नैना ठग लेंगे…3

पिनाक नि डोळे मिटले आणि काही क्षणात त्याला डोळ्यासमोर एक विचित्र आकार दिसू लागला.. हळू हळू त्या गोष्टीला हिरवट रंग आला.. पण अजूनही ते काय आहे हे कळत नव्हतं…
कशाचा तरी आवाज झाला.. आणि त्याची समाधी भंग झाली..
डोळे उघडले आणि समोर नचि पाणी प्यायला उठला होता.. आणि त्याच्या हातातून भांड पडलं होतं…
नचि नं विचारलं ही.. काय रे काय करतोयस ?
काही नाही रे.. हे काय.. गाणी ऐकतोय असं म्हणत हेड फोन काढून हातात घेतला.. आणि प्ले लिस्ट वर गाणं चालू होतं …
जगते जादू फेकेंगे रे
जगते  जगते जादू
नींदे बंजर कर देंगे
नैना ठग लेंगे..
नचि परत निजला पण पिनाक उठला आणि खिडकीबाहेर पाहू लागला… दूरवर पसरलेला दुधाळ प्रकाश पौर्णिमेला अद्याप दोन दिवस आणि आकाशातून डोकावणारा वेटोळा चंद्र…

अचानक समोरच्या झाडावर कसलासा आवाज झाला पण त्याच्या गर्द झाडीत नेमकं काय सळसळलं ते कळलं नाही…

तो वळला आणि पुन्हा व्याघ्रजीनावर येऊन बसला.. आता डोळे मिटले आणि समोर जंगलातली नागमोडी वाट दिसू लागली..

एका क्षणात खालच्या दिशेनी जाणारी नैना… तिच्या लगेचच मागे राहुल आणि काही क्षण काळ जणू स्तब्ध झाला…

त्यानंतर जे दिसलं ते पाहून त्यानं झटकन डोळे उघडले.. नाथां ना नमस्कार करून.. तो उठला सगळं आवरून पुन्हा येऊन पुन्हा निजला..

सकाळी काकू सवयीप्रमाणे लवकर उठल्या आणि आवरून बागेत आल्या…
नेमकी त्याच बाजूला राहुलच्या खोलीची खिडकी होती.. त्यांनी खिडकीतून पोरं उठली आहेत का? म्हणून बघायला डोकावलं आणि जोरात किंचाळल्या..
त्यांच्या आवाजानी सगळे उठून खाली आले
..
राहुल रक्ताच्या थारोळ्यात होता आणि काही रक्ताचे थेंब बाहेरच्या पांगऱ्याच्या झाडाशी पडलेले दिसलें…

पोलीस आले, ऍम्ब्युलन्स आली.. राहुल ला हॉस्पिटल मध्ये नेलं… त्याच्या मानेच्या खाली विचित्र घाव होता.. रक्त स्त्राव थांबला होता पण तो मात्र कोमात गेला…

दोन दिवस तसेच गेले आणि राहुल नी हालचाल केली.. हळूहळू त्याची प्रकृती स्थिर झाली. आता झाल्या प्रकरणात नेमकं काय झालं? हे कळावं म्हणून नचिकेत नी त्याच्या आईच्या सल्या नं पोलिसात तक्रार केली..

पोलिसांनी झाला प्रकार पाहून घराची, आजूबाजूच्या परिसराची कसून चौकशी केली.. पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही..

काकू घरी आल्या आणि राहुलचे काही कपडे न्यावे म्हणून त्याच्या खोलीपाशी आल्या..
इतक्यात त्यांना सळसळ जाणवली.. आणि त्यांनी बाहेर बघताच.. पांगऱ्यापाशी एक वेल चढलेली दिसली.. त्यांना ती विचित्र भासली….
****
नैना ला आज परत निघायचं होतं.. तिच्या आईचा ही बऱ्याचदा फोन येऊन गेला..कसबस तिला थोपवलं होतं.. तिने निमिषा ला फोन केला..
निमू मला निघावं लागतंय.. मी आज जाते पण वीकएंड ला परत येईन..
तिनेही बर म्हणून फोन ठेवला ..

#काय झालं राहुल ला?
#पिनाक कसली साधना करतोयं?

क्रमश :

©मनस्वी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!