गोष्टी लेखकांच्या – गौरी शिंदे

इंग्लिश विंग्लिश सिनेमात एक खूप सुंदर दृश्य आहे

श्रीदेवी बहिणीच्या घरी लग्नकार्य असल्याने न्यू यॉर्कला गेली आहे.तिथेच तिने बराच प्रयत्न करून इंग्रजी भाषा शिकण्याचा खटाटोप चालवला आहे. ती जमेल त्या सर्व मार्गाने इंग्रजी भाषा शिकते आहे.ती एक इंग्रजी चित्रपट पाहतेय त्यात जजमेंटल नावाच्या शब्दापाशी ती अडखळते. मग भाचीला जाऊन अर्थ विचारते , भाची फार सुंदर पद्धतीने अर्थ समजावून सांगते

“तू कशी साडी नेसतेस म्हणून लोकं तुला पुरातन विचारांची/ मागासलेल्या मानसिकतेची म्हणतात कारण इथे लोक जजमेंटल होऊन विचार करतात पण प्रत्यक्षात तू तशी नाहियेस. “

डिअर जिंदगी सिनेमातसुद्धा एक सुंदर दृश्य आहे. आलिया भट आपल्या मानसोपचारतज्ञाला म्हणजेच शाहरुख खानला आपल्या भूतकाळात , गतजीवनात काय घडल आहे ते सांगते आहे. तिला भावना अनावर झाल्या आहेत, तिला भयंकर त्रास होतो आहे अशा वेळी शाहरुख शांतपणे तिला समजावून सांगतो

” Don’t let the past blackmail your present

Into ruining a beautiful future”

दोन्ही चित्रपटांची दृश्ये देण्यामागे लेखणी आणि दिग्दर्शन यातली सुंदरता दाखवण्याचा प्रयत्न करणे हा हेतू आहे. गौरी शिंदे, पुण्याची मराठमोळी मुलगी जिने आपल्या 45 वर्षांच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात फक्त दोनच फिल्म्स लिहिल्या आणि दिग्दर्शित केल्या आणि मुख्य म्हणजे दोन्ही फिल्म्सना पुरस्कार आहेत. फिर गौरी पे लिखना तो बनता है ना.

गौरीच शालेय, महाविद्यालयीन, उच्च शिक्षण सगळ पुण्यातच झालं.टिपिकल मराठमोळ्या मध्यमवर्गीय घरात गौरी वाढली. तिने मास मीडिया शाखेसाठी पुण्याच्या सिंबायोसिस या कॉलेजमधून पदवी घेतली.

नंतर internship निमित्ताने मुंबईला गेली, जिथे तिने शंभर पेक्षा जास्त जाहिराती बनविण्याचा अनुभव घेतला. तिथेच तिने ओह man नावाची शॉर्टफिल्म बनवली जी बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवडली गेली.इथेच फीचर फिल्म बनवण्याची बीज तिच्या मनात रोवली गेली आणि तिने यावर विचार सुरू केला.

2012 मध्ये गौरीने तिची पहिली फीचर फिल्म बनवली जिच नाव होत इंग्लिश विंग्लिश. या फिल्मसाठी तिने लेखन आणि दिग्दर्शन अशा दोन्ही आघाड्या सांभाळल्या.गौरी सांगते ही फिल्म तिला का बनवाविशी वाटली तर चित्रपटात दाखविल्याप्रमाणेच तिचे तिच्या आईशी संबंध होते. गौरीच्या आईला इंग्रजी बोलता यायचं नाही आणि याची गौरीला भयंकर लाज वाटायची. गौरीची आई घरगुती लोणच्याचा उत्तम व्यवसाय करायची ,ती स्वतः एक उत्तम उद्योजिका होती पण केवळ इंग्रजी भाषा बोलता येत नसल्याने त्यांना आत्मविश्वास नव्हता. गौरी सांगते की इंग्लिश  विंग्लिश बनवताना कल्पनेच्या जगतात फार भराऱ्या माराव्या लागल्या नाहीत कारण हे सगळ तिने खूप जवळून अनुभव ल होत. इंग्लिश विंग्लिशच्या स्क्रिनिंग वेळी गौरीने स्वतःच्या आईला हा चित्रपट दाखवला आणि त्या वेळी त्या दोघींच्याही डोळ्यात अश्रू होते.

” आईची माफी मागण्यासाठी मी हा चित्रपट बनवला” असं गौरी भावुकपणे सांगते.

हा चित्रपट लोकांनाच काय पण समीक्षकांना देखील खूप भावला. या चित्रपटाची निवड Toronto international film festival साठी झाली. यासाठी गौरीला दिग्दर्शन क्षेत्रात उत्तम पदार्पणाचा पुरस्कार देखील मिळाला.

यानंतर तब्बल 4 वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर गौरीने तिची पुढची फीचर फिल्म केली ती म्हणजे डियर जिंदगी. इतक्या वर्षांचा गॅप का यावर पुढच्या फिल्मची तयारी हे गौरीचे उत्तर होत. ज्या फिल्मसाठी तिने इतकी तयारी केली ती फिल्म गाजली नसती तरच नवल. डिअर जिंदगी या चित्रपटासाठी देखील गौरीने लेखन आणि दिग्दर्शन अशा दोन्ही आघाड्या सांभाळल्या.उत्तम विषय, त्याहीपेक्षा उत्तम लिखाण आणि दिग्दर्शन आलियाचा सहजसुंदर वावर, शाहरुखची उपस्थिती हे सर्व फिल गुड फॅक्टर एकत्र आले आणि डियर जिंदगीचे सर्वत्र खूप खूप कौतुक झाले. याही चित्रपटासाठी तिला पुरस्कार प्राप्त झाले.

गौरीचे व्यावसायिक आयुष्य जितके यशस्वी राहिले आहे तितकेच वैयक्तिकसुद्धा पण तिच्या वैयक्तिक निर्णयाबाबत मात्र थोडी वादग्रस्त विधाने केली जातात. वयाने 10 वर्षे मोठे असलेल्या माणसाशी लग्न तोही आर बल्की सारखा प्रसिद्ध लेखक, फिल्म मेकर . गौरीच्या घरात हे लग्न तितक्या पटकन स्वीकारलं गेलं नाही, पण आता सगळ आलबेल आहे .

गौरी आणि आर बल्की यांना accidental couple म्हंटले जाते.त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली ती मुंबईत एका ऑफिसच्या लिफ्टमध्ये. गौरी मराठी, आर बल्की तमिळ पण as they say love has no language त्याप्रमाणे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हे अचानक झालं अशातला भाग नाही तर ते एकत्र काम करायचे.त्यांनी त्यांच्या पहिल्या डेटच्या वेळी दोन चित्रपट लागोपाठ पाहिल्याच सांगताना आर बल्की हसतात. मग मैत्री वाढली, प्रेम देखील वाढलं , घरच्यांचा लग्नाविषयीचा आग्रह वाढला आणि 2007 साली दोघांनी लग्न केलं. गौरीच्या मते त्या दोघांचे नाते सांगायला एक सुंदर कविता पुरेशी आहे.

Let there be spaces in your togetherness

Stand together, yet not too near together

आमच्या दोन मांजरी सोडल्यास आमच्यात समान असं काहीच नाही असं आर बल्की सांगतात.

45 वर्षांच्या गौरीला आपल्या termsवर काम करायला आवडत आणि म्हणूनच 4 वर्षात एक फिल्म बनवायला तिची मनाई नाही, यामध्ये लोक काय म्हणतील आपण मागे पडू का असे विचार तिच्या मनात येत नाहीत. तिला तिच्याच termsवर कायम काम करायला मिळो, तिला उत्तम यश पुन्हा पुन्हा लाभो ह्याच सदिच्छा.

Image by Free-Photos from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

3 thoughts on “गोष्टी लेखकांच्या – गौरी शिंदे

  • November 19, 2019 at 6:22 pm
    Permalink

    Bhagyashree you are a amazing writer.
    I m a very big fan of your stories.
    Wish you all the best dear

    Reply
  • January 15, 2020 at 4:38 am
    Permalink

    इंग्लिश विंग्लिश ही अवडला पिक्चर
    आणी गौरी च्या भावना ही

    Reply
  • October 2, 2020 at 9:19 am
    Permalink

    खूप छान लिहिलंस गं. आवडला लेख.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!