आज जाने की जिद ना करो…14
आधीच्या भागाची लिंक– आज_जाने_कि_जिद_ना_करो….13
आज जाने की जिद ना करो…14
त्यानं बुके वाला हात पुढे केला…. अरहं… तू?? मनू जरा दचकलीच…
येस मॅडम … म्हटलं भेटावं तुम्हाला… आणि तुमचा इंटरव्यू ही छापून आणायचाय ना … मग तुम्हाला एकदा दाखवावा… म्हणून आलोय…
तिला त्याचं येणं फारसं आवडलं नसलं तरी तो काम प्रोफेशनली करतोय हे पाहून बर वाटलं .. नाहीतर मीडिया काहीही छापत सुटायची…
तिनं.. त्याच्या मोबाइल वर सेव्ह केलेलं आर्टिकल वाचलं… आक्षेपार्ह काहीच नव्हतं… मग त्याला फोन परत करून .. तिनं कॉफी आणली… आणि मग हळू हळू तिला अरहं ची कंपनी आवडू लागली… कितीतरी मजेशीर किस्से सांगितले त्यानी…. खळखळून हसत होती ती…
काय एकेक उद्योग करतात लोकं… रातोरात प्रसिद्धी मिळवायला… याच्या सुरस रम्य कथांचा खजिना होता… त्याच्या कडे..
आणि त्याला एक कॉल आणि झरकन त्याचा मूडच गेला… तो अस्वस्थ झाला… आणि उठून दाराकडे जात… हवेतच बोटांनी एक आकार काढून दाखवत होता… मग त्यानं घड्याळाकडे बोट दाखवलं आणि… एकच वाक्य म्हणाला .. “वेळ… वेळ कमी आहे तुझ्याकडे “….
म्हणजे?? तिला काही समजायच्या आत तो तडक निघून गेला…
इकडे गोंधळून गेली मनू…. हा आला… तेव्हा किती छान.. मजेत होतो आपण… आणि अचानक हे काय झालं ह्याला..? आणि काय खुणा करत.. बडबडत गेला हा….??
*********-*************-******
तिच्या प्रश्नांना अनुत्तरित ठेवून तो निघाला… ते थेट रूमवर गेला … त्यानं घाईनं सामान पॅक केलं आणि हवाई च्या पोर्ट कडे निघाला… विमानप्रवास सुरक्षित नव्हता… म्हणून मग आता जहाजातून निघून जायचं .. असं मनाशी ठरवून तो बंदराकडे निघाला …..
-*****************************
इकडे मनू सतत मिहीर ला.. आणि नरेश ला.. संपर्क करायचा प्रयत्न करत होती… पण दोघे ही व्यस्त….
तिला घराबाहेर.. समोरच्या बाजूला… एक गाडी आलेली दिसली…
त्यातून रेवा आली होती…. आता ह्या मूड मधे पुन्हा रेवा… रमण ह्या गोष्टी तिला नको होत्या….
तिनं आयपॉड वर मगाशी गाणं लावलं होत… पण अरहं आला आणि ऐकायच राहून गेलं… आता तिनं ते गाणं बंद करावं म्हणून तो हातात घेतला नी चुकून आवाज वाढला…
” वक्त कि कैद में
जिंदगी हें मगर….
तिनं आयपॉड बंद केला…
मग पुन्हा चालू केला… पुन्हा त्याचं ओळीचं पारायण…
वक्त कि कैद में…
जिंदगी हें मगर…
चंद घडियां….
यही हैं…
जों आजाद हैं…..
तोवर रेवा तिच्या समोर येऊन बसली…. हाय.. मनवा हॅलो रेवा.
काय झालं.. तुझा मूड ओके ना मनवा?..
अं.. हो हो… मी ओके आहे… बोल.. काय काम होत तुझं?..?मनू अंदाज घेत म्हणाली.
अगं डॅड येऊन गेले ना… तुझ्याकडे..? पण.. मग तेव्हा पासून ते डिप्रेस आहेत… कळतच नाहीये काय झालय त्यांना … मी विचारलं… त्यांना… पण ते कांहीं सांगत नाहीयेत.. आणि तुझ्याकडे यायला नको म्हणतायत… इति रेवा
हम्म्म्म…. मग आता मी काय help करू.? मनु अजूनही अलिप्त राहू पाहात होती…
हे बघ… मी घेऊन आलीये त्यांना… गाडीत आहेत ते… प्लीज एकदा भेट… नाही म्हणू नकोस ….
आधी मनू मनातून घाबरली… मग सावरली… तिनं विचार केला… शेवटी तो पेशंट आहे आणि त्याची ट्रीटमेंट पूर्ण करणं माझं काम… मग मी का घाबरू… आणि तसंही असा विचित्र अनुभव येऊ शकतो याची मानसिक तयारी आपण ठेवलीच आहे…
ठीक आहे म्हणून तिनं.. रेवा ला त्यांना आत घेऊन यायला सांगितलं….
कसं बस समजावलं तिनं… आणि त्यांना आत आणलं….
आणि पुन्हा रमण आणि मनू समोरासमोर आले…. रमण ला खूपच अपराधी वाटत होत आणि त्या भावना प्रामाणिक आहेत हे ही मनूला पटलं…. तिनं त्यांचा हात हातात घेतला…आणि विचारलं….
काय झालय डॉक्टर? सांगा… कशाचं ओझं आहे मनावर?.
रमण बोलू लागला…. मनवा.. आय एम सॉरी… मी नियम मोडले तुझ्या सेशन चे.. खरच सॉरी पण आज मी एक कबुली द्यायला आलोय….
बोला.. डॉक्टर….
मी पूर्वी,,
म्हणजे… रेवा च्या जन्माअगोदर… child traficking मधे अडकलो होतो…. खूप मुलांची घर… माझ्यामुळे त्यांच्या पासून हिरावली गेली…. आणि ते रडू लागले… मनवा आणि रेवा… दोघी ही हादरल्या…
आणि आता… डॉ पुढे सांगू लागले…. तुझ्या कडे ट्रीटमेंट घेतल्यावर… त्या दिवशी मला माझा भूतकाळ लख्ख आठवला….
मी तुला सांगणार होतो… पण मनातल्या भावना आधी डोळ्यात उतरतात… तसं झालं आणि तू माझा चेहरा वाचलास पण माझं कन्फेशन ऐकण्या पूर्वीच लांब गेलीस…
मनू ही धक्क्यातून सावरली आणि उठून समोर आली..
ते रडू लागले…. मनवा पुढे आली… तिनं त्यांना पोटाशी धरलं…. आणि मग रेवाला हात धरून त्यांच्या जवळ बसवलं… त्यांना पाणी दिलं…
काहीही न सुचून..
ती मिहीर ला कॉल करण्यासाठी मोबाइल शोधू लागली. तो थेरपी रूम मधे होता…. टेबलावर… ती फोन घेऊन वळणार इतक्यात तिचं लक्ष वाळूच्या घडाळ्याकडे गेलं…. त्याच्या वरच्या बाजूला एक स्टार * कोरला होता…
अचानक ते लेटर… अरहं च हवेत बोट हलवून आकृती काढणं… आणि जाता जाता त्याचं वेळ कमी आहे… हे..
वाक्य ही आठवलं…..
#नेमकी काय शिक्षा होणार रमणला?
#मनू ला मिळालेली हिंट… तिला अजून कुठल्या सत्यासमोर आणेल?
#अरहं असा का निघून गेला?
#वेळ खरंच मनूच्या आयुष्याला बंदिस्त करू शकेल?
पुढील भागाची लिंक- आज जाने की जिद ना करो…15
क्रमश:
@मानसी
mage by David Bruyland from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Pingback: आज_जाने_कि_जिद_ना_करो….13 – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Vegalich ahe hi story kahi thang lagat nahi.,. waiting for next part
Thanks a lot… so much happy 😍😍
Pingback: आज जाने की जिद ना करो…15 – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: आज जाने की जिद ना करो…15 – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: आज जाने की जिद ना करो…15 – LekhakOnline – Excellent Marathi Articles