उमेश पटवर्धन, पुणे हे इन्फोसिस या IT कंपनीमध्ये गेली काही वर्षे कार्यरत आहेत. लेखनाची सुरुवात इंजिनियरिंगला असताना एका कथास्पर्धेद्वारे झाली. त्यावेळी लिहिलेल्या कथा किर्लोस्कर, उत्तमकथा आदी मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. पुढे काही वर्षांचा खंड पडून २०१६ मध्ये एका कथालेखन कार्यशाळेद्वारे पुन्हा लेखनाला सुरुवात केली. या काळात नुक्कड, अक्षरधन, Lekhakonline अशा साहित्याला वाहिलेल्या ग्रुपवर सातत्याने कथालेखन केले.
२०१८ मध्ये एक कथासंग्रह ईबुक आणि ऑडिओबुक स्वरूपात प्रसिद्ध झाला. लेखनाच्या या दुसऱ्या टप्प्यात उत्तमकथा, शिक्षण विवेक, निरंजन, रोहिणी अशी दर्जेदार मासिके आणि दिवाळी अंकात अनेक कथा प्रसिद्ध झाल्या.
अलीकडच्या काळात काही कथांना विविध स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळाली आहेत.
2 thoughts on “तो…”