कधी रे येशील तू जिवलगा- भाग २

आधीच्या भागाची लिंक- कधी_रे_येशील_तू_जिवलगा.. 1

सखी आता एकटीच उरली होती… ते चांदणं… तो दुधाळ प्रकाश.. ही  शीतलता आता दाहक झाली होती.. तिचे निळसर पाणीदार डोळे भरून आले.. अन क्षणात ते झरु लागले  ….

तिच्या मनात खोलवर काहीतरी तुटलं होतं..
सहन न होऊन ती तशीच  तिथे बसून राहिली..

सखी.. हे बघ.. खरंच मला तुला दुखवायचं नव्हतं ग… पण तू..
अरे !  ही सखी कुठाय…  इतका वेळ आपण एकटेच पुढे चालत आलोय आणि आता ही एकटचं बडबडतोय… हे लक्षात येऊन सृजन थांबला.. मागे  वळून पाहातो तर ती तिथच कड्यापाशी मान खाली घालून बसलेली दिसली…
सृजन धावतच तिच्या पाशी गेला..
तिला उठवत म्हणाला… अगं इथेच बसून राहिलीस… मी  एकटाच बडबडत पुढे गेलो..
नाही… मला नाही यायचंय… जा तू… मुसमुसणारी सखी त्याच्या कडे नं पाहताच म्हणाली…
अगं.. प्लीज रडू नकोस.. तू खरच माझी खूप गोड़ मैत्रीण आहेस.. आणि तूला असं का वाटलं माझ्याबद्दल.. मला अजून कळत नाहीये.. थोडासा वेळ दे ना.. हे सगळं झेपायला .. प्लीज चल… रात्र ही खूप झालीये..
..नाही.. जा तू… प्लीज मला एकटं राहू दे..
नाहीये ना तुझ्या मनात माझ्याबद्दल काही.. मग आता कशाला काळजी करतोयस.. जा… आणि i m sorry… उगाच प्रपोज करून तुला दुखावलं…
त्यानी अनेक मिनतवाऱ्या करूनही ती ऐकेना..
शेवटी तो खाली वाकला.. आणि तिला तशीच उचलली.. अरे .. अरे.. सोड.. मी पडेन  ना.. सुज्या सोड रे..
सखी आता खाली उतरवण्यासाठी मिनवत होती.. पण आता हा इरेला पेटला…
ऐकलं नाहीस ना… आता अशीच उचलून नेतो… म्हणत हळू  हळू टेन्ट च्या दिशेनी चालू लागला.. त्या धुंद वातावरणात त्यांना असं येताना पाहून निशू आणि निहाल ला जाम आनंद झाला… आयला… हा..आणि  चक्क  हो म्हणाला… निशू तर सखी आणि सृजन च्या दिशेनी धावतच सुटली…

अरे… काय छुपा रुस्तुम निघालास रे…  लगेच हो म्हणालास… माझ्या परीला… thank u… thank u soo  much.. सुज्या… आणि त्यानी सखीला अलगद खाली उतरवलं… पण हिचे डोळे का असे रडल्यासारखे दिसतायत… म्हणत निशूनी तिला जवळ घेतलं… सखीचा बांध फुटला… पुन्हा हमसून हमसून रडायला लागली…
निशू आणि निहाल गोंधळली… पुन्हा एकदा सृजन  काहीही नं सांगता तिथून निघून गेला..
आणि स्लीपिंग बॅग मधे जाऊनं झोपला…
सखी थोडी सावरली… तिनं घडलेल सगळं सांगितलं..
निहाल तिला म्हणाला… हे बघ.. सखी.. शांत हो.. आपल्याला कल्पना होती त्याच्या नकाराची..पण आता हे
खूप मनाला लावून घेऊ नकोस.. शेवटी त्याच्या मनातच नसेल तर तो काहीही केलं तरी या नात्याला स्वीकारणांर नाही..
अरे पण काहीच होप्स नाहीत का?.. ती अगदीच अगतिक झाली…
थोडी वाट पाहूया… त्याला वेळ दे.. लगेच नको बोलायला..असं सांगून निहाल ही झोपायला निघून गेला..
निशू नी तिला जबरदस्ती स्लीपिंग बॅग मधे ओढलं… आणि तिला हलकेच थोपटू लागली.. ती निःशब्दता.. नीरव शांतता.. तिला अस्वस्थ करत होती…
सकाळी त्या दोघींनी परत जायचा निर्णय घेतला.. आणि मग.. ह्यांनी ही प्लॅन  रद्द केला … आता सगळे एका सुमो. मधून परतीच्या प्रवासाला निघाले.. गाडीत आधीच 2 प्रवासी होते त्यामुळे.. सखी आणि सृजन ला शेजारी बसाव  लागलं…. आणि रात्री च्या जागरणामुळे ती पेंगुळली… सृजन नी अलगद पणे हात तिच्या माने मागे ठेवला आणि त्याच्या खांद्यावर ती निजून गेली.. मधे चहासाठी गाडी थांबली आणि तिची झोप मोडली.. बघते तर ती almost त्याच्या छातीवर डोकं ठेवून निजली होती…. आणि आता त्याला झोप लागलेली.. तिनं ही अलगद त्याच्या मानेमागे हात दिला..
निशू मागून सगळं बघत होती.. पण सखीच असं गुंतणं तिला आवडत नव्हतं.. तिनं खुणेनं तिला दटावलं पण ऐकेल ती सखी कुठली?..

काही तासात ते परत पोचले.. सगळे निहालच्या घरी आले… फ्रेश होऊन.. लंच करूनच जा दोघी.. म्हणत त्यानं त्याच्या कामवाल्या मावशींना स्वैपाक करायला सांगितला..
सखी.. तिला सृजन ची हाक आली.. पण प्रतिसाद द्यावा तरी कसा हे नं कळून ती गप्पच राहिली..
सृजन जवळ आला.. तशी ती सोफ्याच्या काठा कडे सरकली.. तो शेजारी येऊन बसला.. बोल ना ग… अजून राग नाही गेला का?..  बोल ना … त्याची आर्जव आता तिला बेचैन करत होती.. पण निशूला वचन दिलं होतं.
अजिबात बोलणार नाही.. होऊ दे कि त्याला ही त्रास.. तस खुळं वय ते… प्रगल्भता कशी येणार.. आता सुज्यानी तिला जवळ घेतलं आणि एखाद्या लहान मुलाला समजवतात तस बोलू लागला.. ऐक  ना… किती सुंदर नातं आहे… तुझं माझं.. मैत्रीचं.. मला नाही ग ते गमवायचं… आणि मला ह्या प्रेमाच्या भानगडीत पडायचच नाहीये..

तुला दुसरी कुणी आवडते का रे?  तिचा भाबडा प्रश्न ऐकून त्याला हसूच आलं.. नाही ग बाई.. पण आता हा विषय बंद कायमचा… प्रत्येकाला एक भूतकाळ असतो… आणि काही वेळा तो इतका गडद असतो कि तुम्हाला त्याला विसरता येत नाही…

असं काय घडलंय.. सांग ना… आता मैत्रीण म्हणतोस ना. मग सांग कि… सखी नं पुन्हा त्याला छेडलं..

त्यानं रोखून तिला पाहिलं आणि चिडलेल्या स्वरात म्हणाला.. कशाला पुन्हा पुन्हा त्रास देतीयेस.. नकोय मला तुझी मैत्री सुद्धा… जातो  मी..

त्याचं  हे रूप पाहून ती जाम घाबरली…
आणि थांब.. थांब म्हणत त्याच्या मागे धावली… पण तो लिफ्ट मधे शिरला आणि निघून गेला… ती पोचे पर्यंत दार बंद झालेलं..  काय असेल याचा भूतकाळ,,?..असा विचार करत मागे फिरली…
क्रमश:
©मानसी

पुढील भागाची लिंक- कधी रे येशील तू जिवलगा- 3

Image by Gerd Altmann from Pixabay 

One thought on “कधी रे येशील तू जिवलगा- भाग २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!