सोलो ट्रीप- भाग ४
मनसोक्त गप्पा मारून झाल्यावर दोघेही झोपी गेले. सकाळी प्रद्युम्न ला जाग अली, तसा तो बाहेर आला. समोरचे दृश्य पाहून तो अचंबित झाला! ते जिथे थांबले होते ते डोंगराचे टोक सोडून चहूकडे ढग होते. ढगांचा समुद्रचं जणू! आणि त्यात मध्ये ते एका बेटावर होते! इतके सुंदर दृश्य त्याने कधीच पहिले नव्हते. त्याने पळत जाऊन अनया ला उठवले आणि जवळ जवळ खेचतच बाहेर आणले.. “हे बघ, यासाठी आलो होतो आपण इथे!.. ” प्रद्युम्न म्हणाला. अनया समोरचे दृश्य डोळे विस्फारून पाहू लागली! काहीवेळ ते तसेच त्या ढगांच्या समुद्रात हरवून गेले! नंतर दोघांनी एकदम एकमेकांकडे पाहिले.. दोघांच्याही डोळ्यात पाणी होते! “I always wanted to visit places that make you realize how tiny you are!” प्रद्युम्न म्हणाला..
अनया ने फक्त त्याच्या खांद्यावर थोपटले. गरमागरम कॉफी घेऊन दोघांनीही खाली उतरायची तयारी केली. उतरताना तिला सुंदर धबधबा दिसला. तिने प्रद्युम्न ला तिथे चलण्याचा आग्रह केला. शेवटी दोघेही त्या धबधब्याजवळ आले. धबधब्याच्या पुढे खूप खोल दारी होती.. “हे बघ माझा असा इथे फोटो काढ, त्याच्यातून दिसले पाहिजे कि मी धबधब्याच्या तोंडापाशी उभी आहे!”-अनया धबधब्यात जात म्हणाली. “अनया पुढे ये, घसरशील .. “-प्रद्युम्न. “काही होत नाही, तू काढ तर फोटो!” असा म्हणता म्हणता ती पुढे सरकली. आता ती धबधब्याच्या तोंडापासून जेमतेम १५-२० पावलं दूर होती, आणि अचानक तिचा पाय शेवाळावरून घसरला, ती घसरत पुढे गेली आणि अगदी धबधब्याच्या तोंडापाशी जाणार इतक्यात कसाबसा दगडांचा आधार घेऊन थांबली. “अनया.. ” – प्रद्युम्न च्या काळजाचा ठोका चुकला.. तो तिला मदत करायला धावला.. कशीबशी दगडांचा आधार घेत ती वर आली.. प्रद्युम्न ने पटकन तिला आधार दिला.. ती भेदरलेल्या कोकरासारखी थरथरत होती. प्रद्युम्न ने तिला खाली बसवले आणि जवळ घेऊन थोपटत राहिला.. थोड्या वेळाने ती सावरली, मग हळू हळू ते डोंगर उतरू लागले.. प्रद्युम्न तिला आधार देत हळू हळू उतरवत होता..
दोघेही जिप्सीपाशी पोचले. प्रद्युम्न ने गाडी थेट एका रिसॉर्ट वर नेली. त्याने मुद्दाम बीच साईड रूम घेतली.. रूम मध्ये जाऊन दोघेही फ्रेश झाले. अनया शांत शांत च होती. तिला जबरदस्त धक्का बसला होता. प्रद्युम्न ने तिला काही वेळ एकांत दिला.. थोड्या वेळाने खोलीत आल्यावर त्याने पहिले कि अनया झोपून गेली होती.. संध्याकाळी उठल्यावर तिचा चेहरा थोडा फ्रेश दिसत होता.. मग तो तिला घेऊन बीच वर गेला. दोघेही समुद्राची गाज ऐकत किनाऱ्यावर बसून राहिले. समुद्राचे संगीत कानात साठवत राहिले.. खूपच बोलकी शांतता होती ती.. ! काहीही ना बोलता खूप काही बोलून जाणारी.. स्वतः शीच संवाद साधणारी.. अंधार पडल्यावर दोघेही खोलीत आले. आल्यावरही अनया पलंगावर खूप वेळ शांत बसून होती.. प्रद्युम्न तिच्याजवळ गेला आणि तिला जवळ घेतले, तसे तिने स्वतः ला त्याच्या मिठीत झोकून दिले ..
“इट्स ओके अनु.. ” तिला आपल्या मिठीत घेत प्रद्युम्न म्हणाला. अचानक अनया हमसून हमसून रडू लागली.. “काय झालं?”-प्रद्युम्न घाबरून म्हणाला.. “आई बाबांची खूप आठवण येतीये.. “-अनया. “इतकाच ना? चल मग फोन करू त्यांना!”-प्रद्युम्न. “तस नाही रे, आज मला काही झालं असतं तर त्यांचा काय झालं असतं .. ” अनया रडत म्हणाली. “अस नाही म्हणायचं” प्रद्युम्न ने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसे तिचे डोके गरम लागले. त्याने तिच्या गळ्याला हात लावला तर अनया ला ताप आला होता! “अग ताप आलाय तुला, चल काहीतरी खाऊन गोळी घे. थांब मी आणतो.. ” प्रद्युम्न म्हणाला. थोडंसं खायला लावून त्याने तिला गोळी दिली. तिला थंडी वाजून अली म्हणून त्याने तिच्यासाठी थोडी डॉकटर्स ब्रँडी मागवली. “शी .. किती घाण आहे.. ” – पिताच अनया म्हणाली. “अग औषध म्हणून पी. एक घोट तर आहे!” प्रद्युम्न. ती त्याची काळजी दुरून टिपत होती आणि मनोमन सुखावत होती. “आता झोप शांतपणे.. ” प्रद्युम्न तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला आणि बाहेरच्या खोलीत जायला निघाला. अचानक त्याला काय वाटले कोणास ठाऊक, पण तो परत आला आणि अनया च्या कपाळावर आपले ओठ टेकवले.
प्रद्युम्न बाहेर जाऊन बसला. तोही खूप थकला होता. समोरच्या बेड वर ऐसपैस पसरून तो टीव्ही पाहू लागला. इतक्यात अनया ब्लॅंकेट घेऊन बाहेर आली. “मी तुझ्याजवळ झोपू?” अनया म्हणाली. “हम्म .. ये .. ” अनया प्रद्युम्न जवळ जाऊन त्याला बिलगून झोपली. “एकही सपना है अब निगाहो मै .. ऐसी हि राते कटती रहे आपकी बाहों मै ..” प्रद्युम्न अनया च्या कानाजवळ जात म्हणाला. अनया चमकलीच!
तिचे हावभाव पाहून प्रद्युम्न हसायला लागला.. “अग घाबरतेस काय अशी? फक्त शायरी म्हणतोय मी!” प्रद्युम्न म्हणाला. “एक सांगू का तुला? तू त्या दिवशी पण मला ह्ग केलं होतस ना, खूप सेफ वाटत होतं मला.. असं वाटत होतं दूर जाऊच नये तुझ्यापासून. फक्त आकर्षण असेल का रे हे? किती छान स्वप्नात असल्यासारखं वाटतंय मला, पण हे स्वप्न तुटणार अजून एका आठवड्याने..” अनया च्या पोटातली ब्रँडी हळूहळू बोलू लागली होती. प्रद्युम्न ला ते जाणवलं. त्याने तिला झोपेतच घट्ट मिठी मारली. सकाळी डोळे उघल्यावर बघते तर ती प्रद्युम्न च्या बाहुपाशात होती. त्याची पकड इतकी घट्ट होती कि तिला हलता सुद्धा येत नव्हते! तिने कशीबशी त्याची मिठी सोडवली. प्रद्युम्न गाढ झोपला होता. त्याला बघून आपसूकच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले.. “किती गोड आहे हा .. किती काळजी घेतो.. मला कोणी मागच्या आठवड्यात माझ्यासोबत अस काही होईल असे सांगितले असते तर हसले असते मी!” ती हलकेच त्याच्या कपाळावर ओठ टेकवणार इतक्यात त्याने डोळे उघडले. अनया दचकली!
प्रद्युम्न ने गोडशी स्माईल देऊन तिला मॉर्निंग विश केले.. “आता कसं वाटतंय ?”-प्रद्युम्न. “आता काय सांगू ह्याला कसं वाटतंय ते.. ” मनात अनया म्हणाली. “आता ठीक आहे मी.”-अनया म्हणाली. “मला किस वगरे करायला अली होतीस कि काय?” प्रद्युम्न हसत म्हणाला. “नाही नाही, मी खालीच उतरत होते.. ” चोरी पकडली गेल्यासारखी अनया म्हणाली आणि पटकन बाहेर पळाली. “शप्पथ.. ऑलमोस्ट कॉट .. ” स्वतःवरच चिडत अनया म्हणाली. चेक आउट करायचे म्हणून दोघांनी लवकर आवरून घेतले. अनया अंघोळ करून अली आणि आवरू लागली. प्रद्युम्न तिला टक लावून पाहू लागला. तिचे ओले केस कमरेपर्यंत रुळत होते. तिचं त्याच्याकडे लक्ष जाताच पटकन तो बावरून इकडे तिकडे बघू लागला. त्याची त्रेधा बघून अनया गालातल्या गालात हसली.
“प्रद्युम्न…” अनया ने हाक मारली. “हम्म .. “-प्रद्युम्न. “औषध लावतोस?”-अनया. काही न बोलता प्रद्युम्न पुढे आला. औषध घेतले. तिच्या पाठीला औषध लावताना त्याला तिच्या पाठीवरचा टॅटू दिसला “wanderlust” त्याने हलकेच त्या टॅटू वरून आपले बोट हळुवारपणे फिरवले.. अनया च्या अंगावर सरसरून काटा आला! प्रद्युम्न लाही तिच्या अंगावर काटा आलेला जाणवला आणि तो गालातल्या गालात हसला. इतक्यात प्रद्युम्न चा फोन वाजला, फोन घेऊन तो बोलण्यासाठी बाहेर गेला.
इकडे जसा तो बाहेर गेला तसा अनया ने सुटकेचा निःश्वास सोडला. स्वतःलाच आरशात बघून ती गोड लाजली. कितीतरी वेळ ती पलंगावर शून्यात नजर लावून बसली होती, तिची आणि प्रद्युम्न ची स्वप्न बघत! इतक्यात प्रद्युम्न आत आला. दरवाजाच्या आवाजाने तिची तंद्री भंगली, आणि तिने प्रद्युम्नकडे पाहिले. त्याचा चेहरा उतरला होता.. “महत्वाच्या कामामुळे मला लगेच मुंबईला जावं लागणार आहे अनया.. ”
क्रमशः
Image by Free-Photos from Pixabay
- दिवाळी २०२० स्पेशल- १९ - November 27, 2020
- दिवाळी २०२० स्पेशल- ३ - November 13, 2020
- पाडस - October 23, 2020
Khup chhan lihita madam tumhi. Next part lavkar yeu dya.
Nice ……waiting for next part