संभाल लू…
तो एक दमलेला बाबा.
अन् त्याची दमलेली रोजचीच कहाणी.
रोजच ऊशीरा घरी पोचायचा.
त्याची एक लाडू सोनपरी.
बाबाची वाट बघून बघून, झोपून जायची बिचारी.
घरात शिरला की तो आधी परीजवळ पोचायचा.
गाल फुगवून रूसलेली अन् तशीच झोपलेली परी बघितली की…
तो मनातल्या मनात हजारदा रडायचा.
तो हलकेच परीचा पापा घेतो.
परीचा फुगीर गाल एकदम पंक्चरतो.
परी गाढ झोपेत.
तरीही, गालातल्या गालात खुदकन् हसते..
दमलेल्या बाबाच्या कष्टांचं अमूल चीज होतं.
हलकेच दार लोटून तो परीच्या आईला फेस करतो.
अरे ये क्या चल रहा है ?
खरे तर हे परीचे बागडण्याचे दिवस.
झोपाळ्यावाचून झुलायचे
किती वेळ बाबा मिळतो तिला…?
तो बाॅसवर रूसतो.
काय वाट्टेल ते होवो..
ऊद्यापासून रोज संध्याकाळी सहाच्या हात घरात.
दुसर्या दिवशी पुन्हा रात्री दहा.
परीचा बाबा हेल्पलेस.
मागच्याच महिन्यात परीचा, सिक्स्थ बर्थ डे सेलीब्रेटला घरानं.
नशीब संडेच होता.
बाबा, परीच्या सेवेस हाजीर था !
सरप्राईझ गिफ्ट.
छान सायकल घेऊन दिलीय परीला,
परीच्या बाबाने.
ट्रायसीकल नाही हं, बायसीकल.
तिला सहज चालवता येईल अशी.
ठुसकीशी.
एकदम क्यूट, परीसारखीच.
गुलाबी रंगाची.
त्यावर बार्बीचं स्टिकर होतं.
पुढे छोटीशी बास्केट.
हॅन्डलला छोटीशी घंटा.
किण्णकिण्ण वाजणारी.
परीनं डोळे विस्फारून बघितलं सायकलीला.
आणि प्रेमातच पडली ती सायकलीच्या.
या सायकलीला, कुठं ठेवू अन् कुठं नको ,असं झालेलं परीला.
सध्या गॅलरीतच ठेवलंय.
प्राॅमीस…
बाबानं प्राॅमीस केलंय.
दर संडेला बाबा परीला सायकल शिकवणार..
पहिला संडे ऊगवला.
खरं सांगू ?
सॅटरडे नाईटला परीला झोपच नाही आली.
स्वप्नात सुद्धा तिला तिची ती सायकलच दिसत होती.
ऊडणारी सायकल.
पॅडल मारलं की एकदम ढगात लपणारी.
परी एकदम करकचून जागी झाली.
कधी एकदा सायकल चालवतेय, असं झालेलं.
साडेसहालाच तिनं बाबाला घराच्या बाहेर काढलं.
दोघं सोसायटीसमोरच्या ग्राऊंडवर.
दहा बारा पोरं पोरी सायकल घेऊन ऊंडारत होती तिथं.
जोरात सायकल चालवायची सगळी.
एकदम धूम स्टाईल.
गर्रकन वळायची.
सूऽऽऽऽसाट, बुंगाऽऽऽट.
मधेच झिग झॅग.
परीचा चेहरा एवढासा.
मला जमेल अशी धूऽऽम सायकल चालवायला ?
परीनं बाबाकडे बघितलं.
बाबानं परीचा चेहरा शब्दांशिवाय वाचला.
‘ऊसमें क्या है ?’
परीचा बाबा परीसाठी एकदम हिरो झालेला.
परी सायकवलवर चढून बसली.
पॅडल मारायला सुरवात केली.
बाबा भरोसे..
सोप्पं नाहीये सायकल चालवणं.
अरे हे काय ?
सायकल एका बाजूला तिरकी तिरकी चालायला लागलीये..
एका बाजूला कलंडली सुद्धा..
परी पडते का काय ?
अशी कशी पडेल ?
बाबा आहे ना तिचा.
“परी, मोठ्ठा श्वास घे.
घट्ट हॅन्डल पकड.
अन् बिनधास्त सायकल चालव..
फिकर नाॅट.
बाबा तुला कधीही खाली पडू देणार नाही..”
पटलं.
परीनं डिट्टो तसंच केलं.
जमलं..
आता निदान सायकल सरळ रेषेत तरी चालायला लागली..
परी सायकल दामटतेय.
कॅरियर धरून परीचा बाबा मागे मागे पळतोय.
कसलं भारी दिसत होतं हे पिक्चर.
तुम्हाला म्हणून सांगतो.
दोन तीन वेळा थोडा वेळ बाबाने सायकल सोडलेली.
परीला माहितच नाही.
अर्ध्या मिनटानं सायकल पुन्हा तिरकी तिरकी..
बाबा आणि परी दोघंही, नाॅट रेडी.
ढकळंगमचांग..
दोघंही धाडकन् पडले.
फार नाही लागलं.
गुडघे फुटले एवढंच.
चंमतग सांगू.
यावेळी कुणीच रडलं नाही.
शून्य मिनटात धूळ झटकत पुन्हा ऊठले..
आणि सायकल राईड सुरू.
साडेआठ वाजता घरी.
दोन तास एलिझाबेथ एकादशी व्रत चाललेलं.
घरी गेल्यावर आईन पन्हं दिलं.
दोघांना कडाडी भुका लागलेल्या.
कढईभर पोहे शून्य मिनटात फस्त.
“अजून एक संडे.
नेक्स्ट संडेला पर्या तुझी तू सायकल चालवशील.
अकेली…
अपने दम पर. “
परीच्या बाबाने पोह्याचा बकाणा भरून गर्जना केली.
कसंच काय अन् कसंच काय ?
खाली डोकं वर पाय.
पुढचे चार संडे.
बाबा घरी नव्हताच.
एकदा काय टूरला.
एकदा अर्जंट मिटींग.
एकदा संडेला पहाटेच घरी पोचला.
एका संडेला असंच काही तरी.
किती तरी दिवसांनी परीच्या बाबाला आजचा संडे फ्री मिळाला.
सॅटर्डेला ऊशीराच घरी पोचला.
परी तोवर अळी मिळी गुप चिळी.
गाढ झोपलेली.
बाबाला तसाच झोपू दिला आईनं.
एकदम नऊ वाजता बाबा खडबडून जागा झाला.
पटकन् गॅलरीत पळाला..
गॅलरीत सायकल नाही.
घरात परी नाही..
बाबा घाबरलाच एकदम.
पोटात रस्त्यावरसारखा मोठा खड्डा.
तो दुसर्या गॅलरीत पळाला.
ही ग्राऊंडफेसींगवाली गॅलरी.
डोळे फाडून ग्राऊंड बघू लागला.
तिथं पोरांची झुंबड.
सायकल दामटणं सुरू होतं.
परीचा बाबा ऊडालाच.
परीच होती ती.
सायकल सवार परी.
काय मस्त सायकल चालवतेय…
एकदम काॅन्फीडन्ट.
मस्त शार्प टर्नही घेतला आत्ताच.
परीचा बाबा एकदम सेंटी झालेला.
डोळ्यात पाणीच आलं त्याच्या.
परीच्या आईनं सायकल शिकवली असणार परीला..
परीच्या बाबाच्या खांद्यावर एकदम एक हात आलेला.
हलकेच थोपटणी.
सवाँर लू..
संभाल लू..
सांभाळून घेतलं..
परीच्या आईने परीच्या बाबाला.
परीच्या बाबाने परीच्या आईला.
परीच्या आईबाबांनी परीला..
हॅप्पी फॅमिली.
जुग जुग जियो..!
……कौस्तुभ केळकर नगरवाला.
Image by Jill Wellington from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
👨👩👧❤️
Mast
sahi ekdam mast
thanks
Super
Superb…
😍😍😍