वारसा (भाग ३)
आधीच्या भागाची लिंक- वारसा (भाग २)
तो आवाज ऐकून सर्वांनी दाराकडे पाहिलं. तिथे तेजस उभा होता. त्याला तिथे पाहून अविनाश आणि राधाला आश्चर्य वाटलं.
अविनाश- तेजस तू? अरे तुझी फ्लाईट तर…
तेजस- ते नंतर बोलू. पण बाबा आधी तुम्ही हे जे करताय ते थांबवा.
अविनाश- अरे पण..
तेजस- बाबा प्लीज हे उद्या करा. माझी फ्लाईट डीले झाली आहे. उद्या पहाटे आहे. प्लीज…
अविनाशला काय कराव सुचत नव्हत. त्यांनी राधाकडे पाहिलं. राधा मान हलवून हो म्हणत होती. अविनाश मांजरेकर आणि त्या बायरला म्हणाले-
अविनाश- मांजरेकर साहेब, डागा साहेब…आपण उद्या करुया हा व्यवहार. तेजस म्हणतोय तर आज राहू द्या.
हे ऐकून हातात आलेले पैसे चोवीस तासांनी लांब जात असलेले पाहून चिडलेला मांजरेकर म्हणाला-
मांजरेकर- अविनाश राव हे बरोबर नाही. तुमच्यासाठी म्हणून मी डागा साहेबांना राजी केल तुमचा लहानसा बिझनेस घ्यायला. ते कितीतरी मोठे उद्योगपती आहेत. पण माझ्या शब्दाखातर तुम्हाला मदत करायला म्हणून तुमचा बिझनेस इतकी मोठी किंमत देऊन विकत घ्यायला तयार झाले. आणि तुम्ही हे काय म्हणताय? मुलगा आज आहे. उद्या निघून जाईल. पण अशी संधी परत नाही येणार. डागा साहेबांना उद्या सिंगापूरला जायचं आहे. काय डागा शेठ?
डागा- ह…हो…म्हणून तर आज सौदा करायला आलोय. सही तर करायची आहे अविनाश शेठ. करून टाका.
मांजरेकर- तेच तर. एक सही करायला कितीसा वेळ लागतोय.
अविनाश ता कन्फ्युज उभा होता. एकदा तेजस कडे आणि एकदा त्या कागदांकडे बघत होता. मांजरेकर घाईत होता.
मांजरेकर- अविनाश भाऊ अहो इतक्या वेळात तर मुलगी बघून होते. तुम्ही फाईल कडे फक्त बघणार की सही पण करणार?
अविनाश- हो…म्हणजे त्यासाठीच आपण भेटलोय. पण तेजस म्हणतोय तर…
आता मात्र मांजरेकर वैतागला.
मांजरेकर- ओ अविनाश भाऊ…त्याला काय काळात आपल्या धंद्यातल? तो सांगतो आणि तुम्ही ऐकता? अहो बापाला आजारी सोडून जो मुलगा परदेशात मजा मारायला जातो त्याच त्तुम्ही का ऐकता? हा उद्या जाईल. मग धंदा कोण सांभाळणार तुमचा? डॉक्टरनी वर्षभर आराम करायला सांगितल आहे ना? मग धंदा काय असाच सोडणार? आता मिळते आहे ती किंमत घेऊन मोकळे व्हा. दोन महिन्यांनी फुकट दिला तरी कोणी घेणार नाही.
अविनाश- अहो पण..
मांजरेकर- पण बीण बाजूला ठेवा. मी रिकामा नाहीये ना? इतकी मेहेनत केली आहे तर ती एका फालतू कारणाने पुढे घालवू नका. चला सही करा आणि मोकळे करा आम्हाला.
अविनाश तसाच कन्फ्युज्ड उभा होता. तेजस हे सर्व ऐकून प्रचंड आश्चर्य आणि रागाने त्यांच्याकडे आणि राधाकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात पाणी होत. इथे मांजरेकर इरेला पेटला होता. त्याने पुढे होत अविनाशचा हात धरून त्यांना ओढत फोफ्यावर बसवलं आणि फाईल त्यांच्या मांडीवर ठेऊन म्हणाला-
मांजरेकर- अविनाश शेठ करून टाका सही.
अस म्हणून तो अविनाश चा पेन धरलेला हात फाईल जवळ नेऊ लागला. अविनाश अजूनही दुहेरी मनस्थितीत होता. मांजरेकर त्याचा हात खेचत सही करा सांगत होता. इतक्यात मांजरेकरच्या हातावर तेजसच्या हाताची घट्ट पकड पडली. मांजरेकर ओढला गेला. तो त्याच्याही नकळत उभा राहिला आणि तो भानावर यायच्या आधीच त्याच्या डाव्या गालावर तेजसने मारलेली थोबाडीत झगझगली. तो तिरमिरला. तेजसचा हा अवतार पाहून डागा तिथून हळूच पळाला.
तेजस- बाबा उद्या सही करू सांगत आहेत ना? मग जबरदस्ती काय करतोस?
मांजरेकर- ए तू मला ओळखत नाही. ओ अविनाश शेठ आता तुमचा मुलगा बाद समजा. नाय ह्याचे तुकडे करून…
त्याच वाक्य पूर्ण व्हायच्या आधी अविनाशने त्याच्या कानाखाली काढलेला आवाज ऐकून तो भेलकांडला.
अविनाश- ए मांजरेकर तेजस माझा मुलगा आहे. ह्या अविनाश इनामदारचा. त्याला बाद करायचा नाद नाय करायचा. औकादीत राहायचं. नायतर तडीपार करून टाकेन तुला. माझ्या पोराकडे वाकडी नजर जरी केलीस ना तर दोन्ही डोळे काढून विकायला ठेवेन फार्मवर. चल. निघ आता.
ह्या बाप आणि पोराच्या अचानक हल्ल्याने गांगरलेला मांजरेकर हळूच कल्टी झाला. पण मनात अपमानाची आग घेऊन. काहीही करून अविनाश चा बिझनेस गिळायचाच हे ठरवून तो निघून गेला. तो गेल्यावर तेजस आणि अविनाश एकमेकांना बघत होते. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. दोघांनी पुढे होत एकमेकांना मिठी मारली. हे बघणाऱ्या राधाने पदराने डोळे पुसले.
राधा- बसा तुम्ही. मी थंड सरबत आणते. डोकी थंड होतील म्हणजे.
तेजस- थांब आई. मला बोलायचं आहे.
राधा थांबली. तेजस ने अविनाशला आपल्या समोर सोफ्यावर बसवलं आणि त्याच्या डोळ्यात बघू लागला. अविनाश नजर चोरत होता.
तेजस- बाबा तुम्ही माझ्याशी खोट बोललात? आणि आई तू पण त्यांना सामील?
अविनाश- नाही रे बाळा. मी खोट नाही बोललो तुझ्याशी. फक्त पूर्ण सत्य नाही सांगितल तुला.
तेजस- ते मला जाणवत होत बाबा. तुम्ही अस्वस्थ होतात. नॉर्मल वागत नव्हतात. मी मुंबईला जायला निघालो ना तेव्हा गाडीतून तुमच्याकडे पाहिलं. तेव्हा तुमचा चेहरा मला खूप अगतिक दिसला बाबा. अविनाश इनामदार आणि अगतिक? स्वतःच्या हिमतीवर इतका मोठा बिझनेस उभारणारे माझे बाबा..माझा आदर्श…माझा स्वाभिमान अगतिक कसा असू शकतो बाबा? तो चेहरा नजरेसमोर घेऊनच मी मुंबई एअर पोर्टला पोहोचलो. गाडीतच बसून होतो. पाउल बाहेर निघत नव्हत. काहीतरी चुकतय अस वाटत होतं. मग निर्णय घेतला आणि तसाच परत आलो आणि हे मांजरेकर प्रकरण दिसलं. माझा निर्णय योग्यच ठरला तर.
हे ऐकून अविनास आणि राधा चकित झाले.
राधा- म्हणजे तुझी फ्लाईट डीले…
तेजस- नाही. ती on time गेली.
अविनाश- म्हणजे रे?
तेजस- म्हणजे मी तिकीट कॅन्सल केल माझं पुण्याला परत येताना. मला तुम्हाला अश्या अवस्थेत सोडून जाण शक्य नव्हत बाबा. मला नक्की काय प्रोब्लेम आहे ते जाणून घ्यायचं होत. आणि ते आता मला कळलय.
अविनाश- तू आमची काळजी नको करू तेजस. अरे हा काय वेडेपणा केलास तू? का परत आलास? इथे सगळ नीट आहे बाळा.
तेजस- पाहिलं मी काय नीट आहे ते. आपल्या स्व:ताच्या हातानी उभा केलेला व्यवसाय तुम्ही विकायला निघाला आहात? आणि का तर डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे म्हणून? मला एक सांगा बाबा. हा व्यवसाय असा विकावा लागला ही गोष्ट तुम्हाला आयुष्यभर सलत राहील की नाही? त्याचा त्रास, गिल्ट तुमच्या हृदयाला त्रास देईल की नाही सांगा.
अविनाश मान खाली घालून होता. त्याला हुंदका आला. तेजस ने पुढे होऊन त्याचे हात हातात घेतले आणि तेजस म्हणाला-
तेजस- बाबा…एक वर्षाचा प्रश्न आहे ना? एक वर्ष मी सांभाळतो आपला बिझनेस. तुम्ही मला गाईड करा. तुम्ही राम आणि मी भरत. तुमचं राज्य एक वर्ष सांभाळतो.
राधा- अरे तेजस पण तुझं एमएस?
तेजस- ते एक वर्षाने करतो. त्याला काय? ते एक वर्षानंतर होऊ शकत. पण आई, आपला व्यवसाय एक वर्ष नाही टिकणार बाबा किंवा मी सांभाळल्या शिवाय.
अविनाश- अरे पण बाळा…माझ्या माझं, तुझ्या आजोबांचं स्वप्न एका वर्षाने पुढे जाईल रे…
तेजस- बाबा मला एक कळत. स्वप्न सत्यात आणताना आजच जे सत्य आहे ते संपवू नये. मी सांगितलेला मार्ग सत्य संपू देणार नाही आणि स्वप्न पण सत्यात आणेल. फक्त एक वर्ष उशिराने.
हे सगळ ऐकून अविनाश राव आणि राधाला भरून आल. त्यांनी तेजसला जवळ घेतला.
अविनाश- राधा, आपला तेजस मोठा झाला बघ. आणि तू मात्र त्याला बाळा बाळा म्हणतेस अजूनही.
राधा- काहीही. आताच बोलताना चार वेळा त्याला बाळा कोण म्हणाल विचारा त्यालाच.
अविनाश – काय रे तेजस मी तुला बाळा म्हणालो का?
तेजस- छे काहीतरीच काय.
अविनाश- शाब्बास. अशीच बाबांची बाजू घ्यायची हा बाळा.
हे ऐकून दोन क्षण शांतता झाली आणि आपण तेजसला बाळा म्हणालो हे लक्षात येऊन अविनाश जोरजोरात हसू लागला. तेजस आणि राधाही त्याला सामील झाले.
तेजस- बाबा उद्यापासून मी ऑफिसला येईन. आपण एकत्रच जाऊ. तुम्ही फक्त केबिन मध्ये बसायचं आणि मला गाईड करायचं. काम मी करेन. ठीक आहे?
अविनाश- ओके सर…
तेजस- सर काय हो बाबा…बाळा जास्त मस्त वाटत. बर ऐका ना…मी आज जरा ऑफिसला जातो आणि थोडा त्या वातावरणाला सरावतो. तुमच्या केबिन मध्ये माझ्यासाठी एक जागा बनवतो.
अविनाश- ठीक आहे. तू जा. मी मोरेंना सांगून ठेवतो.
तेजस- ओके बाय…
राधा- अरे पण तुझ जेवण?
तेजस- सकाळी येताना हेवी नाश्ता केला आहे आई. आता भूक नाहीये. बाय…
इतक बोलून तेजस घरातून बाहेर पडला आणि बाईकला किक मारून दिसेनासा देखील झाला. अविनाश आणि राधा खिडकीतून तो गेला त्या दिशेने कौतुकाने बघत होते.
तेजसची बाईक मार्केट मध्ये आली. तिथे बर्यापैकी गर्दी होती. तेजस ने स्पीड कमी केला. इतक्यात मोबाईल वर बोलत असलेली एक मुलगी उजवीकडे न बघता त्याच्या बाईकच्या पुढ्यात आली. तेजस ने करकचून ब्रेक मारला.
तेजस- ए हिरोईन…फोन जीव घेईल एक दिवस…जरा बघून चाल की…
हे ऐकून त्या मुलीने तेजस कडे वळून पाहिलं. तिचे मोठे गहिरे डोळे, तरतरीत नाक, रसरशीत ओठ, लांबसडक बांधलेले केस, त्यातून चेहऱ्यावर येणार्या दोन बटा, त्या आपल्या लांबसडक बोटांनी मागे करण्याचा तिचा अंदाज, तिचा कमनीय बांधा ठसठशीत दिसेल असा तिने परिधान केलेला लखनवी चुडीदार कुर्ता…तेजसची नजरबंदी झाली. इतक्यात त्याला आवाज ऐकू आला.
मुलगी- एक्स्क्यूज मी. काय म्हणालास तू? हिरोईन? मग तू काय मोठा हिरो आहेस का इतक्या वेगात मार्केट मध्ये गाडी चालवणारा? गाडी चालवणार्याने रस्त्यावर लक्ष द्यायचं असत. पादचाऱ्यांनी नाही. आणि मार्केट सारख्या गर्दीच्या ठिकाणी तर अजिबात नाही.
ती बोलत होती आणि तेजस मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. तिचे दात किती शुभ्र आणि सरळ आहेत ह्याच तो मनातल्या मनात कौतुक करत होता. इतक्यात मागून हाक आली.
आवाज- काय ग शिवानी काय झाल?
शिवानी आणि तेजस दोघांनी त्या दिशेला पाहिलं. केळकर बाई हातात भाजीची पिशवी घेऊन उभ्या होत्या.
शिवानी- बघ ना आई. हा मुलगा माझ्या अंगावर बाईक घालून मलाच हिरोईन वगैरे म्हणतोय. आपल्या गावात गुंड फार वाढलेत.
केळकर बाईंनी तेजस कडे वळून पाहिलं आणि हसून म्हणाल्या-
बाई- तेजस तू? अरे तू अमेरिकेला ना गेला होतास?
तेजस- हो बाई. पण आता एक वर्षाने जाणार आहे. जरा बाबांना बिझनेस मध्ये मदत करणार आहे.
बाई- बर. हिला ओळखलस का?
तेजस- न..नाही.
बाई- अरे ही माझी शिवानी. तुम्हाला चार वर्ष जुनियर आहे. आमच्या ह्यांची पुण्याला बदली झाल्यावर त्यांच्याकडेच राहिली हायस्कूल पासून. इंजिनियर झाली आहे पुण्यातच. कालच आली गावाला. आता लग्नाच बघतोय.
हे ऐकून लाजलेली शिवानी म्हणाली-
शिवानी- ए आई..काहीही काय बोलतेस?
बाई- अग त्यात काय? तू तेजस ला ओळखल नाहीस का? तू अगदी लहान होतीस तेव्हा आपल्या घरी यायचा तो शिकवणीला. तुम्ही दोघे एकत्र खेळलेले आहात. ए तेजस तुझा कोणी मित्र असेल चांगला तर सांग रे.
तेजस- (शिवानीकडे बघत) हो बाई…नक्की सांगतो.
बाई- आणि तुझ्या बाबांना विचार की हीच लग्न जमेपर्यंत त्यांच्या ओळखीत एखादी नोकरी असेल तर बघायला. इतकी शिकली आहे. पुढे लग्न करून जिथे जाईल तिथे नोकरी करेलच. पण अनुभव मिळू दे ना कामाचा.
तेजस- हो बाई नक्की सांगतो. (शिवानीला) बाय…
शिबानी- (एका हाताने बट मागे सारत) बाय…आणि सॉरी…
तेजस- मी पण सॉरी…येतो बाई…
इतक बोलून तेजस निघाला. त्याला डोळ्यासमोर शिवानीच दिसत होती. समोरचा रस्ता धुरकट झाला होता. त्याची बाईक एका कोळणीला धडकली. कोळीण रागाने ओरडू लागली-
कोळीण- तुझा मुडदा बशिवला…डोळे फुटले का रे?
तेजस भांबावला होता आणि काही अंतरावरून हे बघत असलेली शिवानी जोरजोरात हसत होती आणि तेजसच्या मनात रुतत होती. त्याला कोळणीच्या शिव्या ऐकू येत नव्हत्या. त्याच्या हृदयात हजारो व्होयलीन वाजत होती.
क्रमश:
पुढील भागाची लिंक-वारसा (भाग ४)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
मस्तच. मी लंडनला राहणारी एक म्हातारी .५५ वर्षे यादेशात राहिलें पण मराठीचि आवड संपत नाहीं . असंच लिहीत राहा .