डायरी
तिची डायरी :
शनिवार संध्याकाळपासूनच त्याचं जरा सटकलेलंच होतं. आम्हाला जेवायला बाहेर जायचं होतं. मी तो पूर्ण दिवस मैत्रिणींबरोबर शॉपिंग करत होते त्यामुळे घरी उशीरा आले. बहुतेक त्यामुळेच त्याचं बिनसलं असावं. आमच्यात काहीच बोलण झालं नाही, म्हणून मग मीच म्हटलं, जरा वेगळ्या ठिकाणी जाऊया म्हणजे नीट बोलता येईल. तो बरं म्हणाला, पण जरा गप्पगप्प आणि तंद्रीतच वाटत होता.
मी विचारलं, “काय होतंय?’ तर म्हणाला, “काहीच नाही.”
मग विचारलं, “माझ्यामुळे रागावला आहेस का?” तर म्हणाला, “छे! रागावलो वगैरे अजिबात नाहीये आणि तुझ्याशी याचा काहीच संबंध नाहीये.”
घरी परत येताना मी त्याला सांगितलं की माझ त्याच्यावर प्रेम आहे. पण तो गाडी चालवत राहिला. मला समजलंच नाही, “माझंही तुझ्यावर प्रेम आहे.” असं म्हणाला असता तर काही बिघडलं असत का?!
घरी परत येताच मला कळून चुकलं मी पूर्णपणे हरले आहे, त्याला गमावून बसले आहे. तो हाॅल मध्ये बसून फक्त एकटक टीव्ही पहात होता. नजर कुठेतरी दुसरीकडेच हरवल्यासारखी वाटत होती.
मग मी हतबल होऊन झोपायला गेले. दहा मिनिटांनी तो ही झोपायला आला आणि मग आश्चर्यकारकरित्या त्याने माझ्या प्रेमळ आवाहनांना प्रतिसाद दिला आणि आमची रात्र रंगत गेली. पण तरीही मला सतत वाटत होतं, तो त्याच्याच विचारात गुंग आहे, कुठेतरी हरवला आहे.
मग मात्र माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आणि मी ठरवलं, जे काही सलतंय, त्याबद्दल त्याच्याशी स्पष्टपणे बोलायचं. पण तेवढ्यात तो गाढ झोपून गेला होता.
मी खूप रडले. काही समजेनासं झालं. मन सैरभैर झालं. त्याला नक्कीच कोणीतरी “दुसरी” मिळाली आहे याची मला खात्री पटली होती. माझ्या आयुष्याला आता काही अर्थ उरला नव्हता.
त्याची डायरी :
आज बायर्न म्युनिक फुटबाॅलची मॅच हरले, पण आमची रात्र मात्र तुफान रंगली.
(एका जर्मन कथेचा स्वैर अनुवाद)
Image by free stock photos from www.picjumbo.com from Pixabay
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
ह्या ह्या ह्या ही भलतीच “दुसरी”निघाली.
धमाल झालाय अनुवाद.
मस्तच!!
😀😀😀
Hahahah Asch asat bayka khup tokacha vchar kartat n hya lokanch Kahi vegalch asat
😊😊😊
Ashech astat purush …aplyala vatat Kay moth zalay Ani jevha Karan kalat tevha as vatat apan Kay Kay vchar kelele….😂