नैना ठग लेंगे…4

नैना निघाली खरी पण तिला तिच्या भोवती विचित्र दर्प जाणवत होता.. कडवट उग्र पण तरी ही नेमका कुठला.. ते नं कळू शकणारा…

नैनाची आई tarrot card ची अभ्यासक होती आणि एक उत्तम रेकी हिलर सुद्धा..
नैना चे वडील परदेशीं होते आणि त्यांच्या घरात एक म्हातारी आया होती.. नैना च्या बालपणापासून… त्या बाईला नैना.. अम्मा म्हणत असे…

नैना आल्यापासून अस्वस्थ आहे हे दोघींच्या ही लक्षात आलं.. आल्यानंतर तर तिने जेवण ही टाळलं.. आणि ती तिच्या खोलीत बसून तिच्या बागे कडे पाहू लागली.. आज तिच्या पिंपळावर एक धुमारा फुटलेला दिसला.. काहीसा विचित्र आकार होता..
आज बंगल्या भोवती एका विचित्र धुरकट वासाचं रिंगण दिसू लागलं आणि काही क्षणात विरलं..
****

राहुल आता पूर्ण शुद्धीत आला.. त्याची जबानी घ्यायला पोलीस आले.. तेव्हा त्यानं जे सांगितलं ते अजूनचं बुचकळ्यात टाकणार होतं..
त्याच्या सांगण्याप्रमाणे एक पिसाळलेलं आलं होतं..जेव्हा तो बाहेर आला होता आणि नेमका दगड उचलून मारायला तो खाली वाकला आणि त्यानं त्याच्या खांद्यावर उडी मारली आणि चावा घेतला.. आणि ते कुत्रं पसार झालं… आधीच्या थकव्या मुळे तो तसाच आधार घेत आत गेला आणि बेडवर पालथा पडला…
प्रशांत ला गाढ झोप लागली होती त्यामुळे त्याला जाग आली नाही..
पोलिसांनी अपघात आहे असा शेरा मारून ते प्रकरण बासनात गुंडाळलं..
*****
राहुल ला मात्र तो कुत्रा दिसण्याआधी जे दिसलं होतं ते कुणालाच सांगता येत नव्हतं..
पिनाक त्याला भेटायला येतो..
राहुल अजूनही त्याचं विचारात असताना पिनाकनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला
पण
राहुलच्या खोलीत प्रवेश केल्यावर त्याच्या  पाठीच्या कण्यात एक थंड शिरशिरी आली आणि
एकदम डोळ्या समोर अंधेरी आली
समोरची ती वेल, त्यावर लटकलेलं वटवाघूळ आणि खिडकीजवळून येणारा कुबट वास..
सगळंच असह्य झालं.. त्यानं झटकन राहुल चा हात धरला आणि त्याला नचि च्या खोलीत आणलं…
झाला प्रकार राहुलच्या घरी कळला होता आणि त्याचं संध्याकाळी त्याला गावी पाठवलं.. प्रशांत ही निघून गेला.. आता त्या घरात उरले फक्त तीन..

पण का कुणास ठाऊक पिनाक ला आतून वाटत होतं कि कुणीतरी अजूनही तिथं आहे …
*****
नैना च्या आईनं तिला समोर बसवलं… आणि तिच्या हिरव्या निळ्या डोळ्यात खोलवर पाहिलं.. एखाद्या हिमालयातल्या सरोवरासारखे ते शांत दिसत होते..
नैनु… काय झालंय बेटा…
नाशिक ला जाऊन आल्यापासून तू शांत आहेस.. काय घडलयं?
नैना नी डोळे मिटले.. आईनं tarrot कार्ड्स समोर मांडले..
आता ह्यातल्या एखाद्या कार्ड वर बोट ठेव बेटा…

नैना नी डोळे मिटूनच तस केलं..
ते कार्ड आईनं उघडून पाहिलं..
हिरव्या रंगाची उंच झाडं, वाहणारी नदी आणि एकटी बसलेली मुलगी…
नैना नी डोळे उघडले.. आणि काहीही नं बोलता ती तिथून निघून गेली..
अम्मा तिला पुन्हा जेवायला बोलवायला आल्या पण ती फक्त थंड पाण्याची बाटली संपवून सोफ्यावर निजली…आणि अम्मा तिला थोपटत राहिली.. काही क्षणात ती निजली… तिला शाल पांघरून त्या किचनकडे वळल्या.
***
नचि च्या आईने त्यांच्या देवासमोर हात जोडले
आणि वणीच्या देवीकडे पाहत नि्रांजन उजळलं…
क्रमश :
©मनस्वी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!