अतर्क्य (भाग2/7)
कादरभाईची चहाची टपरी जगनशेठच्या हवेलीच्या समोरच्या बाजूस.
अगदी हवेलीच्या डोळ्यासमोर.
हवेलीनं डोळे ऊघडले की समोर कादरभाईच दिसणार.
गेली तीस वर्ष टपरी चालू आहे.
पहाटे तीन ते रात्री दहा.
गंजपेठेत रात्री बेरात्री माल घेवून ट्रक्स येत.
पहाटेपर्यंत रित्या होत.
ट्रक खाली झाली की ड्रायव्हर , हमाल मंडळींना चहा लागे.
कादरभाईची टपरी पहाटेपासनंच जागी .
मनसोक्त चहा ‘ओढला’ जाई.
चहाचा घाणा अखंड चालू.
पहिल्यांदा भांडवल पुरवलं ते जगनशेठनंच.
कादरभाई जगनशेठला मानत असे ते यासाठीच.
बर्याच वेळा जगनशेट पहाटे चारालाच जागे होत.
मग एवढ्या सकाळी स्वयंपाकघराला जागं करणं त्यांच्या जीवावर येई.
मग शेठजी गॅलरीत ऊभे रहात.
कादरभाईंचे डोळे सदैव ऊघडे असत.
हवेलीतली प्रत्येक हालचाल सदैव टिपली जाई.
पुढच्या क्षणी कादरभाईचा पोर्या वाफ्फेदार चहा घेवून हवेलीत पोचे.
कादरभाईची टपरी हवेलीची वाॅचमन झालेली.
संध्याकाळी डाॅ. वर्मांच्या दवाखान्यावर ईथनंच चहा जाई.
तिथला तो घुम्या कंपाऊंडर चहा ओढायला दिवसातून दहा वेळा ईथंच पडिक असे.
पण हल्ली हल्ली कादरभाईवर जगनशेट जरा नाराज होते.
रफिक.
कादरभाईचा एकुलता एक छोकरा.
कादरभाईला खूप शिकवायचा होता त्याला.
पण हा दुसरीच ‘शाळा’ शिकला.
हल्ली कादरभाई पण थकले होते.
पहाटे तीनला रफिकच टपरी खोलत असे.
कादरभाई सकाळी आठ वाजता टपरीवर येत.
रफीक तसा वागायबोलायला बरा.
पण त्याला शाॅर्टकटमध्ये पैसा हवा होता.
मग बंदी असलेली गुटख्याच्या पुड्या विक.
गांज्याच्या पुड्या विक , असलं चालायचं.
हमाल, ड्रायव्हर मंडळींनी टपरीचा अड्डा केलेला.
कादरभाई येथपर्यंत अड्डा जोरात.
मग फक्त चहाची टपरी.
जगनशेटनं रफीकला खूप समजावला.
पण रफीक सुननेवाला नही था.
शेवटी जगनशेटनं त्याला सहा महिने खडी फोडायला पाठवला.
आत्ताच दोन महिन्यांपूर्वी बाहेर आलेला.
तेव्हापासून जगनशेटवर जाम खुन्नस ठेवून.
अगदी खल्लास करनेवाली खुन्नस.
ज्या दिवशी जगनशेट मेला ,त्या दिवशी पहाटे चारला रफीकच चहा घेवून गेलेला.
ग्लासातला हाफ चहा पोलींसानी पंचनाम्यात नोटलेला.
क्या रफीक जगनसेठको टपका….
हो सकता है….
पोलिसांचा सुद्धा रफीकवर वहीम होता.
घाई काय आहे.
आत्ता तर कुठे फाईल ओपन झालीय.
तपास चालू आहे.
( क्रमशः )
Image by Gerd Altmann from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
Best 👌👌👌👌
Sagle bhaag ekatra dyaal ka please
mast
Mast