अश्रुफुले-(प्रकरण ६ वे)- अभिजित इनामदार

यश – काय साहेब. आज चेहरा एकदम खुललाय.
अवि – Yes. यश माय फ्रेंड. आय लव्ह हर
यश – कोण?
अवि – अरे असे काय करतोस?
यश – मृणाल?
अवि – हो रे. आज मी सांगितले तिला. आणि ती सुद्धा खूप प्रेम करते माझ्यावर. You Know यश मी आत्ता खूप खुश आहे. मी तिच्यासाठी काहीही करू शकतो… मी तुला असे शब्दात नाही सांगू शकत पण. मला खरंच सांगतो.
त्याला वाक्य पुर्ण करू न देता यश म्हणाला
यश – अरे बाबा कृपा करून मला सांगूही नकोस की तुला कसे वाटतेय ते. कारण तू जे काही सांगशील ते काही माझ्या पचनी पडणार नाही. आणि तू एकदा सुरु झालास की तासभर लेक्चर देशील. पण सगळं जाऊ दे तू खुश आहेस ना. झाले तर मग.
यश पुढे काय बोलतोय ह्याकडे अवीचे लक्ष देखील नव्हते… त्याचं मन भविष्यातील सुंदर स्वप्नांच्या स्वागताची तयारी करण्यात गुंगले होते. तर नजर शून्यात हरवली होती.
आता अवि आणि मृणाल रोजच्या रोज भेटत होते. भेटीचा वेळ कसा जात होता ते दोघांनाही कळत नव्हते. पुन्हा भेटण्यासाठीचा विरह आता सहन होत नव्हता. त्यात आता मृणालची GRE च्या एक्झामची तारीख जवळ येत होती. त्यामुळे रोज रोज असे भेटून वेळ दवडणे योग्य नव्हते… हे बुद्धीला पटत होते पण मनाला पटत नव्हते. मनाचं आणि डोक्याचं हे असेच असते. जी गोष्ट मनाला पटते, हवीहवीशी वाटते ती गोष्ट करायला डोकं किंवा बुद्धी तयार होत नाही आणि जी गोष्ट डोकं करायला सांगते ती गोष्ट करायला मन तयार नसतं. त्या दोघांचही असाच होत होतं. आज भेटलो.आता उद्या नको असे ते ठरवत. पण शेवटी मन डोक्यावरती कुरघोडी करत होतं. तिचा फोन आल्यावरती अविच मन फक्त तिला पाहण्यासाठी म्हणून प्रचंड वेगानी तिच्याकडे धावत सुटत होतं… तर तो बिचारा आपल्या वेड्या मनामागे धावत असे.
अवि – काय यश काय म्हणतोयस?
यश – मी काय म्हणणार? काही म्हणण्यासारखे आता तुझे दिवस आहेत.
अवि – ते सोड रे. जसा काही तू रोज संध्याकाळी रूमवरच असतोस ते. बर तुझी गर्लफ्रेंड शलाका काय म्हणते?
यश – अरे तुला सांगायला विसरलो. शी इज माय एक्स गर्लफ्रेंड. सध्या मी स्वप्नालीला भेटतो आहे.
अवि – काय रे बाबा. आणि ह्यावेळी काय फक्त दोन महिन्यातच चेंज? पण ह्यावेळी तर तू जरा सिरीयस आहेस तुमच्या रिलेशनशिप बद्दल असे काहीतरी तू म्हणाला होतास मागच्या आठवड्यात. लक्षात आहे माझ्या अजून ते.
यश – हो यार पण आम्हाला असं वाटले की आम्ही दोघे एकमेकांसाठी एकदम परफेक्ट मॅच नाही आहोत. म्हणून मग.
अवि – आणि हे तुम्हाला आधी नाही कळले?
यश – आधी कसे कळेल यार ! एकदम क्लोज आल्यावरतीच कळते ना कोण कसे आहे? कोण कसे आहे ते.
अवि – अरे पण तिच्या मनाचा काही विचार केलास का? तिचं काय? तुझा डिसिजन तिलाही मान्य आहे?
यश – म्हणजे तुला काय म्हणायचय? तिनेच तर हा डिसिजन घेतला. कुठल्या जमान्यात राहतो यार तू अजून. हल्ली कोणी मी तुझ्यावाचून जगूच शकत नाही वगैरे असलं नसतं यार. तिला वाटले आमच्या आवडी निवडी वेगवेगळ्या आहेत. तिच्या इच्छा अपेक्षा वेगळ्या आहेत मी त्या नाही पूर्ण करू शकणार. हल्ली तू नही कोई और सही. कोई और नही कोई और सही. असा जमाना आहे दोस्त.
अवि – म्हणजे?
यश – म्हणजे वाघाचे पंजे. अरे म्हणजे तिला दुसरे कोणीतरी मिळालं. म्हणजे. तिच्या गरजा पूर्ण करू शकेल असे कोणीतरी.
अवि – म्हणजे ती सुद्धा तुझ्यासारखाच विचार करते?
यश – हम्मम
अवि – मग हे सांग ना… हे कशाला की आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट म्याच नाही आहोत म्हणून…
यश – असं कसं म्हणतोस तू?
अवि – तूच बघ यश! तुम्ही एकत्र आलात ते एकमेकांची गरज पूर्ण करण्यासाठी. मग त्या गरजेचं स्वरूप काही असू देत त्याच्या खोलीत मी जात नाही. पण काही दिवसांनी तिला तुझ्या काही गोष्टी खटकल्या, तुला तिच्या काही गोष्टी खटकल्या तर तुम्ही शांतपणे ह्यावर विचार न करता, काही मार्ग निघतो का ते न पाहता, काही तडजोडी न करता सरळ वेगळे होण्याचे ठरवलेत. मग कसे तुम्ही दीर्घकाळ तुमचे नाते टिकवू शकाल?
यश – अरे पण तडजोडी कशाकरता करायच्या? आणि मी तुला मागे पण सांगितले आहे की तडजोडी करून स्वतःच मन मारून खरं सुख मिळत नाही.
अवि – हा तुझा बचाव आहे. बाकी काही नाही
यश – म्हणजे?
अवि – हे बघ तुम्ही आगदी न कळतपणे असे ठरवून टाकले की काही बाबतीत तडजोड करायची आणि काही बाबतीत नाही.
यश – मी नाही समजलो.
अवि – हे बघ जेंव्हा तुला तिच्याकडून हवे ते, हवे तसे, हवे त्या वेळी मिळत असेल मग ते तिचा वेळ, शरीरसुख, मानसिक आधार किंवा अजून काहीही असो पण तुझ्या गरजा भागत होत्या तेव्हा तू पण काही तडजोडी केल्या असशीलच ना जसे की तिला लांब अंतर असून घरी ड्रॉप करून येणे, तिचे फोन रिचार्ज कर, फिरायला नेणे वगैरे वगैरे. तसेच तिच्याही बाबतीत असू शकेल कदाचित. पण ह्यापलीकडे जाऊन जर कोणीही एकमेकांकडून काही अपेक्षा केली तर तुमची सेल्फ एक्झीस्टन्स ची भावना जागी होते. तिने काही बंधने घातली तर ते तुला आवडत नाही आणि तसंच तिच्याही बाबतीत असेल. मी नाही म्हणत नाही. मग तुमचे मन नवीन माणसाला शोधू लागते जिथे बंधने असणार नाहीत आणि मग तुम्ही ते नाते निभवायची जबाबदारी न घेता पळ काढता. बाकी मग हे आम्ही परफेक्ट नाही आहोत एकमेकांसाठी अशी काही करणे शेधता.
यश – तसेही असेल कदाचित. मी नाही म्हणत नाही. मी नाही एवढा विचार केला कधी
अवि – तसेच आहे मित्रा.
यश – पण तुला काही अडचण आहे का? तीही असाच विचार करत असेल माझ्या सारखा तर.
अवि – मला काहीच अडचण नाही. जिथे तू असं विचार करतो तर तुझ्या सारखा विचार तिने केला तर काय बिघडलं? फक्त माझ्या सारख्याच्या मनाला ते रुचत नाही इतकंच.
थोड्या वेळाने अवि म्हणाला
अवि – एक विचारू?
यश – विचार
अवि – तुला त्रास नाही होत ह्या सगळ्याचा? मानसिक त्रास. भावनिक गुंता होत नाही तुझा?
यश – तुला माहित आहे ना यार मी नाही इतका भावनिक आणि मी नाही इतका विचार करत. अन माझी तशी इच्छा पण नाही. सो तुझे विचार तुला लखलाभ असो. मी झोपतोय आता गुड नाईट अवि
अवि – गुड नाईट यश
अवि बेडवर पडला होता. मनात विचार चालूच होता. यश म्हणतो तसा मुलीही असा विचार करतात? की त्याने कमीटमेंट दिली नाही म्हणून ती त्याला सोडून गेली असेल? किंवा खरेच असतील अशाही काही मुली कारण यश म्हणतो त्याप्रमाणे तिलासुद्धा दुसरं कोणीतरी मिळालं होतं.
आगदी दोन टोकं आहेत ना? एक टोक त्याचं स्वतःच प्रेम. जे एकमेकांसाठी काहीही करायला तयार असणारं… तर दुसरं टोक स्वतःच्या सुखासाठी (कदाचित क्षणिक) कोणतीही हद्द पार करायला तयार असणारं टोक. यश आणि शलाका सारखं.
अवीने कूस बदलली. समोर पाहिलं तर यश निवांत घोरत पडला होता.
क्रमश:
Image by Pete Linforth from Pixabay 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!