नैना ठग लेंगे..७

नैनाच्या आईनं खिडकी बंद केली खरी,
पण खोलीत मात्र गारवा भरून राहिला होता....

खिडकीच्या शेजारीच एक छोटंसं सागवानी टेबल होतं.. त्याच्यावर एक जुन्या पद्धतीची पितळी संदूक होती... त्याच्या बाजूला तिची डायरी होती. तिने डायरी उघडली.. त्याच्या मधल्या पानावर एक जाळीदार पिंपळ पान होतं.. ते हातात घेतलं..
त्यावरून अलगद बोट फिरवलं.. मग ती संदूक उजव्या बाजूला फिरवली.. आणि समोरच्या भिंतीतलं कपाट उघडलं. असंख्य जुन्या कागद पत्र आणि पुस्तकांनी भरलं होतं ते.. त्यात एक विचित्र आकाराची तांब्याची मूर्ती होती.. टवके उडालेली अत्यंत ओबडधोबड दिसणारी मूर्ती तिने त्या पितळी संदुकीच्या मधल्या खाचेत बसवली आणि दोनदा उजवीकडे एकदा डावीकडे अशी फिरवली.. संदूक उघडली.. त्यातुन एक हिरव्या रंगाचा बटवा काढला.. त्यातली चिमूटभर उदि तिने कपाळावर लावली.. आणि सगळं नीट  बंद करून ती ध्यानाला बसली..

****
नैना ला घेऊन पिनाक परत आला.. येताना त्यानं विभाला ही घरी सोडलं.. नची आणि काकू बाहेरच्या दिवाणखान्यात बसले होते.. काकूंच्या हातात जपमाळ होती आणि समोरच्या कोपऱ्यात एक समई शांत तेवत होती.
पिनाक ला भेटताच नची चा बांध सुटला.. त्याच्या मिठीत शिरून तो रडू लागला..
नैना ला काहीच कळेना.. ती भांबवून बघत होती.. नची ने तिला सांगितलं..
राहुल गेला.. तशी ती धक्का बसल्यासारखी खाली बसली.. काकू जवळ आल्या.. तिला थोपटत म्हणाल्या.. फारच गुणी मुलगा होता गं.. पण त्यानं आत्महत्या का केली असेल?
काहीच कळत नाही तुम्हा आजकालच्या मुलांचं.. घडाघडा बोलत का नाही तुम्ही?
काकू त्रागा करत राहिल्या आणि नैना त्यांना शांत करून किचनमध्ये गेली..
पिनाक मात्र त्रयस्थपणे तिचं निरीक्षण करत होता.. त्यानं जे तिच्या डोळ्यात पाहिलं ते कोड्यात टाकणारं होतं..
***
विभा घरी आली खरी पण तिने जे पाहिलं होतं. ते अत्यंत भयानक होतं..
एक हिरवट स्त्री आकाराची आकृती, तिला फुटलेल्या अगणित लाल पारंब्या जणू लसलसणाऱ्या जिभा... मनुष्य आणि वेल असं काहीसं मिश्रण... तिचं त्या समोरच्या व्यक्तीला कवेत घेणं... आणि हळूहळू एका वेलीत रूपांतरित होतं त्या माणसाच्या रक्ताचा घोट घेणं...सगळंच भयानक... हे सगळं आठवून ती किंचाळली... आsss आ sss...
आणि दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून ती बेडवर कोसळली ... तिचा आवाज ऐकून तिची रूम मेट धावत आली... पण तोपर्यंत विभा नी हाताची नस कापून घेतली होती आणि खाली रक्ताचं थारोळं आणि त्यावर तिचा हात बेडवरून लोम्बकळत होता..
रूम मेट नी ताबडतोब तिच्यावरं प्रथमोपचार केले आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेलं...
काही वेळानी ती शुद्धीवर आली..
****
ज्या मित्राला पिनाक आणि साथीदारांनी झाडावरून उतरवलं होतं.. त्या मित्राला भेटायला पिनाक आणि नची गेले.. तो शेवटच्या घटका मोजत होता..
आधीच खूप रक्तस्त्राव झाल्यामुळे तो अत्यावस्थ होता.. पिनाक त्याच्या जवळ गेला.. त्यानं बोलायचं प्रयत्न केला.. पण जमत नव्हतं मग त्यानं पिनाक ला खुणेनं जवळ बोलावलं आणि त्याच्या डोळ्यांकडे बोट दाखवलं..आणि खोलीतल्या हिरव्या पडद्याकडे बोट दाखवलं.. काही कळायच्या आत तो कोमात गेला...
नची आणि पिनाक साठी हा धक्का पचवणं अवघड होतं..
त्या मित्रासोबतच बाकीची दोघे ही ऍडमिट होते.. पण सुदैवाने त्यांची तब्येत सुधारत होती 
नची आणि पिनाक त्या मुलांच्या घरच्यांना कळवून घरी परत येत होते..
त्यात निमिषा चा फोन आला.. नची लवकर घरी ये..पोलीस आले आहेत..
पिनाक च्या डोक्यात विचारांची चक्र जोरात फिरू लागली...
****
नैना कुणालाही नं सांगता मुंबईला निघून गेली..
पिनाक नची घरी पोचले.. पोलीस दारातच होते.. गावात सुमित आणि त्याच्या मित्रांबद्दल 
चर्चा झाली होती.. आणि नव्यानं आलेला PSI वरद आता तपासप्रमुख होता..त्यानं चौकशी करायला सुरवात केली..
राहुल कसा होता? वर्तन, व्यसनं? मित्र कोण?
पण कुठलाच धागा मिळेना.. मग काकूंची चौकशी झाली.. त्यांनी ही घडलेला प्रसंग सांगितला.. सगळेजण त्या पांगाऱ्या पाशी आले..
त्यावर चढलेली वेल.. आता गळून पायाशी पडली होती.. आजूबाजूला काहीच सापडलं नाही..
फक्त सगळ्यांच्या नकळत एक वस्तू पिनाक नि उचलून खिशात टाकली..
****
दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये मोठी बातमी छापून आली...
ट्रेकिंग ग्रुप वर वन्य प्राण्याचा हल्ला , एक कोमात,दोघे जखमी.. विभा चं नाव आणि प्रकरण पैसे देऊन दाबून टाकलं होतं..
विभाचे वडील मुंबई ला मोठे वकील होते..
तिला ही ते मुंबई ला घेऊन गेले..
****
घटना इतक्या वेगाने घडत होत्या की सगळेच बधीर झाले होते.. पिनाक सोडून..
तो आज पुन्हा ध्यानाला बसला..
आणि आता दिसू लागली ती जंगलातली वाट..
पावसाळी हवा.. गारठा.. झाडांच्या काळ्या सावल्या आणि पाठमोरी हिरव्या वस्त्रातली स्त्री... ती मुक्तपणे विहरत होती.. अचानक वातावरण बदलू लागलं.. त्या आकृतीला असंख्य धुमारे फुटले.. पारंब्या फुटल्या.. लाल काळ्या रंगाच्या... लसलसणाऱ्या असंख्य जिंव्हा... त्या आता पिनाक च्या दिशेनी सरकू लागल्या..
इतकं भयंकर पाहूनही तो शांत होता..

इतक्यात कुणीतरी पाठीवर हात ठेवला आणि त्यानी झटकन डोळे उघडले..
#कोण होती ती व्यक्ति जी पिनाक ला ध्यानात दिसली?
#विभा नि कुणाला पाहिलं?
#इन्स्पेक्टर वरद ला सापडेल ह्या हल्ल्या मागचा सूत्रधार?
क्रमश :
©मनस्वी

One thought on “नैना ठग लेंगे..७

  • November 7, 2021 at 12:36 pm
    Permalink

    Yacha pudhcha bhag keva yenar? Khup diwas zalet….fb war pan ewadhech parts wachle hote

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!