व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र

व्हॅलेंटाईन डे…(पहिला भाग)

गद्रे अँड देव असोसिएट श्रीरंग गद्रेची सीए फर्म. पार्टनर देव व्हीआरएस घेऊन रिटायर होऊन मुलाकडे दिल्लीला राहायला गेल्यावर पार्टनरशिप डीझोलव्ह होऊन श्रीरंग एकटाच मालक होता आता. वय पंचावन्न. त्याची बायको गेल्याच वर्षी कॅन्सरने गेली. मुलगा अमेरिकेत शिकून तिथेच नोकरी करण्याच्या विचारात. श्रीरंग एकटाच होता आता. पैसा भरपूर होता. प्रभात रोड वर तीन बेडरूम चा आलिशान फ्लॅट मिळाला होता गेल्याच वर्षी इमारत रीडेव्हलप झाल्यावर. त्याची बायको स्वाती डिसेंबर मधे गेली आणि जानेवारीत पझेशन मिळालं. स्वाती नवीन जागा बघू शकली नाही! आता श्रीरंग प्रॅक्टिस वेळ घालवायला चालवतो. बांधलेले काही मोठे क्लायंट आहेत. त्यांचं बिलिंग जोरदार होतं. बाकी आर्टिकल करायला पोर येतात त्यांना ज्ञान देतो. संध्याकाळी क्लब मध्ये टेनिस खेळून गँग बरोबर दोन ड्रिंक झाली की घरी येऊन जेऊन कुमार गंधर्व ऐकत झोपी जातो. सकाळी वॉक. आणि ऑफिस. वर्षातून दोन फॉरेन हॉलिडे गँग बरोबर. लाईफ सेट होत त्याचं.

तीन महिन्यांपूर्वी मध्या परांजपे चा फोन आला. मध्या म्हणजे ह्याचा शाळेतला मित्र. आता दीनानाथ मध्ये ओंकोलोजीचा एच ओ डी आहे. श्रीरंग च्या बायकोची सगळी ट्रीटमेंट त्यानेच केली. शेवटी म्हणाला “जाऊ दे स्वाती ला. केमो नाही घेऊ शकणार ती आता.” त्या नंतर काही दिवसात स्वाती घरीच गेली. पण रंग्या म्हणजे श्रीरंग, मध्या, ऍडव्होकेट पुरुषोत्तम म्हणजे उत्तम, दिग्या म्हणजे पटवर्धन बिल्डर्स कंपनीचा पार्टनर दिगंबर पटवर्धन ज्याने श्रीरंग ची बिल्डिंग री डेव्हलप केली असे सगळे शाळेपासून गां# दोस्त. तर तीन महिन्यापूर्वी मध्याचा फोन आला.

श्रीरंग – बोल रे.

मध्या – एक काम आहे.

श्रीरंग – बोल की. वहिनीला संध्याकाळी खोटं सांगायचं आहे की तू माझ्या बरोबर येणार आहेस असं?

मध्या – नाही रे बाबा.

श्रीरंग – मग आज रमीचा डाव वहिनीला सांगून टाकणार का?

मध्या – ती घरी नाहीये आज संध्याकाळी. आम्ही घरीच बसणार आहोत.

श्रीरंग – का रे? कुठे जाते आहे? क्लब मधून मी पण येतो. तुझ्या घरीच उघडतो लास्ट मंथ मध्ये ड्युटी फ्री मधून आणलेली ग्लेन फिडिक.

मध्या – नको. तिला वास फार येतात. तू नुसता ये खेळ बघायला.

श्रीरंग – ओके. ठेऊ मग?

मध्या – मी काय तुला रमी बघायचं आमंत्रण द्यायला फोन केला अस वाटतंय का? ठेवतोस काय?

श्रीरंग – अरे हो. काय काम आहे सांग.

मध्या – अरे हीची एक मामे बहीण आहे. औरंगाबाद ला असते. हिचा मामा महिन्याभरापूर्वी गेला. आता अपूर्वा एकटीच असते.

श्रीरंग – अपूर्वा कोण?

मध्या – हे असे चु#टिक प्रश्न विचारतोस ना म्हणून आम्हाला शंका येते की तुला सीए कोणी केला अशी. अरे बाबा मामाच्या मुलीबद्दल बोलतोय ना? मग अपूर्वा कोण असेल? हिच्या काकाची आजी असेल का?

श्रीरंग – आलं लक्षात. अपूर्वा वहिनीच्या मामाची मुलगी. पुढे बोल.

मध्या – हिने अपूर्वाला पुण्याला आमच्या घरी बोलावली आहे.

श्रीरंग – सहकुटुंब की एकटीलाच?

मध्या – रंगा तू नक्की सेटिंग लावून सीए झाला आहेस. किती बिनडोक प्रश्न विचारतोस. अरे बाबा तिचं कोणी नाहीये. हीची मामी अपूर्वा झाली तेव्हाच गेली. मग अपूर्वा ने मामाला म्हातारपणी कोण बघणार म्हणून लग्न केलं नाही. आता मामा गेल्यावर एकटी आहे. पैशांची ददात नाहीये. घराचा वरचा मजला स्टुडंट्स ना भाड्यावर देतात. त्याचे भरपूर पैसे येतात.

श्रीरंग – मग तिचे रिटर्न फाईल करायचे आहेत का? कॅश व्यवहार आहेत का?

मध्या – अरे नाही रे बाबा. ती पुण्यात आल्यावर तिला दिवसभर घरी बसवू का? आमची ही क्लिनिकला जाणार. मी हॉस्पिटल मध्ये. अपूर्वाला काहीतरी उद्योग नको का द्यायला? ती बीकॉम आहे. तुझ्या ऑफिसात पाठवू का? पगार वगैरे तू ठरव. ते तिचा इंटरव्ह्यू घेऊन ठरव. पाठवू का?

श्रीरंग – माझ्याकडे?

मध्या – मग माझ्या बरोबर ओ टी मध्ये नेऊ का अप्रन घालून? माणूस कापल्यावर बघून तिथेच हार्ट फेल होईल तिचा. पाठवू की नको सांग.

श्रीरंग – पाठव बाबा. कधी पाठवतोस?

मध्या – परवा. बुधवारी. किती वाजता पाठवू सांग?

श्रीरंग – दुपारी तीन वाजता पाठव. सकाळी माझी मीटिंग आहे हिंजवडी ला.

मध्या – बाय…

श्रीरंग – बाय.

मंगळवार धावपळीत गेला. बुधवारी श्रीरंग हिंजवडी ला मीटिंग साठी गेला. क्लायंट च्या सी एफ ओ ची बंगलोर मुंबई फ्लाईट delay झाली. श्रीरंग ने सी ई ओ बरोबर लंच घेतला. सी एफ ओ फेज थ्री मधील त्या ऑफिसात दोन वाजता पोहोचला. त्या नंतर मीटिंग संपायला साडेतीन झाले. श्रीरंग ला परतीच्या रस्त्यावर ट्रॅफिक लागला. घरी पोहोचायला सहा वाजले. गाडीतून उतरत गाडी लॉक करत त्याने ऑफिस बॉय विजयला ऑफिस बंद करून चावी घरी द्यायला सांगितली. तेव्हा विजय म्हणाला की एक मॅडम बराच वेळ वाट बघत आहेत. ते ऐकून श्रीरंग ला त्याने अपूर्वा ला बोलावली होती ते आठवलं. तो म्हणाला “त्यांना सांग मी पाच मिनिटात येतोय.” त्याने ड्रायव्हर ला पार्क केलेली गाडी ऑफिसमधे घ्यायला सांगितली.

श्रीरंग ऑफिस मध्ये आला. रिसेप्शन एरिया मध्ये अपूर्वा बसली होती. जेमतेम पंचेचाळीस ते पन्नास असेल. पण तितकी देखील न वाटणारी. आरपार रोखून बघणारी. नाकी डोळी नीटस, मापात असलेली. तिला पाहून श्रीरंग म्हणाला –

श्रीरंग – सॉरी हा अपूर्वा. मीटिंग delay झाली आणि मग ट्रॅफिक मध्ये अडकलो.

अपूर्वा – नो प्रोब्लेम.

श्रीरंग – ये ना. केबिन मध्ये ये. विजय दोन चहा दे मस्त.

अपूर्वा – मला नको. माझा तीन कप झालाय ऑलरेडी. विजय मस्त चहा बनवतो. तुम्ही घ्या.

श्रीरंग ला जरा ओशाळ वाटलं.

श्रीरंग – oh is it? मग कॉफी घे. विजय कॉफी तर अप्रतिम बनवतो. विजय दोन अप्रतिम कॉफी दे.

दोघे केबिन मध्ये येऊन बसले.

श्रीरंग – सॉरी परत एकदा. माझी ग्लोब इन्फोटेक बरोबर मीटिंग होती. Quarterly result फायनल करायचा होता.

अपूर्वा – एक विचारू?

श्रीरंग – विचार ना.

अपूर्वा – ह्या क्वार्टर मध्ये त्यांचं land sale चं डील झालं आहे का? आणि ते रिझल्ट मध्ये रिफ्लेक्ट करणार आहात का?

श्रीरंग ने चमकून तिच्याकडे पाहिलं. औरंगाबाद मध्ये असलेल्या बाई ला गलोब इन्फोटेक च्या land deal ची माहिती असलेली पाहून तो उडाला.

श्रीरंग – तुला काय माहित त्या बद्दल?

अपूर्वा – मी ओरिजनल शेयर होल्डर आहे. माझे बाबा शेअर्स मध्ये invest करायचे. मला माहिती सांगायचे. मग मलाही इंटरेस्ट निर्माण झाला. ग्लोब इन्फोटेक चे माझ्याकडे तीन हजार शेयर आहेत. त्यांच्या बॅलन्स शीटवर तुमची सही बघते मी. त्यांचे सी ई ओ वेंकटेश ह्यांनी त्यांच्या con call मध्ये land deal चा ओझरता उल्लेख केला होता. सो मी विचारलं.

अपूर्वा ला असलेली माहिती, इंटरेस्ट पाहून श्रीरंग इंप्रेस झाला होता. ब्युटी विथ ब्रेन असलेल्या अपूर्वा ला भेटून त्याला आनंद झाला होता. इतक्यात विजय कॉफी घेऊन आला. कॉफीचा घोट घेत श्रीरंग म्हणाला –

श्रीरंग – सॉरी. मी ती माहिती देऊ शकत नाही. बिझनेस चे एथिक्स असतात.

अपूर्वा – नक्कीच. मी सहज विचारलं.

श्रीरंग – मला मध्या…म्हणजे मधुकर ने तुझ्या बद्दल सांगितल आहे. Sorry to hear about your father.

अपूर्वा – हो. ते माझा आदर्श होते.

श्रीरंग – I am sure की त्यांना आदर्श मानणाऱ्या तुझ्या सारखेच ते देखील खूप sharp आणि हुशार होते.

अपूर्वा – Yes. ते हुशार होतेच.

श्रीरंग – ठीक आहे. Good to meet you. उद्यापासून कामावर ये. काम बघ. तुला काय करता येईल ते बघ. मग पगाराच बोलू. चालेल ना?

अपूर्वा – Perfect. Thank you sir.

श्रीरंग – तू मधुकर ची मेहुणी आहेस. मला श्रीरंग म्हण. सर नको.

अपूर्वा – नाही सर. मी इथे काम करायला येणार आहे. मधु भवोजिंची मेहुणी म्हणून नाही. मी तुम्हाला सर म्हणेन. बाय. गुड नाईट सर.

अपूर्वा ने शेक hand केला आणि ती गेली. श्रीरंगला स्वतःला लक्षात येत नव्हतं की त्याच्या मनात नक्की काय सुरू आहे.

क्रमशः

व्हालेंटाईन डे…(दुसरा भाग)

अपूर्वाला भेटून श्रीरंग घरी आला. फ्रेश होऊन क्लब मध्ये गेला. तिथे मध्या भेटला. बार जवळ बसून वाईन चा घोट घेत तोंडात एक काजू टाकून तो रंगाला म्हणाला-

मध्या- कशी काय वाटली अपूर्वा?

श्रीरंग- छान आहे.

मध्या- ते मलाही माहित आहे. आमच्या लग्नात तिला पाहिली तेव्हा ही आधी का नाही भेटली अस वाटलं होत. आमच्या हिला मी ते लग्नानंतर सांगितल देखील.

श्रीरंग- मग?

मध्या- मग काय? ती म्हणाली की अपूर्वा आमची नशीबवान आहे. तुमची नजर आधी तिच्यावर नाही पडली म्हणून. माझ्यावर पडली आणि मी अडकले.

श्रीरंग- वहिनी खतरनाक आहे हा ह्या बाबतीत. एक शब्द खाली पडू देत नाही.

मध्या- अपूर्वा तिची आई आहे ह्या बाबतीत. येईल तुला अनुभव.

श्रीरंग- पण काय रे. तू तिच्यावर टवके टाकत होतास हे माहित असून वाहिनी ने तिला तुमच्या घरी राहायला कशी बोलावली?

मध्या- ती म्हणाली मला. अपूर्वला बोलावते आहे. काय लाईन मारायची ती मारा. मला माहित आहे तुमच्यात तितकी हिम्मत नाही आणि अपुर्वावर विश्वास आहे की ती तुम्हाला तशी हिम्मत करू देखील देणार नाही.

श्रीरंग- इतकी खतरनाक आहे का अपूर्वा?

मध्या- मेलडी खाव खुद जान जाओ रंगा. ठेवतो आहेस ना तिला कामावर? कळेल हळू हळू.

श्रीरंग- हो. उद्यापासून बोलावली आहे. हुशार आणि स्मार्ट आहे ती. चांगल काम करेल.

मध्या- रंगा. कामाशी काम ठेव. बाकी “कामाचे” विचार मनात आणलेस ना तर अपूर्वा कुठेच “काम करण्याच्या” लायकीचा ठेवणार नाही तुला.

श्रीरंग- ते सगळ तुझ खातं दिग्या च आहे. मला तू ओळखतोस. मी बायकांच्या लफड्यात पडतो का कधी?

मध्या- म्हणून तर अपुला तुझ्याकडे पाठवली. सेफ deposit vault आहेस ना तू आमचा.

श्रीरंग- अप्पू?

मध्या- घरचं नाव आहे तीच. तू नको म्हणू. नाहीतर मार खाशील.

इतक्यात तिथे आलेल्या दिग्या आणि उत्तम ने ते ऐकल. तिथे बसत दिग्या म्हणाला-

दिग्या- कोण मारतोय रे आमच्या रंगा ला? बोलावू का आमच्या साईट वरच्या पोरांना? Slab मध्ये गाडून टाकतील. माणूस गुल होईल.

मध्या- गप रे. दिग्या तू पटवर्धन आहेस हे सांगाव लागत यार तुझ हे अस बोलण ऐकल की. काय ही तुझी भाषा? काय हे भयानक विचार? माणसाला slab मध्ये गाडणार?

दिग्या- तू लोकांना ऑपरेशन करताना सपासप कापतोस तेव्हा चालत का?

मध्या- काय संबंध? काही तुलना आहे का?

उत्तम- ए तुम्ही दोघे शाळेत असल्यापासून असेच भांडता. गप कि जरा. रंगा ला कोण मारतंय सांग तरी मध्या. दरबंघा कोर्टात केस करतो. दर आठवड्याला बिहार ला फेर्या मारून वेडा होईल जो कोणी आहे तो.

मध्या- कोणी कोणाला मारत नाहीये. माझी मेहुणी आहे. ती रंगाच्या ऑफिसात लागते आहे.

दिग्या- कोणाला?

हे ऐकून रंगा आणि उत्तम जोरात हसले. मध्या चिडून म्हणाला-

मध्या- हा वाईट होता बर का? माझी मेहुणी आहे ती.

दिग्या- असू दे की. ती लागते आहे हे महत्वाच.

रंगा- अरे ए दिग्या…ती माझ्या ऑफिसात नोकरीला लागते आहे.

दिग्या- शी. इतकच. मला वाटलं…

मध्या- ए गपतो का आता?

रंगा- ए दिग्या…खतरनाक आहे ह्याची मेहुणी. आणि जाम हुशार आणि शार्प पण आहे.

दिग्या- म्हणजे पटायला सोपी.

मध्या- तू तेच करणार. समोरच्या वाड्यातली मंजिरी माझी होती. पण तिला तू काढलीस.

दिग्या- मी तुला थांबवला नव्हता. तिला मी रांगडा गडी आवडलो त्याला मी काय करणार?

मध्या- रांगडा गडी? कॉलेज पासून नॉन व्हेज खाल्ल की रांगडा गडी? तरी बर आहे रांगड्या गड्याला आता हायपर टेन्शन आणि शुगर डिटेक्ट झाली आहे. पोट बघ जरा. पोहोचेल का मनात आणलस तरी?

दिग्या- ज्याचा दोस्त डॉक्टर मध्या आहे त्याला कसली बीपी आणि शुगर ची काय भीती? बाकी पोहोचायचं कसं ते मला माहित आहे. तू नको काळजी करू.

उत्तम- अरे विषय काय? तुम्ही काय बोलताय? आपला रंगा गुड बॉय आहे. तो मध्या च्या मेहुणीला काहीही करणार नाही. काय रे रंगा?

श्रीरंग ने हम्म अस उत्तर दिल.

उत्तम- बर ऐका. आज कोर्टात काय मजा आली सांगतो.

चौघांनी आणखी ड्रिंक ऑर्डर केली आणि गप्पा रंगल्या.

दुसऱ्या दिवशी अपूर्वा ऑफिसात आली. श्रीरंग ने तिची स्टाफ शी ओळख करून दिली. अपूर्वाला काम दाखवलं आणि ऑफिसातल्या एका मुलाला तिला मदत करायला सांगितली. पुढे काही दिवस अपूर्वा काम समजून घेत होती. अपूर्वा आता ऑफिसला येऊन आठवडा झाला होता. ती कामात बर्यापैकी रुळली होती. रंगा आणि तिची भेट कमी होत असे. रंगा फार थोडा वेळ ऑफिसला जात असे. असाच महिना गेला.

पुण्यात डिसेंबर ची थंडी पडली होती. ऑफिसात अपूर्वा एकटी होती. आर्टिकल करणारी पोर audit साठी दिल्लीला गेली होती. अपूर्वा कामात हरवली होती. जवळजवळ सात वाजले होते. विजय ने तिला चहा दिला आणि विचारलं-

विजय- madam अजून किती वेळ लागेल? माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज. घरच्यांना घेऊन जेवायला जायच आहे.

अपूर्वा- अरे वा. हे घे. (तिने पाचशे रुपये त्याला दिले) माझ्याकडून तुझ्या मुलाला चोकलेट घे. आणि जा तू. मी ऑफिस बंद करेन.

विजय- आणि चावी?

अपूर्वा- कुठे द्यायची सांग. मी देते.

विजय- तुम्ही निघताना सरांना फोन करा. ते सांगतील.

अपूर्वा- ओके.

विजय गेला. अपूर्वाच काम संपेपर्यंत साडे आठ वाजले. काम संपल्यावर तिने laptop बंद केला. बाथरूम मध्ये जाऊन चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारले. थंडीत पाणी चेहर्याला लागल्यावर तिच्या अंगावर शहरा आला. समोरच्या आरशात बघत तिने केस विंचरले. एकदा आपल्या फिगर कडे पाहून खुश होत स्वतःला आरशात फ्लाईंग कीस दिला आणि बाहेर येऊन तिने श्रीरंग ला फोन लावला.

श्रीरंग- बोल अपूर्वा?

अपूर्वा- सर ऑफिसची चावी कोणाला देऊ?

श्रीरंग- विजय ला दे.

अपूर्वा- तस नाही सर. विजय गेला. मी उशिरा पर्यंत होते. सो…

श्रीरंग- विजय गेला म्हणजे? असा कसा गेला?

अपूर्वा- मीच जायला सांगितल. त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे आज. सो…

श्रीरंग- अच्छा. मग ठीक आहे. गुड नाईट.

अपूर्वा- सर मी विजय गेला सांगायला फोन नाही केलेला. चावी तुम्हाला देऊ का आणि कुठे देऊ विचारायला फोन केलाय.

श्रीरंग- अरे हो…चावी ना…

त्याचा वेंधळे पणा एव्हाना माहित झालेल्या अपूर्वला हसू येत होत.

श्रीरंग- तू..तू क्लब ला ये.

अपूर्वा- कोणता क्लब सर?

श्रीरंग- आमचा क्लब…मी तुला लोकेशन पाठवतो. ये तू. रिक्षाने दहा मिनिटात येशील. उद्या रिक्षा च व्हाऊचर लाव ऑफिसला.

अपूर्वा ने फोन कट केला. श्रीरंग थोडा वेंधळा असला तरी अतिशय हुशार, तत्वाला चिकटून असलेला, सज्जन आणि सभ्य होता हे तिला लक्षात आल होत. तिची बहिण आणि मध्या कडूनही श्रीरंग ची बायको कशी गेली वगैरे तिला कळल होत. एकुणात तिला श्रीरंग हा माणूस भावाला होता. बॉस म्हणून आणि माणूस म्हणूनही.

अपूर्वा क्लबच्या बाहेर उतरली तेव्हा थंडीने कुडकुडत होती. ती क्लब मध्ये शिरली आणि तिने रंगा ला फोन लावला. त्याने तिला पूल साईड ला बोलावली. रंग तिथे एकटाच बसला होता. पुढ्यात jd चा ग्लास होता. अपूर्वा कुडकुडत तिथे आली. पूल साईड ओपन असल्याने वारा जोरात होता आणि त्यामुळे अपूर्वाला आणखी थंडी वाजू लागली. तिने थरथरत्या हाताने किल्ली पुढे केली. श्रीरंग उभा राहिला. त्याने किल्ली घेतली.

श्रीरंग- thanks. तुला उगाच वळसा पडला चावी द्यायला.

अपूर्वा- इट्स ओके सर…

ती तशीच उभी होती. एक awkward सायलेन्स होता. श्रीरंग ला आता काय बोलाव सुचत नव्हत. तिलाही काय कराव कळत नव्हत. म्हणजे जाव की क्लब मध्ये थोडा वेळ बसाव. असेच काही सेकंद गेल्यावर श्रीरंग ने formal होत तिला विचारलं-

श्रीरंग- तुला घाई नाहीये ना?

अपूर्वा- न…नाही…

श्रीरंग- मग बस ना. हवा बघ काय छान आहे.

अपूर्वा मनात म्हणाली हवा छान नाही बोचरी आहे. ह्यांना थंडी वाजत नसेल दोन पेग पोटात गेल्यावर.

श्रीरंग- तुझ्यासाठी मस्त चहा आणि बन मस्का सांगू का?

अपूर्वा न राहवून म्हणून गेली-

अपूर्वा- तुम्ही काय घेताय?

श्रीरंग- व्हिस्की आहे.

अपूर्वा- माझ्यासाठी पण एक मागवा आणि गरम पाणी प्लीज…

ते ऐकून श्रीरंग क्षणभर चमकला. तिच्याकडे बघत राहिला.

अपूर्वा- काय झाल सर?

श्रीरंग- तू व्हिस्की पिणार?

अपूर्वा- मला खर तर ओल्ड मोन्क आवडते. पण तुम्हाला कंपनी म्हणून व्हिस्की चालेल.

अपूर्वा ने दिग्या म्हणाला होता तो ठसका आणि खतरनाक पणा दाखवला होता.

अपूर्वा- सर मागवताय ना?

श्रीरंग- ह..हो मागवतो ना…

आता श्रीरंग च्या लक्षात आल ती थंडीने काकडत होती ते.

श्रीरंग- आपण आत बसुया का? इथे वारा खूप आहे. त्यात तू स्लीव्हलेस ड्रेस घातला आहेस. थंडी वाजत असेल तुला.

अपूर्वा ने तिचे उडत असलेले केस आणि ओढणी सांभाळत मानेने होकार दिला. अपूर्वा त्या अवस्थेत फार लोभस दिसत असल्याच श्रीरंग ला वाटून गेल. त्याने वेटर ला ऑर्डर दिली आणि आपला ग्लास आत टेबल वर आणायला सांगून अपूर्वा ला म्हणाला-

श्रीरंग- this way please…

ती त्याच्या मागे गेली. इन डोअर रेस्तोरांत मध्ये आल्यावर अपूर्वा ला छान उबदार वाटलं. श्रीरंग ने एक कोपऱ्यातल रिकाम टेबल पाहिलं आणि अपूर्वला त्या दिशेने बोट दाखवलं. दोघे तिथे गेले. श्रीरंग ने अदबीने खुर्ची मागे करून तिला बसायला

सांगितल आणि ती बसल्यावर तो समोर बसला.

श्रीरंग- आम्ही सगळे इथे रोज भेटतो. आज नेमके कोणी आले नाही. दिग्या आला होता पण लगेच गेला. मग मी बोअर झालो आणि इथेच ड्रिंक ऑर्डर केल. नॉर्मली मी घरी ड्रिंक घेतो. खूप कंटाळा येतो ना घरी एकट्याला.

इतक्यात वेटर दोघांचे ग्लास घेऊन आला. अपूर्वाच्या ड्रिंक मध्ये गरम पाणी ओतलं.

श्रीरंग- तुला खायला काही सांगू का?

अपूर्वा- नको. सर. घरी जाऊन जेवायचं आहे.

श्रीरंग- ते ठीक आहे ग. (वेटरला) ए एक प्लेट आपली मिक्स भजी आणि खारे काजू आण पटकन.

वेटर गेला. श्रीरंग ने आपला ग्लास उचलला आणि चियर्स म्हणत अपूर्वाच्या ग्लास वर टेकवला.

अपूर्वा- सर…तुमचा मुलगा…ओम नाव आहे ना त्याचं?

श्रीरंग- हो…तो सियाटेल ला असतो. तिथेच सेटल होणार आहे. वर्षातून एकदा येतो. एकदा मी जातो. तेवढीच भेट.

अपूर्वा- आय सी….मग घरी काय करता तुम्ही वेळ घालवायला?

श्रीरंग- म्युझिक ऐकतो.

अपूर्वा- wow. मला पण म्युझिक आवडत. काय ऐकता तुम्ही? मी फुल फिल्मी म्युझिक ऐकते. आरडी माझा फेव्हरेट आहे.

श्रीरंग- अच्छा. मी फिल्म म्युझिक फार नाही ऐकत. कुमार ऐकतो बर्याचदा.

अपूर्वा- किशोर कुमार?

श्रीरंग- नाही..

अपूर्वा- मग कुमार शानू?

श्रीरंग- नाही.. कुमार गंधर्व.

अपूर्वा- ओह…क्लासिकल…माझे बाबा ऐकायचे खूप. पण मला फार समजत नाही त्यातलं.

श्रीरंग- क्लासिकल समजायचं नसत. ते अनुभवायचं असत. एन्जोय करायचं असत.

अपूर्वा- पण सर जे समजत नाही ते एन्जोय कस करता येईल.

श्रीरंग- आपलच उदाहरण घे. तू मला वैयक्तिक फार ओळखतेस का?

अपूर्वा- नाही…फार नाही.

श्रीरंग- पण आता आपली ही भेट एन्जोय करते आहेस ना? क्लासिकल म्युझिकच पण तसंच आहे.

अपूर्वा- थोडक्यात म्युझिक असो किंवा व्यक्ती…सूर जुळले की ओळख फार नसली तरी आनंद देऊन जातात.

श्रीरंग- अरे वा. काय वाक्य आहे. कमाल.

अपूर्वा- सर हे मी नाही. ह्या ग्लासातला jack Daniel बोलतोय.

त्यावर दोघे मनसोक्त हसले. अपूर्वा हसताना फार आकर्षक दिसते हे श्रीरंगच्या लक्षात आल. श्रीरंग माणूस म्हणून सभ्य, हुशार, सज्जन असण्या बरोबरच त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे, तो संवेदनशील आणि केअरिंग आहे आणि सर्वात महत्वाच म्हणजे तो आयुष्यात खूप एकाकी आहे हे अपूर्वाला जाणवलं.

तासभर गप्पा मारून दोघे निघाले.

श्रीरंग- मी तुला घरी सोडतो.

अपूर्वा- नको सर मी रिक्षा करते.

श्रीरंग- नको बाई. तुला इतक्या थंडीत रात्री रिक्षाने पाठवली हे तुझ्या जिजा ला कळल ना तर माझा मर्डर करेल तो त्याच्या कडल्या सर्जिकल नाईफ ने.

दोघे गाडीत बसले. गाडी मध्या च्या घराकडे निघाली. दोघे रस्त्यावरची रहदारी बघत होते. पाच मिनिटात घर आल. अपूर्वा आभार मानून उतरली. तिला गेट च्या आत गेलेली पाहून श्रीरंग ड्रायव्हरला म्हणाला-

श्रीरंग – चल रे…घरी घे…आणि जरा आरडी ची गाणी लाव.

हे ऐकून ड्रायव्हर पण चाट पडला. त्याने आरडी लावला. गाडीत श्रीरंग “तुम आ गये हो नूर आ गया है” ऐकत असताना लिफ्ट मध्ये अपूर्वा “अजुनी रुसुनी आहे” ऐकत मान डोलावत होती. कुठेतरी एक तार जोडली गेली होती. धून नवीन असली तरी सूर जुळून आल्याने मेलडी दोघांनाही आनंद देत होती.

क्रमश:

व्हालेंटाईन डे…( तिसरा भाग)

त्या भेटीनंतर रंगा आणि अपूर्वा मध्ये एक कम्फर्ट झोन निर्माण झाला. त्याचा चांगला परिणाम ओफिसातील कामात दिसू लागला. अपूर्वा मुळात हुशार होतीच. तिला श्रीरंग ला जास्त ओळखू लागल्यावर एक वेगळा आत्मविश्वास मिळाला. तिने घेतेलेल्या निर्णयांच किंवा सूचनांच श्रीरंग ने कौतुक केल्यावर तिला कामाचा आणखी हुरूप येऊ लागला. तिने ओफिसातील अनेक प्रोसेस फाईन ट्यून केल्या. क्लायंट साठी TAT खूप इम्पृव्ह केला. एकुणात सबंध डिसेंबर महिन्यात अपुर्वाने ऑफिसात चांगले बदल घडवले ज्यातून एफिशियन्सी वाढायला, को ओर्डीनेशन वाढायला मदत झाली. ३१ डिसेंबर हा श्रीरंग चा वाढदिवस. त्यातच त्यांच्या फर्म ला ऑफिशियली सुरु होऊन डिसेंबर मध्ये २५ वर्ष पूर्ण झाली. ह्या निमित्ताने श्रीरंग ने स्टाफ, फ्रेंड्स आणि क्लायंट साठी न्यू इयर कम वाढदिवस कम बिझनेस ची सिल्व्हर ज्युबिली अशी दणदणीत पार्टी द्यायचा निर्णय घेतला. पार्टीची सगळी जबादारी अपूर्वा ने स्वतःच्या अंगावर घेतली. सगळी invitation, rsvp, क्लब बरोबर कोओर्डीनेशन तिने सांभाळल. बोलावणे करायला तिने दिग्या ला फोन केला.

दिग्या- हेलो…

अपूर्वा- हेलो. पटवर्धन सर का?

दिग्या- हो बोलतोय. कोण बोलतंय.

अपूर्वा- सर मी अपूर्वा बोलते आहे.

दिग्या- कोण अपूर्वा?

अपूर्वा- सर मी गद्रे अँड देव असोसिएट मधून बोलते आहे. श्रीरंग सरांच्या तर्फे तुम्हाला invite करायचं आहे.

कोण बोलते आहे हे लक्षात आल्यावर दिग्या ने एकदम सूर बदलला.

दिग्या- ओह…मग अप्पू बोलते आहे म्हण की. ते गद्रे अँड देव असोसिएट काय आहे? तू मध्या ची साली ना? म्हणजे आमची पण सालीच की. आणि साली आधी घरवाली असते.

स्वतःच्या ह्या फ्लर्ट कम विनोदावर दिग्या स्वतःच जोरजोरात हसला. अपूर्वाच्या मात्र तो थोडा डोक्यात गेला. ती काहीच बोलली नाही. फोनवर काही सेकंद सायलेन्स होता. शेवटी दिग्याच बोलला.

दिग्या- हेलो…हेलो…आहेस की गेलीस अप्पू?

अपूर्वा- आहे मी सर…तुमचा विनोद संपला असेल तर कामच बोलू का?

दिग्या- ए अप्पू सर काय म्हणतेस मला? मी काही तुझा बॉस रंगा नाहीये मला सर वगैरे म्हणायला. तू मला दिग्या म्हण प्लीज. We are friends अप्पू…

अपूर्वा- मी फोन तुम्हाला पार्टीसाठी इन्व्हाईट करायला केलाय. ३१ डिसेंबर ला रात्री क्लब मध्ये श्रीरंग सर पार्टी देणार आहेत.

दिग्या- ती तो दर वर्षी देतो. त्याचा वाढदिवस असतो त्या दिवशी. पण यंदा क्लब मध्ये देतोय म्हणजे काहीतरी मोठा मटका लागलेला दिसतोय त्याला.

अपूर्वा- त्यांचा वाढदिवस तर आहेच. पण न्यू इयर्स पण आहे आणि मुख्य म्हणजे आमच्या फर्म ची सिल्व्हर ज्युबिली आहे. म्हणून मोठी पार्टी देणार आहेत सर. तुम्ही नक्की यायचं आहे विथ family. आठ वाजता पोहोचा क्लब मध्ये. तुम्ही किती लोक येणार आहात ते मला कळवा प्लीज. त्यानुसार ऑर्डर देता येईल.

दिग्या- कुठे कळवू तुला? तुझा नंबर नाहीये माझ्याकडे.

आता ह्याला नंबर द्यावा लागणार हे लक्षात येऊन अपूर्वा ने जीभ चावली.

दिग्या- हेलो…अप्पू तुझा नंबर देऊन ठेव. मी संध्याकाळ पर्यंत सांगतो.

अपुर्वाने नाईलाजाने आपला नंबर त्याला दिला. बाकी इतरांना पण निमंत्रण देऊन ती कामाला लागली. श्रीरंग आज दिल्लीला गेला होता. संध्याकाळी अप्पू ऑफिसातून निघाली. तिने संध्याकाळचा स्पिनिंग क्लास लावला होता. ऑफिस मधून ती थेट तिथेच जायची हल्ली. आजही ती क्लासला गेली. Bag, फोन वगैरे सगळ लॉकर मध्ये ठेऊन स्पिनिंग करायला गेली. हा क्लास जॉईन केल्यापासून तिला खूप हेल्दी आणि हलक वाटू लागल होत. भरपूर वेळ स्पिनिंग करून घाम गळून शावर घेऊन कपडे बदलून अप्पू ने लॉकर मधून bag आणि फोन घेऊन रिक्षा पकडून घराकडे निघाली. फोन च डेटा नेटवर्क चालू केल्याबरोबर धाड धाड दहा मेसेज येऊन आदळले. सगळे मेसेज दिग्याचे होते. पार्टीला मी एकटाच येईन. You will have to look after me पासून पुण आवडलं का? अमुक रेस्तोरंत ला गेलीस का? आपण एकदा जाऊ पर्यंत फुल on पटवा पटवीचे मेसेज होते. ते वाचून अपूर्वाला हसू आल. त्या नंतर पार्टीच्या दिवसांपर्यंत दिग्या ने मेसेज चा भडीमार केला होता. फेसबुकवर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. दोन तीन वेळा मुद्दाम मध्या च्या घरी जाऊन तिला भेटला होता. अपूर्वा शांतपणे त्याची गंमत बघत होती.

शेवटी ३१ डिसेंबर आला. ऑफिस स्टाफ ला आज हाफ डे दिला होता. सगळे आपापल्या घरी जाऊन तयार होऊन श्रीरंग सरांच्या पार्टीला येणार होते. अपूर्वा काम करत होती. श्रीरंग केबिन मधून बाहेर आला. घरी निघाला होता. अपूर्वला अजून ऑफिसात पाहून आश्चर्याने म्हणाला-

श्रीरंग- अपूर्वा तू अजून इथेच? घरी जा. चेंज कर आणि पार्टी ला ये.

अपूर्वा- नाही सर. सत्यम फूड्स चा ओडीट रिपोर्ट आज पाठवायचा आहे. तो वेळेवर जायला हवा.

श्रीरंग- तो रिपोर्ट माझ्याकडून delay झालाय. मी बोलू का त्याचे md कुलकर्णींशी?

अपूर्वा- नको सर. आजची डेड लाईन आहे आणि रिपोर्ट आजच जाईल. आपल्याकडून delay नको. तुम्ही जा. मी direct येते. चेंज करायला वेळ नाही मिळणार मला.

श्रीरंग- पण अपूर्वा…

अपूर्वा- ह्या सध्या ड्रेस मध्ये चांगली नाही का दिसत मी?

श्रीरंग- नाही. मला तस नव्हत म्हणायचं…पण पार्टी आहे म्हणजे…सोड…तू ऐकणार नाहीस. आहेस तशी छान दिसते आहेस. अशीच ये. No problem.

अपूर्वा- thank you sir.

श्रीरंग घरी गेला. अपूर्वा कामात गढून गेली.

संध्याकाळी क्लब मध्ये श्रीरंग चे अनेक नवे जुने क्लायंट, फ्रेंड्स, कलीग्स, पुण्यातील काही आमदार, नगर सेवक, एक मंत्री वगैरे मंडळी जमू लागली होती. अपूर्वा ऑफिस मध्ये बसून तिच्या कलीग्स बरोबर आणि क्लब च्या manager बरोबर सगळ को ओर्डीनेट करत होती. श्रीरंग तिची वाट बघत होता. दिग्या पण तिलाच शोधात होता. ती ऑफिसात मेल सेंड करून सिस्टीम बंद करत होती. इतक्यात श्रीरंग चा फोन आला.

श्रीरंग- कुठे आहेस अपूर्वा? सगळे गेस्ट आलेत.

अपूर्वा- सर वीस मिनिटात पोहोचते. निघतच आहे.

श्रीरंग- लवकर ये.

श्रीरंग चा फोन कट झाला आणि दिग्याचा फोन आला.

दिग्या- अपु कुठे आहेस तू? मी क्लब मध्ये आलोय. पण दिसत नाहीयेस.

अपूर्वा- सर मी अजून आले नाहीये.

दिग्या- काय? आम्हाला इथे बोलावून तूच आली नाहीस? ए मला जाम बोअर होईल हा. तू प्रोमीस केल आहेस की मला कंपनी देशील म्हणून.

अपूर्वा- हो सर. मी येतेच आहे. ठेऊ?

दिग्या- लवकर ये यार.

अपूर्वा लगबगीने बाथरूम मध्ये गेली.

इथे पार्टी रंगात आली होती. गेस्ट श्रीरंग ला गिफ्ट देत होते. शुभेच्छा देत होते. बार ओपेन झाला होता. थंडी भरपूर होती. काही लोक पूल साईड ला आणि काही आत होते. श्रीरंग अपूर्वाची वाट बघत होता. ती आल्याशिवाय तो केक कापणार नव्हता. इतक्यात अपूर्वा आली. आज तिने साडी नेसली होती. हलका मेक अप. मोकळे सोडलेले केस. ती आल्यावर अनेक पुरुषांच्या नजरा तिच्यावर खिळून ती जात असलेल्या दिशेला त्यांच्या माना वळत होत्या. अपुर्वाने त्याला ती साध्याच ड्रेस मध्ये येणार आहे हे सांगितल्याच श्रीरंग ला आठवल. आणि आता तिला सुंदर साडी नेसून आपल्या दिशेने येताना पाहून श्रीरंगला ती एकदम हाय स्पीड (स्लो मोशन) मध्ये त्याच्या दिशेने येते आहे. बाकी कोणीच तिथे नाहीये अस काहीतरी वाटल आणि तितक्यात ती त्याच्या पुढ्यात होती. तिने हात पुढे करत श्रीरंगशी हस्तांदोलन केल आणि त्याला गिफ्ट दिल. मग त्याला मिठी मारून त्याच्या कानात happy birthday sir अस पुटपुटली आणि दूर झाली. श्रीरंग मात्र तिच्या इतक्या समीपच्या स्पर्शाने, तिच्या परफ्युम च्या वासाने काही क्षण हरवून गेला. आणि इतक्यात दिग्या चा आवाज आला आणि श्रीरंग भानावर आला.

दिग्या- हाय अप्पू? किती वेळ? कुठे होतीस? गेस्ट ना अस ताटकळत ठेऊ नये. Come have a drink. It’s too cold.

अपूर्वा- सर मी थोड्या वेळाने घेते. आताच आले आहे. जरा सगळ्या गेस्ट ना भेटते.

दिग्या- सगळ्या गेस्ट ना? तू मला प्रोमीस केल आहेस ना? मग मला भेट.

बाकीच्यांना हा रंगा entertain करेल. काय रंगा?

इतक्यात मध्या, त्याची बायको, उत्तम आणि त्याची बायको तिथे आले. मध्याच्या बायकोने मुद्द्दाम विचारलं.

मध्याची बायको- काय दिगंबर भावोजी वहिनींना आणल नाही का पार्टीला?

दिग्या- मी कोण आणणार तिला? तिची ती हुशार आहे. तिला काहीतरी काम होत म्हणून नाही आली. मी साईट वरून डायरेक्ट आलो.

मध्या- दिग्या तू आमच्या अपूर्वाला म्हणे गुड मोर्निंग, गुड नाईट संदेश पाठवतोस रोज.

दिग्या मंझा हुवा खिलाडी होता. अनेक बायकांना पटवण्याचा अनुभव त्याच्याकडे होता. काही वेळा पकडला देखील गेला होता. प्रकरण दोघांच्या घरापर्यंत गेली होती. त्यामुळे त्याला अश्या डायरेक्ट प्रश्नांनी काहीच फरक पडत नसे. त्याची लफडी ओपनली केलेली होती. त्यामुळे पकडला गेलो तर वगैरे भीती त्याला अजिबात नव्हती. तो शांतपणे म्हणाला-

दिग्या- म्हणजे काय? तिचा दिवस आणि रात्र दोन्ही चांगले जावे अस मला मनापासून वाटत आणि त्यासाठीच मी तिला दिवस रात्र शुभेच्छा देतो.

उत्तम- दिग्या सुधारणार नाहीस ना तू? अरे किमान मध्या च्या सालीला तर सोड.

दिग्या- साली आधी घरवाली असते. मग तिला का सोडायचं. हे तर मी अपु ला पण सांगितल आहे. हो की नाही अप्पू?

अपूर्वा ने फक्त एक स्माईल केल. श्रीरंग ला मात्र दिग्याचा जाम राग येत होता. खर तर त्याची गरज नव्हती. त्याने ह्या आधी अनेक बायकांना पटवलं होत. त्याची रसभरीत वर्णन श्रीरंग ने ऐकली होती. पण त्याला त्याचा राग कधीच आला नव्हता. फक्त दिग्याची काळजी वाटली होती की कधी अडकला तर बाराच्या भावात जाईल अशी. पण आज त्याची चिडचिड होत होती.

दिग्या- अपु…चल ना यार..बार वाट बघतोय. मग डान्स फ्लोर पण आहे. लेट्स गो.

अपूर्वा- सर तुम्ही काय म्हणालात मित्राची साली तुमची पण आधी घरवाली. बरोबर ना?

दिग्या- of cours.

अपूर्वाने आपला हात त्याच्या पुढे धरला. दिग्याने आनंदाने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि सर्वांकडे विजयी नजरेने पाहिलं. श्रीरंग ला संताप अनावर होत होता.

अपूर्वा- (दिग्याला) सर, मी जीजूंना भाऊ मानते. मग त्याच नात्याने भावाचा मित्र म्हणजे माझाही भाऊ झाला ना? म्हणुनच आज आपल हे नात दृढ करायला मी राखी घेऊन आले आहे तुमच्यासाठी. सर्वांच्या समक्ष बांधते. सध्या सिझन नसल्याने खूप शोधावी लागली. पण तुळशी बागेत मिळाली एकदाची. जरा महाग पडली. पण दादासाठी थोडी काय मी खूप महाग राखी पण घेऊ शकते.

दिग्याला काही कळायच्या आत तिने त्याच्या मनगटावर राखी बांधली सुद्धा. हे पाहून दिग्या सकट सगळे चक्रावून गेले. फक्त अपूर्वा काय चीज आहे हे पूर्ण माहित असलेले मध्या आणि त्याची बायको मात्र गालातल्या गालात हसत होते. अपूर्वने दिग्या चा हात धरला आणि म्हणाली-

अपूर्वा- तुम्हाला मी सर म्हटलेलं आवडत नाही ना? मग तुमच्या इच्छेचा मान राखत आजपासून मी तुम्हाला सर नाही दादा म्हणणार आहे. दादा जाउया ना? बार बोलावतो आहे. थंडी खूप आहे. डान्स फ्लोर आपल्याला खुणावतो आहे.

अपूर्वा पूर्ण भंजाळलेल्या दिग्याला हाताला धरून घेऊन गेली. श्रीरंग सुन्न होता. इतक्यात मध्याची बायको म्हणाली-

मध्याची बायको- रंगा भावजी अशी आहे आमची अप्पू. कोणी जरा वाकड्यात गेला किंवा गळ्यात पडायचा प्रयत्न केला की थेट राखी बांधते. त्या उपर जर तो सुधारला नाही तर मुस्काट रंगवते.

मध्याच्या बायकोच हे वाक्य रंगाच्या मानावार आणि मेंदूवर कोरलं गेल. तो बार कडे बघत होता. अपूर्वा आणि दिग्या ड्रिंक घेत होते. अपूर्वा उत्साहाने काहीतरी सांगत होती आणि दिग्या खांदे पाडून बोर होत ते ऐकत होता. पुढे केक कापून झाला. बारा वाजून गेल्यावर न्यू इयर शुभेच्छा देऊन झाल्या. सगळी मंडळी आपापल्या घरी गेली.

रात्री घरी गेल्यावर श्रीरंग एक एक गिफ्ट उघडून बघत होता. त्याच वेळी त्याच लक्ष अपूर्वा ने दिलेल्या गिफ्ट वर गेल. त्याने गिफ्ट उघडून पाहिलं. त्यात एक कलोन ची १०० मिली ची बाटली होती आणि एक चिठ्ठी होती. तो चिठ्ठी वाचू लागला.

चिठ्ठी- सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या…नाही आपल्या फार्म ला पंचवीस वर्ष झाली त्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा. गेल्या काही महिन्यात तुमच्याकडून खूप शिकायला मिळाल आणि पुढेही शिकणार आहे. मला आपल्या फर्म मध्ये कामाची संधी दिल्याबद्दल तुमचे आभार. सर मला ना तुम्ही एखाद्या यशस्वी योद्ध्या सारखे वाटता. Confident, caring, successful, forgiving, matured, intelligent…and yes good looking पण. सॉरी तुमच्या रुपाबद्दल पर्सनल कॉमेंट करते आहे. पण सर मला जे वाटतं ते मनापासून लिहिते आहे. तर अश्या यशस्वी योद्ध्याला साजेसा फ्रेग्रंस तुम्हाला गिफ्ट करते आहे. आशा आहे तुम्हाला तो आवडेल. नाही आवडला तरी अजिबात राग नाही. फ्रेग्रंस ही अत्यंत खाजगी बाब आहे. पण तुम्हाला जे कलोन दिल आहे त्याचा फ्रेग्रंस मला यशस्वी योध्याचा वावतो म्हणून तुम्हाला दिला आहे. काही जास्त बोलले असेन तर सॉरी. अपूर्वा…

श्रीरंग ने ते कलोन उघडून थोड आपल्या मनगटावर उडवून त्याचा वास घेतला. त्याला तो वास कम्माल आवडला. मग त्याला अपूर्वा ने दिग्याला राखी बांधली तो प्रसंग आठवून हसू आलं आणि नंतर मध्याच्या बायकोने जे सांगितल ते पण आठवल. सगळ्या गिफ्ट उघडून, बघून श्रीरंग झोपी गेला.

दुसर्या दिवशी श्रीरंग ऑफिसला आला. महत्वाचे कॉल, on line मिटिंग वगैरे संपवून त्याने अपूर्वाला एका क्लायंटची फाईल घेऊन आत बोलावलं. ती यायच्या आधी मोबाईल च्या सेल्फी कॅमेरा मध्ये स्वतःला न्याहाळल. इतक्यात अपूर्वा आली.

अपूर्वा- हेलो सर…

श्रीरंग- हाय अपूर्वा…thanks for the lovely gift.

अपूर्वा- आवडलं सर तुम्हाला?

श्रीरंग- yes.

अपूर्वा- चला बर झाल. मला भीती होती की आवडेल की नाही. कारण सर फ्रेग्रंस ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे ना.

श्रीरंग- हो. पण आवड सारखी असू शकते ना? तू काल मारलेलं परफ्युम पण मला आवडलं.

श्रीरंग हे बोलून गेला आणि त्याच्या लक्षात आल की तो काय बोलून गेलाय. अपूर्वा ने देखील त्याच्याकडे चमकून पाहिलं. काही सेकंद ओक्वर्द पॉज. मग घसा खाकरत श्रीरंग म्हणाला-

श्रीरंग- हा जरा ती फाईल बघू.

अपूर्वने त्याला फाईल दिली आणि ती समोर ताटकळत उभी राहिली. श्रीरंग फाईल मधले पेपर्स बघत होता. त्याने वर न बघता हातानेच अपूर्वला इथे ये अशी खूण केली. अपूर्वा जाऊन त्याच्या खुर्चीच्या मागे उभी राहून फाईल बघू लागली. ती जरा खाली वाकल्यावर तिला श्रीरंगच्या कलोनचा वास आला. तेच जे तिने काल त्याला गिफ्ट केल होत. इतक्यात श्रीरंग म्हणाला-

श्रीरंग- ही डेप्रिसिएशन ची फिगर चूक आहे. जरा चेक कर परत एकदा.

अपूर्वा- हो सर. बघते. सर तुम्ही मी गिफ्ट दिलेलं कलोन मारलं आहे?

श्रीरंग- ह..हो…मी म्हणालो ना मला आवडलं म्हणून?

अपूर्वा- सर तुम्हाला खूप सूट करत ते. Thanks.

इतक बोलून अपूर्वा जाऊ लागली. श्रीरंग ने त्याच्या laptop मध्ये डोकं घातलं आणि तो नकळत काल झोपताना ऐकलेलं गाण गुणगुणू लागला. “रोज रोज आंखो तले”….ते ऐकून दाराजवळ गेलेली अपूर्वा वळून परत येत म्हणाली-

अपूर्वा- सर तुम्ही चक्क आरडी च गाण गाताय?

श्रीरंग- हो…काल झोपताना ऐकत होतो. फार सुदिंग गाणी आहेत काही. हे त्यातलच एक.

अपूर्वा- आणि मी कुमार गंधर्व ऐकते आहे काही दिवस. अमेझिंग आहेत ते.

श्रीरंग- हम्म…बर मला एक सांग…तू आमच्या दिग्या ला चक्क राखी बांधलीस काल? कमाल आयडीया होती ती. कस काय सुचल तुला?

अपूर्वा- सर, दिगंबर दादा चांगले आहेत. पण नजर वाईट आहे त्यांची. आणि मला तर लगेच कळते नजर. मी एकटी आहे म्हणजे अव्हेलेबल आहे अस नाही ना होत? मी जोवर चांगली आहे तोवर चांगली आहे. मला एकटी समजून पण कोणी चान्स मारायचा, गळ्यात पडायचा, सहानुभूती दाखवायचा, मैत्री किंवा हक्क सांगायचा प्रयत्न केला तर अश्या लोकांना मी माझ्या स्टाईने सरळ करते. आधी राखी आणि नाही सुधारला तर लाठी असा साधा हिसाब आहे माझा.

इतक बोलून अपूर्वा केबिन मधून निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकर्षक आकृतीकडे बघत हरवलेल्या श्रीरंग ला कोणीतरी जोरात कानफटात मारली. गाल चोळत त्याने पाहिलं तर त्याच्या समोर अपूर्वा रागाने थरथरत उभी होती. तिच्या हातात राखी होती.

अपूर्वा- हात…

श्रीरंग ने हात पुढे केला. तिने त्याच्या हाताला राखी बांधली आणि म्हणाली-

अपूर्वा- माझ्या पाठीला पण डोळे आहेत. बघण सोडा, माझ्या बद्दल मनात वाईट विचार जरी आला ह्यापुढे तर माझ्याशी गाठ आहे. कामाशी काम ठेवा सर. लाईन क्रोस करू नका.

इतक त्याला सुनावून ती तरातरा निघून गेली. ती गेल्यावर श्रीरंग ने रागाने तिने बांधलेली राखी काढून टेबल वर टाकली. इतक्यात त्याला विजय प्यून चा आवाज आला.

विजय- सर घड्याळ का टाकल टेबल वर. अहो तुटेल ना ते.

ते ऐकून श्रीरंग भानावर आला. समोर विजय चहा चा ट्रे घेऊन उभा होता. श्रीरंग ने आपल्या हाताकडे आणि टेबल वर पाहिलं. राखी कुठेच नव्हती. त्याच घड्याळ मात्र टेबल बर पाडलेल होत. थोडक्यात अपूर्वा ने त्याला राखी बांधली हा त्याला झालेला भास होता. पण श्रीरंग ने त्याचा धसका मात्र घेतला होता. विजय ने ठेवलेला चहा सिप करत त्याने मोबाईल मध्ये आर डी हिट्स लावले. नेमक जे गाण लागल ते होत “सच मेरे यार है, बस वोही प्यार है, जिसके बदले में कोई तो प्यार दे…बाकी बेकार है…यार मेरे”

क्रमश:

व्हालेंटाईन डे…(चौथा भाग)

श्रीरंगला लक्षात आल होत की तो अपूर्वाच्या प्रेमात पडला होता. पण त्याचा काहीच उपयोग नाही हे त्याला माहित होत. प्रेमाची कबुली दिली तर ती नक्की राखी बांधेल आणि आपली बहिण होईल ह्याची भीती होती. श्रीरंगला ते अजिबात नको होत. आज निदान कलीग, मैत्रीण तरी आहे. उद्या बहिण झाली तर तिच्याबद्दल मनात प्रेमाचे विचार येण देखील पाप असेल अस त्याला वाटत होत. तो ऑफिसमध्ये असला की अपूर्वा शी बोलण होत असे. हल्ली अपूर्वा जरा जास्तच सुंदर दिसू लागली आहे अस त्याला वाटू लागल होत. तिच्या पेहराव, मेक अप वगैरे मध्ये बदल होऊन ती जास्तीच आकर्षक दिसू लागल्याच त्याच्या लक्षात येत होत. ते खरच तस आहे की आपण प्रेमात असल्याने आपल्यालाच तस वाटतंय हे त्याला कळत नव्हत. पण तो अपूर्वाला न्याहाळत असे. तिच्या लक्षात तर येत नाही ना ह्याची एक भीती त्याच्या मनात असे. त्यामुळे अपुर्वाने विचारलेल्या साध्या प्रश्नावर देखील तो गडबडत असे. इतका हुशार आणि शार्प माणूस असा काय fumble होतोय ह्या विचाराने अपूर्वाला हसू येत असे. पण ती ते दाबून काम संपवून केबिन बाहेर आल्यावर हसत असे.

जानेवारी महिना ह्याच गुंतागुंतीत गेला. श्रीरंग ला आता असह्य होत होत. प्रपोज करून काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा अस त्याला सतत वाटू लागल होत. पण राखी बांधून घ्यायला तो तयार नव्हता. अपूर्वाच्या वागण्यात काहीच सिग्नल मिळत नव्हता. ती सर्वांशीच मोकळेपणाने वागत असे तशीच श्रीरंग शी पण वागत होती. बाकी तिचा नो नॉन सेन्स अवतार पाहिला असल्याने श्रीरंग पुढाकार घेऊन प्रपोज करायची हिम्मत गोळा करू शकत नव्हता.

त्या दिवशी संध्याकाळी खेळून झाल्यावर श्रीरंग ने ड्रिंक मागवलं. ते पाहून मध्या आणि आणि दिग्या चाट पडले.

मध्या- काय रे रंगा…आज चक्क क्लब मध्ये ड्रिंक? तू घरी जाऊन घेतोस ना?

श्रीरंग- सोड ना यार. कुठे घेतो त्याने काय फरक पडतो. डोक फिरलंय माझ.

मध्या- काय झाल?

श्रीरंग- काही नाही. सोड ना.

दिग्या- रंगा साल्या आम्ही यार लोक असताना असा सडू चेहरा करून बसणार तू. सांग तर काय लोचा आहे ते. आपण फोडू जो कोण वाकड्यात गेलाय त्याला.

श्रीरंग- ए मध्या तू ह्या दिग्याला सांग यार. आमच्या फिल्ड मध्ये ह्याच्या फिल्ड सारखे राडे, लाच आणि लफडी करावी लागत नाहीत. सो प्लीज हे गाडू, तोडू फोडू नको.

दिग्या- बर राहील. तुझा धंदा सभ्य आणि आमचा चोरीचा ना? तरी बर तुझ्या बिल्डींगच री डेव्हलपमेंट मीच केल आहे. कस केलय काम ते पण सांग ना मध्या ला.

श्रीरंग- सॉरी यार दिग्या. मला तस म्हणायचं नव्हत. डोक फिरलं आहे सध्या माझ.

दिग्या- बाई च matter आहे का?

हे ऐकून श्रीरंग ने चमकून त्याच्याकडे पाहिलं.

दिग्या- असा घाबरतो काय? असेल तर असू दे की. आपण त्यात पण मदत करू. ह्या मध्या ची ती साली…काय रे नाव तीच?

श्रीरंग- अपूर्वा…

दिग्या- हा अपूर्वा…तिने राखी बांधली म्हणून मी थांबलो का? तर नाही. ती नाही तर और सही. एक गायिका आहे सध्या माझ्या रडार वर.

मध्या- गायिका?

दिग्या- हो. अरे असेच लहान सहान गाण्याचे प्रोग्राम करते. माझ्या कंपनीने एक banner स्पोन्सर केला होता. म्हणून मला चीफ गेस्ट बोलावलं होता. सत्कार केला माझा. मग प्रोग्रामला बसलो. आवाजापेक्षा बाईच आवडली मला. नंबर वगैरे घेतला आहे. ऐशी टक्के ग्यारेन्ती आहे काम होणार. तुझ्या त्या अपूर्वाच्या बाबतीत दहा टक्के पण नव्हती. ती थोडी सरकलेली आहे हे आधीच माहित होत. पण मी खडा टाकून पाहिला. टेंडर असो की बाई Never leave any stone unturned हे माझ तत्व आहे. माझ सोड.. ए रंगा तू बोल ना. तुला काय झालंय बाबा.

श्रीरंग- अरे काय सांगू…

श्रीरंग अपूर्वा बद्दल काय वाटत ते सांगणार होता. पण त्याला दिग्या समोर ते बोलायला awkward वाटल. त्यात दिग्याला १०% शक्यता वाटत असलेली अपूर्वा दिग्याला, इतक्या अनुभवी माणसाला पटली नाही तर मला काय घंटा पटणार हा विचार मनात येऊन तो आणखी hurt झाला आणि त्याने समोर असलेला ग्लास एका घोटात संपवला. आठ वाजले होते. तिघे क्लब मधून निघाले. दिग्या आमदार साहेबांच्या घरी पार्टीला गेला. मध्या ने श्रीरंग च्या ड्रायव्हरला त्याच्या गाडीच्या मागून यायला सांगितल आणि श्रीरंग ला स्वतःच्या गाडीत बसवून तो घरी घेऊन आला. ते आले तेव्हा अपूर्वा निघत होती.

मध्या- अपु ह्या वेळी कुठे?

मध्या ची बायको- अहो शेजारच्या रश्मी आणि इतर पोरींबरोबर सिनेमा बघायला जाते आहे.

अपूर्वा- हेलो सर.

श्रीरंग- हेलो…

अपूर्वा- गुड नाईट सर.

श्रीरंग- गुड नाईट.

अपूर्वा गेली. हे दोघे घरात येऊन बसले. मध्या च्या बायकोने डोळ्याने खुण करून हा इथे कसा? सगळ ठीक आहे ना विचारलं. त्याने हो. काळजी नको करू. अस सांगितल. मग मध्याची बायको माधुरी म्हणाली-

माधुरी- रंगा भावोजी आला आहात तर जेऊनच जा आता. जेवण तयार आहे.

श्रीरंग- ठीक आहे.

मध्याच्या घरी त्याला अजिबात परक वाटत नसल्याने तो लगेच तयार झाला. इतकी ती मैत्री घट्ट होती. तिघे जेवयाला बसले. श्रीरंग फार काही बोलत नव्हता. मध्या ने माधुरीला खुण केली की तू विचार त्याला.

माधुरी- काय हो रंगा भावोजी. असे गप्प गप्प का? काय झालंय?

श्रीरंग- काही नाही…

माधुरी- अस कस. काहीतरी नक्की झालंय. नाहीतर असा पापड मोडत नाही तुमचा. आता सांगायचं नसेल तर नका सांगू. मी आहे त्याची अडचण आहे का? मी आत जाते हव तर.

हे बोलून माधुरी उठली.

श्रीरंग- वहिनी प्लीज. तुही असल्यावर अडचण कसली. तुमच्यापासून काय लपवलं मी आणि स्वाती ने देखील. आणि आता ज्याचा त्रास होतोय ते तर तुमच्याशीच निगडीत आहे.

हे ऐकून मध्या आणि माधुरी चकित झाले.

माधुरी- माझ्याशी निगडीत? भावोजी असे कोड्यात नका बोलू. जे आहे ते सांगा स्पष्ट.

श्रीरंग- वहिनी मी तुमच्या अपूर्वाच्या प्रेमात पडलोय. काय करू कळत नाहीये. तिचा सडेतोड स्वभाव आहे. त्याची भीती वाटते मला. मन मोकळ केल तर राखी बांधेल मला दिग्याला बांधली तशीच. आणि मला ते अजिबात आवडणार नाही. आणि रोज तिला समोर बघून जे आहे ते मनात ठेऊन जगायचा पण कंटाळा आलाय. काय करू काळात नाहीये.

हे ऐकून धक्का बसलेल्या मध्या आणि मधुरीनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं. श्रीरंग ताटाकडे बघत बोलत होता.

श्रीरंग- करून टाकू का मी सरळ प्रपोज? जे होईल ते होऊ दे मग. राखी बांधायला आली तर मी बांधून नाहि घेणार. जबरदस्ती काय आहे राखी बांधायची?

माधुरी- (सिरीयस स्वरात) नको…

श्रीरंग- काय नको वहिनी?

माधुरी- भावोजी प्लीज अशी चूक करू नका. आमची अपूर्वा कणखर असली तरी खूप सेन्सिटीव आहे. तुमचा खूप आदर करते ती. तुम्हाला गुरु स्थानी मानते. ऑफिसातून आल्यावर रोज मला सांगते की सर असे आहेत. सर तसे आहेत. आज मला हे शिकायला मिळाल. ते समजल. तुम्ही तिचे आदर्श आहात. आणि तिच्या गुरूच्या, आदर्शाच्या मनात तिच्याबद्दल अश्या प्रकारच्या भावना आहेत हे तिला कळल ना तर ती खूप hurt होईल. मामाच्या जाण्याच्या दु:खातून आता कुठे सावरते आहे. त्यात परत हा आघात नको.

मध्या- हो रंगा. माधुरी म्हणते आहे ते योग्य आहे. हे बघ..मला कळतंय की स्वाती वहिनी गेल्यावर तू एकटा आहेस. तुलाही कोणाची तरी साथ हवी आहे. आपण शोधू ना यार. तू हे आधी सांगितल असत तर एव्हाना एक छान बायको शोधली असती ना आपण तुझ्यासाठी. अरे हल्ली अनेक वेब साईट आहेत सेकंड म्यारेज साठी. आपण तिथे तुझ नाव नोंदवू. कोणीतरी नक्की मिळेल. पण अप्पू नको यार. मला नाही वाटत तिला अश्या कोणत्याही रिलेशनशिप मध्ये इंटरेस्ट आहे. तिला तीच आयुष्य जगू दे. तू प्रपोज वगैरे केलस ना तर तिला खूप धक्का बसेल. कदाचित ती तो सहन नाही करू शकणार. आणि तुला तिने राखी बांधली तर तुला चालेल का?

श्रीरंग पटकन बोलून गेला-

श्रीरंग- अजिबात नाही.

मध्या- मग सोड तिचा विचार. अपूर्वा म्हणजे तुझ्या आयुष्यात असलेल मृगजळ आहे अस समज. समोर दिसतंय ह्यातच आनंद मान. ते मिळवायला गेलास तर हाती काहीच लागणार नाही. हे मी तुला अपुर्वाचा जिजा म्हणून नाही तर तुझा मित्र म्हणून सांगतोय.

त्या रात्री श्रीरंग घरी आला. त्याला मध्या आणि माधुरी जे म्हणाले ते पटल होत. पण मन ऐकायला तयार नव्हत. अपूर्वला मनातून काढून टाकण त्याला अशक्य वाटत होत पण पर्याय नव्हता. तो उशिरा झोपला. सकाळी अलार्म वाजूनही तो उठला नाही. तसाच पडून होता. काहीच करायची इच्छा होत नव्हती. त्याचा परत डोळा लागला आणि जाग आली ती थेट दहा वाजता एका कॉल आल्यावर. कॉल क्लायंत चा होता. त्याने कसाबसा तो घेतला आणि मग उठून बाई ने फ्लास्क मध्ये ठेवलेला चहा कपात ओतून सिप करत तो बाल्कनीत येऊन झोपाळयावर बसला. स्वातीला आवडायचा तो झोपाळा म्हणून त्याने जुन्या घरातून तिची आठवण म्हणून इथे आणला होता. त्यावर बसल्यावर त्याला स्वातीची आठवण येत असे. आजही आली. तो उठून हॉल मध्ये लावलेल्या तिच्या मोठ्या फोटोसमोर आला आणि म्हणाला-

श्रीरंग- का गेलीस मला सोडून तू? बघते आहेस ना किती एकाकी झालोय मी ते? आपला ओंकार…ओम अमेरिकेत आणि मी इथे…तू कुठेच नाहीस…हे काय झाल ग स्वाती…आठवतात का तुला आपले आनंदाचे दिवस? आपल लग्न, ओम चा जन्म…माझी प्रगती…त्यात तुझी साथ…आपल्या फोरेन ट्रिप्स…तुझा तो झोपाळा…सगळ मागे सोडून गेलीस ग तू…पण तुझ्या वाटणीचा wardrobe अजूनही आहे आपल्या खोलीत….तुझी प्रत्येक साडी, ड्रेस आणि दागिने तसेच आहेत त्यात…अगदी तुझा चष्मा, घड्याळ आणि टूथ ब्रश पण मी घेऊन आलोय ह्या घरात…सगळ सगळ आहे…फक्त तू नाहीस….कसा जगू मी हे उरलेलं आयुष्य एकट्याने…? इतकी का स्वतःची सवय लावलीस मला? आणि सवय लावून अशी अचानक साथ सोडून का गेलीस? काय अवस्था झाली आहे बघ माझी. वेड्यासारखा त्या अपूर्वाच्या मागे लागलोय…मला तू दिसतेस तिच्यात स्वाती…काय करू मी? मला अस वाटत की ती तुझ्यासारखीच मला समजून घेईल, माझी काळजी घेईल, माझ्यावर प्रेम करेल, माझ आयुष्य आनंदाने भरून टाकेल…तू भरलं होतंस तसच…तुझी जागा कोणीच घेउ शकणार नाही स्वाती…पण माझ्या आयुष्यात तू गेल्यावर जी पोकळी आहे ना ती मला खाते आहे रोज…ती भरून काढायला कोणीतरी हवय स्वाती…खूप एकाकी आहे मी…आणि ती पोकळी अपूर्वा भरून काढेल अस मला वाटत…पण तिच्या मनात तस काहीच नाहीये…मला वाटत माझ नशीबच खराब आहे…आता खरच जगायची फार इच्छा नाहीये स्वाती…..कदाचित मी लवकरच तुझ्याकडे येईन…नाही मी weak नाहीये…पण इच्छाच नाहीये आता कशाचीच…एकटा जिवंत आहे मी…पण ह्याला जगण म्हणता येणार नाही….आणि ज्यात जगण नाही अस जिवंत राहण्याला काय अर्थ आहे स्वाती….

हे बोलून श्रीरंग त्या फोटोला डोक टेकून ढसा ढसा रडू लागला. तेव्हा त्या फोटोवर बाष्प जमा झाल्याचा त्याला भास झाला. त्याच वेळी मागे सोफ्यावर ठेवलेला त्याचा फोन वाजत होता. त्यावर अपूर्वा हे नाव दिसत होत.©मंदार जोग

क्रमश:

व्हालेंटाईन डे…(चौथा भाग)

श्रीरंगला लक्षात आल होत की तो अपूर्वाच्या प्रेमात पडला होता. पण त्याचा काहीच उपयोग नाही हे त्याला माहित होत. प्रेमाची कबुली दिली तर ती नक्की राखी बांधेल आणि आपली बहिण होईल ह्याची भीती होती. श्रीरंगला ते अजिबात नको होत. आज निदान कलीग, मैत्रीण तरी आहे. उद्या बहिण झाली तर तिच्याबद्दल मनात प्रेमाचे विचार येण देखील पाप असेल अस त्याला वाटत होत. तो ऑफिसमध्ये असला की अपूर्वा शी बोलण होत असे. हल्ली अपूर्वा जरा जास्तच सुंदर दिसू लागली आहे अस त्याला वाटू लागल होत. तिच्या पेहराव, मेक अप वगैरे मध्ये बदल होऊन ती जास्तीच आकर्षक दिसू लागल्याच त्याच्या लक्षात येत होत. ते खरच तस आहे की आपण प्रेमात असल्याने आपल्यालाच तस वाटतंय हे त्याला कळत नव्हत. पण तो अपूर्वाला न्याहाळत असे. तिच्या लक्षात तर येत नाही ना ह्याची एक भीती त्याच्या मनात असे. त्यामुळे अपुर्वाने विचारलेल्या साध्या प्रश्नावर देखील तो गडबडत असे. इतका हुशार आणि शार्प माणूस असा काय fumble होतोय ह्या विचाराने अपूर्वाला हसू येत असे. पण ती ते दाबून काम संपवून केबिन बाहेर आल्यावर हसत असे.

जानेवारी महिना ह्याच गुंतागुंतीत गेला. श्रीरंग ला आता असह्य होत होत. प्रपोज करून काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा अस त्याला सतत वाटू लागल होत. पण राखी बांधून घ्यायला तो तयार नव्हता. अपूर्वाच्या वागण्यात काहीच सिग्नल मिळत नव्हता. ती सर्वांशीच मोकळेपणाने वागत असे तशीच श्रीरंग शी पण वागत होती. बाकी तिचा नो नॉन सेन्स अवतार पाहिला असल्याने श्रीरंग पुढाकार घेऊन प्रपोज करायची हिम्मत गोळा करू शकत नव्हता.

त्या दिवशी संध्याकाळी खेळून झाल्यावर श्रीरंग ने ड्रिंक मागवलं. ते पाहून मध्या आणि आणि दिग्या चाट पडले.

मध्या- काय रे रंगा…आज चक्क क्लब मध्ये ड्रिंक? तू घरी जाऊन घेतोस ना?

श्रीरंग- सोड ना यार. कुठे घेतो त्याने काय फरक पडतो. डोक फिरलंय माझ.

मध्या- काय झाल?

श्रीरंग- काही नाही. सोड ना.

दिग्या- रंगा साल्या आम्ही यार लोक असताना असा सडू चेहरा करून बसणार तू. सांग तर काय लोचा आहे ते. आपण फोडू जो कोण वाकड्यात गेलाय त्याला.

श्रीरंग- ए मध्या तू ह्या दिग्याला सांग यार. आमच्या फिल्ड मध्ये ह्याच्या फिल्ड सारखे राडे, लाच आणि लफडी करावी लागत नाहीत. सो प्लीज हे गाडू, तोडू फोडू नको.

दिग्या- बर राहील. तुझा धंदा सभ्य आणि आमचा चोरीचा ना? तरी बर तुझ्या बिल्डींगच री डेव्हलपमेंट मीच केल आहे. कस केलय काम ते पण सांग ना मध्या ला.

श्रीरंग- सॉरी यार दिग्या. मला तस म्हणायचं नव्हत. डोक फिरलं आहे सध्या माझ.

दिग्या- बाई च matter आहे का?

हे ऐकून श्रीरंग ने चमकून त्याच्याकडे पाहिलं.

दिग्या- असा घाबरतो काय? असेल तर असू दे की. आपण त्यात पण मदत करू. ह्या मध्या ची ती साली…काय रे नाव तीच?

श्रीरंग- अपूर्वा…

दिग्या- हा अपूर्वा…तिने राखी बांधली म्हणून मी थांबलो का? तर नाही. ती नाही तर और सही. एक गायिका आहे सध्या माझ्या रडार वर.

मध्या- गायिका?

दिग्या- हो. अरे असेच लहान सहान गाण्याचे प्रोग्राम करते. माझ्या कंपनीने एक banner स्पोन्सर केला होता. म्हणून मला चीफ गेस्ट बोलावलं होता. सत्कार केला माझा. मग प्रोग्रामला बसलो. आवाजापेक्षा बाईच आवडली मला. नंबर वगैरे घेतला आहे. ऐशी टक्के ग्यारेन्ती आहे काम होणार. तुझ्या त्या अपूर्वाच्या बाबतीत दहा टक्के पण नव्हती. ती थोडी सरकलेली आहे हे आधीच माहित होत. पण मी खडा टाकून पाहिला. टेंडर असो की बाई Never leave any stone unturned हे माझ तत्व आहे. माझ सोड.. ए रंगा तू बोल ना. तुला काय झालंय बाबा.

श्रीरंग- अरे काय सांगू…

श्रीरंग अपूर्वा बद्दल काय वाटत ते सांगणार होता. पण त्याला दिग्या समोर ते बोलायला awkward वाटल. त्यात दिग्याला १०% शक्यता वाटत असलेली अपूर्वा दिग्याला, इतक्या अनुभवी माणसाला पटली नाही तर मला काय घंटा पटणार हा विचार मनात येऊन तो आणखी hurt झाला आणि त्याने समोर असलेला ग्लास एका घोटात संपवला. आठ वाजले होते. तिघे क्लब मधून निघाले. दिग्या आमदार साहेबांच्या घरी पार्टीला गेला. मध्या ने श्रीरंग च्या ड्रायव्हरला त्याच्या गाडीच्या मागून यायला सांगितल आणि श्रीरंग ला स्वतःच्या गाडीत बसवून तो घरी घेऊन आला. ते आले तेव्हा अपूर्वा निघत होती.

मध्या- अपु ह्या वेळी कुठे?

मध्या ची बायको- अहो शेजारच्या रश्मी आणि इतर पोरींबरोबर सिनेमा बघायला जाते आहे.

अपूर्वा- हेलो सर.

श्रीरंग- हेलो…

अपूर्वा- गुड नाईट सर.

श्रीरंग- गुड नाईट.

अपूर्वा गेली. हे दोघे घरात येऊन बसले. मध्या च्या बायकोने डोळ्याने खुण करून हा इथे कसा? सगळ ठीक आहे ना विचारलं. त्याने हो. काळजी नको करू. अस सांगितल. मग मध्याची बायको माधुरी म्हणाली-

माधुरी- रंगा भावोजी आला आहात तर जेऊनच जा आता. जेवण तयार आहे.

श्रीरंग- ठीक आहे.

मध्याच्या घरी त्याला अजिबात परक वाटत नसल्याने तो लगेच तयार झाला. इतकी ती मैत्री घट्ट होती. तिघे जेवयाला बसले. श्रीरंग फार काही बोलत नव्हता. मध्या ने माधुरीला खुण केली की तू विचार त्याला.

माधुरी- काय हो रंगा भावोजी. असे गप्प गप्प का? काय झालंय?

श्रीरंग- काही नाही…

माधुरी- अस कस. काहीतरी नक्की झालंय. नाहीतर असा पापड मोडत नाही तुमचा. आता सांगायचं नसेल तर नका सांगू. मी आहे त्याची अडचण आहे का? मी आत जाते हव तर.

हे बोलून माधुरी उठली.

श्रीरंग- वहिनी प्लीज. तुही असल्यावर अडचण कसली. तुमच्यापासून काय लपवलं मी आणि स्वाती ने देखील. आणि आता ज्याचा त्रास होतोय ते तर तुमच्याशीच निगडीत आहे.

हे ऐकून मध्या आणि माधुरी चकित झाले.

माधुरी- माझ्याशी निगडीत? भावोजी असे कोड्यात नका बोलू. जे आहे ते सांगा स्पष्ट.

श्रीरंग- वहिनी मी तुमच्या अपूर्वाच्या प्रेमात पडलोय. काय करू कळत नाहीये. तिचा सडेतोड स्वभाव आहे. त्याची भीती वाटते मला. मन मोकळ केल तर राखी बांधेल मला दिग्याला बांधली तशीच. आणि मला ते अजिबात आवडणार नाही. आणि रोज तिला समोर बघून जे आहे ते मनात ठेऊन जगायचा पण कंटाळा आलाय. काय करू काळात नाहीये.

हे ऐकून धक्का बसलेल्या मध्या आणि मधुरीनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं. श्रीरंग ताटाकडे बघत बोलत होता.

श्रीरंग- करून टाकू का मी सरळ प्रपोज? जे होईल ते होऊ दे मग. राखी बांधायला आली तर मी बांधून नाहि घेणार. जबरदस्ती काय आहे राखी बांधायची?

माधुरी- (सिरीयस स्वरात) नको…

श्रीरंग- काय नको वहिनी?

माधुरी- भावोजी प्लीज अशी चूक करू नका. आमची अपूर्वा कणखर असली तरी खूप सेन्सिटीव आहे. तुमचा खूप आदर करते ती. तुम्हाला गुरु स्थानी मानते. ऑफिसातून आल्यावर रोज मला सांगते की सर असे आहेत. सर तसे आहेत. आज मला हे शिकायला मिळाल. ते समजल. तुम्ही तिचे आदर्श आहात. आणि तिच्या गुरूच्या, आदर्शाच्या मनात तिच्याबद्दल अश्या प्रकारच्या भावना आहेत हे तिला कळल ना तर ती खूप hurt होईल. मामाच्या जाण्याच्या दु:खातून आता कुठे सावरते आहे. त्यात परत हा आघात नको.

मध्या- हो रंगा. माधुरी म्हणते आहे ते योग्य आहे. हे बघ..मला कळतंय की स्वाती वहिनी गेल्यावर तू एकटा आहेस. तुलाही कोणाची तरी साथ हवी आहे. आपण शोधू ना यार. तू हे आधी सांगितल असत तर एव्हाना एक छान बायको शोधली असती ना आपण तुझ्यासाठी. अरे हल्ली अनेक वेब साईट आहेत सेकंड म्यारेज साठी. आपण तिथे तुझ नाव नोंदवू. कोणीतरी नक्की मिळेल. पण अप्पू नको यार. मला नाही वाटत तिला अश्या कोणत्याही रिलेशनशिप मध्ये इंटरेस्ट आहे. तिला तीच आयुष्य जगू दे. तू प्रपोज वगैरे केलस ना तर तिला खूप धक्का बसेल. कदाचित ती तो सहन नाही करू शकणार. आणि तुला तिने राखी बांधली तर तुला चालेल का?

श्रीरंग पटकन बोलून गेला-

श्रीरंग- अजिबात नाही.

मध्या- मग सोड तिचा विचार. अपूर्वा म्हणजे तुझ्या आयुष्यात असलेल मृगजळ आहे अस समज. समोर दिसतंय ह्यातच आनंद मान. ते मिळवायला गेलास तर हाती काहीच लागणार नाही. हे मी तुला अपुर्वाचा जिजा म्हणून नाही तर तुझा मित्र म्हणून सांगतोय.

त्या रात्री श्रीरंग घरी आला. त्याला मध्या आणि माधुरी जे म्हणाले ते पटल होत. पण मन ऐकायला तयार नव्हत. अपूर्वला मनातून काढून टाकण त्याला अशक्य वाटत होत पण पर्याय नव्हता. तो उशिरा झोपला. सकाळी अलार्म वाजूनही तो उठला नाही. तसाच पडून होता. काहीच करायची इच्छा होत नव्हती. त्याचा परत डोळा लागला आणि जाग आली ती थेट दहा वाजता एका कॉल आल्यावर. कॉल क्लायंत चा होता. त्याने कसाबसा तो घेतला आणि मग उठून बाई ने फ्लास्क मध्ये ठेवलेला चहा कपात ओतून सिप करत तो बाल्कनीत येऊन झोपाळयावर बसला. स्वातीला आवडायचा तो झोपाळा म्हणून त्याने जुन्या घरातून तिची आठवण म्हणून इथे आणला होता. त्यावर बसल्यावर त्याला स्वातीची आठवण येत असे. आजही आली. तो उठून हॉल मध्ये लावलेल्या तिच्या मोठ्या फोटोसमोर आला आणि म्हणाला-

श्रीरंग- का गेलीस मला सोडून तू? बघते आहेस ना किती एकाकी झालोय मी ते? आपला ओंकार…ओम अमेरिकेत आणि मी इथे…तू कुठेच नाहीस…हे काय झाल ग स्वाती…आठवतात का तुला आपले आनंदाचे दिवस? आपल लग्न, ओम चा जन्म…माझी प्रगती…त्यात तुझी साथ…आपल्या फोरेन ट्रिप्स…तुझा तो झोपाळा…सगळ मागे सोडून गेलीस ग तू…पण तुझ्या वाटणीचा wardrobe अजूनही आहे आपल्या खोलीत….तुझी प्रत्येक साडी, ड्रेस आणि दागिने तसेच आहेत त्यात…अगदी तुझा चष्मा, घड्याळ आणि टूथ ब्रश पण मी घेऊन आलोय ह्या घरात…सगळ सगळ आहे…फक्त तू नाहीस….कसा जगू मी हे उरलेलं आयुष्य एकट्याने…? इतकी का स्वतःची सवय लावलीस मला? आणि सवय लावून अशी अचानक साथ सोडून का गेलीस? काय अवस्था झाली आहे बघ माझी. वेड्यासारखा त्या अपूर्वाच्या मागे लागलोय…मला तू दिसतेस तिच्यात स्वाती…काय करू मी? मला अस वाटत की ती तुझ्यासारखीच मला समजून घेईल, माझी काळजी घेईल, माझ्यावर प्रेम करेल, माझ आयुष्य आनंदाने भरून टाकेल…तू भरलं होतंस तसच…तुझी जागा कोणीच घेउ शकणार नाही स्वाती…पण माझ्या आयुष्यात तू गेल्यावर जी पोकळी आहे ना ती मला खाते आहे रोज…ती भरून काढायला कोणीतरी हवय स्वाती…खूप एकाकी आहे मी…आणि ती पोकळी अपूर्वा भरून काढेल अस मला वाटत…पण तिच्या मनात तस काहीच नाहीये…मला वाटत माझ नशीबच खराब आहे…आता खरच जगायची फार इच्छा नाहीये स्वाती…..कदाचित मी लवकरच तुझ्याकडे येईन…नाही मी weak नाहीये…पण इच्छाच नाहीये आता कशाचीच…एकटा जिवंत आहे मी…पण ह्याला जगण म्हणता येणार नाही….आणि ज्यात जगण नाही अस जिवंत राहण्याला काय अर्थ आहे स्वाती….

हे बोलून श्रीरंग त्या फोटोला डोक टेकून ढसा ढसा रडू लागला. तेव्हा त्या फोटोवर बाष्प जमा झाल्याचा त्याला भास झाला. त्याच वेळी मागे सोफ्यावर ठेवलेला त्याचा फोन वाजत होता. त्यावर अपूर्वा हे नाव दिसत होत.©मंदार जोग

क्रमश:

व्हालेंटाईन डे…(पाचवा भाग)

श्रीरंग ने डोळे पुसत फोन घेतला.

श्रीरंग- हेलो…

अपूर्वा- सर गुड इव्हिनिंग.

श्रीरंग- हम्म…बोल अपूर्वा…

अपूर्वा- सर उद्या मी ऑफिसला हाफ डे येणार आहे. सकाळी जरा कामाला जायचं आहे. मी मेसेज केला असता पण तुम्ही घरी आलात तेव्हाही नीट बोलू शकले नाही आज…म्हणून विचार केला की कॉल करून सांगावं.

श्रीरंग- अस काय काम आहे कि तू हाफ डे राजा घेणार आहेस. थोडी उशीरा ये. Its okay.

अपूर्वा- नाही सर. मला ते नाही पटत. काम माझ आहे. महत्वाच आहे. मग त्याच्यासाठी मी हाफ डे रजा घ्यायला हवी. ऑफिस च्या वेळेत personal काम माझ्या तत्वत नाही बसत. आणि सर जर काम तितक महत्वाच नसत तर मी घेतला असता हा काफ डे? पण माझा नाईलाज आहे. ताई ऐकत नाहीये.

श्रीरंग- (कुतूहलाने) असं काय काम आहे if I may ask…

अपूर्वा- तुम्हाला हक्क आहे सर विचारायचा. आज मी सिनेमा पाहून घरी आले तर ताई आणि जीजू खूप सिरीयस चेहऱ्याने घरात माझी वाट बघत होते. मी आल्यावर जेवायला वाढताना ताई म्हणाली की “अपु उद्या आपण तुझ नाव दोन तीन म्यारेज ब्युरो मध्ये नोंदवू.” सर ते ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी ताईला म्हणाले पण की मला लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. पण मग जिजाजी सुद्धा मध्ये पडले. त्यांनी सांगितल की मी अशीच आयुष्यभर एकटी राहू शकणार नाही. पुढे जाऊन एखाद्या विधुर किंवा घटस्फोटीत माणसाशी लग्न करेन. त्या ऐवजी अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला चांगला नवरा मिळू शकेल. ताईच्या ओळखीच्या कोणीतरी जोगळेकर बाई आहेत…

श्रीरंग- हो. शंत्या जोगळेकर ची बायको. नवी पेठेत ब्युरो चालवते. पटापट लग्न लावते ती.

अपूर्वा- हो सर नवी पेठ. ताई मला सर्वात आधी तिथे नेणार आहे आणि मग आणखी दोन तीन ठिकाणी. त्या दोघांना अचानक काय झालंय काहीच कळत नाहीये मला.

श्रीरंगला आज मध्याच्या घरी झालेलं बोलण आठवल. थोडक्यात मध्या आणि वाहिनी अपूर्वा ला दुसर्या कोणाच्या तरी गळ्यात बांधणार आहेत. ते पण बरोबर आहे म्हणा…तिने माझ्यासारख्या विधुराशी का लग्न करावं? पण मध्या आणि वहिनी ने हे मला तोंडावर सांगितल असत तर बर झाल असत. हे अस मागून, लपून…इतक्यात अपूर्वा म्हणाली-

अपूर्वा- हेलो सर…हेलो…

श्रीरंग- (भानावर येत) हो..हेलो…

अपूर्वा- सर चालेल ना उद्या मी हाफ डे आले तर…

श्रीरंग- its okay…इतक महत्वाच कारण आहे म्हटल्यावर मी कोण नको म्हणणार…आणि तसाही मला चोइस कुठे आहे…

अपूर्वा- म्हणजे? मला कळल नाही सर…

श्रीरंग- काही नाही..घे तू उद्या हाफ डे…

फोन कट झाला. श्रीरंग स्वातीच्या फोटो कडे बघत तिथेच सोफ्यावर झोपला. दिवे सुरूच होते.

सकाळी श्रीरंग ला उशिरा जाग आली. कामवाली बाई ने बेल वाजवल्यावर. बाई ने साफसफाई केली. त्याला चहा दिला. स्वयंपाक केला. बाई गेली. श्रीरंग पेपर वाचत होता. मग त्याने टीव्ही वर न्यूज लावल्या. पण त्याच मन कशातच रमत नव्हत. तो बेडरूम मध्ये जाऊन चक्क झोपला. डिस्टर्ब नको म्हणून त्याने फोन स्वीच ऑफ केला. बेडरूम मध्ये काळोख करून तो झोपला. त्याला गाढ झोप लागली. अचानक दाराच्या बेलचा दूर वरून येणाऱ्या आवाजाने त्याला जाग आली. दुपारचे दोन वाजले होते. त्याला दाराची बेल वाजत असलेली ऐकू येत होती. तो दचकून उठला. इतका वेळ झोप कशी लागली आपल्याला असा विचार करत त्याने दार उघडलं. दारात अपूर्वा होती. तिला घरी आलेली पाहून तो चकित झाला. अपूर्वा घाईत आणि चिंताग्रस्त चेहऱ्याने आत येत त्याचा हात हातात घेत, त्याच्या कपाळाला हात लावून ताप आहे का बघत म्हणाली-

अपूर्वा- सर तुम्ही बरे आहात ना?

श्रीरंग- हो…I am fine…

अपूर्वा- पण सर तुम्ही ऑफिसला का नाही आलात? आणि फोन पण ऑफ आहे तुमचा. म्हणून मग मी घरी आले. Honesty traders च्या फाईल वर तुमची सही पाहिजे सर. ती आजच द्यायची आहे.

श्रीरंग- ओके…बस तू मी आलोच…

अस बोलून श्रीरंग आत गेला. सोफ्यावर बसलेली अपूर्वा त्याच घर न्याहाळत होती. तिला स्वातीचा फोटो दिसला. ती फोटोसमोर जाऊन उभी राहिली. स्वाती किती सुंदर आणि हुशार होती ते तिच्या फोटो मधून सहज लक्षात येत होत. तिच्या डोळ्यात माया आणि करुणा होती. अपुर्वाचे हात नकळत जोडले गेले. अपूर्वा हात जोडून तशीच उभी होती आणि तितक्यात श्रीरंग बाहेर आला. अपूर्वा ला स्वातीच्या फोटो समोर उभी पाहून म्हणाला-

श्रीरंग- my late wife स्वाती.

अपूर्वा- हो सर…आल लक्षात…mam किती सुंदर होत्या…आणि हुशार पण असणार…

श्रीरंग- येस…स्वाती सारखी कोणी नाही. ती माझं सर्वस्व होती. माझ नशीब चांगल की मला स्वाती सारखी बायको मिळाली…पण नशिबाचा देवाला पण हेवा वाटला असावा…भरल्या संसारातून त्याने तिला उचलून नेली.

हे बोलताना त्याचा आवाज कातर झाला. एक मिनिट कोणीच काहीच बोलल नाही.

श्रीरंग- आण ती फाईल…मी सही करतो.

अपूर्वा ने फाईल दिली. श्रीरंग ने सही केली. परत एक ओक्वर्द सायलेन्स.

अपूर्वा- सर तब्बेत बरी आहे ना तुमची? डॉक्टर ला दाखवूया का?

श्रीरंग- नको. I am fine…काल जरा उशीर झाला झोपायला…म्हणून उशिरा उठलो. बाकी काही नाही. बर तू चहा घेणार का?

अपूर्वा- नको सर. ताई बरोबर लंच करून ऑफिसला गेले आणि तशीच इथे आले.

श्रीरंग- मग ज्यूस?

अपूर्वा- सर तुम्ही जेवलात का?

श्रीरंग- ह..हो जेवलो की. बाई सकाळीच स्वयंपाक करून गेली.

अपूर्वा- सर तुम्हाला ना खोट बोलता येत नाही अजिबात. तुमचा चेहरा आणि डोळे तोंडाशी सिंक मध्ये नाहीयेत. बसा तुम्ही मी तुम्हाला वाढते. किचन कुठे आहे?

श्रीरंग- अग कशाला…मी घेईन…

अपूर्वा- सर प्लीज…तुम्ही इथे डायनिंग टेबल वर बसा. मी जेवण गरम करून आणते. किचन कुठे आहे?

श्रीरंग- तिथे…

अपूर्वा किचन मध्ये गेली. बाई ने काय काय केलय ह्याचा अंदाज घेतला. फ्रीज मध्ये काय काय आहे ते पाहिलं. मग भात, कढी, भाजी आणि पोळ्या गरम केल्या. कांदा आणि टोमेटो चिरून त्याची कोशिंबीर केली. सगळ जेवण बाहेर आणून श्रीरंग ला वाढलं. श्रीरंग ताटाकडे बघत होता.

अपूर्वा- आता वारा घालू का मी मग जेवणार का तुम्ही?

हे बोलून अपूर्वा जोरात हसली. श्रीरंग पण कसनुस हसून जेवू लागला. तिने केलेली कोशिंबीर त्याला खूप आवडली. अगदी बारीक चिरलेले कांदा आणि टोमेटो. परफेक्ट तिखटपणा देणाऱ्या वाटून घातलेल्या मिरच्या, आलं, दाण्याचं कुट आणि वरून लिंबू पिळून हलकी फोडणी ओतलेली. आहाहा.

श्रीरंग- कोशिबीर मस्त झाली आहे हा अपूर्वा. स्वाती पण सुगरण होती. हाताला अफाट चव होती तिच्या..

श्रीरंग हे बोलला…पण आपण काय बोलून गेलोय हे लक्षात येऊन जरा गडबडला.

श्रीरंग- म्हणजे मला अस म्हणायचं होत की…

अपूर्वा- आल लक्षात सर…तुमच्या मिसेस चांगला स्वयंपाक करायच्या आणि माझ्या हाताची कोशिंबीर खाऊन तुम्हाला त्यांची आठवण आली. हे माझ्यासाठी compliment आहे सर.

श्रीरंग जेवत होता. अपूर्वा त्याला जेवताना बघत होती. पोळी, भाजी संपली की ताटात वाढत होती. श्रीरंग च जेवण झाल. तो हात धुवून आला. बोलताना मग अपूर्वा आणि तो म्यारेज ब्युरो बद्दल बोलत होते. त्या अनुषंगाने अपूर्वाच्या नवर्याकडून अपेक्षा, अपूर्वाची कौटुंबिक पार्श्वभूमी, तिला लग्न ह्या गोष्टीबद्दल वाटत असलेली भीती, तिचे, गाव, नातेवाईक, शिक्षण ह्याबद्दल ती बोलत गेली. श्रीरंग ने देखील नकळत स्वाती आणि त्याच्या आयुष्याबद्दल तिला सांगितल. ओंकार बद्दल माहिती दिली. अश्या गप्पांमध्ये संध्याकाळ कधी झाली दोघांना कळल नाही.

श्रीरंग- आता संध्याकाळी तरी चहा घेणार ना? मी मस्त चहा करतो.

अपूर्वा- नको. मी जास्त चांगला चहा करते. बसा तुम्ही. मी बनवते चहा.

अपुर्वाने चहा केला. खरच छान झाला होता. दोघांनी चहा घेतला. आता निरोपाची घडी आली.

अपूर्वा- सर एक सांगते…उद्या माझ कुठे लग्न होईल आणि मी कुठल्या शहरात जाईन ते माहित नाही. इथे पुण्यात असले तरी घरचे नोकरी करून देतील की नाही माहित नाही. पण सर, तुमच्याबरोबर जितके दिवस काम केलंय त्यात मला खूप शिकायला मिळाल आहे. तुम्ही माझे गुरु, माझे शिक्षक आहात. मी जगात कुठेही असले तरी ही नोकरी आणि तुम्ही दोघानाही कधीच विसरणार नाही. Thank you सर.

अस म्हणून अपुर्वाने वाकून त्याच्या पायाला हात लावून नमस्कार केला.

श्रीरंग- अग हे काय करतेस…

अपूर्वा- सर जे मनात आहे ते सांगते आहे.

मग तिने पुढे जाऊन स्वातीच्या फोटोला पण नमस्कार केला. आणि ती निघून गेली. श्रीरंग काही मिनिट तसाच बसून होता. मग त्याला आठवल की आता क्लब मध्ये जायची वेळ झाली आहे. तो चेंज करून क्लब मध्ये जायला निघाला.

क्लब मध्ये मध्या, दिग्या, उत्तम तिघेही भेटले. मध्याला पाहून मात्र श्रीरंग च्या डोक्यात तिडीक गेली. इतक्या वर्षांच्या मैत्रीवर त्याने पाणी ओतलं होत. आणि ते पण मेहुणीसाठी? स्पष्ट सांगायला हव होत त्याने. परस्पर लग्न लावून टाकणार होता तो. श्रीरंग आज गप्प गप्प होता. बाकी तिघांच्या ते लक्षात आल.

दिग्या- काय रे रंगा…आज शांत का इतका? तब्बेत बरी आहे ना?

श्रीरंग- हो…

उत्तम- मग असा घुम्या सारखा का आहेस? बीपी शूट झालंय का? ए मध्या बघ रे जरा ह्याची पल्स…

श्रीरंग- प्रत्येक वेळी आजार शारीरिक असेल अस नाही. मनाला पण आघात होऊ शकतो ना?

दिग्या- आयला….इमोशनल matter आहे…काय रे काय झाल? प्रेमात वगैरे पडलास की काय? आणि मग कोणीतरी व्हिलन शत्रू आला वगैरे…

श्रीरंग- व्हिलन शत्रू कशाला पाहिजे? मित्र आहेत की पाठीत सुरा खुपसणारे.

हे बोलून त्याने मध्या कडे रागाने पाहिलं. माद्या ने नजर चोरली.

उत्तम- हे काय नवीन? स्पष्ट बोल काय झालंय ते.

श्रीरंग- मला का विचारतोस? ह्या मध्या ला विचार ना दोस्तीत का मुतला ते. बायकोच्या हातच खेळण का झाला ते.

हे ऐकून मध्या चिडून बोलला-

मध्या- ए रंगा…तोंड सांभाळ बर का. बायकोवर कोणाच्या जातोस तू?

श्रीरंग- तुझ्या…काय करशील? मारशील? मार ना आहे तुझ्या समोर मी. मार…

दिग्या- ए बाबांनो…कॉलेजात आहात का? भांडताय काय असे? काय झाल नक्की रंगा?

श्रीरंग- होणार काय? मी ह्याला आणि ह्याच्या बायकोला सांगितल की अपूर्वा मला आवडते म्हणून. तर ह्याच्या बायकोने काय केल माहित्येय? लगेच तीच नाव शांत्याच्या बायकोच्या ब्युरो मध्ये टाकल.

उत्तम- मग लगेच लग्न होणार. शन्त्याची बायको लै फास्ट लग्न लावते.

दिग्या- अरे ए उत्तम…विषय शंत्या च्या बायकोचा नाहीये अप्पू चा आहे. पण रंगा तुला अपु आवडते? कधीपासून?

श्रीरंग- तू चान्स मारत होतास तेव्हापासून.

दिग्या- काय सांगतोस लेका. म्हणजे आपला फुल दोस्ताना सिनेमा होता की. तू अमिताभ आणि मी शत्रू.

श्रीरंग- तो परवडला. हा प्रेम चोप्रा बघ इथे बसलेला. लाज नाही वाटत त्याला माझ प्रेम असून अपूर्वा च लग्न दुसरीकडे करून द्यायला.

मध्या- ए रंगा…काय चुकल रे माधुरीच? तिला जर तिच्या बहिणीच लग्न तुझ्यासारख्या विधुराशी न होता आधी लग्न न झालेल्या मुलाशी व्हाव अस वाटल तर काय चुकल तिचं? तुला हाच चोइस दिला तर तू काय करशील?

श्रीरंग- माझी बहिण असती आणि जर माझ्या जागी तू असतास तर मी तीच लग्न तुझ्याशी लावून दिल असत.

मध्या- हे बोलायला सोप आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आणि तू ढीग लावशील रे लग्न. जिला लग्न करायचं आहे ती तयार पाहिजे ना? ती तर राखी घेऊन उभी असते तुझ्यासारख्या लोकांसाठी. काय दिग्या.

दिग्या- हा ते तर आहेच. लई खतरनाक आहे ती अपूर्वा. आपल्या सारख्यांना उभे नाही करणार.

श्रीरंग- तरीही मध्या तू आणि वहिनी ने मला चुत्या बनवला हे नक्की.

मध्या- परत तेच. आम्ही काय अपूर्वा ला कोंडून ठेवली आहे की अमुक माणसाशी लग्न कर म्हणून? आम्ही आमच कर्तव्य केल तिचं नाव ब्युरो मध्ये घालून. तिला जर दुसरा कोणी आवडला तर आमची काहीच हरकत नसेल. आणि तो जर तू असशील तर आम्हाला आनंदच होईल.

उत्तम- ए रंगा जा ना. इथे बडबड का करतोस? तिला विचार ना जाऊन.

मध्या- तिला नाही भिडणार हा. कारण ती राखी बांधून ह्याचा पण भाऊ करेल ह्या विचाराने फाटते ह्याची.

दिग्या- प्रेमात आणि धंद्यात फाटून उपयोग नाही. चान्स सोडायचा नाही एक पण.

मध्या- उद्या व्हलेन्ताईन डे आहे. बघ. मार प्रपोज अपु ला. एकतर ती मिसेस गद्रे होईल किंवा तू तिचा रंगा दादा बनून तिच्या लग्नात अक्षता टाकून तिची पाठवणी करशील.

दिग्या- आयला हे भारी आहे. रंगा…गो फॉर इट. ही नाही तर दुसरी मिळेल. पण हिला मिळवायचा चान्स सोडू नको. इसी ख़ुशी में ए वेटर चार लार्ज JD. बिल गद्रे साहेब देणार.

श्रीरंग च्या डोक्यात विचारांचं काहूर होत. त्या क्लब मधले इतर आवाज त्याला ऐकू येत नव्हते. इतक्यात त्याला अपुर्वाचा मेसेज आला. तिने लिहील होत “सर आत्ताच एका स्थळाचा होकार आलाय. उद्या व्हलेन्ताईन डे ला भेटायचं म्हणतोय तो. इंजिनियर आहे. आय टी मध्ये मोठ्या पदावर आहे. परदेशात होता बरीच वर्ष म्हणून लग्न नाही झाल. आता पुण्यात सेटल आहे. बावधनला चार बेडरूम ची जागा आहे. घरी आईवडील आणि तो असे तिघेच आहेत. सर उद्या मी राजा घेऊ का? उद्या आम्ही भेटून फायनल करू. मला फोटो आवडला आहे आणि त्याचा होकार तर आहेच.”

इतक्यात मध्याच्या फोनमध्ये पण माधुरीचा मेसेज आला की मुलाचा होकार आला आहे. उद्या फायनल करायचं आहे.

मध्याने ओरडून सांगितल-

मध्या- गाईज शंत्या ची बायको चेटकीण आहे. एका दिवसात स्थळ आणून होकार पण कळवला आहे अपूर्वाला. उद्या फायनल मिटिंग आणि मग मार्च मध्ये लग्न. Bad luck रंगा.

श्रीरंग त्याच्या फोनमध्ये मेसेज वाचत होता. त्याने अपूर्वला ओके असा रिप्लाय दिला आणि खिशातून पाच हजार रुपये काढून टेबलवर ठेऊन तो तिथून निघून गेला. हे तिघे त्याच्याकडे सहानुभूतीने बघत होते.

दिग्या- मित्रांनो, आपला रंगा तर विकेट वर न येता रिटायर hurt झाला यार.

इथे घरी अपूर्वा श्रीरंग चा ओके असा रिप्लाय पाहून समोरच्या आरशात स्वतःकडे बघत लाजत होती. तिच्या कानात उद्याच्या त्या मुलाशी होणाऱ्या भेटीनंतरच्या लग्नाची सनई वाजत होती.©मंदार जोग

क्रमश:

व्हॅलेंटाईन डे…शेवटचा भाग © मंदार जोग

आज व्हॅलेंटाईन दिवस. सकाळपासून श्रीरंग अस्वस्थ होता. सकाळचं काहीही रूटीन फॉलो न करता तसाच बेड वर बसून होता. घड्याळात साडे दहा वाजले. ऑफिस मधून काही फोन आले. काही क्लायंट चे फोन त्याने अटेंड केले. पण काहीच करायचा मूड नव्हता त्याचा. इतक्यात अपूर्वाचा मेसेज आला –

अपूर्वा – Happy valentine’s day sir.

ते पाहून श्रीरंग ची आणखी चिडचिड झाली. पण त्याने शांत होत रिप्लाय केला.

श्रीरंग – तुलाही शुभेच्छा. ठरल का मग लग्न?

अपूर्वा – इश्य सर…अजून भेटलोय कुठे आम्ही? लंच ला भेटणार आहोत डेक्कन ग्रिल ला.

श्रीरंग – बरीच खुश दिसतेस.

अपूर्वा – माहीत नाही सर. पण टेंस नक्की आहे. पण ताई आणि जीजुंवर अवलंबून किती दिवस राहणार ना ? आणि हा मुलगा खरंच चांगला आहे. आय होप all goes well. Wish me luck sir.

श्रीरंग – बेस्ट ऑफ लक.

श्रीरंग ने फोन बेडवर फेकला आणि तो बाहेर आला. फोटो मधून स्वाती हसत असल्याचा त्याला भास झाला. तो फोटो समोर उभा राहून म्हणाला –

श्रीरंग – हसते आहेस ना? हस. तू गेलीस मला सोडून. मजा करत असशील स्वर्गात आणि माझ्या आयुष्याचा नरक झाला आहे त्याचं तुला हसायला येतंय. एक तू आहेस फोटो मध्ये बसलेली आणि एक ती आहे हातात राखी घेऊन उभी. इकडे आड तिकडे विहीर…श्या…

अस म्हणून त्याने चिडून त्या रनर वर जोरात गुद्दा मारला. तो मारल्यावर तिथे असलेलं एका एअर लाईन ने त्याला दिलेलं विमानाचं मॉडेल खाली पडल. ते उचलून परत रनर वर ठेवताना त्याला त्या एअर लाईन च काम आल्यावर ते घ्यावं की नाही ह्याबाबत स्वातीशी झालेली चर्चा आठवली.

श्रीरंग – नाही यार स्वाती…ह्यांचे बुक्स क्लिअर नाहीयेत. काहीतरी मोठा घोटाळा आहे. मी त्यांचं काम घेतलं आणि उद्या काही स्कॅम झाला तर माझ नाव खराब होईल.

स्वाती – श्रीरंग, हे तुझ assumption आहे. तू बोल की एकदा त्यांच्याशी. समजून घे काय आहे ते. तुला ज्या शंका आहेत त्या विचारून घे. मग निर्णय घे. जर तुला तरीही ते अयोग्य वाटले तर काम घेऊ नको. आणि ओके वाटले तर काम घे. त्यांच्या फी मधून आपली युरोप ट्रिप आणि एक २ बी एच के नक्की येतील. Never assume things.

स्वतीचे ते बोल आठवून श्रीरंग चे डोळे सताड उघडले. तो फोटोला म्हणाला –

श्रीरंग – येस स्वाती…मी अपूर्वा ला प्रपोज न करताच ती राखी बांधेल म्हणतोय. एकदा प्रपोज करायला पाहिजे. जास्तीतजास्त राखी बांधेल ना? कदाचित नाही बांधणार. होकार देईल. पण लग्न ठरत असताना मी अस मध्येच प्रपोज करणं योग्य आहे का?

स्वातीच्या चेहऱ्यावर आश्वासक स्माईल होत. श्रीरंग तसाच पटापट तयार होऊन डेक्कन ग्रिल कडे निघाला. तो पोहोचला तेव्हा एक तरुण मुलगा आणि अपूर्वा एका टेबलवर बसून हसत खेळत बोलत होते. मध्या आणि माधुरी दुसऱ्या टेबलवर आणखी एका वयस्क कपल बरोबर बोलत बसले होते. अपूर्वाला त्या पोराबरोबर पाहून श्रीरंग तिरमिरला. तो थेट अपूर्वा कडे गेला आणि म्हणाला –

श्रीरंग – अपूर्वा आय लव्ह यू. माझ्याशी लग्न करशील?

हे पाहून अपूर्वा, तो मुलगा, मध्या, माधुरी, ते कपल आणि हॉटेल मधील इतर लोक शॉक झाले .

श्रीरंग – मी काय विचारतोय अपूर्वा? माझ्याशी लग्न करशील का?

अपूर्वा ने त्याच्याकडे एक मिनिट न्याहाळून पाहिलं.

मुलगा – हे काय आहे अपूर्वा?

अपूर्वा – तुम्ही थांबा जरा. मी बघते.

अस म्हणून तिने पर्स मधून राखी काढून श्रीरंगच्या समोर धरली. श्रीरंग वरमला. समजायचं तर समजून गेला. त्याने डोळे पुसत आपला हात राखी साठी पुढे केला. अचानक अपूर्वाने त्याच्या बोटात अंगठी सरकवली. ते जाणवून श्रीरंग ने डोळे उघडले.

श्रीरंग – अपूर्वा अंगठी? म्हणजे?

मागून मध्या पुढे येत म्हणाला –

मध्या – आता एंगेज मेंट रिंग म्हणजे काय हे पण तुला सांगायला हव का रे रंगा? ही घे. तू पण अपूर्वाला अंगठी घाल.

श्रीरंग ने अविश्र्वासाने अपूर्वला अंगठी घातली.

मध्या – You may kiss the fiancee…बराच तुंबला आहेस म्हणून ही खास व्हॅलेंटाईन ऑफर.

श्रीरंग ल काही कळायच्या आधीच अपूर्वा ने त्याचा किस घेतला. जे घडतंय ते स्वप्न आहे अस वाटून त्याने अपुर्वाच्या उघड्या पोटाला चिमटा काढला. ती कळवळली.

अपूर्वा – सर दुखलं की हो.

श्रीरंग – मध्या हे नक्की काय आहे?

माधुरी – मी सांगते. तुम्ही आमच्या घरी येऊन मन मोकळं करून गेलात. आम्हाला अपूर्वा च मत जाणून घ्यायचं होत म्हणून आम्ही तुम्हाला काहीतरी खोटं सांगितल.

मध्या – अपूर्वा घरी आल्यावर तू जे म्हणालास ते आम्ही तिला सांगितलं.

अपूर्वा – सर मला तुमच्या डोळ्यात आणि वागण्यात प्रेम जाणवत होत कितीतरी दिवस. पण तुमची आणखी माहिती हवी होती. माझी माहिती द्यायची होती. आणि मुख्य म्हणजे स्वाती ताईंच मत जाणून घ्यायचं होत. तुमचं घर बघायचं आणि समजायचं होत. म्हणून मी त्या दिवशी तुमच्या घरी आले. तुम्हाला वाढलं. चहा केला. आपण एकमेकांशी मोकळेपणाने बोललो. आणि सर स्वाती ताईंच्या फोटोसमोर उभी राहून मी त्यांना विचारत होते की मी त्यांची जागा घेतलेली त्यांना चालेल का म्हणून.

माधुरी – आणि भावोजी स्वाती त्याच रात्री हिच्या स्वप्नात आली आणि हिला शालू भेट देऊन “ये माझ्या घरी. माझ्या श्रीरंगची काळजी घे असं म्हणाली.

ते ऐकून श्रीरंग च्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

श्रीरंग – मग हा मुलगा बघायचा कार्यक्रम?

मध्या – ही ह्या अपूर्वाची आयडिया. तिने पैज लावली होती की हे नाटक केल्यास तू येऊन तिला प्रपोज करशील.

माधुरी – आणि आम्ही नाही म्हणत होतो. पण अपूर्वा जिंकली.

श्रीरंग अपूर्वकडे बघत होता. तिने राखी परत एकदा त्याच्या समोर धरली आणि त्या तिच्या बरोबर असलेल्या मुलाला बांधली.

श्रीरंग त्या मुलाला म्हणाला –

श्रीरंग – सॉरी यार…माझ्यामुळे तुला एका सुंदर मुलीकडून राखी बांधून घ्यावी लागते आहे.

माधुरी – ती तो दर वर्षी बांधून घेतो. हा अपुचा मामेभाऊ आहे. इथेच पुण्यात असतो. आमच्या नाटकात त्याला आणि ह्या त्याच्या ह्या आई वडिलांना आम्ही सामावून घेतलं. काय काम केलं आहे तिघांनी.

इतक्यात दिग्या आणि उत्तम सहकुटुंब आले.

दिग्या – काय रे रंगा. राखी की किस?

उत्तम – त्याचा चेहरा सांगतोय किस म्हणून.

मध्या – ए रंगा, चायला तुला मुलगी मिळाली, किस मिळाला आता इथे व्हॅलेंटाईन पार्टी च बिल तू द्यायचं.

श्रीरंग – चालेल.

अपूर्वा – चालेल काय चालेल? आमच्या ह्यांना अस नाही हा लुटायच. ते बिचारे भोळे आहेत म्हणून त्यांना बिल द्यायला लावता? उलट तुम्ही सर्वांनी बिल द्या आम्हा दोघांना त्रास दिल्याबद्दल.

माधुरी – घ्या..आतापासून बायको बोलू लागली आहे. आमची स्वाती अशी नव्हती.

अपूर्वा – मी अपूर्वा आहे स्वाती नाही. आणि जशी आहे तशी स्वाती ताई आणि ह्यांना पसंत आहे. बाकीच्यांना काय वाटत त्याची आम्हाला पर्वा नाही.

दिग्या – बर अपूर्वा ताई. हा तुझा दादा पार्टी देईल.

इतक्यात श्रीरंग मध्येच उठत म्हणाला –

श्रीरंग – अपूर्वा आपण जरा घरी जाऊया. स्वातीला ही गुड न्युज देऊया.

कोणी काही बोलायच्या आधी तो अपूर्वला हाताला धरून घेऊन गेला .

दिग्या – स्वाती वाहिनीच फक्त निमित्त आहे. रंगा आज व्हॅलेंटाईन जोरदार साजरा करणारं. चीयर्स फॉर रंगा आणि अप्पू.

सर्वांनी आपापले चषक एकमेकांना टेकवले. इथे श्रीरंग च्या बेडरूम मध्ये श्रीरंगच्या मांडीवर आरूढ झालेल्या अपूर्वा ने त्याच्या ओठांवर ओठ टेकले होते. बाहेर स्वातीच्या फोटोवर बाष्प जमा झालं होत पण तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होत. ©मंदार जोग

समाप्त

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!