नैना ठग लेंगे…५
नैना च्या आई ने ते tarrot कार्ड काढून बाजूला ठेवलं .. आणि तिच्या खोलीत जाऊन दार लावून घेतलं तिला समोर तिची जुनी डायरी दिसली.. काही पानं चाळली... आणि पुन्हा बंद करून ठेवली.. आज कुणालाचं जेवायची इच्छा नव्हती.. बाहेरच वातावरण हळूहळू कुंद होऊ लागलं.. त्यापाठोपाठ आरक्त दिसणारे ढग आणि चमकणाऱ्या विदयूल्लता... त्यांनी खिडक्या बंद करून घेतल्या.. अम्मा ला हाक मारली आणि बाकीच्या ही खिडक्या बंद केल्या.. नैना ला जाग आली.. बाहेर पावसाची धार जोर पकडू लागली....बाहेर गडगडाट आणि मिट्ट काळोख दाटून आला.. अद्याप घरात दिवे होते पण काही वेळात इन्व्हर्टर ही बंद झाला.. अम्मा जागोजागीच्या मेणबत्त्या उजळत होती.. नैना मात्र बाहेरच्या व्हरांड्यात आली.. तिने फोन पाहिला तर निमिषा चे 10 मिस्ड कॉल्स.. तिने फोन लावला.. आणि निमिषा फोनवर रडू लागली.. निमू काय झालंय? रडू नकोस.. शांत हो.. प्लीज ये परत ये यार .. I need u.. हो येईन मी पण झालंय काय.. नैना ला काळजी वाटत होती.. मी फोनवर नाही सांगू शकत... प्लीज ये.. असं सांगून निमिषा नी फोन कट केला.. ती ही रोजच्या पोलिस चौकशीला कंटाळली होती.. दुसऱ्याच दिवशी नैना चा पिनाकला फोन आला.. पिनाक.. मला निमिषाचा कॉल आला होता.. नेमकं काय झालंय? मला काहीच कल्पना नाही ग.. तू नचि ला विचार... मी जरा बिझी आहे.. मी तिकडे येणार आहे पण मला शांतता हवीये ..तू काही मदत करशील? तुझा काय प्लॅन आहे? मी?? मला एका ट्रेक ला जायचंय.. आणि तुला मी तिथे नाही नेऊ शकत.. नैना नी पुन्हा विनंती केली तसं तो म्हणाला.. हे बघ नैना.. मी सगळ्यांना काही सांगत बसत नाही कि मी नेमकं काय करतोय.. पण तुला जर माझ्याबरोबर यायचं असेल तर काही ठिकाणी फिरावं लागेल थांबाव लागेल आणि काही ठिकाणी तुला नेणं अजिबात शक्य नाहीये.. So तू एखादा ट्रेक ग्रुप निवड आणि त्यांच्या सोबत जा.. नैना 'ठीक आहे' म्हणाली आणि तिने फोन कट केला. निमू ला पुन्हा कॉल केला.. आणि दोन दिवसांनी येते असं सांगितलं.. दोन दिवस तिने स्वतः ला खोलीत बंद केलं आणि एक पोर्ट्रेट काढलं.. ते संपलं आणि ती बाहेर आली.. अशी अनेक इमॅजिनरी काढलेली पोर्ट्रेटस होती तिच्या कडे.. काही गरजेपुरते कपडे घेतले आणि आईला सांगून ती निघाली. नाशिक ला पोचताच ती नचि च्या घरी गेली.. काकू आणि नचि बाहेर गेले होते.. घराला कुलूप... तिने नचि ला आणि निमू ला कॉल केला.. दोघांचाही ही फोन लागत नव्हता.. शेवटी तिने पुन्हा पिनाक ला कॉल केला.. त्यानी फोन उचलला.. बोल.. नचि काकू निमू कुणाचाच फोन लागत नाहीये.. So तुला केला.. मी पोचलीये.. नाशकात.. Ok आता कुठे आहेस? त्यानं विचारलं आता नचि च्या घराबाहेर.. आलोच 5 मिनिटात.. जवळ आहे मी.. असं म्हणून त्यानं कॉल कट केला.. एकंदरीत तिला त्याच्या बद्दल अनामिक आकर्षण वाटू लागलं होतं.. तिला घेऊन तो जवळच्या हॉटेल मध्ये गेला.. त्यांनी नाश्ता केला.. आणि बाहेर पडत असताना त्याला त्याचा मित्र सुमित दिसला.. तो त्याच्या ग्रुप बरोबर आत येत होता.. Hi हॅल्लो झालं आणि त्याचं ग्रुप मधल्या विभा नी नैना ला हाक मारली.. Hi नैना.. कशी आहेस? बऱ्याच वर्षांनी भेटलो ग! विभा... नैनाच्या बालपणीची,आजोळी भेटणारी मैत्रिण.. सध्या ती ही शिकायला नाशिक मध्ये आली होती.. पण आज गाठ पडली.. गप्पा झाल्या आणि मग कळलं कि आता नाश्ता करून ते सगळे हरिहर गडावर जाणार आहेत.. . पिनाक नि तिच्याकडे पाहिलं.. आणि विचारलं.. सुमित माझा जुना आणि विश्वासू मित्र आहे.. तुला जायचं असेल तर यांच्याबरोबर जाऊ शकतेस.. नाहीतर घराची किल्ली देतो नचिच्या घरी थांब.. विभा नि ही आग्रह केला.. चल ना.. आणि नैना त्यांच्या बरोबर निघाली.. सुमीत नैना आणि विभा नि आपसात फोन नंबर exchange केले आणि त्यांच्या गाडीत बसून नैना निघाली.. तिने आईला ही सुमित आणि विभा भेटल्याच कळवलं आणि कुठे जातोय ते ही सांगितलं.. नचि आणि निमू ला ही msg टाकला.. आणि हरिहर गडाच्या दिशेने प्रवास सुरु झाला.. जाताना दोन्ही बाजूनी दिसणारी हिरवी वाट, गार वारा यानं तिला झोप लागली.. काही वेळानी मागून कुणीतरी हात लावल्याच जाणवलं अन जाग आली.. त्यांची मिनी बस ब्रेकसाठी थांबली होती आणि गाडीत ती आणि सुमित चे अजून दोन मित्र तिच्या मागच्या सीटवर बसून तिला नकोसे स्पर्श करत होते.. ती झटकन उठली, मागे वळून पाहिलं.. तिचे डोळे, त्यातला राग पाहून ती पोरं खाली गेली, तिने विभाला हाक मारली.. चहा ही तिने गाडीच्या पायरीवर बसूनच घेतला.. थोड्याच वेळात सगळे परतले.. या वेळी ती विभा आणि सुमित च्या मध्ये बसली अन प्रवास सूरु झाला.. अजून गडाच्या पायथ्याला पोचायला अर्धा तास लागणार होता.. बाहेरच वातावरण पालटू लागलं.. अंधारून आलं.. आभाळ दाटलं.. आजूबाजूची हिरवी झाडं.. काळसर भासू लागली आणि पावसाची सर कोसळली.. विजांचा लखलखाट वातावरण भेसूर करू लागलं.. हे सगळे नेहमीच ट्रेक ला जात पण आजचा पाऊस रौद्र रूपात आला... इतक्यात बस च्या समोर एक फांदी कोसळली.. ड्रायव्हर नि गाडी कशी बशी थांबवली.. आणि पुढे जाण्यास साफ नकार दिला.. सगळ्यांनी विचार केला आता थोडी आडोश्याची जागा शोधू मग पुढे जाऊ.. गाडी मागे फिरवली... आणि थोड्याच अंतरावर एक छोटंसं हॉटेल दिसलं.. गाडी त्याच्या पार्किंग ला लावून सगळे आत आले.. चहा भजी झाली.. आणि मालक संध्याकाळची दिवा बत्ती करू लागला.. सुमित नि नं राहवून विचारलं.. काय हो.. अजून फक्त पाच वाजलेत इतक्यात दिवा बत्ती..? काय करणार शेट.. आज अवस आहे.. बर झालं तुम्ही परतीच्या रस्त्याला लागलात.. आता लवकर निघा म्हणजे नाशकात लवकर पोचाल. अहो अमावस्या आहे म्हणून काय झालं.. आम्ही ट्रेक ला चाललोय.. पाऊस थांबला कि जाणार परत हरिहर ला.. सुमित नि हरिहर गडा कडे पाहत म्हणाला.. मालक मात्र गप्प राहिला.. थोड्या वेळात पावसाचा जोर कमी झाला आणि सगळे गाडीपाशी आले.. सगळे मिळून आठ जण होते.. त्यातल्या तिघांनी परत फिरायचा निर्णय घेतला.. ड्राइव्हर ही पुढे यायला नाही म्हणाला.. मग सुमित, विभा नैना आणि ती दोन मुलं ज्यांनी मगाशी नैना ला त्रास दिला होता ती ह्यांनी ट्रेक पायी करायचं ठरवलं.. अर्थात ती दोघं नैना ला एकटं गाठायचं ह्या एकाच गोष्टी साठी ट्रेक ला येणार होती.. विभा आणि सुमीत मात्र adventure साठी ट्रेक ला जाणार होते.. *** पिनाकसाठी आजचा दिवस खूपच महत्वाचा होता.. अमावस्येला नाथ संप्रदायाचा अनुग्रह घेणार होता... अनुपम शीला जिथे नाथ संप्रदायाची दिक्षा मिळते,काहीसा जंगल भाग ब्रम्हगिरीच्या पायथ्याचा .. आधी त्र्यंबकेश्वर दर्शन..मग अनुग्रह आणि मग साधनेसाठी एखादी कपार किंवा गुहा शोधायची ..असा त्याचा मानस होता. तो नैनाला सोडून घरी आला.. आवरून पुन्हा बाहेर पडला.. गाडीला किक मारली आणि थेट त्रंबकेश्वर ला निघाला.. नची नैना आणि पिनाक ला फोन ट्राय करत होता... एक अत्यंत वाईट बातमी होती... राहुल त्याच्या राहत्या घरी गळफास लावून गेला होता. #कुणाचं पोर्ट्रेट होतं ते? #काय घडेल नैना सोबत? #पिनाक ला दिक्षा मिळेल? क्रमश : ©मनस्वी
Latest posts by gangal_manasi (see all)
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021