ये उन दिनो की बात हैं….
थोडी थंडी पडायला लागलीय…. मला मुंबईची थंडी आवडते…. खरं तर ती थंडी नसते… नुसता सकाळ संध्याकाळी हवेत गारवा असतो इतकंच…. बाकी थंडी अनुभवायची तर दिल्ली सारख्या ठिकाणी राहायला हवं… मग कळते थंडी म्हणजे काय…. मी काही वर्षे दिल्ली मध्ये वास्तव केले…. तेव्हा थंडी हा एक स्वतंत्र ऋतू असतो हे आयुष्यात प्रथम अनुभवलं….. एक तर मुबंई वरून दिल्ली ला गेल्यामुळे माणशी एकच स्वेटर आमच्या कडे होता तोही अगदी साधा हलका फुलका…. थंडी पडायला लागल्यावर आम्हाला कळलं की हया स्वेटर चे काही इथे निभाव लागणार नाही… मग आयुष्यात पहिल्यांदा स्वेटर खरेदी केली…. घरी घालायला वेगळे…. बाहेर जायला वेगळे… या शिवाय branded thermal wear, आता पर्यंत हातमोजे फक्त छायागीत मधील हिरो हिरोईन ला बर्फात खेळतानाच घातलेले पहिले होते…….. त्यांचीही या थंडीत फार जरूर असते हे कळले…. आपल्या बॉम्बे dying च्या double bed च्या चादरीवर झोपलो की नुसतं गार गार वाटायचं…. मग छान जाडजूड रजया खास बिछाना वर पांघरायला आणि अंगावर पांघरायला विकत घेतल्या…… मुंबई मध्ये कधी काळी घेतलेला स्वेटर वर्षा न वर्ष चाले…… इथे कितीही स्वेटर घ्या कमीच पडे….. इथला महिला वर्ग फार आवडीने स्वेटर खरेदी करतात…. साडी वर जसा मॅचींग blouse असतो तसा प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग स्वेटर ही खरेदी केला जातो…. पुरुष आपले मळखाऊ रंगाच्या स्वेटर वर समाधानी असतात अगदी दिवसही 12/13 degree temperachar असते…. रात्री तर नुसतं कुडकुडायला होत….. मी तर किचन मध्ये पण गिझर बसवून घेतला होता….. आता बोला रात्री हिटर सुरु केल्या शिवाय झोप येणं मुश्किल…..
हया थंडीत खाण्या पिण्या ची मात्र चंगळ असते…. सरसो का साग, आलू पराठे, छोले पूरी, momos, गरमा गरम chinese सूप, वेग वेगळ्या चिक्या, drifruit ची पंजिरी….गप्पा मारत मारत चहा चे किती cup रिचवले जायचे काही विचारू नका….. दुपारी उन्हात बसून गप्पा ची मैफिल जमायची….. जुन्या दिल्लीत ऐन थंडीत करीम ‘s भेजा करी, मटण करी वर ताव मारणे ही आनंदाची पर्वणी असे….. दिल्लीत असताना आम्ही ह्या दिवसात भरपूर day ट्रिप्स करायचो…. दिवसभर कितीही फिरा अजिबात थकवा जाणवायचं नाही……. कितीतरी वेळा आम्ही घरून जेवण बनवून न्यायचो आणि मस्त family पिकनिक करायचा…. मजा यायची……. 31 st च्या पार्टीत ही जागोजागी ठेवलेल्या शेकोटी वर हात शेकत… स्टार्टर्स खाण्याची मजा औरच होती….
नाही म्हणायला या थंडीचा थोडा फार त्रास व्हायचा पण हळू हळू मजा ही यायची……. तर अशी ही उन सर्दी के दिनो की बात….
- चाळिशीतली बर्फी - February 25, 2023
- अंगत पंगत - December 16, 2022
- ये उन दिनो की बात हैं…. - November 4, 2022