सोलो ट्रीप- शेवटचा भाग

“तेरा मुझसे है जन्मो का नाता कोई.. यु हि नही दिल लुभाता कोई.. जाने तू.. या जाने ना..”

अनया प्रद्युम्न च्या खांद्यावर डोके ठेवून पहुडली होती. प्रद्युम्न ने तिचा हात हातात घेतला होता, आणि दोघेही पलंगाला टेकून डोळे मिटून गाणे ऐकत होते.. उद्या दोघेही परत जाणार आपापल्या वाटेला ! सगळं सामान पॅक करून दोघे गाणी ऐकत बसले होते..

“प्रद्युम्न.. “-अनया. “हम्म शोना.. “-प्रद्युम्न. “ट्रिप कशी संपली कळलेच नाही ना रे.. आले तर मी सोलो ट्रिप साठी होते पण हि माझी soul ट्रिप च ठरली.. ” अनया म्हणाली! “हो ना.. उद्यापासून परत तेच रुटीन सुरु.. दिवस कसे संपले कळलंच नाही.. ” प्रद्युम्न म्हणाला.

“तुला आठवतंय आपण कसे भेटलो? आता आठवल्यावर इतकं हसू येतंय ना मला.. “-अनया. “हो ना.. कसली वेन्धळी वाटली होतीस तू मला बघितल्या बघितल्या! पण तू गाणं म्हटलंस ना, तेव्हाच मला आवडली होतीस.. आपण जंगलातून बाहेर पडलो तेव्हा मी तुझ्या पूर्ण प्रेमात पडलो होतो!”-प्रद्युम्न. “मला तर प्रत्येक क्षण नि क्षण आठवतोय.. भेटलो त्या रात्री तू माझ्या केसांची बट मागे केली होतीस.. माझ्या पायात काटा रुतला तेव्हा किती कळवळला होतास तू.. आणि डोंगरावरची रात्र.. ती तर सगळ्यात स्पेशल होती.. तुझा पहिला स्पर्श.. आधी नकळत.. मग चुकून.. मग कळत केलेला… मला कायमच हवाहवासा वाटणारा.. आपला पहिला किस – रादर माझा पहिला किस.. तुझ्या ओठांनी तू मला केलेला प्रत्येक स्पर्श.. तुझी मिठी .. आपलं कँडल लाईट डिनर .. तुझं असं जवळ घेणं .. हळुवारपणे स्पर्श करणं.. सगळं सगळं आठवतंय आणि हे सगळं माझ्यासाठी कायमच स्पेशल राहील.. खूप मिस करेन मी तुला प्रद्युम्न..” अनया हळवी होत म्हणाली.. “मीही तुला खूप मिस करेन ग.. ” अनया च्या गालावर हात ठेवत प्रद्युम्न म्हणाला… “मला तुझ्या मिठीत घे ना मग.. आजची रात्र आपली ट्रिप मधली शेवटची रात्र..” अनया प्रद्युम्न जवळ येत म्हणाली.. प्रद्युम्न ने तिला घट्ट मिठीत सामावून घेतले. “असं वाटतंय हि मिठी कधीच सुटू नये..”-अनया. “अनु.. “-प्रद्युम्न. “आत्ता काहीच बोलू नकोस प्रद्युम्न.. मला तुझ्या सहवासाचा प्रयेक क्षण साठवून घ्यायचाय मनात..”-अनया. काहीही न बोलता प्रद्युम्न ने त्याचे ओठ अनया च्या कपाळावर टेकवले आणि परत आपल्या मिठीत घेतले.. झोपतानाही अनया प्रद्युम्न च्या एका हातावर डोकं ठेवून त्याला बिलगून झोपली..

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रद्युम्न लवकर उठला आणि अंघोळ करून बाहेर आला तेव्हा अनया नुकतीच उठली होती.. प्रद्युम्न टॉवेल ने अंग पुसत होता.. पिळदार शरीर आणि पाठीवर मानेखाली काढलेला सूर्याचा टॅटू .. अनयाला त्याला मिठी मारण्याचा मोह आवरला नाही. मागून जाऊन तिने त्याच्या टॅटू वरून हात फिरवला.. आणि त्याला मिठी मारली. “आज जाणार आपण.. ” अनय म्हणाली. “हो.. ग शोना.. इच्छा नसली तरी जावे लागेलच.. चल आवर तू पण, टॅक्सी येईलच इतक्यात.” प्रद्युम्न म्हणाला. अनया आवरून रेडी झाली.. टॅक्सी यायला थोडा वेळ होता. “So this is it.. ” प्रद्युम्न म्हणाला.. “खूप अवघड जाणारे ग मला.. पण मी लवकरात लवकर मुंबई ला येईल तुला भेटायला.. आणि हो अजून एक.. मुंबई वरून माझी कनेक्टड फ्लाईट आहे, सो मी लगेच निघून जाईल.. आपल्याला भेटता येणार नाही तिथे ..”

प्रद्युम्न म्हणाला.. “माहितीये मला.. ” अनया म्हणाली.. इतक्यात रूम सर्व्हिस ने टॅक्सी आल्याचे सांगितले.. “एक किस तो बनता है यार” अनया हसत म्हणाली.. “मग तूला काय वाटलं? तुला तसाच सोडेन मी?” रूम च दार लावत प्रद्युम्न म्हणाला.. अनया त्याच्या जवळ आली तसे त्याने तिला ओढून आपल्या बाहुपाशात घेतले आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले.. किस करून झाल्यावर प्रद्युम्न ने अनया ला घट्ट मिठी मारली.. “I will miss you my love..” प्रद्युम्न म्हणाला.. “Me too” अनया जड अंतःकरणाने म्हणाली..

दोघेही टॅक्सित बसून विमानतळाकडे रवाना झाले..

मुंबई एअरपोर्ट वर निघताना दोघांनी एकमेकांना फक्त डोळ्यांनीच निरोप दिला.. अनया तिच्या घरी अली आणि प्रद्युम्न चेन्नई ला गेला..

दोघांचाही जणू काही श्वास थांबला असावा इतके ते बेचैन झाले होते.. एकमेकांशिवाय दोघांनाही अजिबात करमत नव्हतं .. अशातच एकदा अनया ला प्रद्युम्न ने फोन केला.. “कुठे आहेस ग?” “ऑफिस मध्ये. का रे?” “मी मुंबई मध्ये आलोय..” “काय??” पूर्ण ऑफिस ला आवाज जाईल इतक्या जोरात ती किंचाळली! “मी येतीये तुला भेटायला.. आहेस कुठे तू??” अनया ने विचारले. प्रद्युम्न ने त्याच्या हॉटेल चा पत्ता दिला.
अनया खूप खुश होती, आज ती तब्बल एक महिन्याने प्रद्युम्न ला भेटणार होती! त्याच्या रूम मध्ये येताच दोघांची नजरानजर झाली, प्रद्युम्न ने तिला मिठीत घेतले आणि ती लहान मुलासारखी रडू लागली.. “खूप मिस केलं रे मी तुला.. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय.. “-अनया म्हणाली. “माहितीये मला! मीही नाही.. म्हणूनच मी उद्या आई बाबांना मुंबई ला बोलावले आहे, तू हि तुझ्या घरच्यांशी बोलून घे. आपल्या लग्नासाठी!!” प्रद्युम्न ने तिच्यावर बॉम्ब टाकला.. “अरे पण इतकं अचानक.. ” अनया म्हणाली.. “हो. अस वाटतंय आत्ताच लग्न करावं तुझ्याशी आणि घेऊन जावं तुला माझ्या सोबत.. ” म्हणत प्रद्युम्न ने तिला उचलले. “सोड मला.. ” अनया म्हणाली.. “खरंच सोडू?”-प्रद्युम्न ने विचारले. “अजिबात सोडू नकोस.. मला असच जवळ ठेव तुझ्या.. खूप खूप जवळ.. कायम.. ” जमिनीवर उतरत आणि प्रद्युम्न ला बिलगत अनया म्हणाली..

अरे थांब एक ना तुला एक दाखवायचं.. म्हणत अनाया ने शर्ट चे बटन काढायला सुरुवात केली. “अग हे काय करतीये तू?” प्रद्युम्न गोंधळून म्हणाला.. “थांब रे.. हे बघ..” अनया म्हणाली. तिने गळ्याच्या थोडे खाली प्रद्युम्न च्या नावाचा टॅटू करून घेतला होता.. “खरंच वेडी आहेस तू.. पूर्ण वेडी.. आणि मी नंतर नाही म्हणालो असतो तर? किंवा अजूनही म्हणालो तर?” प्रद्युम्न ने विचारले. “मी नाही दुसऱ्या कोणाशी लग्न करणार.. इतकी क्लीअरिटी आली आहे मला आता.. ” प्रद्युम्न च्या डोळ्यात बघत अनया म्हणाली.. इमोशनल होऊन प्रद्युम्न ने तिला मिठीत घट्ट पकडून ठेवले.. “मला असंच तुझ्या मिठीत कायम राहायचं प्रद्युम्न.. ” अनया म्हणाली.. प्रद्युम्न ने मिठी सोडवली, तिचे दोनही गाल हातात घेतले.. आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले.. “इतकंच ? मी इतकी धावपळ करत आले आणि इतकंच?” अनया ने मिश्कीलपणे विचारले.. “अस? तसतर बरच काही आहे लिस्ट वर.. आणि आता तू शर्ट च बटन हि काढल आहेस..” अनया ला जवळ घेत प्रद्युम्न म्हणाला.. “पण आज मी काहीच करणार नाही.. आता डायरेक्ट हनिमून! सध्या आमच्यासाठी इतकंच पुरे..” तिच्या ओठांवर हळुवार बोट फिरवत प्रद्युम्न म्हणाला! त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकले आणि दोघे एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेले..

आज अनया च्या घरी लगबग होती.. प्रद्युम्न आणि त्याच्या घरचे पाहुणे अनया कडे लग्नाची बोलणी करायला येणार होते.. इतक्यात दारावरची बेल वाजली. अनया च्या आई बाबांनी त्यांचे स्वागत केले. लग्नाची बोलणी पार पडली. प्रद्युम्न ने त्याच्या आईशी अनया चे फोनवर बोलणे करून दिले होते. त्यांना सून पसंत होती. एक महिन्यानंतर चा मुहूर्त निघाला होता. अनया ची इच्छा होती कि तिचे लग्न साऊथ ला एखाद्या प्राचीन मंदिरात व्हावे, त्याप्रमाणे सगळी तयारी करण्यात अली. अनया चा शब्द कोणी खाली पडू देत नव्हते. अनयानेही सर्वांना छान लळा लावला होता. आता ती बऱ्यापैकी तेलगू बोलायला शिकली होती. सगळेच खूप आनंदात होते. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. प्रद्युम्न सेलिब्रिटी असल्याने त्याचे लग्न चांगलेच चर्चेत होते. मुहूर्ताची वेळ झाली आणि अनया व प्रद्युम्न पती पत्नी झाले. त्या क्षणी दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिले.. “मी कायम असेल तुझ्यासोबत अनु.. ” अनया च्या कानाजवळ जात हलक्या आवाजात प्रद्युम्न म्हणाला..आणि त्याने अनया चा हात हलकेच दाबला. अनया ने डोळ्यांनीच होकार दिला.

३ महिन्यानंतर..

“बरोब्बर ५ महिने झाले आपण पहिल्यांदा इथे येऊन.. ना?” अनया म्हणाली. “हो.. इथेच भेटलो होतो आपण पहिल्यांदा. जंगलात चुकली होतीस तू. वेंधळी कुठची.” प्रद्युम्न म्हणाला. “हम्म कळतंय लग्न झाल्यावर कोण वेंधळ आहे ते.” लटक्या रागाने अनया म्हणाली. “तू आहेस माझी काळजी घ्यायला मला माहितीये ते.. म्हणूनच मी राहतो वेंधळ्यासारखा.. ” लाडात येत प्रद्युम्न म्हणाला. “By the way, तेव्हा तू मला जितकि हॉट वाटली होतीस त्यापेक्षा खूपच जास्त हॉट आहेस.. ” प्रद्युम्न अनया ला मिठीत घेत म्हणाला. “दुसरं काही सुचतं का नाही रे तुला?” अनया म्हणाली. “टिपिकल बायको सारखी बोलायला लागली आहेस हा आता तू! आणि आवडतं मला ते जाम! पण त्यासोबत तू स्वतः ला हरवायला नकोयेस मला..कारण मी त्याच मुलीच्या प्रेमात पडलो होतो!” प्रद्युम्न म्हणाला. “माहितीये मला.. आता जायचं का झोपायला? खूप झोप येतीये मला.. ” अनया म्हणाली.. “झोप बीप विसर आता, माझ्या शूटिंग मुळे आपण ३ महिन्यांनी आलोय हनिमून ला.. त्यामुळे आता सगळ्याची व्याजासहित वसुली होईल..” डोळा मारत प्रद्युम्न म्हणाला. “मग चल ना.. आणि by the way मलाही तू वाटलं होतास त्यापेक्षा बराच हॉट आहेस! And u deserve everything कारण लग्न आधी आपण मुंबईत भेटलो तेव्हा शक्य असूनही तू “तसं” काही केलं नाहीस… तेव्हाच ठरवलंय मी, you will get best of me for everything.. ” अनया म्हणाली, आणि दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले! जिथे हि गोष्ट सुरु झाली होती,तिथे तिला एक सुंदर वळण मिळाले!

समाप्त.

Image by Free-Photos from Pixabay 

Pooja Pathak
Latest posts by Pooja Pathak (see all)

Pooja Pathak

कम्प्युटर इंजिनियर, सध्या ह्युमन रिसोर्स विभागात कार्यरत. वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड. इतरही बरेच छंद - गायन, चित्रकला, मिमिक्री, स्केचिंग. क्रिएटिव्हिटी ला वाव असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. पेनपूजा हे स्वतः साजे लिखाण असणारे फेसबुक पेज Oct 2018 पासून चालवत आहे.

4 thoughts on “सोलो ट्रीप- शेवटचा भाग

  • April 8, 2020 at 7:39 pm
    Permalink

    सुंदर प्रेम कथा

    Reply
  • April 14, 2020 at 6:26 am
    Permalink

    वेडी आहेस तू पूजा… Please keep writing girl…

    Reply
  • June 17, 2020 at 5:31 pm
    Permalink

    खूप छान लेखन आणि कथा पण.

    Reply
  • June 18, 2020 at 6:51 pm
    Permalink

    Bhari ekdum👌👌👌👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!