चाळिशीतली बर्फी
मी साधारण कॉलेज मध्ये असताना एक चित्रपट पाहिला होता , सवत माझी लाडकी . एक मध्यम वयीन डॉक्टर त्याच्या तरुण सहकारी डॉक्टर च्य प्रेमात पडतो. अणि मग त्याच्या बायकोला ते कळल्यावर ती नवऱ्याला तिच्याशी लग्न करायची परवानगी देते.पण एक अट घालते की दोघी सोबतच एका घरात राहतील. अणि मग त्या सवती कडून घरातील सर्व कामे करून घेते….स्वतः आराम करते….मग पुढे थोडी मजा मस्ती ट्विस्ट अँड turns येत गोष्टीचा छान शेवट होतो.तर यात त्या डॉक्टर ला त्याचा एक मित्र सांगत असतो की मला आजकाल एक मैत्रीण मिळाली आहे…आहे आपल्याच वयाची म्हंजे चाळिशीत पण अगदीं बर्फी सारखी आहे…. छान दिसते वगैरे वगैरे…. मला तेंव्हा कळलं नाही हा काय प्रकार आहे…. चाळीशीतली बर्फी 🤔🤔.,.मी teen ager होते आणि आजू बाजूच्या चाळिशीत असलेल्या बायका म्हणजे माझ्या आई, काकी, मावश्या इत्यादी. त्या अगदी typical राहणीमान… चापून चोपून नेसलेली साडी, कपाळवर टिकली, फारतर सणावाराला गजरा मालणे…..अणि गेला बाजार लग्न कार्याला थोडीशी लिपस्टिक……. नात्यातील एखादीच स्त्री स्लीवलेस blouse घाली आणि दररोज लिपस्टिक लावत असे…. बाकी सगळया अश्याच साधं राहत…. त्यामुळे चाळिशीत कोणी खूप छान दिसते, या वयातही attractive दिसते हे सारं कळण्या पलीकडे होत…. आता मीच चाळिशी ओलांडली आहे हो…..हे मी एक स्त्री असूनही ओपनली कबूल करतेय…… कारण माझी मुलगी आता २० वर्षाची आहे आणि माझा बाल विवाह झाला नाही आहे😜…. असो…..
तर आता जेव्हां मी माझ्या लहापणापासून च्या मैत्रीणीना भेटते किंवा माझ्या च वयाच्या आसपास च्या बहिणींना भेटते तेंव्हा जाणवते यार किती भरभर वर्षे गेली ही….. छोटे फ्रिल वाले फ्रॉक घालून, केसाला चप्प तेल लावून एक गजरा पिनेत अडकवायच्या , वाढदिवसाचे केक कापण्याच्या वया पासून हळु हळु वयात येण्याचं प्रवास एकत्र झालाय….मग फर्स्ट क्रश पासून कोणी तरी आवडण्या पासून ते कुणी प्रपोज करण्याची secrets share केली आहेत….. मग लग्न ठरल्या पासून ते मुलांची शाळा हाही प्रवास एकत्र झालाय……
पूर्वी साधारण तिशी च्या आसपास मुलं,नवरे, सासू हे गप्पा चे विषय असायचे….. आता हळूहळू त्या तून बाहेर येतोय…. मुलं independent झालीत…. स्वतः साठी वेळ मिळू लागलाय….. लव्ह बर्डस पासून ते आता बेस्ट buddies च्य phase मध्ये नवरा बायकोचं नात आलंय……… घराच्या जबाबदाऱ्या आहेत पण आता त्याचं ओझ वाटत नाहि सार अंगवळणी पडलंय…… पोरकट गप्पा पासून…. थोडी mature गप्पा होतात,योगा,exercise, manupause, मुलांचं करिअर, त्यांनी हळु हळु आपल्या पासून करिअर करता आपल्या पासून लांब जाण्याची मानसिक तयारी होतेय….. आईं वडिलांचं म्हातारपण सांभाळायची जबाबदरी नकळत आपण स्वीकारतो… आता अगदी वय झाल नसलं तरी हळु हळू खुणा दिसू लागल्या आहेत…. थोडस वाढलेलं वजन, हलके दुखणारे गुढगे, केसातील रुपेरी बट.,..
मला वाटतं ही चाळिशी एक छान phase आहे…. यात एक ठेहराव आहे…. नवरा बायकोच्या नात्यातला ओल्ड वाईन चा गोडवा आहे…. केसातील रुपेरी बटे मध्ये अनुभवांनी आलेलं शहाणपण आहे….मग खर तर आपण ही चाळिशी enjoy करायला हवी….. चित्रपटात सांगितल्या प्रमाणे बर्फी बनायला काय हरकत आहे…. छान व्यायाम करा, fit रहा, तरुण वयात न करायला मिळालेली फॅशन करा, हौस मौज करा, मित्र मैत्रिणी ना भेटा, स्वतः च असं आयुष्य जगा, एखाद्या दिवशी स्वतः च्या😜नवऱ्या सोबत छान तयार होऊन date वर जा…… एकत्र निवांत पणे घालवलेले क्षण नात्याला रिफ्रेश करतात……..
तर माझ्या चाळिशीत असलेल्या मैत्रिणींनो एक छान आयुष्य जगा ……. सुंदर तर तुम्ही आहातच पण…. ते सौंदर्य जपा… स्वतः वर प्रेम करा…. एखाद्या गोड बर्फीच्या तुकड्या सारखा गोडवा तुम्ही स्वतः मध्ये ठेवा.,…. अणि आनंदाने जगा….
अनुजा पाठारे
- चाळिशीतली बर्फी - February 25, 2023
- अंगत पंगत - December 16, 2022
- ये उन दिनो की बात हैं…. - November 4, 2022