अतर्क्य (भाग3/7)
जगनशेटच्या हवेलीच्या मागच्या बाजूला दोन छोट्या खोल्या.
तिथली डाॅ. वर्मांची ‘गुपचूप’ डिस्पेन्सरी.
कितीही झालं तरी जगनशेट बेपारी मानस.
पूर्वी या दोन खोल्यात गोडावून असायचं.
आता गोडावून गावाबाहेर हाकलल्यामुळे या दोन खोल्या रिकामटेकड्याच होत्या.
या खोल्या भाड्यानं द्यायला त्याची काहीच हरकत नव्हती.
आख्ख्या गंजपेठेत एकही दवाखाना नव्हता.
हमालांच्या तब्येतीच्या तक्रारी असायच्याच.
त्यांचीही सोय झाली.
डाॅ. वर्मांची फीही फार नसायची.
त्यामुळे मोहल्ल्यातल्या गोरगरीबांचीही सोय होई.
स्वार्थाबरोबर परमार्थही साधला गेल्यानं जगनशेट खुष होते.
स्वतः जगनशेटची तब्येत तशी नाजूकच.
जबरा डायबेटिस.
ईन्शुलीन टोचून घ्यावं लागायचं दररोज.
हाय बी पी.
त्यालाही हक्काचा डाॅक्टर मिळाला होता.
डाॅ. वर्मा.
एम.डी.मेडीसीन.
प्रचंड हुशार.
डायग्नोसिस परफेक्ट.
नुसता पेशंटचा हात धरला की आजार डाॅक्टरच्या कानाशी बोलू लागे.
फालतू टेस्ट वगैरेचा तो शौकिन नव्हता.
कमीत कमी औषधे.
बर्याच वेळा आपल्याकडची सॅम्पल्स फुकट देणार.
जास्तीत जास्त आराम.
पुन्हा हसतमुख.
वाणी मिठास.
पेशंटशी मनमोकळं बोलणार.
डाॅ. वर्मांशी बोलूनच पेशंट निम्मा बरा होई.
सिव्हिल हाॅस्पीटलमध्येही डाॅ. वर्मांसाठी पेशंट खोळंबलेले असायचे.
तसा ‘देव’माणूसच म्हणायचा.
ईतकं असलं तरी शेवटी तोही माणूसच होता.
स्वतःचं हाॅस्पीटल टाकता तर नोटा छापत बसला असता.
पण डाॅ. वर्मांना पैसा नको होता.
त्यांना हवं होतं नाव.
मूलतः डाॅक्टर संशोधक वृत्तीचा.
प्रयोगशील.
सगळ्या पॅथींची मिळून त्यानं एक संयुक्त उपचारपद्धती शोधली होती.
डायबेटिस त्याचा आवडता प्रांत.
कागदी निष्कर्षांना प्रत्यक्षात ऊतरवण्यासाठी त्याला गिनीपीग हवे होते.
ज्यांच्या शरीरावर बिनबोभाट प्रयोग करता येतील अशा बाॅडीज.
ही असली शरीर गंजपेठेत त्यांना सहज मिळायची.
डाॅ. वर्मांचं संशोधन अंतीम टप्प्यात आलेलं.
जगनशेटवरही त्यांचे प्रयोग चालायचे.
एकच डोस.
नेमका.
कमी जास्त नको.
डायबेटिसचा खात्मा.
पण चुकला तर मात्र पेशंट पॅरॅलाईज्ड.
तोल जाणार.
चक्कर येणार.
कदाचित मरणार सुद्धा.
डाॅ. वर्मांनी मनाचा हिय्या केला.
जगनशेटचा गिनीपीग.
दहा वर्षांच्या त्यांच्या अभ्यासाची आज फायनल टेस्ट.
जगनशेटच्या ईन्शुलीनच्या डोसमध्ये ते औषध मिसळले.
जगनशेट मेला तेव्हा त्याच्या खोलीत ती सिरींज अन् रिकामी बाॅटल मिळाली.
कही ….
तो डोस चुकला.
जगनशेटचा तोल गेला अन् तो गॅलरीतून खाली पडला.
याने , जगनशेटच्या मृत्युचा जिम्मेदार डाॅ. वर्मा ?
कुछ समझ में नही आ रहा है !
कनफ्युज्ड.
…काय घाई आहे ?
फाईल आता कुठे ओपन झालीय.
तपास चालू आहे.
. (क्रमशः)
Image by Gerd Altmann from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
Suspense!
are baapa re
अतर्क्यच आहे पाहू पुढे… उत्सुकता….