मिल गया….

मी तुला नेहमी नाक्यावरच्या कट्ट्यावर पाहायची
कायम टापटीप, एखादा स्वेटशर्ट आणि डेनिम,
नेहमी हातात तो चहाचा ग्लास, तुझ्या त्या भन्नाट बेस असलेल्या आवाजातल्या गप्पा…
उंच, बॉडी झकास, गोरा रंग, सरळ नाक, खुरटी दाढी, त्यातले ते गुलाबी ओठ
(हॊ… मला त्या खुरट्या दाढीतले तुझे गुलाबी ओठ चोरून पहायला  आवडायचं… तू बोलतं असलास की त्यांची एक मोहक हालचाल व्हायची… आणि हसलास की ती कोलगेट स्माईल माझ्या काळजाची वाट लावायची… ती हलकीशी खळी ही माझ्या नजरेतून सुटली नव्हती, ते चॉकलेटी डोळे, कलत्या उन्हात असे काही दिसायचे की तुला उभं करून रोज पन्नास फोटो काढायचा मूड व्हायचा… त्या जाडसर भुवया आणि दाट पापण्या..
हे असं love at first sight होणं हेच असेल का?
त्यात तुझी ती modifay बाईक… आई गं… इतकी सुंदर पेंट केली होतीस…
तुमचा ग्रुप बघून मला तू नेहमीच राजबिंडा वाटलास..
हा फक्त तुझी खुरटी दाढी, रोखून बघणारी नजर पाहिली की काळजात लकलकायचं..

हम भी कुछ कम ना थे…  लांब केस, तुझ्याइतकी नै पण गोरीच..  डोळे मात्र मॅचिंग मॅचिंग चॉकलेटी..  आणि ओठ ही नाजूक.. दिसायला चिकणीच… उंचीत जरा मार खाल्ला मी
तुमच्या गँग नी कधीच कुणाची छेड काढली नाही.. उलट मुली जाताना दिसल्या की माना वळवून भलत्याच विषयावर बोलाण व्हायचं..
मी ही संध्याकाळी मुद्दाम तुला पहायला, दळण, भाजी (कधी कधी शेजाऱ्यांची फुटकळ कामं काढून 😜) ये जा करायची
सोबतीला माझी मैत्रीण ( उगा तिची फरफट 🙄🤭)
पण काय तो तुझा माज 🙄🥴 बघायचास नाही माझ्याकडे
बारीक झाले मी खेटे घालून तू मात्र स्थितप्रज्ञ..
मग मी सायकल वरून ट्रिंग ट्रिंग करत चकरा मारल्या..
तरी ही दुर्लक्षच…
मग ठरवलं आता ह्याला बघायला भाग पाडायचच..
मी माझ्या बाबांची ची बाईक शिकले
आणि शायनींग मारत मुद्दाम तुझ्यासमोर आले..
पण हाय रे कर्मा!!!!
नेमका तू ज्या बाईक वर बसला होतास त्यालाच येऊन धडकले..
आतून इतकी घाबरले…
वाटलं .. काय हे ढमे.. ‘आपल्या’ च गाडीचं नुकसान केलंस   (तू माझा हे माझं ठरलंच होत ना 😜😜)
आणि मगं पडल्यावर मुद्दाम बेहोशी का बहाना…
या वेळी मात्र तू बधलास…
प्रसंग गंभीर आहे हे कळून मला उचलायला धावलास…
मी ओके होते… पण तू हातांनी उचलून घेतलंस आणि असलं भारी वाटलं म्हणून सांगू…
मैत्रिण जाम घाबरलेली..
तसंच मला जवळच्या क्लिनिक मधे नेलस…
शी… ते ही मेलं जवळच होतं…
असू दे… तरी   …  ‘तेरी बाहों में झुलने का मजा ही कुछ और था..
मी पडताना माझ्या डोक्याला जखम झाली होती…
मग मी ही मेमरी लॉस नाटक केलं…
कसला घाबरला होतास…
तासभर तिथे माझ्या उशाशी बसून होतास..
तुझ्या डोळ्यातलं पाणी मला बरंच काही सांगून गेलं…
😜 मी हळूच डोळे उघडून बघत होते..
जाग आली (नाटकच ते ही )
आणि मी कुणालाही ओळख दाखवली नाही…
में कहा हूं… अशी overacting… बरी जमली..
मग आई आली… बाबा परगावी होते…
तिला ओळख द्यावी लागली…
ती मला घेऊन घरी आली…
सोडायला तू आला होतास…
रिक्षात तुला नं पाहता बसणं ही शिक्षा होती… गाडीचंही नुकसान झालं नै आपल्या🙄🤭
मग तुला रोज यायचास…
माझ्या घरच दळण, भाजी…  सबकुछ कामं तु करायचास… मी आराम… आलास की दुर्लक्ष… छळायलाच हवं… तू नै छळलस . 😉
एक दिवस मग आई आणि बाबांनी माझ्यावर तो बॉम्ब फोडला..
माझं लग्न ठरवलंय सांगितलं..
तुझं येणं बंद झालं होतं..
हाय…  मला इतका राग आला…
मी जाम कटकट केली
आणि तरातरा घरातुन बाहेर पडले..
तु नेहमी सारखाच कट्ट्यावर दिसलास..
मित्रांच्या गराड्यात..
सरळ येऊन तुझ्या समोर उभी राहिले..
आणि रडत धुमसत विचारलं तुला
Will u marry me?
तू काहीही नं बोलता निघून गेलास..
मी तशीच रडत धुसफुसत घरी..
आईबाबांना म्हणाले… मी तयार आहे लग्नाला..
आई म्हणाली.. फोटो बघ त्याचा..
मी घुश्श्यात… नको… थेट मांडवात दिसेलच ना
अगं भेटणं होऊ दे तुमचं…
थेट लग्न लावतात का?
मग भेटायचा दिवस ठरला
सगळी तयारी जोरदार चालू होती
ऐकून होते हॅन्डसम आहे,
स्वतः चा व्यवसाय आहे,
आणि बरंच काही…
पण मला मात्र तूच आवडला होतास
आता त्या राजकुमारात मला काय इंटरेस्ट 🙄
पण त्या दिवशी तो आला… मी चहा घेऊन समोर… नं बघताच त्याला चहा ऑफर केला…
आणि चक्क त्यानं गुडघ्यावर बसून विचारलं..
माझी बायको होशील?
मी आवाज ऐकून हादरले…
त्याला पाहिलं… आणि आई बाबा कुणाचीही तमा नं बाळगता
चक्क मिठीतच शिरले…
नालायक… दुष्ट…. तूच होतास..
मग कळलं गेल्यावर्षी मामाच्या घराजवळ तू राहायला होतास
तिथेच मला पाहिलंस आणि प्रेमात पडलास…
आई बाबा सगळ्यांना पटवलंस…
आणि मी हे कळताच लाजून आत पळाले…
आता मात्र हक्कानी आत आलास …
पाठमोऱ्या मला अलगद बिलगलास
तुझे उष्ण श्वास माझ्या मानेवर जाणवू लागले आणि
माझं काळीज धडधडू लागलं…
मी वळवून माझा चेहरा ओंजळीत धरलास
आणि अलगद तुझ्या प्रेमाची मोहोर उमटवलीस..
मी लाजून कुशीत शिरले…
आणि तशीच तुझ्या मिठीत विरघळले..

Image by StockSnap from Pixabay 

9 thoughts on “मिल गया….

  • November 10, 2020 at 7:25 pm
    Permalink

    सुंदर कथा नेहमीप्रमाणे, तुमच्या सगळ्या कथा खूप छान आहेत.

    Reply
    • November 11, 2020 at 11:41 am
      Permalink

      Thank u soo much 😍

      Reply
    • November 11, 2020 at 2:57 pm
      Permalink

      👌👌👌👌

      Reply
  • November 11, 2020 at 11:43 am
    Permalink

    Thank u soo much 😍

    Reply
  • November 11, 2020 at 6:58 pm
    Permalink

    खूपच गोड प्रेमकथा…..!!

    Reply
    • November 12, 2020 at 9:02 am
      Permalink

      ♥️♥️♥️😘

      Reply
  • November 17, 2020 at 10:15 am
    Permalink

    छान लिहिता

    Reply
  • November 17, 2020 at 4:59 pm
    Permalink

    Thank you 😍😍

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!