन माणुस म्हणुन जगेल….तो ते सगळं करेल जे दद्दुंना करता आल नाही ….!!

आमीरनं हे नुसत ठरवलं नाही तर केल सुद्धा….तो रोज मक्केचं पाणी टाकुन चंदन उगाळतो…पंडित केसरी शर्मांच्या तसबीरीवर केसर मोहम्मद चा पोता रोज चंदनाचा टिळा लावतो….घरातला विरोध डावलुन त्यांन दद्दुंच्या खोलीत रामलल्ला आणि गीता ठेवलीये ….न विसरता नमाज नंतर त्यांचीही इबादत करतो.
तोही दद्दुंसारख पाहत असतो झेलमच्या त्या किनार्यावर …शोधत असतो दद्दुंच पुश्तैनी घर ….भैय्या बाबुजी मां दिसतायेत का ??? पण आमीरला फक्त सरहद दिसते ….एवढ्याश्या केसरी शर्माला केसर मोहम्मद बनवणारी…..त्याच्या माणसांपासुन …त्याच्या मुळांपासुन दुर करणारी ……मग मधेच त्याला दद्दु दिसतात….दद्दुही सरहदपारच पाहत असतात ….मग त्या सरहदकडे पाहतचं  म्हणतात,
”तुमने सियासते बाटी….खींच दी लकीरे,

फिर भी मेरा लहु,मेरा दिल ना बांट सकी ये सरहदे !”

समाप्त.

Image by Mohammed Salem from Pixabay 

Asmita Satkar
Latest posts by Asmita Satkar (see all)

8 thoughts on “सरहदे

  • July 14, 2021 at 6:04 am
    Permalink

    apratim lihilay!

    seemepalyaadchya bhaashechaa vaapar dekhil uttam ……

    Reply
    • July 15, 2021 at 3:30 pm
      Permalink

      खूपच सुंदर….

      Reply
  • July 24, 2021 at 7:28 pm
    Permalink

    खूपच छान,👌👌 वाचताना गुलजार जी यांचं देवडी आणि रावीपार आठवत होतं, फाळणीच्या अश्या अनेक कथा मन विषण्ण करणाऱ्या, हेलावून टाकणाऱ्या..

    Reply

Leave a Reply to Anya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!