निरोप घ्यावा आता

Ok bye, आपण किती सहज पणे बोलतो. आपण दररोज ज्यांना भेटतो त्यांच्याशी बोलताना असे bye बोलून निघताना, त्यांचा निरोप घेताना काहीच वाटत नाही.  पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पासून काही वर्षा साठी किंवा कायमची दूर जाणार असते तेव्हा असा निरोप घेणे किती जड जाते आपल्याला.  माझे बहीण भाऊ दोघेही परदेशी असतात.  वर्षा दोन वर्षांनी त्यांचे येणे होते भारतात.

भारतात आल्यावर सर्वांच्या गाठी भेटी घेत इतर कामे उरकण्यात दिवस कसे भुर्रकन उडून जातात.  कितीही ठरवले तरी त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारणे होताच नाही.  भरभर पुढे जाणारे घडयाळाचे काटे काही हाताने पकडून ठेवता येत नाहीत आणि अखेर काही चुटपुटत्या भेटी वर समाधान मानूनच त्यांच्या निरोप घ्यायची वेळ येते.  येतो आम्ही लवकरच परत असे बोलत ते जेव्हा एअरपोर्ट मध्ये जातात तेव्हा मनातून माहित असते की आता परत वर्ष दोन वर्ष काही भेट नाही,  पण तरीही लवकरच परत या,  असे बोलताना गळ्यात आवंढा दाटून येतो. एअरपोर्ट च्या काचेच्या आड दिसणारे माझे बहीण भाऊ  डोळ्यातील अश्रू  मुळे कधीच दिसेनासे झाले असतात… .

माहेर हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील हळवा कोपरा असतो . तसा माझाही आहे.  लग्नाच्या आदल्या रात्री पै पाहुण्यांनी भरलेले माझे घरात या सर्वाना सोडून जायचे या कल्पनेनेच किती मन भरुन आले होत. अगदी कधीही भावनिक न होणाऱ्या माझ्या बाबांच्या डोळ्यात हि पाणीपाहून मला आणखी वाईट वाटत होते. मग मला हसवाय साठी माझ्या मावशीने आणि भावंडानी किती गमती जमती केल्या होत्या. आणि ती निरोपाची माझ्या माहेरातील रात्र आम्ही छान हसत खेळत घालवली. लग्नानंतर इतक्या वर्षांनी सुद्धा माहेरी गेली की परत येताना मनात कालवा कालव होते.
आमची बदलीची नोकरी असल्याने काही ठराविक वर्षांनी आमची बदली होते.  इतकी वर्षे एकत्र घालवल्यावर,  एकत्र मौज मजा केल्या वर,  अचानक बदली झाली की मैत्रिणी ना द्यावा लांगणारा निरोप खूपच त्रासदायक असतो.
बदली झाल्यावर सामानाची बांधा बांध केल्यावर, रिकामे घर पाहून मनाचा बांध फुटतो. त्या घरात घालवलेल्या अनंत आठवणी समोर फेर धरून नाचू लागतात …..मला अजूनही आठवते आमची मुंबई हून दिल्ली ला बदली झाली तेव्हा packers and movers चे लोक सामानाची बांधाबांध करत असताना मी आणि माझी मुलगी त्या घरातील खिडकीतच किती वेळ बसून होतो. त्या खिडकीशी निगडित किती तरी आठवणी होत्या माझ्या… …मग सामान pack झाल्यावर कसे बसे मन घट्ट करून तिथून आम्ही निघालो . ..
जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा त्या व्यक्तीने कधीच आपला निरोप घेतला असतो पण आपल्याला मात्र त्या व्यक्ती चा निरोप घेतां येत नाही…
सगळ्यात गोड निरोप समारंभ असतो तो आपल्या बाप्पाचा….. दहा दिवस आपला पाहुणचार घेऊन बाप्पा आपल्या घरी निघतात .हा निरोप बाप्पाला देणे फार जरुरी असते कारण तेव्हाच बाप्पा पुढच्या वर्षी आपल्या साठी सुखाचा नवीन ठेवा घेऊन येणार असतो .माझ्या घरचा गणपती दीडच असतो. विसर्जनाचा दिवशी बाप्पा निघाले की मन उदास होते…. बाप्पा ने जाऊच नये असे वाटत राहते…  अनंत चतुर्थीदषी ला वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक निघते .ढोल ताशाच्या तालावर थिरकणारी पावले जसजसा समुद्र किनारा जवळ येतो तस तशी जड होतात, विसर्जनाची शेवटची आरती बोलताना  . …बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या बोलताना डोळ्यांना कधी धार लागते कळतंच नाही….
तर असे हे माझ्या आयुष्यातील निरोपाचे हळवे क्षण तुमच्या सोबत share करून तुमचा निरोप घेते.

Anuja Pathare
Latest posts by Anuja Pathare (see all)

Anuja Pathare

मी अनुजा पाठारे. माझे शिक्षण m.com पर्यंत Sydenham कॉलेज येथून झाले आहे.मी एक शिक्षिका आहे. विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या भाषेत शिकवण्यात माझा हातखंडा आहे. मी एक मनस्वी व्यक्तिमत्त्व आहे. स्वानंदी अशी माझी खरं तर ओळख करून द्यायला मला आवडेल. मी जशी माझ्या जिवाभावाच्या माणसाची मने आनंदी ठेवते तितकच स्वतःच मनही आनंदी ठेवते . स्वतःच मन खुश ठेवण, स्वतः च्या आवडी निवडी पुरवण, स्वतः चे छंद जोपासण हे माझ्या आयुष्यात तितकंच महत्वाचे आहे.. आपल्या आनंदात इतरांना सामील करून घ्यायला ,नवीन नाती जोडायला अन् त्या सोबतच जुनी नाती जपायला फार आवडते. जीवनात आनंद मिळवण्यासठी फार मोठया मोठया ऐहिक सुखा ऐवजी लहानसहान गोष्टी मधून आनंद शोधा हा माझा जगण्याचा फंडा आहे. जसे मला उत्तम उत्तम लेख , पुस्तके वाचून समाधान मिळत तसेच स्वतः च्या मनातील विचार शब्द रुपात मांडून ही खूप समाधान मिळते. Lekhonline च्या माध्यमातून माझे अनुभव, माझ्या मनातील भावना तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न तुमच्या पसंतीस उतरेल हीच आशा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!