मुसाफिर_हूं_यारों… 1
तुझ्या नजरेतला ठेहेराव
घेई काळजाचा ठाव
पैलतीर गाठेल मग
माझ्या प्रीतीची नाव…
ए सांग ना कशी झालीये ही कविता?…
तिचा बाळबोध प्रश्न !..तो गोड हसला.. मस्त !!!!
त्याचं नेहमीचंच उत्तर… आज पाच वर्ष झाली त्यांच्या नात्याला.. या रम्य संध्याकाळी.. मुळशीच्या त्या घाटातल्या जागी जिथं तो तिला पहिल्यांदा घेऊन आला होता.. त्याच जागी.. आजही bike वरच आली दोघं.. कार असूनही ह्या आठवणींना उजाळा द्यायचा तर bike वर येणं must होतं…
शिरीन आणि अबीर .. नुकतचं प्रेमात पडलेलं युगुल
ती त्याला मॅनेजमेंट कोर्स ला एका वर्ष सिनियर…
त्याला ती पाहता क्षणीच आवडली.. तिला ही आवड्या..
पण सांगायचं कुणी?
मग त्यांच्या त्या कॉलेज मधे एका नाटकाची स्पर्धा आली..
हिच्या उत्साहाला उधाण आलं..
तिकडे तो ही तयारी करू लागला.. जुनिअर च्या लोकांनी त्यालाच म्होरक्या म्हणून निवडला..
होताच तो तसा.. उमदा.. उंची उत्तम.. रुंद छातीचा. पिळदार दंडाचा.. .. उजळ गोरा.. मोत्यासारखे दात अन गहीरे पिंगट डोळे.. आवाज.. कमाल.. असा काही बेस होता कि ऐकणारा भारून जावा.. उत्तम प्रभुत्व भाषेवर .. एखादा उत्तम नट झाला असता.. पण इंजिनियरिंग चा डिप्लोमा करून साहेब आता मॅनेजमेंट शिकायला आले होते.. लीडरशिप मुळातच होती अंगात आणि आता तर काय आयती संधी चालून आली होती..
शिरीन.. आपल्या कथेची नायिका..
गव्हाळ रंगाची.. मोहक सौन्दर्य.. टपोरे तपकिरि डोळे.. मध्यम पण उठावदार बांध्याची .. पटकन नजरेत भरणारी.. आणि डोळ्यात अशी काही चमक कि पाहणारा गुंतून जाई… तिचा मधाळ आवाज… बाईसाहेब डबल पोस्ट ग्रॅज्युएशन करत होत्या… अभ्यासू.. पण सगळ्या कलांची आवड…
पार्किंग मधे एकिने तिची ओळख करून दिली.. तिनं हसून hallo म्हटलं.. त्याच फक्त एक स्मितहास्य…
आईगं.. कसला गोड़ आहे.. खळी कमाल… तिचं स्वगत !!
त्यानं नाटकाच्या स्पर्धे बद्दल संगितलं… आणि ही ऑडिशन द्यायला आली सुद्धा… नायिका या पात्रासाठी बऱ्याच मुली आल्या होत्या.. वर्ग गच्च भरला होता.. एकेक जण पुढे येऊन सादर करत होता.. तिचं नाव आलं.. ती पुढे आली.. आणि तिनं विषय विचारला.. त्यानं पटकन सांगितलं.. खेडवळ बाई सादर करून दाखव..
पक्की पुणेरी ही.. भाषा स्वच्छ.. हीला काय जमेल.. त्याचे मित्र कुजबुजले… तिचं लक्षच नव्हतं… तिने स्टेज कडे पाठ केली आणि मोजून 10 व्या सेकंदाला ती वळली ती एका खेडवळ आईच्या रूपात.. भाषेचा लहेजा इतका चपखल कि ऐकणारा मंत्रमुग्ध… तिचा वावर..अभिनय… अप्रतिम.. प्रेक्षकांची मनं खिळून राहिली.. तो तर क्लीन बोल्ड…
तिनं exit घेतली.. वर्गाच्या बाहेर गेली.. आणि पुन्हा आत आली.. शांतपणे वर्गावरून नजर फिरविली.. शांतता… स्तब्ध.
एका टाळीने सुरुवात झाली.. आणि मग कडकडाट..
तिनं थँक यू म्हटलं आणि जाग्यावर येऊन बसली.. तो तिलाच पाहात होता.. तिला जाणवलं.. पण तिनं साफ दुर्लक्ष केल.. आता नाटकात मिळणारी भूमिका तिला जास्त महत्वाची होती… स्वप्न होतं तिचं… अगदी लहानपणापासूनच… तिच्या बाबांनी तिला नाटकात काम करू दिले नाही कि कधी त्याच रीतसर शिक्षण घेऊ दिले नाही… आज ती सुप्त इच्छा पूर्ण होणार होती..
पण जुनिअर च्या मुलींना मात्र ती नको होती…
तिचं नाव वगळले… ती धुमसली… सरळ जाऊन त्याच्या तोंडावर सांगून आली… मला घेतलं नाहीत तर नाटकच होऊ देणार नाही… आधी माझ्यापेक्षा सरस अभिनय करणारी दाखवा नाहीतर माझी निवड झालीये असं जाहीर करा… तिचा आवेश.. राग.. तिची अभिनयाबद्दलची ओढ दाखवत होता… तो शांत राहिला.. दुसऱ्या दिवशी लेक्चर मधे येऊन तिला.. तिचं नाव फायनल केलं असल्याच जाहीर केलं.. कित्ती खूष झाली ती.. त्याला ही त्याची नायिका म्हणून तीच हवी होती.. त्याचा शब्द अंतिम ठरला.. आणि हीच फायनल झाली..
आता तयारी सुरु झाली नाटकाच्या कथा निवडीची…
Cheers… एक भन्नाट थरार नाटक.. अप्रतिम कथा..
आणि ते बसवायला बोलावलं त्याच्याच एका मित्राला.. दिग्दर्शक बाहेरचा.. अनुभवी… त्यांच्याच वयाचा… मध्यम चणीचा.. हुशार.. बोलक्या डोळ्यांचाx.. शंतनू..
वाचन, चहा.. भेटीगाठी सुरु झाल्या…
अन एक दिवस त्यानं विचारलं… शिरीन! … जरा काम आहे माझं… माझ्या बरोबर येशील? येताना जरा नाटकाच्या नेपथ्य वाल्याकडे पण जाऊन येऊ..
ही भाबडी.. निघाली.. तसही मनोमन सुखावली.. आज बाकीच्यांचा.. जळाऊ लुक तिला असला भारी वाटत होता.. पल्सर होती त्याची… ब्लॅक बयूटी म्हणायचा.. तो.. गाडी वर फारच जीव… पण आज त्याच्या दोन ‘जान’ एकत्र आल्या.. त्यानं गाडी सुरु केली… आणि… लगेच ब्रेक.. अर्रे… पाडशील मला… सावकाश कि..
मग धरून बस मला… आणि हसण्याचा गडगडाट..
आरसा adjust झालाच होता … त्याच्या पाठीवर तिनं हलकेच एका चापटी दिली.. अन ती गोड लाजली.. आरशातलं तिचं प्रतिबिंब आता त्याच्या मनात उतरलं.. अन त्याचं.. तिच्या…
गाडीने वेग घेतला… आणि वारं प्यायलेली ती दोघं निघाली सुसाट… मुळशीच्या रस्त्याला… एका बाजूला त्यानं गाडी थांबवली… कललेली उन्हं… धुंद वारा.. दोघं bike वरून उतरली… आणि घाटात दिसणारी ती मोकळ्या आकाशातली रांगोळी मुग्ध पणे निरखत होती..
सहज नजरा जुळल्या.. ती लाजली.. तो अधिकच जवळ आला..
प्रेमाची वेगळी अशी कबुली द्यावीच लागली नाही त्यांना..
त्यानं वाऱ्यावर भुरभूरणाऱ्या तिच्या बटांना अलगद मागे सारलं.. तिचा चेहरा ओंजळीत धरत तो तिच्या अजूनच जवळ आला… तिच्या अधरांना तो अधरांनी स्पर्श करणार… इतक्यात…
तिनं त्याच्या ओठांवर बोट ठेवलं.. तो थांबला.. एका हातानी तिला कमरेत हात घालून जवळ ओढत म्हणाला… काय गं? नको?.. ती लाजली.. अन म्हणाली.. पाच सेकंद… त्या पेक्षा जास्त नाही…. तो खळखळून हसला… हो… मान डोलावून म्हणाला.. इतक्या रोमँटिक क्षणी प्रेयसी सेकंद मोजून किस करणार… कल्पनाच भारी आहे… तो पुन्हा जवळ आला…. ए थांब नाही तीन… मी नाही कधी केलं यापुर्वी हे… धडधडतंय..
आता मात्र त्यानं मिठी अजून घट्ट केली… आणि ती काही बोलणार इतक्यात.. तिचे ओठ त्यानं अलगद टिपले.. ती इतकी धुंद झाली त्या क्षणांनी कि तिला मिठी सैल करताच ग्लानी आली.. त्यानं सावरलं.. काही क्षण असेच गेले.. ते दोघेही भानावर आले.. तीनं ओढणीने चेहरा बांधून घेतला.. आता परतीच्या वाटेवर ती बिलगून बसली.. कुणीच बोलत नव्हतं.. पण तिच्या डोळ्यातून ती खूप बोलत होती …
तिचं घर आलं.. अर्थात ती राहते कुठे हे आधी तिचा पाठलाग केल्यानं त्याला ठाऊक होतचं..
ती उतरली.. आणि पर्स सावरून निघणार एवढ्यात त्यानं हात धरला..
ती पुन्हा जवळ आली.. मग हळूच कानाशी पुटपुटला.. आता सेकंद वाढली तर चालेल ना..? इश्श्य… ती लाजून.. लाल झाली.. तिच्या कपाळावर ओठ टेकवत त्यानं निरोप घेतला.. आणि तो सुसाट घराच्या दिशेने निघाला…
कट्ट्यावर मित्रांना टांग देऊन साहेब डायरेक्ट घरी पोचले.. पुन्हा रात्री कट्ट्यावर जमणं हा तर या वयातला अलिखित नियम असतो.. तसा तो पुन्हा मित्रांच्या घोळक्यात गेला.. काय रे नेपथ्य… सामान मिळालं का सगळं.. एका मित्रानी विचारलं… हो.. इतकंच म्हणतं त्यानं एका सिगारेट शिलगावली… ओठांशी घेताच… काहीतरी आठवून पुन्हा गडगडाट हसण्याचा… काही न
कळून मित्रांनी विचारलं..
तर उत्तर न देताच.. पुन्हा गाडीला किक मारून स्वारी गायब…
आता नाटकाच्या तालमी जोरदार रंगू लागल्या… शिरीन कॉलेज च्या आधी एके ठिकाणी नोकरी ही करत होती पार्ट टाइम… आणि अबीर चं workshop होतं… स्वतः च.. त्यामुळे वेळा जुळवून तो तिला पिक अप करू लागला… आणि एक दिवस नाटकाच्या सेट साठी त्याला बाहेर जावं लागलं.. ती एकटीच घरी जाणार होती..
त्याच्या एका मित्रानं समीर नं विचारलं… सोडू का मी तुला घरी? पण अबीरला आवडणार नाही.. आणि ही झाशीची राणी होतीच… निर्भय.. मग नको म्हणाली आणि निघाली एकटी… तिनं मैत्रिणीची स्कुटी मागून घेतली..
दहा वाजून गेले होते.. कारण कॉलेज संध्याकाळी 7 te 8.30.. आणि मग नाटकाची तालीम तासभर.. आज ती वाट पाहात राहिली अबीरची आणि उशीर झाला..
शिरीन… नी गाडीचा वेग वाढवला.. युनिव्हर्सिटी रोड ला आता वर्दळ नव्हती.. बाजूच्या टपऱ्यांवर बरीच टोळकी चहा बिडी साठी रेंगाळलेली… नेमका नुकताच पाऊस पडून गेलेला.. त्यामुळे रस्ता ओला.. आता खड्डे आणि ओल्या रस्त्यावर तिला वेग कमी करावा लागला..
नेमके रस्त्यावरचे दिवे बंद झाले… आणि गाडीचा उजेड मिणमिणता… आतां… भीती वाटायला लागली… तेवढ्यात मागून एका कार चा उजेड आला.. पण ती कार काही ओव्हरटेक करेना… अंतर राखून ती गाडी तिच्या मागे येत होती..
आता घर समोर दिसत होतं पण ही कार पाठलागं केल्यासारखी मागेच… तिला टेन्शन आलं.. तीनं वळण्यासाठी इंडिकेटर दिला आणि इतक्यात गाडी स्लिप झाली… पुढे काय होतंय ए कळायच्या आत ती फुटपाथच्या दिशेनी फेकली गेली…कार जवळ आली.. ती अजूनही शुद्धीत होती… गाडीतून तो माणूस खाली उतरला आणि वेगानी तिच्याकडे झेपावला…
अंधारात त्याचा चेहराही दिसेना धड… तिनं उठायचा प्रयत्न केला पण पाय दुखावल्यामुळे तिला हलताही येत नव्हतं.. तो अगदी जवळ आला… तिनं घाबरून चेहरा झाकून घेतला आता बोटांच्या फटीतून ती त्याला पाहायचा प्रयत्न करत होती.. आणि… तो तिला हात लावणार.. एवढ्यात…
क्रमश :
©मनस्वी
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Interesting