रिले कथा- भेट- भाग ८ (शेवटचा भाग)

त्याचा चोरीला गेलेला प्रत्येक प्राजक्त तर इथे तिच्या चेहरयावर छानसा फुललेला दिसत होता. त्याने तिच्यासाठी लावलेला प्राजक्त जणुकाही आज बहरलेला होता….तिच्यासाठीच… काही क्षण दोघेही एकमेकांकडे पहातच राहिले…

“श्यामल…”तो फक्त एवढेच म्हणाला.

तिने मान हलवली. तिने आवाज दिला,”नंदु…”

तो ही फक्त हसला.

शिरयाने मधेच म्हणले,”काका…तुम्हाला आवाज देताय का काकी…”

नंदुने त्याला टपली मारली व म्हणाला,”ऐकु येतंय रे मला…म्हातारा नाही झालोय अजुन…”

शिरयाच्या चेहरयावर आश्चर्याचे भाव उमटले व तो म्हणाला,”आता हे कधीपासुन तरुण झाले? कालपर्यंत तर हे म्हातारे होते…”

दोघेही एकदम हसले.

नंदुली टेबलावर प्राजक्ताची फुले दिसली. तो मनापासुन हसला…

“प्राजक्त माझ्या मनातला

तुझ्यासाठीच फुललायं…

मार्ग जणु आपला

त्यांनीही जाणलायं…”

नकळत त्याच्या तोंडुन चार ओळी बाहेर पडल्या. ती एकदम त्या शब्दात तल्लीन होऊन गेली…. राधाने तल्लीन व्हावे तसे.

तो बोलायचा थांबला तशी ती म्हणाली,”किती दिवसांनी ऐकतेय तुला नंदु…विश्वास बसतं नाहीये…”

तो काही बोलणार तेवढ्यात शिरयाने पण डोळ्यावर हात ठेवत म्हणलं,”माझा पण विश्वास बसत नाहीये…”अाणि काहीही न बोलता तो चालता झाला.

त्याच्या पाठमोरया शरीराकडे पहात नंदु म्हणाला,

“विश्वास नसला माझा डोळ्यांवर

तरी आहे माझ्या मनावर…

तिचा भास असला तरी चालेल

दिसु दे खळी तिच्या गालांवर…”

हे ऐकुन या वयातही तिची खळी तशीच खुलली.

………………..

“मला वाटलं नव्हतं की आता जीवनाच्या कुठल्याही वळणावर आपली भेट होईल….”तिने एकदम हताशपणे म्हणलं.

तो म्हणाला,”यालाचा नियती म्हणातात…”

“नियती…”लांब श्वास घेत ती फक्त हसली.

“बरं सांग…तु इथे कशी आलीस? नवरा, मुलं कोण आहे सोबतीला?”त्याने सहजपणे विचारलं

“सोबतीला कोणी असलं तर हा प्राजक्त मीच आणला असता का?”ती जराशा निराशपणे म्हणे. पण लगेच पुढे बोलु लागली,

“महिन्यापुर्वी मिलिंदचे देहावसन झाले…तीव्र हार्टअँटँक होता…क्षणात होत्याचे नव्हते झाले…काही सांगायचे, बोलायचे राहुनच गेले…खुपदा आपण काही गोष्टी वेळ नाही म्हणुन नंतर बोलुयात म्हणतो, पण ती वेळ येतच नाही…”

त्याने तिच्याकडे बघत,”साँरी… मला माहिती नव्हतं…”

“कसं कळणार…आपले काही संबंध राहीले होते का…”ती हळुच म्हणाली.

त्या क्षणी तो भुतकाळात गेला…प्रत्येक वेळेस तिची पाहिलेली वाट व हातात आलेली निराशा…

स्वत:ला सावरताना झालेला त्रास…

कवितेतुन जाणवणारा तिचा श्वास…

सततचे तिचे आभास…

सगळं कसं आत्ताही तसंच्या तसं डोळ्यासमोर येत होतं…

“आणि ही म्हणतेय संबंध राहीले होते का?”तो स्वत:ची वदला.

काही क्षण काय बोलावे हे दोघांनाही कळले नाही.

…………….

“कधी आठवण काढली नाहीस माझी?” त्याने विचारले.

“आठवायला विसरावं लागतं…”ती म्हणाली

व पुढे बोलु लागली…

“तु चंद्र पाण्यातला

अन मी नभातला…

स्पर्शता पाण्यास

मज मीच गमावला…”

हे एेकुन त्याचा चेहरा खुलला.

“तु वाचलेस हे पुस्तक?…”त्याने तिच्याकडे पहात विचारले.

“हे आणि सगळेच…’तुला जगताना’ पर्यंत सगळीच पुस्तक वाचलीत…”तिने त्याच्या डोळ्यात पहात उत्तर दिले.

दोघांनाही आत्ता शब्दांची गरज उरली नव्हती.

………..

“काँफी बनवते छान…काही खाल्लं आहेस का?”तिने विचारले.

“हो…शिरया सकाळीच नाश्ता करायला लावतो…त्याला नाही चालतं मी नुसता चहा घेतलेला…”तो हसत म्हणाला.

“चहा खुप नको घेत जाऊस…”ती आधीसारखी हक्काने बोलली. तो फक्त हसला.

तिच्या मागे किचन मधुन मागचे अंगण पहात तो म्हणाला,”तुला हा सागर किनारा खुणावत नाही का? माझ्याशी खुप बोलतो…”

“मिलिंद असतानाच हा बंगला घेतला होता…मला कधी तरी भारतात आल्यावर निवांत रहाता यावं म्हणुन… अर्नवला जाँब लागल्यामुळे तो कँनडाला शिफ्ट झाला. शिकागोचे घर खुप एकटेपणा देत होते. म्हणुन या सागराशीच गप्पा मारायला इथे आले….”हे बोलताना तिच्यात एक एकटेपणा दिसुन येत होता. पण तेवढ्यात तिचं म्हणाली,”आता तु आहेस सोबतीला तर काहीच प्रश्न उरला नाहीये आयुष्याचा…”

तो विचारात पडला…हे तरी सत्य समजावं का?

या वयात तरी सोबतीला राहु शकु?

“काँफी…”असे म्हणत तिने कप पुढे केला.

“वाह…आजपर्यंत इतक्यांदा काँफी एकत्र घेतली पण तुझ्या हातची काँफी पहिल्यांदाच घेतोय…झकास काँफी करतेस की तु….”काँफीचा घोट घेत तो म्हणाला.

तिलाही तेच जाणवलं…

आयुष्यात काही गोष्टी राहुनच जातात त्यातलीच ही गोष्ट…

पण तसे न दाखवता ती म्हणाली,”पण सारखी नाही घ्यायची हा काँफी…चांगली नसते शरीरासाठी…”

तो परत हसला…स्वत:शीच…

……………..

“काय बेत आहे आज? मी बाहेर चाललोय काय आणु?” त्याने तिला विचारले.

“फिश करी म्हणालास ना…तीच तयारी करतेय…जरासं आमसुलांच बघायचं होतंस…आणतोस का?”ती म्हणाली.

“फिश करी म्हणल्यावर आमसुलं काय अख्खा समुद्र आणतो ग…तु नुसतं म्हणं…”त्याने एकदम उत्साहाने म्हणलं.

ती हसत म्हणाली,”आमसुलं मिळाली तरी बसं आहे…”

“हे गेलो आणि हे आलोच….”म्हणत तो बाहेर पडला. थोड्याच वेळात आला तर बरंच काय काय घेऊन आला होता.

“काय आणलंस रे इतकं …काही गरज होती का?…”म्हणत तिने त्याच्या हातातल्या बँगा घेतल्या.

“आज बाजार असतो…त्यामुळे सगळं फ्रेश मिळतं…असु दे ग…”असं म्हणत त्याने तिच्या हातात एक पुडी दिली.

तिने काय आहे म्हणत पानाची पुडी उघडली तर त्यात सोनचाफ्याची पिवळी फुलं होती.

त्याचा सुवास सर्वत्र पसरला…

“हा सोनचाफा पाहिला की मला तु कायम आठवायचीस…तुझा तो पिवळा ड्रेस, गालावर रेंगाळणारी ती बट व लांबसडक केस…सोबतीला माझी कविता…तुझे तल्लीन होऊन ऐकणे…

चाफ्याची दरवळं काही क्षण दोघांनाही भुतकाळात घेऊन गेली.

पण आजही तो सोनचाफा तिचा हेवा करत होता. बराच काळ

सरला तरी आजही तो तेच निसिम्म प्रेम पहात होता….

……………

रात्री उशीरा मेसेज पाँपअप झाला म्हणजे नंदुच असणार म्हणत तिने फोन हातात घेतला तर अर्नवचा मेसेज होता,”हँपी टु शेअर वीथ यु माँम….प्रमोशन मिळालंय…आज डँड हवे होते…खुप खुष झाले असते…होप यु आर फाईन…काळजी घे स्वत:ची…मिस यु…”

उत्तर देऊन तिने मोबाईल बाजुला ठेवुन दिला.

कुठेतरी अर्नवचा जन्म…त्याचे बालपण…

पहिले टाकलेले पाऊल…शाळेचा पहिला दिवस…आठवुन गेले.

बघता बघता पंख फुटले…

आकाशात स्वतंत्रपणे झेप घेतलीये…आता त्याला आपली गरज उरली नाहीये…हवायं तो फक्त आपला आशिर्वाद…तो कायमच राहीलं….

काहीच उरलं नाही या जाणीवेने तिला एकदम भरुन आलं…सगळेच पाश असे सहजतेने सुटतात का?

तिने नंदुला मेसेज केला,”आनंदाची बातमी शेअर करायला पण सोबती नाहीये…ही नक्कीच दु:खाची बाब आहे…”

बराच वेळ झोपेची आराधना करत तिने डोळ्यांवर उशी ठेवली…

पण काहीच मिनिटात मेसेजला उत्तर आले,”इतक्या रात्री हा मेसेज पाठवायला मी एक हक्काची जागा आहे ना…यावरुनच कळलं पाहिजे की शरीराने कधीही सोबत नसलो तरी मनात कायम घर करुन रहातोय…आतातरी कायमचे सोबती म्हणुन राहु शकतो का ग आपण? सुख दु:ख सोबतीने वाटुन घेऊयात… की आताही शक्य नाही…

तुझा होकार असेल तर छानच आहे पण तुला मनातुन नाही वाटत असेल तरी सांग, आपल्या नात्यात काही बदल होणार नाही. आपण आजन्म सोबत रहाणारच आहोत…जास्त विचार करु नकोस…

उद्या सकाळी उठलीस की मेसेज कर…बेड टी लेके बंदा हाजीर है…गुड नाईट”

ते वाचुन तिचे डोळे पाणावले. नवी सकाळ नव्याने काहीतरी घेऊन येऊ दे म्हणत तिने डोळे मिटले व बघता बघता तिला डोळा लागला.

…………………

सकाळी जाग येईपर्यंत चांगलेच उजाडले होते. तिने जरासा कंटाळा बाजुला करत सगळेच आवरुन घेतले. ती त्याच्या रात्रीच्या मेसेजचा विचार करत असतानाच नेमकी दारावरची बेल वाचली.

नंदुच आला असेल समजुन तिने दार काढलं तर दारात पोस्टमन आलेला दिसला. त्याला पाहुन तिला नवल वाटले.

“बँकेतुन पार्सल आलेय तुमचे…इथे सही करा…”असं म्हणत त्याने तिच्या समोर सहीसाठी कागद दिला. स्वत:चेच नाव बघुन तिने सही केली. तिच्या हातात एक बंद लिफाफा देऊन पोस्टमन गेला. दार बंद करावं म्हणलं तर तेवढ्यात नंदु आलाच.

“अरे वा…पोस्टमन कसा काय आला फाँरेनर बाईंकडे?” त्यावे हसत विचारले.

“हो ना…तेच बघत होते तेवढ्यात तु आलास…”असं म्हणत तिने लिफाफा उघडला.

आतमधे बँकेतर्फे एक लेटर होते व आत अजुन एक लिफाफा होता. तिला हा ट्रेजर हंटचा खेळ जरा झेपत नव्हता. तिच्या चेहरयावरची आठी पाहुन त्याने विचारले,”काही काळजीचे आहे का?”

“बँकेचे पत्र वाचते, मग कळेल…”असे म्हणत तिने पत्र वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते की मिलिंदने तिच्यानावे एक पत्र लिहुन लाँकरमधे ठेवले होते. जे त्याच्या मृत्युनंतर तिला सुपुर्द करावे असे त्याने लिहुन ठेवले होते.

तिला खुप आश्चर्य वाटत होते. तो म्हणाला,”तु पत्र वाच म्हणजे सगळे कळेल…”

होकार देत तिने त्याचा लिफाफा बघितला. त्यावर माझ्या प्रितीस भेट असे लिहिले होते. तिने आतले पत्र वाचण्यास सुरुवात केली,”

प्रिय श्यामल…

तु प्रिय आहेस हे वेगळे लिहायला नकोय पण तरीही लिहितोय कारण माझ्या जाण्यानंतर तुला काही दिवसांनी हे पत्र मिळत असेल व माझी ही साद ऐकुन तुला खुप आनंद मिळेल.

तुला एकटे सोडुन जावे असे मला कधीच वाटले नव्हते पण काय करणार नियतीच म्हणायची.

कशी आहेस? काळजी घे स्वत:ची…माझे प्रेम सतत तुझ्यासोबतीला असेलच.

एक गोष्ट तुला मी हयात असेपर्यंत सांगु शकलो नाही ती म्हणजे तुझ्या व नंदनच्या नात्याविषयी माझ्या मनात असलेले विचार…

असे दचकु नकोस…मला कळुन चुकले होते तुमचे दोघांचे अतुट प्रेम…पण कधी जाणवु दिले नाही मी…कारण…कारण सांगु…माझेही तुझ्यावर प्रचंड प्रेम होते ग राणी…मी तुला गमवु इच्छित नव्हतो…हो…तुझ्याशिवाय माझे जगणे व्यर्थ होते…

पण एक सांगु…मी तुमच्या प्रेमाचा आदर करत होतो…माझ्या मनात कधीही ते प्रेम उथळ वाटत नव्हते.

आज मी तुझ्यापासुन दुर गेलोय…अर्नव त्याच्या विश्वात असेल…तु एकटी राहिलेले कसे काढशील ही चिंता सतावतं रहाणार मला…म्हणुन मी ही चिठ्ठी लिहुन ठेवतोय की माझ्या जाण्यानंतर तु नंदनकडे जा…तो तुझी वाट पहातच असणार…तुम्ही दोघे नव्याने आयुष्य जगा…

माझ्याकडुन, माझ्या प्रेमाकडुन तुला ही भेट समज…अशी आगळी वेगळी भेट देणारा नवरा म्हणुन मी चुकतोय की बरोबर करतोय हे जगाच्या नजरेने काय ठरेल हे मला माहिती नाही, पण तु सदा सुखी रहावीस हीच एक मनोमनी इच्छा आहे…शेवटची…

तुझाच…

मिलिंद “

हे वाचताना ती घळाघळा रडत होती. धुसर नजरेने मिलिंदचे नाव वाचताना तिला मिलिंदचा हसरा चेहरा दिसत होता. तिने नंदुचा हातात हात घेतला व ती म्हणाली,”ही भेट स्विकारणार?”

तिचे हे बोलणे ऐकुन त्याचेही डोळे भरुन वाहु लागले. तिला जवळ घेऊन कपाळावर ओठ टेकवले व तो म्हणाला,

“क्षण हे जपण्याचे अन जगण्याचे…

करुयात सुरुवात आयुष्याची

पुन्हा नव्याने….”

– समाप्त

– प्राजक्ता रुद्रवार

Image by mohamed Hassan from Pixabay 

rudrawar praajaktaaa

rudrawar praajaktaaa

प्राजक्ता राहुल रुद्रवार उद्योजिक, शिक्षिका, समाजसेविका, ब्लाँगर, कंटेन्ट राईटर...सकारात्मकता व आयुष्य यांची सांगड घालताना लाभलेलं हे हळवं मन जपत मनातले भाव लेखणीच्या साथीने तुमच्यापर्यंत पोहचवावं हाच एक धागा पुरेल आपल्या ओळखीला.

22 thoughts on “रिले कथा- भेट- भाग ८ (शेवटचा भाग)

  • June 10, 2020 at 7:28 am
    Permalink

    Khupach chan jamun Ali relay story! Ha katha lihinyacha nawin, wegala prakar awadla.

    Reply
    • June 10, 2020 at 6:37 pm
      Permalink

      Thank you so much..

      Reply
    • June 13, 2020 at 8:25 pm
      Permalink

      सुंदर शेवट… भेट उतरत्या वयात थेट …👌👌🙏🙏😍😍🌺🌺🍫🍫💞💞💖💖

      Reply
      • April 4, 2021 at 1:33 pm
        Permalink

        सारं काही आलबेलं… पण नंदू शुद्ध शाकाहारी होता, आहे सांगितलं नाही का बी आर ने…? फिश करी वाचताना थोडं हसू आलं… आज दुस-यांदा परत वाचली कथा… श्यामलसाठी … मस्त वाटलं… 😍😍😍💖💖🙏🙏👌👌👌

        Reply
  • June 10, 2020 at 9:10 am
    Permalink

    सही झालीय गोष्ट

    Reply
  • June 10, 2020 at 11:21 am
    Permalink

    Mast..
    Intresting type of writing 1 story by 2 ppl…

    Reply
    • June 10, 2020 at 6:39 pm
      Permalink

      Thank you very much…

      Reply
  • June 10, 2020 at 12:25 pm
    Permalink

    छान👌👌

    Reply
  • June 10, 2020 at 2:35 pm
    Permalink

    खूपच मस्त!!!

    Reply
  • June 10, 2020 at 3:30 pm
    Permalink

    नितांत सुंदर कथा….

    Reply
    • June 10, 2020 at 6:40 pm
      Permalink

      मन:पुर्वक धन्यवाद….

      Reply
      • June 18, 2020 at 11:10 am
        Permalink

        Thank you very much

        Reply
  • June 10, 2020 at 6:30 pm
    Permalink

    खूप सुंदर

    Reply
    • June 10, 2020 at 6:40 pm
      Permalink

      धन्यवाद….

      Reply
  • June 18, 2020 at 11:32 am
    Permalink

    Shevat Chan Kelat Prajakta & BR Sir

    Reply
    • June 18, 2020 at 1:00 pm
      Permalink

      Aaj sagale bhag wachalet ka 😀
      Thank you so much…

      Reply
  • June 21, 2020 at 6:46 am
    Permalink

    Khup chhan end , ekhadi film kadhavi..

    Reply
  • September 6, 2020 at 6:35 pm
    Permalink

    खूपच छान कथा.,.. एकच कथा दोन व्यक्तींनी लिहिली आहे हे कुठेच जाणवलं नाही…. सुंदर

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!