धडाकेबाज- भाग १

 
       ” ए , चल , हे कपडे घे बदलून !! “
 जेल च्या महिला कर्मचारी ने तिच्या अंगावर कैद्याचे कपडे फेकले . तिने मुकाटपणे आपले कपडे पिशवीत भरून नवा ‘ गणवेश ‘  चढवला . 
” हातातले घड्याळ , कानातले ,आणखी काही ऐवज , पैसे वगैरे  असतील तर ह्या पाकिटात घाल . ” 
” नाव सांग ! ” एकीने रजिस्टर हातात घेऊन विचारले . 
” मीरा …मीरा  जयसिंग . “
” नाव मीरा , आणि काम?..गुन्हा काय ……. खून करून आलीस ? “
” नाही …नवऱ्याला मारले . ” 
दोघीजणी फिस्सकन हसल्या . 
” म्हणजे डायरेक्ट वरती ? “
” नाही , एक हात आणि एक पाय मोडला फक्त . “
” फक्त ? …आम्हाला पण शिकव की , कसं मारायचं नवऱ्याला . ” पुन्हा तसाच  फिदी फिदी हसण्याचा आवाज . 
तिने संयम ठेवून कपडे बदलले . सगळ्या सूचनांचे पालन करून  , सोपस्कार पार पाडून झाल्यावर तिला 
104 नंबर च्या कोठडीत ढकलण्यात आले . 
        तिच्या अपेक्षेनुसारच घडले होते . तिला दोन अतिशय अरदांड  गुंड महिलांसोबत 
त्या आठ बाय दहा च्या खोलीत रहावे लागणार होते . नवीन कैद्याला दोन क्रूर महिलांसोबत ठेवले की तिथेच त्यांचा आत्मविश्वास , आत्मसन्मान गळून पडतो . ती कैदी लगेच ‘मुठीत’ येते . हे त्या जेलचे सोपे शास्त्र ! . 
 त्या जेल चा नियमच होता जणू ! 
       ” ए ! बिडी आहे तुझ्याजवळ ? ” आपले पिवळे  कुरतडलेले दात विचकत एकीने विचारले . 
 तिने मान फिरवून नाही म्हटले . लगेच दुसरीने तिची मान पकडली , आणि जोरात तिला भिंतीवर आपटत म्हणाली , ” शिस्तीत , अदबीने ,झुकून बोलायचं !! उद्याच  तुला झिया दी समोर उभी करतो . मग समजेल अदब कशी दाखवायची ते .  इथे जेलर पासून सगळे तिला वाकून सलाम करतात !! ” 
       सकाळी त्या अरदांड कैद्यांसोबत तशाच अनेक इतर कैद्यांनी आपली चुणूक दाखवली . दात घासतांना , अंघोळीसाठी पाणी आणतांना , जंगली कुत्र्याला लाज वाटावी असे भांडण तिला बघायला मिळाले . जेलमधील मोकळी जागा जणू कुस्तीचा आखाडा झाला होता . अचानक आवाज शांत झाला म्हणून तिने बघितले तर एक धिप्पाड कैदी राणीच्या आवेशात येत होती . 
 ” हीच झिया दी ” कुणीतरी कानात कुजबुजली . मीरा ने एकदम वळून पाहिले , तशी ती म्हणाली,
” मी कामना , 106 . ह्या झिया पासून सावध रहा . ” 
झिया आल्याबरोबर एकीने तिला बादलीभर पाणी दिले . दुसरीने लगेच टॉवेल पुढे केला . 
” नवीन बकरी आलीये म्हणे ! कोण आहे ? मुजरा नाही करणार ? ” 
एकीने मिराला पुढे ढकलले . ” ही आहे दी !! ” 
 मीरा नुसतीच मान खाली घालून उभी होती . आजूबाजूला कुजबुज सुरू झाली . पहारेकरी स्त्रिया ( त्यांना सगळ्या ‘ बॉस ‘ म्हणत ) देखील आता काहीतरी नाट्यमय घडणार म्हणून बघू लागल्या . 
  ” ए !! दी ला मुजरा कर **** !” तीच पिवळ्या दाताची शिवी हासडून म्हणाली  .
मीरा शांत .
झिया तिच्या जवळ आली .
” ही गोरी चामडी सोलून काढली ना की मग कळेल तुला . इथे माज नाही करायचा . सलाम कर !!! ” ती ओरडली , तशी मीरा ने वेगात पाय फिरवला आणि एक लाथ तिच्या जबड्यावर मारली . झिया चा दात तुटून खाली पडला आणि तोंडातून रक्त आलं . तशी ती पिवळ्या दाताची चवताळून तिच्या दिशेने आली . मिराच्या दोन फटक्यातच ती मोरीत जाऊन पडली . तशी कामना गालात हसली .
काही सेकंदातच सगळ्या कैदी महिला दूर सरकल्या .
झिया रागाने बेभान होऊन पहारेकरी महिलांवर ( बॉस वर ) ओरडत होती .
” नुसत्याच काय बघताय , जिवंत रहायचंय की नाही ? धरा तिला !! आणि आणा माझ्या कोठडीत !! ” 
 
” कोठडीत का ? हिम्मत असेल तर इथे लढ न ! दम नाही अंगात ? ” मीरा ओरडली .
 
झिया ने सगळा जोर लावून तिच्यावर हल्ला केला . मिराने एक फटक्यातच तिला लोळवले . सगळ्या कैद्यांना मिराच्या ताकदीचा अंदाज आला .
झिया ला हा अपमान सहन झाला नाही . आपल्या खास मर्जितल्या रक्षक हाताशी घेऊन तिने  मिराला आंघोळ न करू देताच 104 ला वापस टाकायला लावले . 
     काही वेळातच झियाला कुणी भेटायला आल्याची खबर आली . 104 मधून मीराला ती बारीक 
बोळ दिसत होती जिथून कैद्यांना भेटीसाठी नेले जात होते . पंधरा मिनिटांनी झिया वापस आली तेव्हा तिच्याकडे कसलेतरी मोठे पुडके होते . मिराला मात्र ते नीट दिसत नव्हते . जाताना झियाने तिच्याकडे आव्हानात्मक खुनशी नजरेने बघितले . 
अर्ध्या तासात सकाळचे विधी आटोपून 
दोघी अरदांड 104 ला वापस आल्या .
आता मात्र त्यांचा पावित्रा वेगळा होता . भाषा बदललेली होती .
” तू कोण ग ? इथे कशी ? ” 
” नवऱ्यावर जीवघेणा हल्ला केला , चार हाडं मोडली  म्हणून दोन वर्षांची शिक्षा आहे …….ही झिया कोण ? ” 
” ताहीर दुराणी माहितेय ? मोठ्ठा डॉन ? त्याची बहीण आहे . सगळे घाबरतात तिला . ” 
” मग ती इथे जेलमध्ये कशी आली ? “
” तिच्या जीवावर उठलेत काही गुंड !
शकील च्या टोळीतले ! इथे जीवाला धोका नाही , म्हणून स्वतःला अटक करवून घेतलीये . “
     ” दुराणी ची आणखी कुणी हस्तक आहे इथे ?  शकील ची पण कुणी असणारच  . ” 
” शकिलच्या गोटातील आहे न एक  ,  शीना झोरावर .  तिला स्पेशल सेल मध्ये ठेवलंय . सगळ्यांपेक्षा वेगळं .
तीन बोबटस्फोटात सत्तर मारलेत तिने . …..
पण ही झिया फार उडत होती . बरं झालं तू तिची उतरवली . मज्जा आली . ” 
” पण तुम्ही दोघी देखील कमी नाहीत . मला किती त्रास दिलात आणि 
तिच्या समोर मात्र लाळ घोटता न ? ” मीरा मुद्दाम म्हणाली . 
” इथं जगायचं न , तर असंच करावं लागतं बाई . नाहीतर ती कामना !! गरीब आहे  स्वभाव , तर रोजचा मार खाती . ” 
      दुपारपर्यंत सगळ्यांना भरपूर कामे दिली गेली होती . पत्रावळी ,द्रोण बनवणे , दोऱ्या वळणे , पुठ्ठ्याचे खोके बनवणे , स्वयंपाक , परिसर झाडणे , संडास बाथरूम धुणे ….अनेक कामं .
 जेलर तन्वी सिंग एक चांगली आणि शिस्तप्रिय ऑफिसर होती . तिने स्वतः मिराची चौकशी केली . इतकी सुशिक्षित महिला एका गुन्हेगारा सारखी इथे बंद आहे ह्याबद्दल तिने सहानुभूती दाखवली . बाकी सगळा  स्टाफ मात्र  अतिशय कामचुकार , लालची …..
       जेवणाच्या वेळी मीराने कामना ला गाठले . अत्याचारा पासून वाचण्यासाठी तिने एका बड्या आसामीचा खून केला होता . ती एक साधी शिक्षिका होती . मीरा ने
तिच्या कानात कुजबुजत  काही सांगितले . 
    जेवण झाल्याबरोबर अचानक मीरा आणि कामनाची बाचाबाची झाली . मीरा ने तिच्यावर धावा बोलला , तशी एक  भीमकाय कैदी तिच्या बाजूने मिराशी भांडायला आली . मिराने गणवेशात लपवलेला स्वयंपाकाचा सुरा काढला . 
सगळ्या जणी तिथे गोळा झाल्या . मीरा ने तो हल्ला जीवघेणा वाटेल , पण त्या बाईला लागणार नाही याची काळजी घेतली . मामला गंभीर आहे हे पाहून शिपाई महिला सरसावल्या . सकाळपासून दोन तीनदा मीरा ने ‘ 
‘ राडा ‘  केला होता . त्यांनी मीरा ला ताब्यात घेतले , हात बांधले आणि जेलच्या मागील बाजूस असलेल्या  ‘स्पेशल सेल ‘ मध्ये नेऊन टाकले . मीरा ला जे हवे होते ते फार लवकर साध्य झाले होते !!! तिच्याकडे खूपच कमी वेळ होता .
   रात्रीचे जेवण घेऊन कर्मचारी आली होती . मीरा ने कपड्यात लपवलेली  शंभर ची नोट तिला दिली आणि काही सांगितले . थोड्याच वेळात पलीकडून टकटक ऐकू आली . म्हणजे कर्मचारी बाईने निरोप दिला होता . मिराने प्रत्युत्तरादाखल टकटक केली . थोड्याच वेळात एका ताटलीत पावातून चिठ्ठी आली . त्यात लिहिले होते , 
‘ काय प्लॅन ? ‘  
मीरा चा फेकलेला खडा बरोबर लागला होता . तिने त्या चिठ्ठी चे अत्यंत बारीक तुकडे केले
आणि त्या  ‘ बॉस ‘ जवळ निरोप पाठवला , ‘ अजून एक दिवस ‘ . 
मीरा ने तिथला सगळा नकाशा डोक्यात ठेवला होता . 
       मुख्य जेलच्या मागच्या बाजूला चार खास सेल होते . अतिशय धोकादायक किंव हिंसक गुन्हेगार अथवा अतिरेकी तिथे ठेवल्या जात . 
सकाळी आणि संध्याकाळी  असे दोन वेळा त्यांना एकानंतर एक स्वछतागृहाकडे पाठवल्या जायचे . 
त्याच्या मागच्या बाजूला खोल खंदक होते . आणि त्यामागे काटेरी कुंपण ! 
     
    तिने  मध्यरात्री आधी झियाची बॅग चोरली . त्यात खूपच उपयोगी सामान होते . जेल च्या दुरुस्ती विभागातून चोरून एक स्क्रू ड्रायव्हर आणि छोटे कटर मिळवले होते  . रात्री स्वच्छता गृहात दरवाजाच्या फटीत तिने ते कटर लपवले . वरच्या पर्यखाली ड्रीलिंग मशीन ,आणि दोर लपवला . नळाखालील बादली च्या खाली स्क्रू ड्रायव्हर  ठेवला . तिथला मिणमिणता दिवा देखील लागणार नाही , असे वायर तोडून ठेवले , आणि बिनधास्त येऊन झोपली . 
       पहाटे पाचलाच भयंकर आरडा ओरडा झाला . मीरा ला माहीत होते काय झाले असणार ते . शीना झोरावर  स्वछतागृहाच्या मागील बाजूने पळून गेली होती . जेलर तन्वी सिंग हैराण होती की हे कसे शक्य झाले . तिने मीरा ला अनेक प्रश्न विचारले , पण मीरा ला काहीच माहीत नव्हते ना  (!! ) . 
         दुसऱ्याच दिवशी मीरा ला सोडण्याची ऑर्डर आली . मीरा तडक निघाली , तिच्या कर्मभूमीत!
 
क्रमश:
 
 
पुढील भागाची लिंक– धडाकेबाज- भाग २
 
 
 
Image by Sammy-Williams from Pixabay  
 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

23 thoughts on “धडाकेबाज- भाग १

  • September 23, 2020 at 7:56 am
    Permalink

    Masst ..interesting suruvat..tumchya storys chanch astat..i love your way of writing..superb..👌👌

    Reply
    • September 23, 2020 at 12:23 pm
      Permalink

      धन्यवाद

      Reply
      • September 23, 2020 at 6:05 pm
        Permalink

        Wow…something different than usual love story..looking forward for next part

        Reply
    • September 24, 2020 at 8:22 am
      Permalink

      भारी. सुरुवात तर धडाकेबाज झाली.

      Reply
      • September 24, 2020 at 1:28 pm
        Permalink

        थँक्स

        Reply
  • September 23, 2020 at 9:27 am
    Permalink

    andaaj yetoy, jabardast asnaar pudhachee story !

    Reply
    • September 23, 2020 at 12:24 pm
      Permalink

      😊🙏🙏

      Reply
  • September 23, 2020 at 2:06 pm
    Permalink

    भारी सुरुवात…जबरदस्त कथा असणार

    Reply
    • September 23, 2020 at 5:52 pm
      Permalink

      Hope you like it

      Reply
  • September 23, 2020 at 4:04 pm
    Permalink

    Very interesting..
    महत्वाचं म्हणजे मोठा पार्ट टाकला आहे 😀

    Reply
    • September 23, 2020 at 5:52 pm
      Permalink

      👍👍👍🙏🙏

      Reply
    • September 24, 2020 at 10:55 am
      Permalink

      छान सुरुवात 👍

      Reply
      • September 24, 2020 at 6:56 pm
        Permalink

        धन्यवाद

        Reply
  • September 23, 2020 at 6:38 pm
    Permalink

    मस्त 👌👌

    Reply
    • September 24, 2020 at 2:05 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • Pingback: धडाकेबाज- भाग २ – LekhakOnline – Excellent Marathi Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!