मुसाफिर हूँ यारों… 2
एवढ्यात… त्याने. तिला हात पुढे केला.. अबीर…. या परिस्थितीत हसावं का रडावं हेच कळेना.. त्यानी तिला उठवलं.. हाताला आधार देत.. ती पुन्हा खाली बसली… नाही रे येत आहे उठता.. ती रडवेली झाली.. त्यानी चक्क उचलून घेतलं तिला.. अरे नको.. म्हणे पर्यंत गाडीत आणून ठेवलं.. पाणी देऊन तो ती स्कुटी पार्क करायला गेला.. तिच्या पायाला बऱ्यापैकी लागलं होतं…. अबीर गाडीत बसला.. कार बाजूला घेतली.. आणि त्यानं तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं… ए माझी झाशीची राणी.. काही नाही झालं.. रडू नको.. ती आपसूक मिठीत आली..
मग शांत झाली.. पण तू कसा इथे आत्ता?.. तो हसला.. म्हणजे आल्या म्हणायचं बाई साहेब नॉर्मल मोड ला?
गप रे !.. सांग ना..
अगं, सेट च काम झालं लवकर पण इथून जवळच एका मित्रा कडे आलो होतो.. इतक्यात तू वळताना दिसलीस.. म्हणून मी ही गाडी वळवली..शिरीन त्याच्या कडे पाहात म्हणाली..
नाही नाही… मुळीच नाही… ही एकच कार बराच वेळ माझ्या मागे होती…
तूच होतास ना.. इतका वेळ मागे…? सांग ना…
बोल ना… तिचा त्रागा पाहून त्याला अजून हसू येत होतं..
हो.. मीच पाठलाग करत होतो…. तो डोळे मिचकावत म्हणाला.. खरं तर तू एकटी गेलीयेस हे कळलं आणि काळजी वाटली.. म्हणून आलो.. रागावलीस?..
आता मात्र तिची कळी खुलली.. गोड़ हसली.. मनोमन सुखावली… आज घरी ती एकटीच होती.. आई बाबा दोघेही कामानिमित्त बाहेर गावी… दुसऱ्या दिवशी येणार.. पण त्याला कल्पना नव्हती.. ती म्हणाली.. वर चलतोस.. पाय खूप दुखतोय.. म्हणजे मला जिना चढता येईल.. त्यांन तिला हाताला धरून वर आणलं.. एकच मजला. पण त्या 20 पायऱ्या ही त्रासदायक होत्या .. हे काय? आई बाबा नाहीयेत? .. बर चल मी निघतो म्हणत तो जाणार इतक्यात ती म्हणाली.. अरे थांब कॉफी तर घेऊन जा.. .घरात आल्यावर ती लंगडत किचन कडे वळली.. तसा तो मागे गेला.. नको काहीही खुडबुड करूस… बस.. आणि जेवण कुठे झालाय तुझं?
कॉफ़ी नको मी आणतो काहीतरी… त्याच हे हक्क गाजवण तिला खूप आवडल..
घरी दोघांना पुरेल इतका स्वैपाक होता.. तिने सकाळीच करून ठेवलेला… त्यानं तिला गरम करून वाढलं.. तिच्या आग्रहापायी तो ही जेवला.. पायाला ही क्रेप बॅंडेज बांधून दिल.. तिला जवळ घेत म्हणाला… राहशील ना एकटी नीट? तिचा प्रतिप्रश्न : का रे?? मग काय तू सोबतीला राहणार आहेस!! तो पुन्हा एकदा खळखळून हसला …
नको मला तुझी भिती वाटते 😜😜.. गप रे.. म्हणत तिनं एक हलकीशी चापट त्याच्या दंडावर मारली.. तिचा हात तसाच धरून तिला जवळ खेचलं.. त्या अलवार क्षणांनी त्या दोघांना आपल्या कवेत घेतलं… त्यांच्या जाणिवा.. ते स्पर्श.. ते उष्ण श्वास.. तो मिसळत जाणारा गंध… तो हवेतला गारवा… आणि ती आश्वासक उबदार मिठी… धुंद करत असतानाच.. त्याचा फोन वाजला… ते भानावर आले… त्याच्या आईचा कॉल.. अरे.. आहेस कुठे? वेळेच भान नाही का? किती वेळ वाट बघायची मी? आवाजातली तीव्रता त्यांना जाणवली… तिनं निरोप दिला.. पोचलो कि कळवतो म्हणत तो निघून गेला..
आजवर ची ही सगळ्यात मुग्ध करणारी भेट होती… पण पुढे काय वाढून ठेवलय याचा तिला अंदाज ही नव्हता…
आता अगदी जेमतेम चार दिवसांवर आलं त्यांचं नाटक…
आज नाटकाची रंगीत तालीम.. ‘भरत’ ला ठरली.. सेट वेशभूषा सगळी तयारी झाली… ती ही तयार झाली… तिला दोन भूमिका होत्या… आधी एका गोड़ सोज्ज्वळ बायकोची अन मग एक प्रतारणा करणाऱ्या बायकोची…
अर्थात तिच्या बॉयफ्रेंड च्या भूमिकेत हा होता… पण का कुणास ठाऊक.. आज नेहमी प्रमाणे तालीम रंगली नाही… सगळ्यांचंच काही ना काही चुकत होतं… तिला टेन्शन आलं… आणि जसा प्रयोग झाला… तीला स्टेजवर चक्कर आली… त्यानं सावरलं.. आत नेलं… लांबून पाहणाऱ्याचा गैरसमज व्हावा अशा स्थितीत तो तिच्या जवळ… ती शुद्धीवर आली… आणि समोर उभे तिचे पालक … त्याची पाठ.. आणि अचानक आवाज… एक किंकाळी..
नेमकं काय घडलं?…
एवढ्यात ! त्याच्या शेजारी… वरचा लाईट कोसळला.. त्याच्या फुटलेल्या काचा आणि तो आवाज यानं भेदरून शिरीन किंचाळली… अबीर नी प्रसंगावधान राखत तिचा चेहरा आपल्या हातांनी झाकला… आणि काच त्याच्या हातात घुसली… नेमक झालं असं कि.. वरचा कामगार जो लाईट ची वायर जुळवत असतो त्याला छोटासा शॉक लागतो आणि त्याच्या हातातून लाईट सटकतो तो आणि थेट अबीर शिरीनच्या पायापाशी कोसळतो…
आता शिरीन चे बाबा पुढे येतात.. अबीर च्या हातातली काच बाजूला काढत त्यावर रुमाल बांधतात.. तोपर्यंत शंतनू फर्स्ट एड घेऊन धावत येतो .. अरे बरच लागलंय.. चल डॉक्टर कडे जाऊन येऊया… अबीर नी शिरीन कडे पाहिलं.. ती म्हणाली.. मी ठीक आहे पण तुला खूप लागलंय… चल ना प्लीज.. तिच्या आवाजातली काळजी तिच्या बाबांच्या नजरेतून सुटली नाही.. पण ते शांत राहिले..
सगळे हॉल च्या बाहेर आले… शिरीन ला घरी जायला सांगून.. शंतनू आणि अबीर जवळच्या डॉक्टर कडे जाऊन आले… जखम खोल नव्हती… अबीर ला घरी सोडताना… शंतनू त्याला म्हणाला.. लकी आहेस.. शिरीन सारखी पोरगी तुझ्या प्रेमात आहे.. इतकी गोड छोकरी.. काश मेरी गलफ्रेंड होती !
अबीर शांत राहिला … काहीच प्रतिक्रिया नाही…
चार दिवसांनीं नाटक उत्तम पार पडलं… अबीर आणि शिरीन दोघांनाही उत्तेजनार्थ अभिनयाचं बक्षीस मिळालं.. पहिलंच बक्षिस… सेलेब्रेशन तो बनता हैं बॉस… म्हणत… सगळ्या ग्रुप नी मुळशी च्या मानस ला लंच ला जायचं ठरवलं…
गुलाबी.. आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस… हलकासा मेकअप.. आणि बांधलेली पोनीटेल… अबीर ला आवडते म्हणून मॅचिंग टिकली लावलेली… शिरीन…आज भलतीच मादक दिसत होती…
पांढऱ्या रंगांचा राऊंड नेक टी शर्ट.. आणि डेनिम जीन्स मधे… अबीर ही आज कत्लेआम करत होता… 12 जणांचा गृप.. पण पोरी पाच म्हणून अबीर नी कार घेतली.. पण आयत्या वेळी शंतनु म्हणाला मी गाडी चालवतो.. शिरीन पुढे बसलेली.. अबीर बाईक वर… ती पटकन उतरून अबीरच्या मागे जाऊन बसली… इकडे शंतनू धुसफुसला..
सगळे पोचले तरी हे दोघे अजून पोचले नव्हते आणि फोनला नेटवर्क नाही त्यामुळे वाट बघण्यापलीकडे काहीच मार्ग नव्हता…. शेवटी तासाभराने दोघे आले…
कारण… म्हणे बाईक पंक्चर… पण खरं कारण वेगळंच होतं…
तिला घेऊन अबीर येताना एका लॉज पाशी थांबला… अन त्या उत्साहाच्या भरात दोघांनी नकळत लक्ष्मण रेष ओलांडली…
काही दिवसांनीं अबीर ला त्याच्या कामा संदर्भात परदेशी जायचा योग आला… नेमका शिरीन च्या वाढदिवसाच्या वेळी तो परदेशात असणार होता… शिरीन तशी समजूतदार होती… आल्यावर करूया सेलेब्रेशन म्हणत तिनं निरोप दिला… आजच्या निरोपाची मिठी सैल होऊच नये असं वाटत असतानाच… त्याला आईचा कॉल आला… शिरीन चा निरोप घेऊन तो 2 महिन्यांसाठी
निघून गेला…
कामाचा ताण… अबीर ची आठवण.. अभ्यास या सगळ्या मुळे.. आजकाल तीची चीड चीड वाढू लागली.. .
पण आज मात्र ती जास्तच अस्वस्थ होती… ऑफीसला दांडी मारून तिनं मैत्रिणीला.. सई ला कॉल केला.. सई म्हणजे जीवश्च कंठश्च सखी…
दोघी भेटल्या.. थोड्या वेळानी शिरीन नी तिची पाळी चुकल्याचं सांगितलं… हे ऐकताच सई नं ताबडतोब टेस्ट करून घ्यायला लावली… शीट !…
जे व्हायला नको तेच झालं होतं… आतां… निस्तरायला अबीर नाही… आणि त्याला जर हे.. हवं असेल तर..???
पण हे सगळं सांगायला तो होता कुठे इथे?
लग्नाच्या आणा भाका काही अबीर नी घेतल्या नव्हत्या… शेवटी प्रॅक्टिकल निर्णय घेत… शिरीन आणि सई नं… शंतनू ची मदत घ्यायची ठरवली… आज त्यांनी सगळी परिस्थिती त्याला सांगितली… आधीच शिरीन साठी हळव्या असलेल्या शंतनू नी तिला मदत करायची ठरवली…
एव्हाना फक्त गोळ्या घेऊन ह्यातून तिची सुटका नाही होणार हे स्पष्ट झालं होतं..
आता आज तिची पहिली सोनोग्राफी झाली… त्या निष्पाप चिमुकल्या कळीला खुडायचं.. या कल्पनेनी ती हादरली होती.. पण परिस्थिती पुढे तिचा नाईलाज होता…
सई आणि शंतनू नी तिला गावाबाहेरच्या एका छोट्या हॉस्पीटल मधे नेलं.. खोटी ओळख … फसवली गेलेली गरीब घरातली मुलगी आहे असं सांगून… डॉक्टरांना विनंती केली… पण क्युरेटिन शक्य नव्हतं.. आता पर्याय एकच.. त्या कळीला या जगात तिची पूर्ण वाढ़ होण्याआधीच आणायचं.. इंजेक्शनं देऊन डॉक्टर वाट पाहू लागले… कळा सुरु झाल्या… आणि काही तासात… ती मोकळी झाली…
आतून आणि बाहेरून ही आलेली ही पोकळी… जीवघेणी होती… केवळ 2 दिवसाच्या ट्रिप च्या नावाखाली ती घराबाहेर पडली होती.. आणि आज सई शंतनू शिवाय हे गुपित कुणालाच ठाऊक नव्हतं…
मुळातच ती काय सांगणार होती? कुमारी मातृत्व हे परदेशात जितकं सहज स्वीकारतात ते इथे थोडंच मान्य होणार होतं? आणि अबीर… तो कुठे होता इथे?.. एकटीनं सगळं झेलत.. सहन करत.. ती वाट पाहात होती…
अबीर आला… अगदी उत्साहात… तिच्या हातात चॉकलेट च पाकीट देत म्हणाला… कित्ती मिस केलय तुला… अग पण तिकडे रोमिंग कार्ड नव्हत.. सॉरी.. एकदाही बोलू शकलो नाही.. रागावली नाहिस ना..
शिरीन ला आता मात्र प्रचंड रडू कोसळल…साहजिकच होतं.. गद्धे पंचविशी जेमतेम… दोघांचीही..
तिनं रडत सगळं सांगितलं…
अबीर तिला थोपटत राहिला.. मग म्हणाला… बर केलंस.. मी असतो तरी हाच निर्णय घ्यायला सांगितला असता…
तिला खूपच गिल्ट आल होतं.. आणि वाईट ही वाटत होतं.. निदान अबीर नी असं म्हणायला नको होतं… त्यांचं पाहिलं वहिल पिल्लू होतं..
काही दिवस असेच गेले… अबीर च वागणं अजूनही तसच होतं.. ही मात्र खूपच शांत झाली.. घुमी सुद्धा… आता अबीर ला भेटली कि एकच प्रश्न… लग्न कधी करूया? घरी सांगूया का आता?.. पण अबीर चा नकार ठाम…
एके दिवशी मात्र शिरीन इरेला पेटली… तिने अबीर ला कॉलेज बाहेर गाठलं.. शंतनू आणि बाकीचे मित्र थोडे लांब उभे होते … अबीर ! आज काय तो सोक्षमोक्ष लाव ह्या नात्याचा… मला नाही रे सहन होतं… अबीर शांतपणे म्हणाला… हे बघ शिरीन.. चुक झाली आणि ती निस्तरलीस सुद्धा.. मान्य तू एकटीनं सगळं केलंस पण म्हणून लगेच आपल्या नात्याला लेबल लावू नकोस…
तिच्या साठी हे सगळं धक्कादायक होतं.. ती तडक घराकडे निघाली… वाटेत तिला असं रडत जाताना शंतनू नी पाहिलं.. आणि त्याचा जीव कासावीस झाला… त्याने ही अबीर ला जाब विचारला.. पण अबीर काही धड उत्तर देईना..
काही दिवसांचा अबोला.. रुसवा.. मग होईल शांत असा विचार करून अबीर.. तिच्या फोन ची वाट पाहात राहीला.. पण ती कॉलेज ला आली नाही कि तिनं फोन घेतले नाही.. आता मात्र त्याला राहवेना.. 2 आठवडे कसे काढले तिच्या शिवाय.. त्यालाच माहित होतं..
आज ती दिसली… कॉलेजच्या कट्ट्यावर.. पण हे काय..
मला बघून हीनं नजर का फिरवली… तो तिरमिरीत तिच्यापाशी गेला… तिच्या हाताला धरून तिला बाजूला खेचत म्हणाला.. शिरीन… काय चालल आहे तुझं.. तू मला का इग्नोर करतियेस…
तिनं शांतपणे त्याच्या कडे पाहिलं… त्याचा हात बाजूला करत ती नं बोलताच पुढे गेली.. शंतनू गाडीवर बसला होता.. ती मागे बसत म्हणाली… चल… मला नाही थांबायचंय.. त्यानी किक मारली आणि ते निघाले.. त्यांचा पाठलाग करत अबीर ही पोचला… मुळशीच्या रस्त्यावर.. शंतनू नी गाडी थांबवली… तो गाडी पासून दूर जाऊन थांबला… अबीर आणि शिरीन आता पुन्हा एकदा समोरासमोर… ती शांत.. तो अस्वस्थ… नं राहवून तो म्हणाला.. सॉरी ग… प्लीज बोल… मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय… त्याचा स्वर गहिवरून आला..
आणि तू शंतनू बरोबर का निघून आलीस? ती त्याच्या कडे रोखून पाहात म्हणाली…
कारण. तोच होता ना आधार.. त्या कातरवेळी… आणि त्याला मी आवडते… लग्नाची मागणी घातलीये त्यानी… तुला तर नात्याची बेडी नकोय.. कमिटमेंट नाही द्यायचीये… मग मी काय आयुष्यभर अशीच वाट बघत जगू?
काही क्षण तसेच गेले.. असह्य शांततेत.. पण मग त्याचा निश्चय झाला… अबीर गुडघ्यावर बसला आणि हात पुढे करत म्हणाला… आत्ता लग्न करतो तुझ्याशी… माझी होशील?
शिरीन ला नेमकं काय घडतंय हे कळायच्या आत तिला अबीर नी प्रपोज केल होतं… आणि ते ही लग्नासाठी…
तिला सुचेना… शंतनू आता त्यांच्या दिशेनी चालत आला..
शिरीन आता संभ्रमात… काय घडतंय हे? काय करू मी..? एकीकडे तिचं प्रेम दुसरीकडे तिच्यावर असलेलं शंतनू च प्रेम.. स्वार्थी निर्णय घ्यायला मन धजावेना…
पण हा प्रश्न शंतनूनीच सोडवला.. अबीरच्या हातात तिचा हात देत तो म्हणाला… अबीर ही शेवटची संधी… आता जर माती खाल्लीस तर मी हिला कायमची पळवून नेईन… मग बस तसाच… आणि शिरीन च्या डोक्यावर टपली मारत म्हणाला… माहितीये किती वेडी आहेस त्याच्यासाठी.. जा.. हो म्हण… आणि मी नॉर्मल आहे.. काळजी करू नकोस… ती.. हो म्हणाली.. अबीर नी तिला डायरेक्ट घरीच नेलं… रीतसर घरी सांगितलं… तिला मागणी घातली आणि त्यांचा साखरपुडा ही झाला..
मग वर्षांनी लग्न.. सगळं कसं मनाजोगतं.. अबीर ला त्या क्षणी आलेलं शहाणपण.. आणि नात्याच्या ओढीमुळेच आज ते एकत्र आले होते…
आज त्यांच्या नात्याचा पाचवां वाढदिवस… त्या पहिल्या वाहिल्या पाच सेकंदाच्या चुंबनाची हिच ती जागा…
आता एका गोड़ परीचे ते आई बाबा ही झाले आहेत.. आणि आज तिला घरी ठेवून ती दोघचं बाहेर आले आहेत.. हा क्षण पुन्हा जगायला..
ए सांग ना… नक्की कशी झालीये कविता… मस्त.. ! त्याच उत्तर…
पण ह्या मस्त नंतर मात्र पुन्हा एकदा अधर मिलनानी त्यानं मस्त ची पावती तिला दिली… इश्श्य ! म्हणतं ती पुन्हा मिठीत शिरली….तशीच..
समाप्त
©मानसी
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
छान
Short and sweet.