यशस्वी पुरुषाची बायको ….(भाग २ )
यशस्वी पुरुषाची बायको ….(भाग २ )
अजिताने फोन कट केला आणि तिच्या आईला फोन करून बातमी सांगितली. अजिताची आई हे ऐकून खुश झाली. पण वडिलांना काळजी वाटू लागली की अजिता अमेरिकेत हे सर्व कस manage करेल एकटीने. त्यांनी तिला हे बोलून देखील दाखवलं. पण त्यांना आणखी काळजी वाटेल म्हणून अजिता ने “इथे कठीण नसत. होईल manage” वगैरे सांगून वेळ मारून नेली. यथावकाश अजिताने नोकरी सांभाळत एकटीने जर्सी मध्ये सात महिने काढले. आठव्या महिन्यात ठरल्यानुसार तिची आई आली. मिलिंद अधून मधून येत होताच. नऊ महिने उलटून गेल्यावर ईशाचा जन्म झाला. मिलिंद ने तिला हातात घेतल्यावर तो म्हणाला
मिलिंद- हिच्या रूपात मला देव अगदी साक्षात ईश्वर दिसतोय. आपण हीच नाव इशा ठेऊ. इशा मिलिंद गोखले.
ईशाच नामकरण तिच्या जन्माच्या दिवशीच झाल होत. बारश्यात तेच नाव ठेवलं गेल. बारश्याच्या रात्री इशा झोपल्यावर मिलिंद अजिताला म्हणाला-
मिलिंद- अजिता एक चांगली न्यूज आहे. आपल्या ईशाचा पायगुण म्हण.
अजिता- काय रे?
मिलिंद- मला आमच्या कंपनीतून मस्त ऑफर आहे.
अजिता- काय?
मिलिंद- आमची तीन डेव्हलपमेंट सेन्टर्स इंडिया मध्ये सेट अप होत आहेत. मला पुण्याचा सेंटर हेड म्हणून जाणार का विचारलं आहे बॉस ने. पगार डॉलर मध्येच मिळेल. ३०% rise देणार लगेच. पुण्यात घर, गाडी आणि सगळा खर्च वेगळा. आणि पर्फोर्मंस बोनस पण सोलिड आहे. आणि आपण परत आपल्या देशात जाऊ.
अजिता- आणि माझी नोकरी? माझ पण प्रमोशन ड्यू आहे.
मिलिंद- ओह…पण अजिता आपल्याला हा call घ्यावाच लागेल ना आता. आय मीन ईशासाठी आपल्याला family म्हणून एकत्र राहावच लागेल ना? आता मी वेस्ट आणि तू इस्ट अस नाही ना चालणार? मग तू वेस्टला यायच्या ऐवजी आपण दोघेही इंडियात गेलो तर? आणि इंडिया मध्ये खर्च कमी असेल. इन्कम डॉलर मध्ये आणि खर्च रुपीज मध्ये. तू नोकरी केली नाहीस तरी चालेल.
अजिता- मी नोकरी फक्त पैशांसाठी नाही ना करत? माझ पण करियर आहे ना मिलिंद.
मिलिंद- I know…ठीक आहे. मी force नाही करत तुला. मी ऑफिसला सांगतो की india is not happening…बाकी पुढल पुढे बघू.
हे बोलून मिलिंद तिच्याकडे पाठ करून झोपला. अजिता समोर एक प्रचंड प्रश्न उभा होता. ईशां, संसार की करियर? ईशाला आई बापाच प्रेम द्य्याच की नोकरीत पुढे जायचं…अजिता खूप उशिरा पर्यंत विचार करत होती. शेवटी पाळण्यात शांत झोपलेल्या ईशाच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून तिने एक निर्णय घेतला.
दुसर्या दिवशी सकाळी तिने मिलिंदला सांगितल की ती इंडिया ला यायला तयार आहे. ती इंडिया मध्ये काहीतरी जॉब शोधेल इशा शाळेत जाऊ लागल्यावर. तोवर ती इशाच्या संगोपनाकडे लक्ष देईल. मिलिंद ने त्याच्या करियर मध्ये प्रगती करावी. एका आईने एका हुशार इंजिनियर वर मात केली होती. महिन्याभरात दोघे इंडियात आले. मुंबईला मिलिंदच्या आई वडिलांना नातीची भेट घडवून दोघे पुण्याला त्यांच्या नव्या घरात राहू लागले. अजिता ईशाच्या संगोपनात हरवली आणि मिलिंद ऑफिसच्या कामात. काही वर्षात मिलिंद इंडियाचा कंट्री हेड झाला होता आणि अजिता “ईशाची मम्मा” म्हणून ईशाच्या शाळेत आणि ईशाच्या मैत्रिणींच्या आयांच्या ग्रुप मध्ये प्रसिद्ध झाली होती.
क्रमश:
अजिता….(दुसरा आणि (शेवटचा भाग)
मिलिंद आता त्याच्या कंपनीत मोठा माणूस झाला होता. त्याचा पर्फोर्मंस बघून त्याला कंपनीने गेल्याच आठवड्यात asia pacific ची जबाबदारी सोपवली होती. वाढलेली जबाबदारी, वाढलेले अधिकार आणि वाढलेलं कार्यक्षेत्र ह्यामुळे मिलिंदच्या वागण्यात प्रचंड confidence आला होता. इतका की अनेकदा तो लोकांना उर्मट वाटत असे. पण तो त्याचा स्वभाव झाला होता. आपल्या प्रगतीने तो स्वतःच्याच प्रेमात पडला होता. त्याच travel खूप वाढलं होत. भारतात आणि भारता बाहेरही. महिन्यातले दहा दिवस तरी तो फिरतीवर असे. आणि पुण्यात असला तरी कंपनी पार्टी, क्लायंट मिटिंग, outing अश्या अनेक कारणांनी घरी यायला उशीर होत असे. घरी आल्यावरही तो अंघोळ करून एखाद ड्रिंक घेऊन झोपत असे. सकाळी कॉल सुरु होत. अजिता आणि ईशां कडे त्याच लक्ष नसे. सुरुवातीला कामाचा लोड, स्ट्रेस वगैरे कारण स्वतःला सांगून अजिता काहीच बोलली नाही. पण तिला त्याच्या वागण्यातला बदल जाणवत होता. कॉलेजात असताना मित्र. मग प्रियकर प्रेयसी. नंतर अमेरिकेत लग्न करून आयुष्य नव्याने सुरु केलेलं कपल असे नात्यातले बदल आता बॉस आणि घराची केअर टेकर असे झाले आहेत अस अजितला वाटू लागल होत. त्या रात्री मिलिंद ड्रिंक हातात धरून बेडवर बसून फोन बघत होता. इशा झोपली होती. अजिता सहज त्याच्या शेजारी येऊन बसत त्याला म्हणाली-
अजिता- खूप स्ट्रेस आहे का कामाचा? काय सुरु आहे नवीन ऑफिसात? काही क्रिटीकल प्रोजेक्ट आहे का?
मिलिंद ने फोन मधून वर न बघता फक्त हम्म केलं.
अजिता- हम काय करतोस? सांग ना काय प्रोजेक्ट आहे ते. मलाही आवडेल ऐकायला.
मिलिंद- प्लीज यार…मला काम करू दे.
अजिता- आत्ता काम? मिलिंद work life balance माहित आहे ना तुला? हे अस नको करू. तब्बेत खराब होईल. काम delegate करत जा ना.
मिलिंद अचानक जाम चिडला.
मिलिंद- तू आता मला शिकवणार का की काम कस करायचं ते? मला कंपनीने एशिया चा हेड काम येत नाही म्हणून केला ना?
अजिता- अजित तस नाही म्हणत मी. मी फक्त इतकाच सांगते आहे की तू कामाचा स्ट्रेस घेऊ नको. तुझ घराकडे लक्ष नसत सध्या. रात्री येतोस. आपल्याच दुनियेत असतोस. तुझ travel सुरु असत. सकाळी पण कॉल्स आणि ऑफिस. माझ्याकडे आणि ईशाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो तुला. म्हणून मी…
मिलिंद- घराकडे बघायाल तू आहेस ना अजिता? आता माझ corporate life सोडून मी घर सांभाळत बसू का? तुला नाही कळणार corporate चा स्ट्रेस. Corporate म्हणजे ईशाची शाळा नाहीये जी जरा पाऊस पडला कि बंद ठेवली किंवा तिची nappy नाहीये जी ओली झाली कि बदलली. तू ना ते सांभाळ व्यवस्थित. माझ्या कामच मी बघतो.
हे बोलून मिलिंद तिच्याकडे पाठ करून झोपला. अजीताला खूप वाईट वाटत होत तो बोलला त्याच आणि रागही आला होता. ती शांतपणे दिवा मालवून आडवी झाली. डोळ्यात पाणी होत. पण झोप येत नव्हती. सकाळी उठल्यावर मिलिंद त्यच्या नॉर्मल रुटीन नुसार कॉल्स आणि नानात्र ऑफिसला गेला. ईशाला स्कूल बस मध्ये बसवून अजिता घरी आली. तिच्या डोक्यातून अजून काल रात्रीचा विषय गेला नवता. मिलिंद जे बोलला ते तिच्या जिव्हारी लागल होत. तिने काही वेळ डोळे मिटले आणि ती शांत बसली. मिलिंद खूप stressed आहे आणि त्यातून तो हे बोलला अशी तिने स्वतःची समजुक काढली आणि ती कामाला लागली. दोन महिने असेच गेले. मिलिंद घरात देखील तो बॉस आणि बाकी नोकर असल्यासारखा वागू लागला होता. तो एका इगो ट्रीप वर असल्याच अजिताच्या लक्षात आल होत. मिलिंद मध्ये झालेला हा बदल तिला अजिबात रुचत नव्हता. पण शब्दाला शब्द वाढेल म्हणून ईशाकडे बघून ती काही बोलत नव्हती. एकूणच मिलिंद आणि अजिता मध्ये संवाद संपल्यासारखा झाला होता. अजितला तो दुरावा, तो एकाकीपणा बोचत होता. ईशाकडे बघून ती दिवस काढत होती.
ईशाचा वाढदिवस एका आठवड्यावर आला होता. हा वाढदिवस अजिता मोठा करणार होती. तिने इशाच्या सगळ्या फ्रेंड्स ना आमंत्रण दिल. ईशाचे आणि मिलिंद चे आई वडील, कझिन्स वगैरे पण येणार होते. बरोब्बर एक आठवडा आधी मिलिंद घरी आला आणि फोनमध्ये बघत अजिताला म्हणाला-
मिलिंद- मी उद्या सिंगापूरला जातोय. महत्वाची मिटिंग आहे. तिथून hongkong आणि नंतर शांघाई.
अजिता- ईशाच्या बर्थ डे पार्टीला असशील ना?
मिलिंद- म्हणजे काय? माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी असणारच ना? बिझी असलो तरी तिचा बाप आहे मी. मी घरची आणि ऑफिसची दोन्ही जबाबदाऱ्या पार पडतो.
अजिता- ठीक आहे. नक्की ये म्हणजे झालं.
मिलिंद- what do you mean? मी येणार नाही? मी बेजाबदार आहे? हे बघ अजिता तू ना हे असले टोमणे मला नको मारत जाऊ. त्या तुझ्या मम्मी लोकांच्या ग्रुप मध्ये हे असले चाळे करत जा. मी कोणी फालतू माणूस नाहीये हे असले टोमणे ऐकून घ्यायला.
अजिता- मी कधी फालतू म्हणाले तुला? तुझ्याच मनात काय काय सुरु असत.
मिलिंद- हो का? बर. मला ना असल्या फालतू इश्यू वरून वाद नाही घालायचा. माझ्या मागे खूप मोठे प्रोब्लेम्स आहेत. मिलियन डॉलर्स च्या प्रोजेक्ट्स ची जबाबदारी आहे. मी तुझ्या बरोबर वाद घालून माझी एनर्जी घरात वेस्ट नाही करणार, गुड नाईट.
तो झोपी गेला. अजिता विचार करत होती की माझ्याशी बोलण म्हणजे एनर्जी वेस्ट करण? मी इतकी का किरकोळ झाले आहे? ह्याचे मिलियन डॉलर चे प्रोजेक्ट असतात मग माझी मुलगी तर अमूल्य आहे. पण ह्याला आमची किंमत नाही. ह्या विचारातच तिला झोप लागली. दुसर्या दिवशी मिलिंद सिंगापूरला गेला. इशा आणि अजिता वाढदिवसाच्या तयारीला लागल्या. ईशाचा ड्रेस, तिचं गिफ्ट, हॉल च डेकोरेशन अश्या लहान लहान आनंदात दोघी मश्गुल होत्या. आणि ईशाचा वाढदिवस उद्यावर आला. अजिता ने मिलिंद ला त्याची आठवण करून देत उद्या कितीला येणार आहेस हे विचारणारा मेसेज केला. ब्लू टिक दिसूनही मिलिंद चा रिप्लाय आला नव्हता. संध्याकाळी इशा आणि अजिता हॉल वर पोहोचल्या. बरोबर ईशाचे दोन्ही आजोबा आणि आजी होते. सगळे पाहुणे जमले होते. लोक ईशाला wish करत होते आणि अजिताकडे मिलिंद ची चौकशी करत होते. तो आला नाही ह्यावर आश्चर्य व्यक्त करत होते. अजितला फारच कानकोंड होत होत. ती कशीबशी हसून मिलिंद खूप बिझी असल्याच सांगून वेळ मारून नेत होती. पार्टी संपली. मिलिंद चे आई वडील हॉल वरूनच ओला करून मुंबईला गेले. अजिताचे आई वडील सगळी गिफ्ट्स वगैरे गाडीत टाकून अजिताच्या घरी आले. दमलेली ईशां गिफ्ट्स उघडून लगेच झोपली. आई बाबा आणि अजिता हॉल मध्ये बोलत बसले होते. मिलिंद नाही आला हे त्या दोघानाही आवडलं नव्हत. एकंदरीत काहीतरी बिनसलं आहे हे त्यांना जाणवत होत. शेवटी वडिलांनी विषय काढला.
बाबा- अजिता, बेटा काय सुरु आहे तुझ्यात आणि मिलिंद मध्ये? All well ना?
अजिता- हो बाबा…all well.
आई- खोट नको बोलू तू अजिता. आम्हाला दिसत का नाही काय चाललय ते. हे काय वागण आहे मिलिंदच? मुलीच्या वाढदिवसाला आला नाही? लोकांना तोंड दाखवताना नाकी नऊ आले तुझ्या. आणि आमच्याही. ही काही रीत नाही वागायची.
अजिता- आई त्याला काम असेल ना महत्वाच…नाहीतर आला असता तो.
बाबा- अस काय ग काम असणार? जगात तो एकटाच का नोकरी करतो? आपल्या नात्यात किती मुलं आहेत मोठमोठ्या कंपन्यात नोकरी करणारी. पण हे अस वागण नाही बर का कोणाचं.
अजिता- बाबा…जाऊ द्या ना…प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते.
आई- आणि संसार करायची सुद्धा एक पद्धत असावी लागते. हे काय वागण? संसार तुझा एकटीचा नाहीये ना? ते काही नाही. तू बोल त्याच्याशी आणि त्याला जरा समजाव.
अजिता- हो आई. मी समजावते. तुम्ही निघा आता. आधीच उशीर झालाय तुम्हाला.
आई आणि बाबा तिचा निरोप घेऊन निघाले. जायला दार उघडल तर दारात मिलिंद उभा.
क्रमश:
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023