आगळी वेगळी वधूपरीक्षा- भाग ७

अमेय चे आई-बाबा काही दिवसांसाठी गावाला गेले होते…घरा मध्ये फक्त तो आणि त्याची आजी, म्हणजेच स्नेहाताईंची आई….अनायसे सुट्टी होती…विनी आणि अमेय नि डॉक्टर लेल्यांकडे जायचे ठरवले..त्यांचं क्लिनिक उघडण्याची वेळ सकाळी साधारण ९ ची…..मग विनी आणि तिची आई अमेय ला म्हणाली कि आमच्याघराजवळच त्यांचं क्लिनिक आहे, तर आधी तू नाश्त्याला आमच्या कडे ये आणि मग दोघे जा…विनी ला भेटायचा हा चान्स कोण सोडेल हो….अमेय नि जरा संकोचीपणाचे नाटक केले आणि दोनदा आग्रह केल्यावर लगेच तयार झाला…सकाळी साडे ८  वाजता विनी च्या घरी स्वारी हजर….गडद निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि लाईट ब्लू जीन्स, डोळ्यावर मस्त रे बॅन चा गॉगल असा एक्दम स्टाईल मध्ये अमेय त्याच्या गाडीवरून विनी च्या घरी आला… विनी पुढे बागेतच होती …… .तिला पाहून तो हरवूनच गेला

प्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या या कवितेसारखीच अमेय ची अवस्था झाली…

मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो !

तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो!

असेच रोज नाहुनी लपेट उन्ह कोवळे,

असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे;

तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो!

अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले,

असेच सांग लाजुनी कळ्यास गुज आपुले;

तुझ्या कळ्या, तुझी फुले, इथे टिपून काढतो !

तसा राहिला न आता उदास एकटेपणा,

तुझीच रूपपल्लवी जिथे तिथे करी खुणा;

पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो!

………विनी ने हिरव्या कच्च रंगाचा खणाच्या कापडाचा सुंदर ड्रेस घातला होता…नुकतीच न्हाहून आल्यामुळे ओले केस मोकळे सोडले होते …खाली हिरवळीत बसून ती प्राजक्ताची फुले वेचत होती…सकाळचे कोवळे ऊन तिच्या गोर्यापान चेहेऱ्यावर आल्यामुळे, अजूनच सुंदर ती दिसत होती…वाऱ्यामुळे डोळ्यावर येणारे केस ती अलगद बाजूला घेत होती….ओंजळीत फुलं घेऊन ती उठली तर तिच्याकडे बघत असलेला अमेय तिला दिसला….तिची त्याच्याकडे नजर जाता क्षणी त्याने नजर फिरवली आणि गालातल्या गालात हसत गेट मधून आत आला…तोही तितकाच छान दिसत होता…त्याला बघून लाजून ती आत अली…बाजूलाच टीपॉय वर ठेवलेल्या पेपर वर तिनी ती फुले ठेवली आणि घाई घाईनी त्याला, “आत ये ना” म्हणाली….तो सोफ्यावर बसला……हळूच तिला म्हणाला….काल व्हॉट्सअप मेसेजेस बघितले नाहीस का….मी कितीवेळ तुझ्या रिप्लाय ची वाट बघत होतो…विनि च्या आईने हे ऐकलं…आणि म्हणाली मीच तिला रात्री १० नंतर फोन वापरायला बंदी केलीये….उगीचच आपलं फोन शी खेळत बसायचं, घरातल्यांशी बोलायचं सोडून…आई काय ग तू पण….विनिच्या आई हसल्या…विनि चे बाबा आत होते…विनी नि त्यांना हाक मारली….ते बाहेर आले आणि त्यांनी त्याचे हसून स्वागत केले…त्याचे आई-बाबा कधी येणार याची चौकशी केली..त्याच्या आणि तिच्या बाबांच्या थोड्याफार गप्पा झाल्या….तेवढ्यात विनी च्या आईने दोघांना आत नाश्त्यासाठी बोलावले…दोघेही आत खुर्च्यांवर जाऊन बसले….विनी ने दोघांच्या पोह्याच्या प्लेट्स त्यांना दिल्या…फोडणीच्या पोह्यांवर ताजा ओला खोवलेला नारळ, आणि त्यावर बारीक शेव आणि कोथिंबीर घातली होती…विनी च्या आईने लगेच कौतुकाने अमेयला सांगितलं कि…पोहे विनी ने केलेत बरंका….पोहे अर्थातच छान झाले होते…पण अमेय च्या देहबोलीवरून वाटत होते कि त्याला अजून काहीतरी हवे होते…मधेच तो खाता खाता थांबला…विनी चा जीव वर खाली व्हायला लागला…त्यांच्या कडे खडे मिठाचा वापर होत असल्यामुळे, तिला वाटलं मिठाचा खडा चुकून लागला कि काय, म्हणून तिने त्याला पटकन पाणी प्यायला दिले….जरा बिचकतच विचारलं…बरे झालेत ना पोहे…आणि बाबांकडे पण पाहिलं…बाबा तर व्यवस्थित खात होते…ती बुचकळ्यात पडली….मग अमेयनेच थोडे संकोचानी सांगितले….कि त्याला पोहे उपम्यावर साखर पेरून खायला आवडते….विनी च्या आईने तत्परतेने साखरेचा डबा त्याच्यासमोर ठेवला….आणि म्हणाली, अगं बाई…हो का….साखर पेरून छान लागतात का पोहे….घे घे….आता त्याने खऱ्या चवीने पोहे खाल्ले,,,न संकोचता परत मागून घेतले ….विनी पण सुखावली…..आज तिच्या पाक कौशल्याची पहिली परीक्षा ती पास झाली होती……तिने सुद्धा मनात, त्याला वरून साखर घेतलेली आवडते याची नोंद करून घेतली….पोहे खाल्ल्यावर एक फक्कड चहा तर बनता है बॉस…सगळ्यांनी चहा घेतला…आणि दोघे डॉक्टर कडे जायला निघाले…अमेय नि आई-बाबांना नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला….विनी, आलेच मी म्हणत पटकन आतून केस बांधून बाहेर आली…..गाडीवर बसायच्या आधी दोघांची नजरानजर झाली…आणि ती सुंदर दिसत असल्याची, जणू पावतीच तिला त्याच्या मिश्किल डोळ्यांमध्ये मिळाली….तिने त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला…दोघेही आनंदात डॉक्टरांकडे गेले…तो तिला म्हणाला उगीच केस बान्धलेस…..तिने लाजून हळूच केसाचा क्लचर काढला….त्यानी ते त्याच्या गाडीच्या आरशातून पाहिलं आणि त्याला हसू आलं…

डॉक्टर लेले त्यांच्या केबिन मध्ये होत्या…त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांच बोलणं झाल्यावर त्यांनी या दोघांना आत बोलावलं…त्यांच्या केबिन मध्ये त्यांच्या खुर्चीच्या मागच्या बाजूला धन्वंतरीची अतिशय सुरेख संगमरवरी मूर्ती एका काचेच्या पेटीत ठेवली होती….टेबल वर चांदीचं तांब्या भांडं ठेवलेलं होता…उदबत्तीचा सुगंध दरवळला होता…डॉ. लेले साधारण ६० वर्षांच्या असतील, पण चेहऱ्यावर तेज…सुंदर सिल्क ची साडी नेसलेली…अमेय कडे बघून म्हणाल्या…हि अगदी एवढीशी होती तेव्हापासून आमच्याकडे येतीये…तिला योगा ची आवड आहे ना…माझा मुलगा डॉक्टर अय्यंगारांकडे योगासनं शिकला आहे…हि त्याचीच विद्यार्थिनी…तोही डॉक्टर आहे…तुमचं अभिनंदन…आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा …बोला….काय विचारायचंय….विनी म्हणाली आई म्हणत होती कि लग्ना आधी काही गोष्टींविषयी माहिती करून घे म्हणून ….म्हंटलं अमेय ला सुद्धा घेऊन यावं, म्हणून भेटायला आले…हो..आई म्हणाली मला….आणि त्यांनी पुढे बोलायला सुरवात केली….विनी तू साधारण २३-२४ वर्षाची आहेस आणि अमेय????….मी २७….म्हणजे तुमची तिशी जवळ आली आहे….आजकालची जीवन शैली बघता..प्रत्येकानी आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे…तुमच्या कामामुळे…लाइफस्टाइल मुळे…नकळतपणे तुमच्या मनावर आणि शरीरावर ताण येत असतो….चुकीची आहार पद्धती, वेळीअवेळी झोप या सगळ्यांमुळे तुम्हालाच याचा वाढत्या वयानुसार त्रास सहन करावा लागतो….स्त्री किंवा पत्नी हि तुमच्या आयुष्यात फारच महत्वाची भूमिका बजावत असते…वाढत्या वयानुसार तिच्या शरीरात बरेच बदल घडत असतात…ते तुम्हा पुरुषांनी जाणून घेणे फार महत्वाचे आहेत…तुझी बायको होऊन ती तुझ्या घरी राहायला येणार…म्हणजे ती फक्त शरीरानी तिथे येणार नसून, मनानी ती तुमच्याकडे आणि माहेरी अशी असणारे…त्यामुळे एका दिवसात ती तुमच्याघरात तिथल्या वातावरणाप्रमाणे रुळणार नाही…उदाहरण द्यायचं झाला तर आपण जेव्हा रोपवाटिकेमधून एखादं झाड आणतो तेव्हा ते झाड ज्या मातीत वाढलेलं आहे, रुजलेलं आहे, त्या मातीसकट ते घरी आणतो…आणि तसाच नव्या जागेत लावतो…तसंच मुलीसुद्धा त्यांच्या आधीच्या आयुष्यातील गोष्टी आठवणी स्वरूपात आपल्या मनामध्ये घेऊन येतात…नव्या वातावरणात रुजताना त्यांच्या मनामध्ये अनेक मानसिक द्वंद्वव होत असतात…आणि त्यांना समजून घेणारे म्हणजे तुम्ही असता, सर्वात जवळचे…त्यामुळे नव्याने वाढत चाललेली वेल जशी एका भक्कम झाडाचा आधार शोधत असते तसा भक्कम आधार तुम्ही होणं अपेक्षित आहे…..या दरम्यान बरेच हॉर्मोनल चेंजेस होत असतात…मूड स्विन्ग्स होत असतात….ते तुम्ही दोघांनीही समजून घ्यायला हवेत…आयुर्वेदा मध्ये सांगितल्या प्रमाणे…स्त्रीवर वंश निर्मितीची फार महत्वाची जबादारी आहे…आणि ती जर वेळेत, म्हणजेच तिच्या आणि तुमच्या योग्य वयात झाली तर पुढची पिढी अतिशय चांगली निपजते..आणि त्यासाठी आत्तापासूनच चांगली तयारी करावी लागते…म्हणजेच हे सर्व तुमच्या आरोग्याशी निगडित आहे…मूल केव्हा जन्माला घालायचं हा जरी तुमचा वैय्यक्तिक प्रश्न असला तरी ते योग्य वेळेत जन्माला येणं हि तितकंच महत्वाचं आहे…तुमच्या आणि तुमच्या घरच्यांच्या दृष्टीनं…म्हणजेच तुमचे आई-वडील सुद्धा तुमच्या मुलांना सांभाळायला सक्षम असले पाहिजेत…आता तुम्ही म्हणाल…अजून आमच्या लग्नाला पत्ता नाही….आणि तुम्ही आत्ताच का हे आम्हाला सांगताय….तर लग्नानंतर काही वर्षांनी का होईना हि पुढची स्टेज असणारच आहे…आणि नवविवाहित मुलांना या वर वर साध्या  दिसणाऱ्या, गंभीर गोष्टी लक्षात येत नाहीत…म्हणूनच आम्ही कॉउंसेलिंग करतो…..तर या पुढील जबाबदाऱ्यांसाठी तुम्ही मनानी आणि शरीराने तयार असले पाहिजे…आणि त्यासाठीच पंचकर्म आणि यासारखे अनेक पर्याय आपल्याकडे आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त होऊ शकतं…आजकालच्या मॉडर्न भाषेत याला डिटॉक्सिफिकेशन असं म्हणतात…….बऱ्याच वेळ बोलणं झाल्यावर दोघेजण डॉक्टरांचा निरोप घेऊन समाधानाने निघाले….

गाडीवरून जाताना दोघांनाही डॉक्टरांचं बोलणं आठवत होत….आणि जबाबदारीची जाणीव पण होत होती…दोघांनी या विषयावर चर्चा करून त्यासंबंधित योग्य निर्णय घ्यायचं ठरवलं आणि अमेय विनी ला घरी सोडून त्याच्या घराकडे रवाना झाला

क्रमशः

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!