यशस्वी पुरुषाची बायको ….(भाग ३ शेवटचा भाग)
आई आणि बाबा तिचा निरोप घेऊन निघाले. जायला दार उघडल तर दारात मिलिंद उभा.
आई बाबांना पाहून मिलिंद हसत म्हणाला-
मिलिंद- अरे वा. तुम्ही? घरी निघालात का?
बाबा- हो…
मिलिंद- घरी का जाता इतक्या रात्री? इथेच रहा सकाळी जा. मी ड्रायव्हर ला सांगतो ना तुम्हाला ड्रोप करायला.
बाबा- नको आम्ही जातो ना घरी. अर्ध्या तासात पोहोचू…
मिलिंद- ऐका माझ. उद्या जा. या आत या.
तो त्या दोघांना हाताला धरून आत घेऊन आला. मग त्यांनीही जायचा विचार बदलला. मिलिंद अंघोळ करून आला आणि बार मधून ड्रिंक बनवू लागला.
बाबांना म्हणाला-
मिलिंद- तुम्हाला काय?
बाबा- नको मला. जेवण झालंय माझ.
मिलिंद- त्यात काय? Scotch घ्या. मी लास्ट ट्रीप मध्ये दोन bottles आणल्या आहेत. आजही एक bottle आणली आहे. मी कधीच ड्युटी फ्री मधून scotch आणि परफ्युम घ्यायला विसरत नाही.
अस म्हणून त्याने बाबांसाठी एक ग्लास भरला. बाबांना दिला. मग त्यांच्या समोर बसून त्याने अजिताला विचारलं.
मिलिंद- काय मग? वाढदिवस कसा झाला? मला यायला मिळाल नाही यार. मिटिंग एक्स्टेंड झाली.
हे तिघे काहीच बोलले नाही. ते लक्षात येऊन मिलिंद म्हणाला-
मिलिंद- come on guys. काम काम आहे ना? तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे जणू काही मी काहीतरी मर्डर केलाय. चिल.
अजिता शांतपणे म्हणाली-
अजिता- हो तू मर्डर केला आहेस. आमच्या भावनांचा. ईशाच्या हौसेचा.
मिलिंद- what? Come on. कामात होतो. नाही येऊ शकलो. Period. त्याचा इतका इश्यू का करताय?
अजिता- इश्यू? मी इश्यू करत नाहीये. जे आहे ते सत्य सांगते आहे. इश्यू तू तुझ्या कामाचा करतो आहेस.
हे ऐकून मिलिंद चिडला.
मिलिंद- what did you say? Come again. मी कामाचा इश्यू करतोय? You mean मी खोट बोलतोय? काम नसताना उगाच बाहेर राहतोय?
अजिता- नाही. काम आहेच तुला. पण मिलिंद तुल अस वाटतय किंवा तू अस दाखवतो आहेस हल्ली की काम फक्त तुला असत. अरे जगात करोडो लोक काम करतात मिलिंद.
मिलिंद- अच्छा? ते करोडो आणि मी सारखेच? स्टेशन वर ओझी वाहणारा हमाल, रिक्षावाला, सकाळी पेपर टाकणारा पोरगा, दुधवाला, तुझे स्वीगी चे डिलिव्हरी बोईज आणि मी सारखेच ना? कारण ते पण काम करतात. उद्या म्हणशील आपल्या घरातली मेड, तू आणि मी पण सारखेच आहोत कारण तुम्ही पण काम करता.
अजिता- एक…एक मिनिट…तू काय म्हणालास आत्ता? मी आणि मेड? मिलिद, तुला मी आणि मेड सारख्या वाटतो का?
मिलिंद- तस नाही…
अजिता- मग कस आहे मिलिंद. You said it just in so many words…
मिलिंद- आता आल ना लक्षात how it hurts? माझी comparison तू माझ्या कामाशी कुठेह्ही तुलना न होणाऱ्या workers बरोबर केलीस. मी निदान तुझी तुलना तुझ्या कामाशी similarity असलेल्या maid शी तरी केली.
हे ऐकून अजिता आणि तिचे आई वडील आवक झाले.
आई- मिलिंद हे काय बोलताय…
अजिता- आई एक मिनिट. आज मला बोलू दे. मिलिंद पहिली गोष्ट मी तुझ्या कामाची तुलना कोणत्याही कष्टकरी माणसाशी केली नव्हती. तुझा इगो तुला तास भासवत होता. पण तू माझी तुलना कामवालीशी केलीस? नकळत तुझ्या तोंडून तुझ्या मते माझी काय लायकी आहे, तू मला काय समजतोस हे बाहेर पडलं.
मिलिंद- हे…हे बघ all I meant was घराची काम करणे. तुला maid नाही म्हणालो मी. नीट आठव मी काय म्हणालो ते.
अजिता- हो. Thanks की तू मला स्पष्ट शब्दात कामवाली म्हणाला नाहीस. पण मिलिंद तुझ्या वागण्यातला फरक मला कळत नाहीये अस नाही. तुझ करियर, तुझी प्रगती, तुझ स्टेटस, तुझी power, तुझं यश ह्या सगळ्यात तू स्वतः मध्ये इतका हरवून गेला आहेस की तुला इतर लोक किरकोळ वाटू लागलेत. मी आणि ईशा तर तुझ्या खिचगणतीत पण नसतो. तुझा ड्रायव्हर, मेड, दूधवाला, पेपरवाला ह्यांच्या बरोबर महिन्याला ज्यांच्यावर खर्च करावा लागतो अश्या आम्ही दोन व्यक्ती आहोत तुझ्या दृष्टीने. आमचा महिन्याचा खर्च दिला की तुझी जबाबदारी संपते. आम्हालाही तू त्यांच्यातल्याच समजतोस. मिलिंद एक लक्षात ठेव वृक्ष जितका मोठा होतो ना तितकाच तो वाकतो आणि इतरांना आधार देतो. यश आणि विनम्रता एकत्र असल्या ना तर माणसाला आदर मिळतो. नाहीतर ती व्यक्ती फक्त यशस्वी असते. तिला आदर मिळत नाही.
मिलिंद- आदर मिळत नाही? तू काय बघितल आहेस अजिता? एकदा माझ्या ऑफिसात ये आणि बघ काय आदर मिळतो मला ते. एकदा माझ्या क्लायंटना भेट आणि बघ काय आदर मिळतो मला ते. आणि ही वृक्ष जितका मोठा वगैरे वाक्य ना आपल्या शाळेत निबंधात मार्क्स मिळवून द्यायची. तू मला नको सांगू. प्रोब्लेम हा आहे की तुला बसल्या जागी सगळी सुखं मिळत आहेत ना ती बोचायला लागली आहेत. माझ्या प्रगतीचा आनंद व्हायच्या ऐवजी तू माझ्यावर जळते आहेस. आणि म्हणून काहीतरी करायचं, घरात मला बोलायचं, घरात बेकार वातावरण करायचं जेणेकरून माझा कामावरच फोकस हलेल आणि मी फेल होईन हेच तुला सध्या करायचं आहे.
हे मिलिंद जोरात ओरडून बोलला आणि अजिता आणि तिचे आई वडील हादरले. तिघांनी अविश्वासाने एकमेकांकडे पाहिलं.
अजिता- काय म्हणालास तू मिलिंद? मी जळते तुझ्यावर?
मिलिंद- हो हो तू जळतेस. तुला माझा सक्सेस बघवत नाही. तस नसत तर अशी वागलीच नसतीस तू. म्हणतात ना यशाची किंमत चुकवावी लागते प्रत्येकाला. माझ्या यशाची किंमत तुझी जेलसी आहे. आज मी जो काही आहे तो माझ्या मेहेनत आणि हुशारीच्या जोरावर आहे. त्यात तुझा काहीच रोल नाहीये. उलट आज तू जे सुख अनुभवते आहेस ह्या घरात आरामात राहायचं, हव ते विकत घेता यायचं ते माझ्यामुळे आहे. तरीही माझ्यावरच जळतेस तू.
बाबा- मिलिंद हे जरा जास्त होतंय…
मिलिंद- माझ घर आहे. मला हव ते बोलेन मी. ज्यांना पटत नाही त्यांनी जाव आपापल्या घरी. मी माझ्या घरात माझाच अपमान नाही सहन करू शकत.
हे ऐकून बाबा तडक उठले आणि निघाले. आई पण त्यंच्या बरोबर बाहेर पडली. अजित ने त्यांना थांबवायचा प्रयत्न पण केला नाही. तिला बाबांचा मानी स्वभाव माहित होता. आई बाबा गेल्यावर ती ईशाच्या शेजारी जाऊन पडली. डोळ्यात अश्रू आणि झालेल्या अपमानाचा राग होता!
दुसर्या दिवसापासून मिलिंद आणि अजिता मध्ये संवाद जवळजवळ थांबला. अगदी जुजबी आणि कामापुरत बोलत होते दोघ एखादा शब्द. असेच पंधरा दिवस गेले. आणि एक दिवस मिलिंदची बहिण माधुरी त्यांच्या घरी अचानक राहायला आली. अचानक आल्याने तिला नाही देखील म्हणता आल नाही. माधुरीने एका दिवसात अजिता आणि मिलिंद मध्ये सर्व ठीक नसल्याचं ताडलं. दुसर्या दिवशी मिलिंद ऑफिसला गेल्यावर तिने अजितला सरळ विचारलं. त्यावर अजिताने देखील कोणताही आडपडदा न ठेवता तिची होत असलेली कुचंबणा बोलून दाखवली. त्यावर माधुरी म्हणाली-
माधुरी- वहिनी, तुला काय वाटत? आई बाबा इतके मागे लागलेले असून मी अजूनही लग्न का नाही केलं? तुमच तर लव्ह म्यारेज आहे. माझ लग्न आई बाबा एखाद्या अनोळखी मुलाशी लावून देणार आहेत. पण मी तयार नाहीये. माझ्यासमोर माझ गाण्यातल करियर आहे. उद्या मी फार यशस्वी माणसाशी लग्न केल तर माझ करियर, माझ यश त्याच्या समोर झाकोळल जाईल आणि जर किरकोळ माणसाशी लग्न केल तर आयुष्यभर मला एका माणसाला पोसावं लागेल ज्याची मला अजिबात गरज वाटत नाही. मला यशस्वी पुरुषाची किरकोळ, त्याच्या मूड्स आणि हुकुमाची गुलाम असलेली बायको म्हणून त्याच्या पैशाने केलेले दगिने आणि कपडे घालून मिरवायच नाहीये. मला एका सज्जन आणि समंजस पुरुषाची तो आदर देत असलेली बायको म्हणून सामान्य आयुष्य जगायला आवडेल. पण असा पुरुष खूप दुर्मिळ असतो. म्हणुनच असा दुर्मिळ पुरुष मी स्वतः शोधेन…तो तसा असल्याची खात्री करून मगच लग्नाचा विचार करेन. तोवर मजेत आयुष्य सुरु आहे. जिंगल्स गाते आहे. मैफिली सुरु आहेत गाण्याच्या. माझ युट्युब channel पैसे देत आहे. कशाला हवेत दादा सारखे पुरुष आयुष्यात? मला नाही बनायचं यशस्वी पुरुषाची सहनशील बायको.
अजिता- हम्म…true…
माधुरी- आणि तू पण नको राहू ह्यापुढे यशस्वी पुरुषाची सहनशील बायको. दादाच्या वागण्यात झालेला बदल मलाही जाणवतो आहे. मलाच नाही तर आई बाबांना देखील. वहिनी हे पुढे वाढतच जाणार. तो कदाचित आणखी यशस्वी होत जाईल आणि संसारात तुझी किंमत तितकीच कमी होत जाईल. मला वाटत तू सोड त्याला आणि मस्त एकटीने जग आयुष्य.
अजिता- ते शक्य नाही माधुरी. ईशाची जबाबदारी आहे माझ्यावर. तिला वडिलांची गरज आहे.
माधुरी- ठीक आहे. मी मला जे सुचल ते सांगितलं. You know your options the best.
त्या दिवशीसंध्याकाळी माधुरी निघून गेली. पण ती जे काही बोलली होती ते मात्र अजितच्या मनात रेंगाळत होत. रात्री तिला झोप लागली नाही. ती माधुरी म्हणाली त्याचाच विचार करत होती. तिचे ऑप्शन काय काय आहेत हे आठवत होती. आपण यशस्वी पुरुषाची किरकोळ, त्याच्या मूड्स आणि हुकुमाची गुलाम असलेली सहनशील बायको म्हणून पुढलं आयुष्य जगायचं की इतर काही ऑप्शन बघायचे ह्याचा विचार तिच्या डोक्यात सुरु होता. आज रविवार. पहाटे साधारण साडेपाचला ती उठली. तिने एक चिठ्ठी लिहिली. त्यात तिने लिहील होत “मिलिंद, मला वाटत आपण इथेच थांबूया. मला तुझ्या बरोबर पुढे जाता येणार नाही. ईशाला घेऊन मी बाबांकडे जाते आहे. डिव्होर्स नोटीस पाठवेन लवकरच. मला तुझ्याकडून एकही पैसा नकोय. फक्त डिवोर्स अमिकेबली होऊ दे ईशासाठी ही विनंती. बाय. यशस्वी हो. अजिता…”
हि चिठ्ठी तिने मिलिंदच्या मोबाईल खाली ठेवली आणि आपली bag भरून. ईशाची bag भरून ती ईशाला घेऊन घरातून बाहेर पडली. रिक्षात बसताना घराच्या खिडकीकडे पाहून तिच्या घशात आलेला आवंढा तिने गिळला. डोळ्यातले अश्रू पुसले आणि ती निघाली. पुढे चक्र जोरात फिरली. ती निर्णयावर ठाम असल्याने तिचे आणि मिलिंद =चे आई बाबा तिचं मन वळवू शकले नाही. मिलिंदचा इगो इतका होता कि त्याने मला हे होणार माहित होत कारण तू माझ्यावर जळतेस. ठीक आहे तुझी मर्जी.” असा स्टान्स ठेवला. मुळात तिने काहीच मागणी केली नसल्याने मिलिंद आनंदी होता. ईशाच पझेशन अर्थात अजिताला मिळालं. डिव्होर्स झाला. डिव्होर्स नंतर आता काय ह्या विचारात अजिता असताना तिला S tech ltd ची विवाहित महिलांसाठी second inning career ची जाहिरात दिसली. तिने apply केलं. सगळे राउंड क्लियर करत तिने नोकरी मिळवली. आणि आजचा दिवस….आज तिचं प्रमोशन होऊन ती vice president झाली होती. उत्तम पगार, गाडी आणि स्वतःच घर होत तिचं. इशा चांगल्या शाळेत होती. दोघींचं एक खूप सुंदर जग निर्माण केल होत तिने.
घरी आल्यावर ईशां तयारच होती toms kitchen मध्ये जायला. अजिता फ्रेश झाली, तिने चेंज केल आणि दोघी जेवायला निघाल्या. गाडीत इशा म्हणाली-
इशा- मी dad ला तुझ्या प्रमोशनच सांगितल.
अजिता- ओके…
ईशां- त्याने तुला congrats दिले आहेत.
अजिता- ओके…
ईशां- आपण dad बरोबर कधीच नाही का राहणार?
अजिता- नाही.
ईशां- मग तू नवीन dad नाही का आणू शकत माझ्यासाठी?
हे ऐकून अजिताने ईशाकडे चमकून पाहिलं आणि तिला आजचा ऑफिस मधला प्रसंग आठवला. ऑफिस मधलं फंक्शन झाल्यावर अजिता तिच्या कामात गर्क असताना समीरने तिला त्याच्या केबिन मध्ये बोलावलं होत. तिथे गेल्यावर त्याने तिच्या हातात esops ची फाईल ठेवली आणि म्हणाला-
समीर- अजिता हे माझ्या कंपनीचे शेयर्स. इम्प्लोयी स्टोक ऑप्शन मध्ये तुला देतोय. तू आता ह्या कंपनीच्या सिनियर म्यानेजमेंट चा भाग झाली आहेस. सो हे तुझ्यासाठी.
अजिता- thanks समीर.
अजिता जाऊ लागली.
समीर- एक मिनिट अजिता.
अजिता वळली आणि म्हणाली-
अजिता- yes समीर…
समीर- अजिता, मी इंजिनियर झाल्यावर mba केल आणि नोकरीला लागलो. पण माझ मन रमल नाही. म्हणून ही कंपनी सुरु केली. ती ग्रो करण्यात इतका हरवून गेलो की आज वय छत्तीस आहे पण लग्न करायचं राहून गेल. आज मी यशस्वी आहे. इतक प्रचंड बिझनेस आहे, पैसे आहेत आणि सगळ आहे. पण माझे आई बाबा म्हणतात ते मला आता पटतंय. माझ्या आयुष्यात माझ्या जवळच्या माणसाची कमी आहे. अशी एक स्त्री जी मला समजून घेईल, माझ्यावर प्रेम करेल. माझा आंधार बनेल. अजिता मला एका matured, समजूतदार आणि हुशार मुलीची गरज आहे माझ्या आयुष्यात आणि ती मुलगी मी तुझ्यात बघतो. तुझ्या past बद्दल, ईशां बद्दल मला सगळी माहिती आहे. आणि मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू विचार कर ह्यावर आणि feel free to say no. ह्याचा आपल्या कामावर परिणाम होणार नाही. मी आधी व्यावसायिक आहे आणि मग इतर. मी काम आणि personal life मिक्स करत नाही. But do think about it.
अजिता त्याच्याकडे बघत हे सर्व ऐकत होती. त्याच बोलून झाल्यावर ती शांतपणे म्हणाली-
अजिता- Yes I will…and thanks…for the esops…
इशा आणि अजिता हॉटेल मध्ये आल्या. मस्त जेवल्या. डेझर्ट खाल्ल. तिथे ईशाने परत विचारलं-
ईशां- तू नवीन dad नाही का आणू शकत माझ्यासाठी?
अजिता काही क्षण विचार करून म्हणाली-
अजिता- माहित नाही बेटा…
इथे इशा मस्त आईस्क्रीम खात होती आणि अजिता समीरच्या ऑफरचा विचार करत होती. परत एकदां यशस्वी पुरुषाची बायको म्हणून जगायचं का हा प्रश्न तिच्या समोर होता. समीर मुलगा चांगलाच होता. दोन वर्ष ती त्याला बघत होती. पण…थोडा वेळ विचार करून तिने समीरला रिप्लाय केला “समीर, मी तुझ्या ऑफरचा विचार केला. माझ्या आधीच्या अनुभवावरून मी ideally नाही म्हणायला हवं. मला यशस्वी पुरुषाची बायको बनून जगण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. पण तू तसा good boy आहेस. सो मला थोडा वेळ दे उत्तर द्यायला. पण तोवर आपण चांगले मित्र होऊ. एकमेकांना समजून घेऊ. पुढे काय होत ते पुढे पाहू. तुझ्यात मला matured आणि माझ्या individuality ला respect देणारा नवरा असे traits दिसले तर कदाचित काहीतरी होईलही. पण मला वेळ लागेल. I need time.”
आणि दोन मिनिटात समीरचा रिप्लाय आला. “take your time. I understand and I can wait. आणि हो ह्याचा परिणाम कामावर होऊ द्यायचा नाहीये. 😊”
आता अजिता आणि इशा घरी निघाल्या होत्या. अजिताच्या मनात समीरच्या समंजस रिप्लाय ने उगाच एक अंकुर फुलवला होता. आपण यशस्वी पुरुषाची किरकोळ, त्याच्या मूड्स आणि हुकुमाची गुलाम असलेली सहनशील बायको बनून राहायचं नाकारून आज स्वतः एक यशस्वी स्त्री असलेली अजिता ह्यावेळी मात्र अतिशय सांभाळून पुढे पावलं टाकणार होती. पुढे काय होणार हे काळच ठरवणार होता. पण आज एका यशस्वी आईची मुलगी असलेली इशा गाडीच्या मागच्या सीटवर शांतपणे झोपली होती आणि अजितासाठी ते सर्वात मोठ यश होत. गाडी निर्जन रस्त्यावर जात होती. रस्त्यात आणि आयुष्यातही पुढे कोणत वळण आहे माहित नव्हत. पण अजिता आज सक्षम होती. आज ती यशस्वी पुरुषाची बायको नाही तर स्वतः एक यशस्वी स्त्री आणि आई होती.
समाप्त
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023