चहा/चाय

“भैया, दो चाय और दो सिगारेट्स देना” अमित चहा टपरीच्या मालकाला म्हणाला

“और भाई? आज बिल्ली शेर कैसे बन गयी? अरे तिने पाहिलं तुला फुकताना तर परत शिव्या खाशील तिच्या” अमितच्या मागून येणारा तुषार म्हणाला

“आज इतक्या साध्या शब्दात अपमान? ” अमित हसत तुषारला उद्देशुन म्हणाला

“सर ये लिजिये चाय-सिगारेट” टपरिवाल्याने चहा-सिगारेट सरकवत म्हणलं. टपरीच्या आजूबाजूस चहाचा टिपिकल दरवळ पसरला होता, त्यातच अधूनमधून जळत्या सिगरेट्सचे वासही मिक्स झाले होते.

“अम्या तुला अजून अब्सकोंड नाही केलं मी नशीब मान.” तुषार रागात बोलला.

“हम्म…तू मला अब्सकोंड करणार!!!!अरे लहानपणी एका वॉटरबॅगमध्ये पाणी प्यायचो आपण,नंतर एका बाटलीतील मदिरा.पाण्याला नाही तर मदिरेला तरी जाग” अमित तुषारने धरलेल्या सिगारेटला लायटर लावत बोलला.

“अबे तू जाग बे …सुट्ट्याला तरी जाग. अम्या तू का आला आहेस तुझं तोंड घेऊन माझ्यासमोर?”

अमित स्वतःच्या सिगारेटला लायटर लावतोय पण होत नाहीये हे दिसतंय मग तुषार स्वतःच लायटर काढून अमितची सिगारेट पेटवतो.

“किती वेळा सॉरी म्हंटल रे मी तुला कालपासून” अमित करवादला.

“ओचू ओचू शॉली म्हणतोयस!!!ही सगळी शोना बाबू नाटकं तिच्यासमोर हं माझ्यासमोर नाय यायचं हे घेऊन आणि तुला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही रे.चूक नाही गुन्हा घडलाय अक्षम्य गुन्हा घडलाय अम्या तूझ्या हातून” तुषारचा राग शांतच होत नव्हता.

“तुश्या, फक्त थोडा वेळ लेट आलो रे मी.. तुम्ही लोकं तर…..” अमित

“फक्त थोडा वेळ!!!!! अम्या  *#*  तू दहा ओव्हर लेट आला बे. अरे टी ट्वेन्टी होती ती पण भारत-पाकिस्तान आणि तू *#* तिच्यासोबत शॉपिंगला म्हणून गेला, आता येतो मग येतो करत दहा ओव्हर लेट पोचला माझ्या घरी. अबे बिअर या चहासारखी गरम झाली होती तोवर” तुषार अमितच बोलणं पूर्ण होण्याआधीच त्याच्या अंगावर वसकला.

“तुश्या उचक तू ..पण कमी उचक रे. मला माहितीय आपला आधीपासून प्लॅन ठरला होता.पण तुला तर माहितीय ना मुलींना कपडे ट्राय करायला, फायनल करायला किती वेळ लागतो” अमित विनवणीच्या स्वरात- “मला नाही माहित मुलींना किती वेळ लागतो ते!! आबे proud to be a single मला एव्हढच माहीत आहे आपण लहानपणापासून आपले कुठलेच प्लॅन फिस्कटू दिले नाहीत, क्रिकेटचे तर नाहीच नाही.अम्या फालतू कारणं देऊ नकोस यार. क्या कर रा बे तू?? Be a man, मॅचला उशीर होतो म्हणायचं , निघायचं..हे पण शिकवावं लागतंय होय रे *#*” तुषार

आता चहा पिऊन झालेले असतात, सिगारेट्स विझत आलेल्या असतात. भडास बाहेर काढल्यामुळे मनही शांत झालेली असतात.

“सरकार इस टाइम माफी दे दो. पुन्हा होणार नाही असं” अमित आता हात जोडून म्हणाला

“काय गॅरंटी? ” तुषार “इथून पुढं आपला प्लॅन ठरला असेल तेव्हा मी तिच्यासोबत कोणताच प्लॅन ठरवणार नाही.क्रिकेटपेक्षा काही महत्वाचं नाही. आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का??भैया और एक एक सिगारेट देना” अमित “चल चल बस कर अब ओव्हरएकटिंग..अबे सिगारेट नको बे” तुषार एकदम म्हणला “आता कोण बिल्ली बनतय?” अमित मिश्कीलपणे हसत म्हणाला-

“अरे तुझी बिल्ली येतेय इकडे.ते बघ.” तुषार अमितच्या गर्लफ्रेंडला इकडे येताना पाहून उत्तरला-

“वाचलो” अमितने सुस्कारा सोडला.

“आम्ही वाचवायचेच धंदे करतो आणि तुम्ही आपल्या प्लॅनची घालत रहा” तुषार

“तुश्या बोललो ना बे नाही होणार अस परत…चल निघुयात..आणि तू सिंगल आहे होय रे *#* अबे भगवान से डर” अमित तुषारला गुद्दा हाणत बोलला-

तुषार यावर खळखळून हसला आणि ते दोघं टपरिवाल्याला पैसे देऊन एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून निघाले.

आता तिथे फक्त चहाच नव्हे तर मैत्रीचा देखील दरवळ पसरला होता.

त.टी.- सुजाण वाचकांनी चिन्हांकित जागा मनातल्या मनात भरायच्या आहेत 😋आणि गोष्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायचं आहे👍

Image by andreas N from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

4 thoughts on “चहा/चाय

  • June 10, 2019 at 11:11 am
    Permalink

    Pyar ka panchanama 2 .. almost same scene for match..

    Reply
    • June 11, 2019 at 11:23 am
      Permalink

      प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार 😊 आणि हो हा चित्रपट माझ्याही खूप आवडीचा😃

      Reply
  • July 2, 2019 at 4:45 am
    Permalink

    गाळलेल्या सगळ्या जागा नीट भरून वाचलं, बरं का! 🙊🙈😂

    Reply
    • July 28, 2019 at 12:17 pm
      Permalink

      Hahaha, माझा पहिला जॉब होता तेव्हा माझा महेश नावाचा मित्र होता. तेव्हा आम्ही पण अश्याच गप्पा हाणायचो चहाच्या टपरीवर. भारीच.

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!